Samvedana Kendra

Samvedana Kendra Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Samvedana Kendra, Charitable organisation, Latur.

3 ऑक्टोबर राष्ट्रीय व  6 ऑक्टोबर जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमीत्त दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रँली संपन्न              ...
05/10/2024

3 ऑक्टोबर राष्ट्रीय व 6 ऑक्टोबर जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमीत्त दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत रँली संपन्न
समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद, लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, लातूर, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल लातूर येथे सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग, दिव्यांग मुलांसोबत चालण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त श्री. अविनाश देवसटवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. संतोषकुमार नाईकवाडी, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. इंगोले, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे श्री. डॉ. योगेश निटुरकर, वैसाका श्री. राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार श्री. बाळासाहेब वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. अविनाश देवसटवार यांनी सर्व सेरेब्रल पाल्सी दिव्यांगांना शुभेच्छा दिल्या. तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. संतोषकुमार नाईकवाडी यांनी सर्व सेरेब्रल पाल्सी दिव्यांग व्यक्तींना शुभेच्छा दिल्या व समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरिता सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सेरेब्रल पाल्सी या विषयावर श्री. डॉ. योगेश निटुरकर यांनी माहिती दिली. यामध्ये सेरेब्रल पाल्सी म्हणजे मेंदुचा पक्षाघात होय. नवजात अर्भकाचा जन्म होताना मेंदुला ऑक्सीजन कमी पडणे हे त्याचे प्रमुख कारण आहे. याचे त्वरीत निदान होणे महत्वाचे आहे. निदान झाल्यानंतर नियमित फिजिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी बालकांची करुन घेणे हे अत्यंत महत्वपूर्ण आहे. शिशु किंवा बाल्याअवस्थेमध्ये अशा थेरपीचा खुप चांगला परिणाम व उपयोग होतो. दुर्देवाने याचे महत्व पालकांच्या लक्षात न आल्यामुळे पाल्याच्या दीर्घकालीन जीवनातील अडथळ्याला सामौरे जावे लागते.
व्यसनमुक्ती तथा अमली पदार्थ सेवन विरोधी सप्ताह च्या निमीत्ताने समाजकल्याण विभागातील वैसाका श्री. राजू गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने दिव्यांगांसाठी स्वतंत्र क्रीडांगण उपलब्ध करुन, पँरॉऑलिंपीक ची पुर्वतयारी करुन देण्याचा मानस जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. इंगोले साहेब यांनी व्यक्त केला.
मान्यवरांच्या हस्ते रँलीला हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करण्यात आले. रँलीकरिता लातूर शहर व परिसरातील दिव्यांगांच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थी, एम आय टी फिजीओथेरपी महाविद्यालयाचे विद्यार्थी, हासेगाव येथील फिजीओथेरपी महाविद्यालयाचे विद्यार्थी, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ लातूर उपकेंद्र येथील एम एस डब्लु चे विद्यार्थी उपस्थित होते. रँलीच्या आयोजनासाठी सर्व दिव्यांग शाळांमधील मुख्याध्यापक, विशेष शिक्षक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे बस्वराज पैकै, सौ. शितल हिप्परगेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री. व्यंकट लामजणे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे यांनी केले.

दिव्य कला मेळा पुणे                                                                                                     ...
28/09/2024

दिव्य कला मेळा पुणे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, भारत सरकार यांच्या वतीने दि. 28 सप्टेंबर 2024 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान “दिव्य कला मेला” या कार्यक्रमाचे आयोजन पीडब्ल्युडी ग्राऊंड, न्यु सांगवी, पिंपरी चिंचवड, पुणे येथे करण्यात आले आहे. 100 पेक्षा अधिक राज्यातील विविध संस्था, दिव्यांग उद्योजक यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आले आहे. दिव्यांगांकरिता आवश्यक कृत्रिम साहित्य वितरण करण्यासाठी मोजमाप शिबीर या ठिकाणी घेण्यात येत आहे. देशातील विविध राज्यांमधील दिव्यांग कलाकारांच्या केलेचे सादरीकरण येथे होणार आहे. दिव्यांगांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय न्यास च्या सहयोगाने
रा.स्व.संघ जनकल्याण समिती संवेदना प्रकल्प, हरंगुळ (बु) संचलित, जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र (घरोंदा), नदी हत्तरगा ता.निलंगा जि.लातूर या प्रकल्पास या महत्वाच्या शिबीरामध्ये स्टॉल लावण्याची संधी मिळाली आहे. घरोंदा मधील बौद्धिक दिव्यांग व्यक्तींनी उत्पादित केलेल्या वस्तु व माहितीचा स्टॉल “दिव्य कला मेला” या कार्यक्रमामध्ये लावण्यात आला आहे. या स्टॉलवर घरोंदा प्रकल्पातील विशेष शिक्षक, विद्यार्थी, पालक यांची उपस्थिती आहे.

आज गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 भारताचा स्वातंत्र्य दिन    🇮🇳   रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचलित, 'संवेदना' प्रकल्पामध...
16/08/2024

आज गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 भारताचा स्वातंत्र्य दिन 🇮🇳 रा. स्व. संघ जनकल्याण समिती संचलित, 'संवेदना' प्रकल्पामध्ये स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. लातूर येथील डॉ. पद्मावती बियाणी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर प्रकल्पाचे सदस्य, कर्मचारी यांच्यासमोर फिटल मेडिसीन (Fetal Medicine) या विषयावर व्याख्यान झाले. वैद्यकीय शास्त्रातील नवीन तंत्रज्ञानामुळे फिटल मेडिसीन चा उपयोग केल्याने प्रतिबंधात्मक उपाय अथवा उपचार केल्यामुळे निरोगी नवजात अर्भकाचा,/ शिशुचा सांभाळ चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो. गर्भवती मातेच्या आधुनिक सोनोग्राफीच्या माध्यमातून तपासणी व तत्सम विषयाच्या तपासण्या वेळेपूर्वी करण्याचे महत्त्व त्यांनी विषद केले. याप्रसंगी प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, उपाध्यक्ष श्री श्रीराम देशपांडे ,कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आरोग्य शिबीर दि. 09 ऑगस्ट 2024         संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र , लातूर या...
13/08/2024

आरोग्य शिबीर दि. 09 ऑगस्ट 2024

संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र , लातूर यांच्या संयुक्त विद्यामाने शुक्रवार दि. 09 ऑगस्ट 2024, रोजी लातूर जिल्ह्यातील सेरेब्रल पाल्सी प्रवर्गातील मुलांची आरोग्य तपासणी शिबीर डॉ.संदिकर यांच्या हॉस्पिटल मध्ये घेण्यात आले. या साठी ज्युपिटर हॉस्पिटल, मुंबई येथील पेडियाट्रिक ऑर्थोपेडीक तज्ञ व विभाग प्रमुख डॉ. तरल नागदा, डॉ.प्रवीण विश्वकर्मा, पेडियाट्रिक फ़िजिओ थेरापिस्ट - डॉ.अंशी उपाध्याय, डॉ. अमिना मार्कर व ओपीडी सहाय्यक श्री.वीरेंद्र जैन यांनी उपचार करून पालकांना मार्गदर्शन केले.
आरोग्य देवता धन्वंतरी चे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ.राजेश पाटील, उपाध्यक्ष श्री.ॲड.श्रीरामजी देशपांडे,संपर्क प्रमुख श्री.सुरेश दादा पाटील,समिती सदस्य डॉ.श्रीनिवास संदिकर,समाज कल्याण विभागाचे वै.सा.का.श्री. राजू गायकवाड उपस्थित होते. प्रास्ताविक व परिचय व उद् घाटनाचे सूत्र संचालन डॉ.आरती संदिकर यांनी केले. या शिबिरामध्ये ऐकून 53 दिव्यांग मुलांची तपासणी करण्यात आली. यातील 15 विदयार्थाना शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सुचविले. मुलांचे व्यायामा, औषधे,शिक्षण मुलांच्या वाढी विषयीच्या सर्व शंकांचे निरसन डॉक्टरांनी केले. हे शिबीर परिणामकारक होणयासाठी प्रकल्प समिती सदस्य,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.दीपा ताई पाटील, फ़िजिओ थेरापिस्ट डॉ.मयुरी बिल्लावार, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

दि. 6, 7 सप्टेंबर 2024 रोजी 'संवेदना' शाळा हरंगुळ (बु.) व जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र (घरोंदा), नदिहात्तरगा जि. ला...
07/08/2024

दि. 6, 7 सप्टेंबर 2024 रोजी 'संवेदना' शाळा हरंगुळ (बु.) व जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र (घरोंदा), नदिहात्तरगा जि. लातूर येथे ऑक्युपेशनल थेरपी चे शिबीर आयोजित करण्यात आले होते. बौद्धिक दिव्यांग, डाऊन सिंड्रोम, आत्ममग्न मुलांसाठी ऑक्युपेशनल थेरपी महत्वाचे आहे. मुले, पालक, काळजीवाहक, विशेष शिक्षकांना हा विषय अवगत करीत असताना डॉ. रागिनी शर्मा.

संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा, हरंगुळ (बु) लातूर आणि जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र (घरोंदा), किल्लारी कारखान्याच्य...
06/08/2024

संवेदना बहुविकलांग मुलांची शाळा, हरंगुळ (बु) लातूर आणि जनकल्याण दिव्यांग पुनर्वसन केंद्र (घरोंदा), किल्लारी कारखान्याच्या मागे, नदी हत्तरगा जि.लातूर येथे दीप आमावस्या च्या निमीत्ताने दिव्यांग विद्यार्थ्यांनी दीपोत्सव साजरा केला. या प्रसंगी प्रकल्पातील फिजीओथेरपीस्ट, स्पीच थेरपीस्ट, विशेष शिक्षक, आय टी आय मधील शिल्प निदेशक, आय टी आय चे प्राचार्य, शाळेच्या मुख्याध्यापिका, समन्वयक यांची उपस्थिती होती.

संवेदना प्रकल्पाचे कार्य" दिव्यांग व्यक्तीसाठी महत्वपुर्ण आहे.  मा.ना.मनसुखभाई मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री, भारत सरक...
21/02/2024

संवेदना प्रकल्पाचे कार्य" दिव्यांग व्यक्तीसाठी महत्वपुर्ण आहे. मा.ना.मनसुखभाई मांडवीय, केंद्रीय आरोग्य मंत्री, भारत सरकार
संवेदना प्रकल्पाच्या वतीने दिव्यांगांसाठी फिजीओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, विशेष शिक्षण,विविध श्रेणीतील घटकांसाठी प्रशिक्षण चालते. दिव्यांगांसाठी संवेदना दिव्यांग औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात आली आहे यामुळे दिव्यांगांना रोजगार निर्मिती होणार आहे. दिव्यांगांसाठी सुसज्ज अशा इमारतीमध्ये सुरु असणारे संवेदना चे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे.असे प्रतिपादन मा.ना.मनसुखभाई मांडवी, केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री यांनी केली. संवेदना प्रकल्पास भेट देवून सर्व उपक्रमांची माहिती घेतली. दिव्यांग विद्यार्थ्यांना वर्गामध्ये जाऊन वार्तालाप केला. सोबत लातूर चे मा. खासदार सुधाकर शृंगारे , प्रकल्पाचे अध्यक्ष डाॅ.राजेश पाटील, कार्यवाह डाॅ योगेश निटुरकर, संपर्क प्रमुख श्री सुरेशदादा पाटील होते. दिव्यांगांसाठी वैश्विक कार्ड काढण्यासाठी वरीष्ठ अधिकारी यांची बैठक घ्यावी. आदी विषयांबाबत केंद्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य श्री. सुरेशदादा पाटील यांनी मंत्री महोदयांना विनंती केली.
प्रसंगी जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. संतोषकुमार नाईकवाडी, श्री राजु गायकवाड, श्री वेजीनाथ व्हनाळे, मुख्याध्यापिका सौ. दीपा पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

Address

Latur
413531

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samvedana Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share