शेतकरी संघटना लातुर

  • Home
  • India
  • Latur
  • शेतकरी संघटना लातुर

शेतकरी संघटना लातुर भीक नको, घेऊ घामाचे दाम!

वगळलेल्या ट्रिगरचा पीक विमा योजनेत समावेश करा; शेतकरी संघटनेची मागणी••••••••••••••••••••••••••••••••२०२५ थकित पीक विमा त...
21/04/2026

वगळलेल्या ट्रिगरचा पीक विमा योजनेत समावेश करा; शेतकरी संघटनेची मागणी
••••••••••••••••••••••••••••••••
२०२५ थकित पीक विमा तात्काळ द्या
••••••••••••••••••••••••••••••••
प्रतिनिधी - पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर नुकसान भरपाई देणारे ट्रिगर/ जोखमीच्या बाबींचा येणाऱ्या हंगामात समावेश करावा व २०२५ ची पीक विमा नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना द्यावी. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना तथा स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लातूर यांना देण्यात आला आहे.
२०२५ पासून राज्य सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेत बदल करुन शेतकऱ्यांना वैयक्तिक स्तरावर नुकसान भरपाई मिळवून देणारे ट्रिगर/ जोखमीच्या बाबी वगळलेल्या आहेत.फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई देण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.निसर्गाच्या असमतोलामुळे पर्जन्यमान अनिश्चित झाले आहे.त्यामुळे कधी पेरणी वेळेवर होत नाही.तर कधी एकदम कमी तर कधी एकदम जास्त पाऊस होऊन पिकांचे नुकसान होते.तर अनेक वेळा तांबेरा, लष्करी अळी, गोगलगाय यांसारखी आपत्ती येऊन नुकसान होत आहे.किंवा पीकांची काढणी झाल्यानंतर आवकळी पाऊस,गारपीट होऊन पिकांचे नुकसान होत आहे.मात्र सरकार पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई देत असून, काही निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर पीक कापणी प्रयोग घेऊन संपूर्ण मंडळ किंवा तालुक्याच्या नुकसानीचा अंदाज लावत आहे.हा अंदाज बहुतांश चुकीचा ठरला आहे.एकाच गावात,एकाच शिवारात काही भागात गारपीट होऊन पिकांचे नुकसान होत आहे,तर एका भागात पाऊसच पडला नाही म्हणून पीके वाळत आहेत अशी निसर्गाची परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे सरकारने वगळलेल्या १)पेरणी न होणे,२) स्थानिक आपत्ती३) हंगामातील प्रतिकुल परिस्थिती ४) काढणीपश्चात नुकसान या जोखमीच्या बाबींचा समावेश पीक विमा योजनेत करणे आवश्यक आहे.तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल अन्यथा पीक विमा योजनेतू फक्त विमा कंपनीचेच भले होईल,असा आरोप सरकारवर केला आहे.
तसेच २०२५ चार थकित पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही.मा. मुख्यमंत्री महोदयांनी खरिप हंगामात अतिवृष्टीमुळे पीकांचे नुकसान झाल्यानंतर हेक्टरी किमान १७०००/- रुपये विमा भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते अद्याप हवेतच विरले आहे.असेही संघटने निवेदनात म्हटले आहे.जर येणाऱ्या हंगामात वगळलेल्या ट्रिगरचा समावेश करण्याचा निर्णय आठ दिवसांत नाही घेतला व २०२५ च्या विम्याचा विषय मार्गी नाही लावला,तर शेतकरी संघटना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात तिव्र आंदोलन करेल असा इशारा शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष कल्याणाप्पा हुरदळे, जेष्ठ नेते हरिश्चंद्र सलगरे,निलंगा तालुका उपाध्यक्ष करण भोसले यांनी दिला आहे.

वायदे बाजार बंदी शेतकऱ्यांवर अन्यायकारकच...
05/04/2026

वायदे बाजार बंदी शेतकऱ्यांवर अन्यायकारकच...

 #कर्जमाफी
30/03/2026

#कर्जमाफी

फसवी कर्जमाफी शेतकरी नेत्याचा संताप #कर्जमाफी ...

17/10/2025
21/09/2025
सरकारने शेतकऱ्यांना आजपर्यंतची लुट-वापशी करावी.सध्या गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह देशभरात अतिवृष्टीमुळे जमीनीचे व ...
21/09/2025

सरकारने शेतकऱ्यांना आजपर्यंतची लुट-वापशी करावी.

सध्या गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रासह देशभरात अतिवृष्टीमुळे जमीनीचे व पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जरी हे आस्मानी संकट असले तरी अशा संकटाच्या काळात तग धरुन राहु शकेल अशी अवस्था सरकारने शेतकऱ्यांच्या घरात निर्माण होऊ दिली नाही.ज्या ज्या वेळी निसर्गाच्या कृपेने पिक पाणी चांगले झाले, जागतिक बाजारपेठेत शेतीमालाला चांगला भाव मिळून शेतकऱ्यांच्या खिशात दोन पैसे शिल्लक राहतील अशी परिस्थिती निर्माण झाली.त्या त्या वेळी सरकारने निर्यात बंदी घातली,देशांतर्गत साठ्यांवर मर्यादा घातली,तर दुसऱ्या देशातून अधीक भावाने शेतीमाल खरेदी करुन आपल्या देशात कमी भावाने पुरवठा केला.त्याचाच परिणाम म्हणुन शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरुन निघाला नाही.शेतकरी कर्जबाजारी झाला.त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात शिल्लक नसल्याने अशा नैसर्गिक संकटांचा सामना करण्याची आर्थिक क्षमता शेतकऱ्यांमध्ये तयार होऊ शकली नाही.म्हणून सरकारने अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत केली पाहिजे, जे की आजपर्यंत शेतकऱ्यांच्या केलेल्या लुटीतूनच द्यायची आहे.त्याकरीता एकरी ५०,०००/- रु. मदत सरकारने सरसकटपणे कुठलीही अट न घालता केली पाहिजे.अन्यथा शेतकऱ्यांची तरुण पिढी सरकारचा हिशोब चुकता केल्याशिवाय राहणार नाही.

- रुपेश शंके
युवा जिल्हाध्यक्ष - शेतकरी संघटना लातूर

आज तिवटग्याळ पाटी, उदगीर येथे नाफेड मार्फत हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीला मुदत व खरेदी मर्यादा वाढवून मिळावी व न...
29/01/2025

आज तिवटग्याळ पाटी, उदगीर येथे नाफेड मार्फत हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदीला मुदत व खरेदी मर्यादा वाढवून मिळावी व नोंदी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी व्हावी,यासाठी शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.कारण सध्या बाजारात सोयाबीनला ४०००/- रु. पेक्षा कमी भाव मिळत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरुन निघत नाही.एकीकडे सरकार शेतकऱ्यांना बाजार पेठेचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य देत नाही.जागतिक बाजारात मागणी व किंमत चांगली असल्यास निर्यात बंदी घालते,तर कधी अनावश्यक आयाती करुन शेतीमालाचे भाव पाडत आहे.मग शेतकऱ्यांनी करायचं कसं? म्हणून आमच्या शेतीमालाचे भाव सरकार ठरवत आहे,तर सरकारने जाहीर केलेल्या भावानेच आमचा शेतीमाल करावा.अन्यथा शेतकऱ्यांना स्वातंत्र्य द्यावे!

 #किसानआंदोलन गेल्या 42 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कडाक्याच्या थंडीत आमरण उपोषण करीत असलेले सरदार जगजित...
06/01/2025

#किसानआंदोलन
गेल्या 42 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी कडाक्याच्या थंडीत आमरण उपोषण करीत असलेले सरदार जगजितसिंग डल्लेवाल यांची आज शेतकरी संघटनेचे नेते तथा स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, महिला आघाडी अध्यक्षा सीमाताई नरोडे, लातूर युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, घनसावंगी तालुकाध्यक्ष विश्वंभर भानुसे यांनी भेट घेतली.
पंजाब -हरियाणा बॉर्डर (खनौरी बॉर्डर) येथे शेतकरी त्यांच्या मागण्या घेऊन दिल्लीकडे जात असताना, पोलिस बळाचा वापर करुन त्यांना तेथेच अडवून ठेवण्यात आले आहे.त्यामध्ये एका तरुण शेतकऱ्याला गोळी लागून त्याचा जिव गेला.सुमारे दहा हजार शेतकरी पंजाब -हरियाणा बॉर्डर वर अत्यंत कडाक्याच्या थंडीत बसले आहेत.तर सरदार जगजितसिंग डल्लेवाल हे गेल्या 42 दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत.त्यांची तब्येत अत्यंत खराब आहे.तरीही सरकार त्यांच्याशी बोलायला तयार नाही.शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या गप्पा मारणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी साधी चर्चा करायलाही तयार नाहीत.ते शेतकरी काय या देशाचे नागरीक नाहीत, माणूस नाहीत?
अशा पद्धतीने शेतकरी आंदोलनाची अवहेलना करणाऱ्या #केंद्र_सरकारचा_जाहीर_निषेध‌...

Address

Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शेतकरी संघटना लातुर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share