NAAL Foundation , UJANI

NAAL Foundation , UJANI कल्याणकारी और सुख प्रदान करने वाली मातृभूमि की सेवा हम सदैव करते रहे ।

19/02/2026
Wish you happy DIPAWALI to all Indians.,....
21/10/2025

Wish you happy DIPAWALI to all Indians.,....

01/10/2025

सदैव सत्य की जय हो ।
दशहरा की सभी को हार्दिक शुभकामनाएं ।

विनम्र अभिवादन
27/09/2025

विनम्र अभिवादन

03/09/2025

I am delighted to share the launch of our official website.

Websirte Link:

Web site created using create-react-app

नाळ फाउंडेशन उजनी ची पंच वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सदर सभेत सर्व सदस्यांनी एकमताने अध्यक्ष म्हणून ॲड. सचिन ढवण...
04/08/2025

नाळ फाउंडेशन उजनी ची पंच वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. सदर सभेत सर्व सदस्यांनी एकमताने अध्यक्ष म्हणून ॲड. सचिन ढवण यांची तर उपाध्यक्ष म्हणून श्री महेश मुळे तसेच सचिव म्हणून श्री सोमनाथ मुकडे, सह सचिव म्हणून ॲड सचिन सलगरे व कोषाध्यक्ष म्हणून श्री प्रशांत शिंदे यांची पुढील पाच वर्षा साठी एकमताने बिनविरोध फेर निवड करण्यात आली. याप्रसंगी सर्व सदस्यांनी त्यांचा सत्कार केला.

*उजनी येथे नाळ फाउंडेशनचा शिष्यवृत्ती प्रदान सोहळा उत्साहात साजरा* औसा तालुक्यातील उजनी येथील श्री गणेश शिक्षण संस्थेच्य...
03/08/2025

*उजनी येथे नाळ फाउंडेशनचा शिष्यवृत्ती प्रदान सोहळा उत्साहात साजरा*
औसा तालुक्यातील उजनी येथील श्री गणेश शिक्षण संस्थेच्या,गणेश विद्यालय शाळेत थोराजीराव बापूराव चव्हाण सर शिष्यवृत्ती प्रदान समारंभ सोहळा शनिवार दि.०२ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजता गावचे ग्राम दैवत श्री गणेशनाथ महाराज मंदिर सभागृह येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे म्हणून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी चे माजी कुलगुरू उजनीचे सुपुत्र डॉ.अशोक ढवण,श्री गणेश शिक्षण संस्था उजनी चे सचिव धनराज पाटील तसेच श्री.गणेश विद्यालय उजनी चे मुख्याध्यापक प्रविण कोपरकर हे उपस्थित होते की कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नाळ फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन ढवण हे उपस्थित होते.
श्री.गणेश विद्यालयाचे १९९८ सालच्या १० वी बॅच चे माजी विद्यार्थी प्रशांत थोराजीराव चव्हाण व त्यांच्या मित्र परिवाराने एकत्र येत स्थापन केलेल्या नाळ फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून चव्हाण परिवार गेली ४ वर्षे गणेश विद्यालयातील १० वी उत्तीर्ण हुशार, होतकरू व गरजवंत विद्यार्थी,विद्यार्थीनीस २१ हजार रुपये हे थोराजीराव बापूराव चव्हाण सर शिष्यवृत्ती म्हणून प्रदान करत आहेत.नाळ फाउंडेशन उजनी या संस्थे तर्फे दरवर्षी गरजू,हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक विकासासाठी अशा प्रकारची आर्थिक मदत करत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.त्याचा फायदा गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना होतो.अनेक विद्यार्थ्यांनी या मदतीचा फायदा आपल्या शैक्षणिक विकासासाठी करून घेतला आहे.आतापर्यंत २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे.याही वर्षी नुकतेच गणेश विद्यालय शाळेतील ५ गरजू विद्यार्थ्यांना नाळ फाउंडेशन यांच्या वतीने शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.एस एस सी बोर्ड परीक्षेत ज्या विद्यार्थ्याने उत्कृष्ठ गुण घेतलेले आहेत,पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरी भागात राहून शिक्षण घेण्यास तयार आहेत अश्यांना त्यांची घरची आर्थिक परिस्थिती पाहून शिष्यवृत्ती साठी पात्र ठरविले जाते.नाळ फाउंडेशन चे सदस्य,सिनिक्रॉन टेक्नोलॉजीस् चे संचालक प्रशांत चव्हाण यांनी शिष्यवृत्ती धारकांची नाव घोषित केली.यावर्षी मुलींनीच बाजी मारली असून शिष्यवृत्तीची मानकरी कु.श्रेया मारूती ढवण ही विद्यार्थीनी ठरली.तिने सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात झालेल्या एस .एस .सी परीक्षेत ९०.६० % गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला.या करीता नाळ फाऊंडेशन च्या वतीने २१००० ₹ चा धनादेश देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रोत्साहनपर बक्षिस म्हणून प्रतिक रविंद्र गायकवाड ,कु श्रद्धा सचिन मोहिते ,कु शिवकन्या संजय उमाटे ,कु प्रतिक्षा लक्ष्मण मुकडे या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी २१०० ₹ चा धनादेश देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.नाळ पाऊंडेशन चे उपाध्यक्ष महेश मुळे यांनी एस.एस.सी परीक्षेत गणित विषयात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कु श्रेया मारूती ढवण यांना २००० ₹ चा धनादेश दिला.
नाळ फाऊंडेशन चे सदस्य डॉ.अब्दूल्ला शेरीकर यांनी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी ची फार्मासिटिकल सायन्सेस या विषयामध्ये डॉक्टरेट पदवी मिळविल्याबद्दल त्यांचा नाळ फाउंडेशनच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला .
यावेळी उपस्थित गणेश विद्यालय आणि महात्मा गांधी इंग्लिश स्कूल येथील विद्यार्थ्यांना प्रमूख पाहुणे डॉ.अशोक ढवण यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या जीवनातील घडलेल्या विविध प्रसंगावर ते बोलत असताना आपले अनुभव व्यक्त केले.यश मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नामध्ये खूप अपयश पचविले मात्र प्रयत्न सोडले नाहीत.यश अपयशातून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर कसे कुलगुरू पदापर्यंत पोहचले या संदर्भात विस्तृत मार्गदर्शन यावेळी विद्यार्थ्यांना केले.
नाळ फाऊंडेशन चे अध्यक्ष ॲड.सचिन ढवण,अतिरिक्त सरकारी वकील संभाजीनगर ॲड.सचिन सलगरे, सिनिक्रॉन टेक्नोलॉजीस चे इंजिनिअर कैलाश बरदापूरे,धनराज मुकडे यांनीही विद्यार्थ्यांसमोर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन नाळ फाऊंडेशन चे सचिव
सोमनाथ मुकडे यांनी केले तसेच नाळ फाऊंडेशनचे सदस्य धनराज जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.
सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.तसेच विद्यार्थ्यांचे,पालक यांनी या मदतीबद्दल नाळ फाउंडेशन संस्थेचे आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी नाळ फाऊंडेशन चे उपाध्यक्ष श्री महेश मुळे सर , कोषाध्यक्ष श्री प्रशांत शिंदे सर , सदस्य श्री संजय जोशी साहेब , श्री गिरिष महाबोले साहेब , श्री सोपान कागे सर , श्री राहूल वाघे सर , श्री दादासाहेब पाटील सर , शिक्षक, विद्यार्थी,पालक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते .

31/07/2025

सन 2024 - 25 या शैक्षणिक वर्षातील इयत्ता 10 वीतील परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंताचा सत्कार करणे आणि शिष्यवृत्ती बहाल करण्यासाठी दर वर्षी प्रमाणे याही वर्षी नाळ फाऊंडेशन कृत ' श्री थोराजीराव बापूराव चव्हाण सर शिष्यवृत्ती योजना ' सोहळ्याचे आयोजन दिनांक 02 ऑगस्ट 2025 रोजी ठिक 10:30 वाजता संत गणेशनाथ महाराज मंदिरातील सभागृहात करण्यात आले आहे .
गुणवंतांचा सत्कार सभारंभ तसेच डॉ अशोक ढवण (माजी कुलगुरू कृषी विद्यापीठ परभणी)सरांचे उपस्थितांना मार्गदर्शन होणार आहे .
तरी या कार्यक्रमासाठी आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे . गुणवंतांच्या सत्कारामुळे विद्यार्थ्या मध्ये सकारात्मक बदल घडवून त्यांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे काम आपण सर्वजण उपस्थित राहून करावयाचे आहे .
तरी उजनी नगरीतील सर्व ग्रामस्थांना, मित्रपरिवाराला विनंती की आपण सर्व कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी .
धन्यवाद 🙏
आपले विनित
नाळ फाऊंडेशन उजनी

Address

Ujani
Latur
413520

Telephone

+918975736969

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NAAL Foundation , UJANI posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to NAAL Foundation , UJANI:

Share