Arvind Patil Nilangekar Followers

Arvind Patil Nilangekar Followers सबका साथ, सबका विकास

07/05/2026
मराठवाड्याच्या आंब्याचा शाही थाट आदरणीय आ. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांच्यासोबत अनुभवूया आज संध्याकाळी फेसबुक लाईव्ह ...
07/05/2026

मराठवाड्याच्या आंब्याचा शाही थाट आदरणीय आ. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांच्यासोबत अनुभवूया आज संध्याकाळी फेसबुक लाईव्ह द्वारा...

https://www.facebook.com/share/1Cn65cmmsH/

'समृद्ध शेतकरी अभियाना'चा जागर गावोगावी!समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत निलंगा, देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा, फ...
07/05/2026

'समृद्ध शेतकरी अभियाना'चा जागर गावोगावी!

समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत निलंगा, देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा, फक्राणपूर, शेंद (उ), नागेवाडी, केळगाव, औराद (शा), सुमठाणा, डिगोळ, सिंधीकामठ, दादगी आणि मानेजवळगा या गावांमध्ये आ. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत फलदायी शेतकरी संवाद मेळावे आणि मार्गदर्शन शिबिरे संपन्न.

निलंगा विधानसभा मतदारसंघातील शेती आणि शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या कामांना म...
06/05/2026

निलंगा विधानसभा मतदारसंघातील शेती आणि शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या कामांना मंजुरी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या अनुषंगाने माजी पालकमंत्री मा.आ.श्री. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर साहेबांनी राज्याचे जलसंपदा मंत्री मा.ना.श्री. राधाकृष्णजी विखे-पाटील साहेब यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले.

अंधेरा हटा, कमल खिला!
05/05/2026

अंधेरा हटा, कमल खिला!

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे माजी मंत्री मा.आ.श्री. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांच्य...
04/05/2026

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे माजी मंत्री मा.आ.श्री. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची आगामी 'पाणी टंचाई आढावा बैठक' संपन्न झाली. या बैठकीमध्ये निलंगा, देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे, टँकर्सची आवश्यकता असल्यास ती तत्काळ पूर्ण करणे आणि जनावरांच्या चाऱ्याची व पाण्याची गैरसोय होऊ न देणे, यावर प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निलंगा मतदारसंघातील नागरिकांचे पाण्यासाठी कसल्याही प्रकारचे हाल होऊ नये, यासाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.

04/05/2026

भाजपचे निर्विवाद वर्चस्व!
पुन्हा कमळ फुलले...

'समृद्ध भारत समृद्ध शेतकरी अभियान टप्पा ३.०' अंतर्गत माजी पालकमंत्री मा.आ.श्री. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांच्या मार्...
30/04/2026

'समृद्ध भारत समृद्ध शेतकरी अभियान टप्पा ३.०' अंतर्गत माजी पालकमंत्री मा.आ.श्री. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा मतदारसंघातील निलंगा, देवणी आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे हिसामाबाद, वडमुरंबी, बेवनाळ, शेडोळ, वागदरी (वलांडी) आणि वडगाव या गावांमध्ये अत्यंत यशस्वीपणे शेतकरी मार्गदर्शन शिबिरे पार पडली. यामधून कृषी तज्ज्ञांनी उपस्थित शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर, ऊस, केळी, फळबाग लागवड, तसेच बियाणे व खते खरेदी करताना घ्यायची काळजी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

सर्व नागरिकांना आवाहननमस्कार! राज्यात, विशेषतः विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून येणारा मे महिना ...
29/04/2026

सर्व नागरिकांना आवाहन

नमस्कार! राज्यात, विशेषतः विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून येणारा मे महिना अधिक तीव्र उष्णतेचा ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना नम्र आवाहन आहे की, दुपारच्या कडाक्याच्या उन्हात अत्यावश्यक कारण नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे.

पुरेसे पाणी प्या, हलके व सैल कपडे परिधान करा, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्ण यांची विशेष काळजी घ्या. उष्माघात टाळण्यासाठी सावलीत राहण्याचा प्रयत्न करा आणि आरोग्याची काळजी घ्या.

आपल्याला सहकार्य करण्यासाठी आणि आपल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन कायम तत्पर आहे.

समृद्ध शेतकरी अभियानातून शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची घडत आहे सांगड!शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालत मतदारसं...
28/04/2026

समृद्ध शेतकरी अभियानातून शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाची घडत आहे सांगड!

शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालत मतदारसंघातील कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे दूरदृष्टीचे पाऊल म्हणजे 'समृद्ध शेतकरी अभियान'!

Address

Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arvind Patil Nilangekar Followers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share