16/09/2024
सुरक्षित बालकच देशाचे भवितव्य सुरक्षित ठेवेल
: ॲड.प्रवीण पाटील
बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा २०१२ (POCSO ACT ) चे प्रशिक्षण संपन्न.
लातूर:
प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग,लातूर संवेदना प्रकल्प,हरंगुळ (बु) व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लातूर व धाराशिव येथील दिव्यांग शाळांचे अध्यक्ष, सचिव, मुख्याध्यापक, अधीक्षक व लिपिक यांना आधार फाउंडेशन धनेगाव ता जि लातूर चे अध्यक्ष तथा तज्ञ प्रशिक्षक बालहक्क संरक्षण आयोग,मुंबई ॲड.प्रवीण हणमंतराव पाटील यांनी बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा २०१२ (POCSO ACT)चे प्रशिक्षण दिले. यावेळी प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग,लातूर श्री.अविनाश देवशटवार, जिल्हा पुनर्वसन केंद्र,लातूरचे अध्यक्ष श्री. सुरेश पाटील, समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद लातूर श्री.संतोषकुमार नाईकवाडे, समाज कल्याण आयुक्तालय पुणे चे अधिकारी श्री .काथवटे सर,श्री.फुले सर, सहाय्यक सल्लागार समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर श्री वाकडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी ॲड.प्रवीण पाटील यांनी बालहक्क संरक्षण म्हणजे काय ? त्यामध्ये शाळा व्यवस्थापन यांनी कोणती काळजी घ्यावी ? बाल लैंगिक शोषण विरोधी कायद्याचा उद्देश काय? यातील बालकाच्या संरक्षणाकरिताच्या तरतुदी कोणत्या ? बालकाच्या हक्कांना बाधा आणणाऱ्या घटकांना शिक्षेच्या तरतूदी कोणत्या? यांची माहिती दिली व शाळेचे वातावरण बालकेंद्रित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगून बदलापूर येथील झालेल्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याकरिता आपण सर्वांनीच बाल हक्क संरक्षणाची जबाबदारी उचलून कसलीही अनुचित घटना घडू नये याकरिता पूर्वकाळजी घेणे आवश्यक असुन सुरक्षित बालकच देशाचे भवितव्य सुरक्षित ठेवणार असल्याचे सांगितले व सदरील कार्यशाळा आयोजित करून हा संवेदनशील विषय विषयावर चर्चा घडवून आणल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले. यावेळी प्रादेशिक उपायुक्त देवशटवार यांनी सदरील प्रशिक्षणातून दिव्यांग शाळांच्या व्यवस्थापनाला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून याचा उपयोग आपण आपल्या शाळेतील बालकांच्या संरक्षणाकरिता करावा असे आवाहन केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारतीय पुनर्वास परिषदेचे सदस्य श्री व्यंकटेश लामजने यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गजानन बहुउद्देशीय संस्था,बोरी चे अध्यक्ष श्री अण्णा कदम यांनी केले.