Grameen Shramik Pratishthan

Grameen Shramik Pratishthan GSP is a reputed NGO working in Marathwada region since 1981 for the empowerment of marginalised.

04/06/2026

पनवेलकरांनो!

दररोजचा लोकलचा प्रवास, ऑफिसचा ताण आणि धावपळीने शरीर पूर्णपणे थकून जातंय का?

पाठदुखी, सांधेदुखी किंवा डोकेदुखीने त्रास होतोय का?"

"मग आता वेळ आली आहे… तुमच्या वेदनांना पूर्णविराम देण्याची!"

कारण आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. खास अंध युवकांमार्फत चालवले जाणारे जीएसपी वेलनेस सेंटर

"इथे तुम्हाला मिळतील शरीर आणि मनाला पूर्ण रिलॅक्स करणाऱ्या खास थेरपी—
👉 ॲक्युप्रेशर मसाज
👉 कास्यथाळी
👉 फूट मसाज
👉 फूट रिफ्लेक्सोलॉजी
👉 हेड मसाज
👉 अरोमा थेरपी

तेही अगदी कमी किमतीत.

"आणि सगळ्यात खास म्हणजे…हे सेंटर पनवेल रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडपासून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर आहे .

त्यामुळे प्रवासाचा त्रास नाही… मिळेल तो फक्त आरामच आराम!"

" चला तर मग वाट कशाची बघताय?

आजच भेट द्या – जीएसपी वेलनेस सेंटर

रिलॅक्स व्हा. रिफ्रेश व्हा आणि ताणमुक्त व्हा.

GSP is a reputed NGO working in Marathwada region since 1981 for the empowerment of marginalised.

We Are Hiring 🔴पद: Graphics Design & Video Editing Trainer📍 ठिकाण: लातूर (प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक)🕐 नोकरीचा प्रकार: पू...
03/06/2026

We Are Hiring 🔴

पद: Graphics Design & Video Editing Trainer

📍 ठिकाण: लातूर (प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक)
🕐 नोकरीचा प्रकार: पूर्णवेळ (Full Time)

ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान ही ४३ वर्षे सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. आम्ही अस्थिव्यंग युवक-युवतींसाठी Digital Media चे मोफत प्रशिक्षण देतो. या प्रशिक्षणासाठी आम्हाला एका अनुभवी आणि समर्पित Trainer ची आवश्यकता आहे जो दिव्यांग विद्यार्थ्यांना Graphics Design व Video Editing शिकवेल.

उमेदवाराला Adobe Photoshop, Illustrator, Premiere Pro आणि After Effects या software चे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. किमान २ वर्षे अनुभव, पदवी आणि वय २१ ते ३० वर्षे असणे आवश्यक आहे. मराठी भाषेत उत्तम संवाद कौशल्य आणि सामाजिक कार्यात रस असणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला शिकवण्याची आवड आहे, सामाजिक कार्यात रस आहे, Freelancing सोडून Stable Full Time Job हवी आहे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करायचे आहे, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे!

अर्जासाठी CV आणि Portfolio WhatsApp करा: 7875043678
📧 [email protected]
🔗 Google Form: https://forms.gle/P8fQQ2rU1Rtf5HFU6

आपल्या संपर्कातील योग्य व्यक्तींना हे नक्की Share करा

दिव्यांग सक्षमीकरणासाठी लातूरचे ‘डीएसआरसी’ मॉडेल राज्यासाठी दिशादर्शक; ‘टीस’ समाजकार्य मुंबईच्या विद्यार्थ्यांकडून ‘वन स...
28/05/2026

दिव्यांग सक्षमीकरणासाठी लातूरचे ‘डीएसआरसी’ मॉडेल राज्यासाठी दिशादर्शक;

‘टीस’ समाजकार्य मुंबईच्या विद्यार्थ्यांकडून ‘वन स्टॉप सोल्यूशन’ उपक्रमाचा अभ्यास.

दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देत आणि शासकीय योजनांचा लाभ सन्मानाने मिळवून देण्यासाठी बुधोडा येथील ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान संचलित औसा येथील ‘डिसेबिलिटी सपोर्ट अँड रिसोर्स सेंटर’ (DSRC) हे ‘वन स्टॉप सोल्यूशन’ मॉडेल संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरत आहे. देशातील नामांकित टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथील समाजकार्याच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा औसा तालुक्यात प्रत्यक्ष अभ्यास केला आहे.

कायद्यानुसार मान्यताप्राप्त 21 प्रकारच्या दिव्यांगत्वासाठी सेवा उपलब्ध करून देत, ग्रामीण भागातील दिव्यांग बांधवांना एकाच ठिकाणी आरोग्य सेवा, शासकीय प्रमाणपत्रे, विविध योजना व डिजिटल ओळखपत्र यांचा लाभ या केंद्रामार्फत सन्मानाने उपलब्ध करून दिला जात आहे.

26 जून रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, हसेगाव येथे 47 आशा वर्कर यांच्यासोबत तसेच औसा पंचायत समितीतील 52 ग्रामविकास अधिकारी यांच्यासोबत टाटा सामाजिक विज्ञान संस्था येथील विद्यार्थ्यांकडून दिव्यांग जनजागृतीबाबत विशेष सत्र व उपक्रम घेण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगने, तालुका आरोग्य अधिकारी रेवनाथ देवणीकर, डॉ. ईश्वर कोळे, विस्तार अधिकारी बालाजी तेलंग, किशोर हिरवे, उषा शिंगडे, छाया कोल्हे, गोपाळ चौधरी, महादेव मस्के, हनीफ शेख व रणधीर धुमाळ उपस्थित होते.

या उपक्रमाच्या अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी गाव पातळीवर ग्रामसेवक, आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी जनजागृती व क्षमता विकास सत्रांचे आयोजन केले. यामुळे स्थानिक यंत्रणा दिव्यांग विषयाबाबत अधिक सक्रिय व संवेदनशील होण्यास मदत होणार आहे.

अत्यावश्यक कागदपत्रांचे गतिमान वाटप व नोंदणी कार्य

डीएसआरसी केंद्राने आतापर्यंत 2616 दिव्यांग व्यक्तींची नोंदणी केली असून 1929 लाभार्थ्यांचे डिजिटल प्रोफाईलिंग पूर्ण केले आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना शासकीय प्रमाणपत्रे, युडीआयडी कार्ड आणि योजनांचा लाभ जलद गतीने मिळत आहे.

दिव्यांग सक्षमीकरणाचा ‘लातूर पॅटर्न’

“दिव्यांगांना परावलंबित्वाकडून सन्मानजनक योगदानाकडे घेऊन जाणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. डीएसआरसी हे राज्यातील पहिलेच ‘वन स्टॉप सोल्यूशन’ केंद्र ठरत आहे. ग्रामीण भागातून सुरू झालेला हा अभिनव प्रयोग आता दिव्यांग सक्षमीकरणाचा ‘लातूर पॅटर्न’ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळवत आहे.”
— प्रशांत सुडे, कार्यकारी विश्वस्त, ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान, लातूर



Prashant H. Sude

ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान कर्मचाऱ्यांसाठी 'GSP संहिता' कार्यशाळेचे आयोजनमंगळवार, दिनांक 05 मे ,2026 रोजी 'GSP संहिता' या...
06/05/2026

ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान कर्मचाऱ्यांसाठी 'GSP संहिता' कार्यशाळेचे आयोजन

मंगळवार, दिनांक 05 मे ,2026 रोजी 'GSP संहिता' या महत्त्वपूर्ण विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

संस्थेतील कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव तसेच संस्थेची कार्यप्रणाली माहिती होणे या मुख्य उद्देशाने ही कार्यशाळा करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत सकारात्मक वातावरणात झाली. प्रतिष्ठान अध्यक्ष हरिश्चंद्र सुडे यांच्या हस्ते नवीन कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर पंचशील डावकर मॅडमनी कार्यशाळेची भूमिका मांडली.

कार्यशाळेच्या सुरुवातीला सहभागींचा उत्सव वाढवण्यासाठी ऍक्टिव्हिटी घेण्यात आली. या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागींचे गट करण्यात आले. प्रत्येक गटाला उपलब्ध साधने वापरून सर्वात लांब साखळी तयार करायची होती. आणि यासाठी कोणतेही नियम नव्हते. या ऍक्टिव्हिटी मधून नियम नसताना लोक कसे निर्णय घेतात, गटांमधील सहकार्य तसेच नियम नसताना येणाऱ्या अडचणीमुळे कशाप्रकारे गोंधळ निर्माण होऊ शकतो हे स्पष्ट झाले.

यानंतर प्रशांत सर यांनी बाहेरील परिस्थिती, संस्थेतील कर्मचारी यांची जबाबदारी , संस्थेची वाटचाल आणि उद्देश याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कर्मचारी जर आपल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडत नसतील तर त्याचे संस्थेवर आणि समाजावर होणारे नकारात्मक परिणाम यावरही त्यांनी प्रकाश टाकला. याशिवाय सकारात्मक कल्चर डेव्हलप करणे ही कर्मचाऱ्याची महत्त्वाची जबाबदारी आहे यावर विशेष भर दिला.

यानंतर संहिता तयार करताना कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचा व सूचनांचा विचार व्हावा यासाठी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांची मते जाणून घेण्यात आली. यात विशेषतः कामाचे प्रभावी नियोजन, आदर्श कार्यसंस्कृती, सुट्टी व रजेचे नियम, कार्यालयीन कामकाजातील वेळेची शिस्त तसेच कर्मचारी कामगिरीचे मूल्यमापन व त्यासाठीचे निकष या बाबींचा समावेश होता. कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनांचा योग्य विचार करून प्रभावी संहिता तयार करण्यात येईल असे सांगण्यात आले.

कार्यशाळेच्या शेवटी प्रशांत सर यांनी या वर्षीपासून दरवर्षी 1 मे रोजी संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यासाठी चार विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत अशी घोषणा केली.

या पुरस्कारामध्ये खालील चार पुरस्कारांचा समावेश असेल:
1. सर्वोत्कृष्ट कर्मचारी
2. ब्रँड अँबेसिडर ऑफ जीएसपी
3. आदर्श व प्रेरणादायी कर्मचारी
4. उत्कृष्ट प्रकल्प/टीम

कार्यशाळेच्या शेवटी सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव अधिक स्पष्ट झाली. तसेच संस्थेच्या संहितेची पूर्णपणे आणि प्रभावी अंमलबजावणी करण्याचा त्यांनी सकारात्मक अभिप्राय व्यक्त केला. आणि ही प्रेरणादायी कार्यशाळा उत्साहात पार पडली.



Prashant H. Sude Grameen Shramik Pratishthan

BPC रत्न शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्नग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान ( GSP India...
02/05/2026

BPC रत्न शिष्यवृत्ती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान ( GSP India) व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी BPC रत्न शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. या शिष्यवृत्ती अंतर्गत दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कडून श्री. शंकर एम. (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, मुंबई रिफायनरी, BPCL), श्री. संजीव पिल्लाई (चीफ जनरल मॅनेजर – HR, मुंबई रिफायनरी, BPCL ), श्री. रविंद्र येलपाले (DGM Admin, मुंबई रिफायनरी, BPCL) तसेच अपर्णा पांडे (मॅनेजर CSR, मुंबई रिफायनरी, BPCL) तसेच ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान चे कार्यकारी विश्वस्त श्री. प्रशांत सुडे Prashant H. Sude हे मान्यवर उपस्थित होते.

माहुल, आंबापाडा व गव्हाणपाडा येथील ८५ शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सोहळ्यात गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना शाल, सन्मानचिन्ह, कॉलेज बॅग व स्टडी टेबल देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान श्री. प्रशांत सुडे सर यांनी संस्थेच्या उपक्रमांबद्दल माहिती देताना सांगितले की, संस्था केवळ शिष्यवृत्तीपुरती मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी Aptitude test, क्षमता बांधणी कार्यशाळा यांसारखे विविध उपक्रम राबवते. BPCL च्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच अशा उपक्रमांना भविष्यातही पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.



Prashant H. Sude Grameen Shramik Pratishthan Grameen Shramik Pratishthan

प्रभावी संवादातून सशक्त नातेसंबंध निर्माण करण्याकडे एक पाऊलग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या कर्मचारी वर्गामध्ये संवाद अधिक ...
15/04/2026

प्रभावी संवादातून सशक्त नातेसंबंध निर्माण करण्याकडे एक पाऊल

ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या कर्मचारी वर्गामध्ये संवाद अधिक प्रभावी, सकारात्मक आणि संवेदनशील व्हावा, तसेच टीममधील स्नेहबंध अधिक दृढ व्हावेत या उद्देशाने “प्रभावी सुसंवाद आणि स्नेहबंध” या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सत्रादरम्यान पंचशील डावकर यांनी दैनंदिन कामकाजात संवादाची भूमिका किती महत्त्वाची आहे हे स्पष्ट करत Pause, Think, Speak या संकल्पनेद्वारे प्रभावी बोलण्याचे तंत्र समजावून सांगितले. विविध ऍक्टिव्हिटी, डॉक्युमेंटरी आणि रोल प्ले यांच्या माध्यमातून सहानुभूती, समानुभूती, देहबोली आणि न बोलताही होणारा संवाद यांचे महत्त्व सहभागी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवता आले. विशेषतः टीम ऍक्टिव्हिटीमधून प्रत्येकाच्या क्षमता, सहभाग आणि एकमेकांबद्दलची समज अधिक मजबूत झाली.

या कार्यशाळेत संवादाचा परिणाम केवळ कामापुरता मर्यादित नसून तो आपल्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यावरही कसा होतो हे अधोरेखित करण्यात आले. आवाज (38%) आणि देहबोली (55%) यांचा संवादावर होणारा प्रभाव स्पष्ट करत “थोडं थांबा, विचार करा, मग बोला” हा साधा पण प्रभावी मंत्र देण्यात आला.

या सत्रातून ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठानच्या कर्मचारी वर्गाला ताणतणावाच्या परिस्थितीतही सकारात्मक, स्पष्ट आणि परिणामकारक संवाद कसा साधावा याचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे संस्थेची कार्यसंस्कृती अधिक सक्षम, सुसंवादी आणि परिणामकारक होण्यास निश्चितच मदत होईल.

#ग्रामीण_श्रमिक_प्रतिष्ठान #प्रभावी_संवाद

Prashant H. Sude

We Are Hiring 🔴पद: Graphics Design & Video Editing Trainer📍 ठिकाण: लातूर (प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक)🕐 नोकरीचा प्रकार: पू...
02/04/2026

We Are Hiring 🔴

पद: Graphics Design & Video Editing Trainer

📍 ठिकाण: लातूर (प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक)
🕐 नोकरीचा प्रकार: पूर्णवेळ (Full Time)

ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान ही ४३ वर्षे सामाजिक कार्य करणारी संस्था आहे. आम्ही अस्थिव्यंग युवक-युवतींसाठी Digital Media चे मोफत प्रशिक्षण देतो. या प्रशिक्षणासाठी आम्हाला एका अनुभवी आणि समर्पित Trainer ची आवश्यकता आहे जो दिव्यांग विद्यार्थ्यांना Graphics Design व Video Editing शिकवेल.

उमेदवाराला Adobe Photoshop, Illustrator, Premiere Pro आणि After Effects या software चे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.

किमान २ वर्षे अनुभव, पदवी आणि वय २१ ते ३० वर्षे असणे आवश्यक आहे. मराठी भाषेत उत्तम संवाद कौशल्य आणि सामाजिक कार्यात रस असणे गरजेचे आहे.

जर तुम्हाला शिकवण्याची आवड आहे, सामाजिक कार्यात रस आहे, Freelancing सोडून Stable Full Time Job हवी आहे आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करायचे आहे, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे!

अर्जासाठी CV आणि Portfolio WhatsApp करा: 7875043678
📧 [email protected]
🔗 Google Form: https://forms.gle/P8fQQ2rU1Rtf5HFU6

आपल्या संपर्कातील योग्य व्यक्तींना हे नक्की Share करा!

02/04/2026

पनवेलकरांनो!

दररोजचा लोकलचा प्रवास, ऑफिसचा ताण आणि धावपळीने शरीर पूर्णपणे थकून जातंय का? पाठदुखी, सांधेदुखी किंवा डोकेदुखीने त्रास होतोय का?"

"मग आता वेळ आली आहे… तुमच्या वेदनांना पूर्णविराम देण्याची!"

कारण आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत. खास अंध युवकांमार्फत चालवले जाणारे जीएसपी वेलनेस सेंटर

"इथे तुम्हाला मिळतील शरीर आणि मनाला पूर्ण रिलॅक्स करणाऱ्या खास थेरपी—
👉 ॲक्युप्रेशर मसाज
👉 कास्यथाळी
👉 फूट मसाज
👉 फूट रिफ्लेक्सोलॉजी
👉 हेड मसाज
👉 अरोमा थेरपी

तेही अगदी कमी किमतीत.

"आणि सगळ्यात खास म्हणजे…हे सेंटर पनवेल रेल्वे स्टेशन आणि बस स्टँडपासून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर आहे .

त्यामुळे प्रवासाचा त्रास नाही… मिळेल तो फक्त आरामच आराम!"

"चला तर मग वाट कशाची बघताय?

आजच भेट द्या – जीएसपी वेलनेस सेंटर, Captain House, Plot no. 2, Rd Number 10, Sector 11, New Panvel East, Panvel

रिलॅक्स व्हा. रिफ्रेश व्हा आणि ताणमुक्त व्हा.

GSP is a reputed NGO working in Marathwada region since 1981 for the empowerment of marginalised.

ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान मार्फत 115 ग्रामीण मुलींना शिष्यवृत्ती वाटप.ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान मार्फत स्व. सौ. सविता हर...
27/01/2026

ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान मार्फत 115 ग्रामीण मुलींना शिष्यवृत्ती वाटप.

ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान मार्फत स्व. सौ. सविता हरिश्चंद्र सुडे किशोरी विकास कार्यक्रमांतर्गत बुधोडा पंचक्रोशीतील गरीब, होतकरू व शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एकूण 115 मुलींना रविवारी ( दि. 25 रोजी ) शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. आयोजित कार्यक्रमात दिव्यांग महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंदीप संस्थेच्या संस्थापिका मीनाक्षी राजाराम निकम यांना स्व. सौ. सविता हरिश्चंद्र सुडे स्मृती पुरस्कार २०२६ प्रदान करून गौरवण्यात आले.

स्व. सौ. सविता हरिश्चंद्र सुडे यांच्या स्मरणार्थ पारंपारिक पद्धतीने विधी कर्मकांड न करता त्यांच्या कार्यातून ग्रामीण भागातील मुलींनी प्रेरणा घ्यावी आणि गरीब होतकरू मुलींना शिक्षणाची संधी देऊन उज्वल भविष्य घडवण्यासाठी मागील 11 वर्षांपासून ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान मार्फत शिष्यवृत्ती आणि किशोरी विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला.

या शिष्यवृत्ती आणि किशोरी विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील होतकरू मुलींना शैक्षणिक साहित्य, शाळेचा गणवेश व आर्थिक सहाय्य केले जाते. त्याच बरोबर एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये आरोग्य , व्यक्तिमत्व विकास , समूह बांधणी , संभाषण कौशल्य, जीवन कौशल्य या वरती मार्गदर्शन केले जाते. या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आतापर्यंत ६०० मुलींना मदत करण्यात आली आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरिश्चंद्र सुडे यांची प्रमुख उपस्थिती होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण तज्ञ रीना ढिला, पितांबर पाटील, कार्यकारी विश्वस्त प्रशांत सुडे, सतीश अष्टुरे, दत्तात्रय सुरवसे, प्रेरणा सुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा लोहार व आम्रपाली कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.








Prashant H. Sude

मुकुंदराज माध्यमिक विद्यालय, नांदगाव येथे आयोजित ध्वजारोहण समारंभात मा. श्री. हरिश्चंद्र सुडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थि...
26/01/2026

मुकुंदराज माध्यमिक विद्यालय, नांदगाव येथे आयोजित ध्वजारोहण समारंभात मा. श्री. हरिश्चंद्र सुडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहणाचा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला.

या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले, त्यानंतर मा. श्री. हरिश्चंद्र सुडे यांच्या शुभहस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले, या सन्मानामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य व प्रेरणा निर्माण झाली.

यानंतर शाळेच्या वतीने मा. श्री. हरिश्चंद्र सुडे यांचा अत्यंत आदरपूर्वक व आनंदात सत्कार करण्यात आला, यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून केलेले प्रेरणादायी मनोगत विशेष ठरले, त्यांच्या विचारांना विद्यार्थी तसेच उपस्थित प्रेक्षकवर्गाकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. 🇮🇳

Address

At Post. Budhoda Tq. Ausa Dist. Latur
Latur
413520

Alerts

Be the first to know and let us send you an email when Grameen Shramik Pratishthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Grameen Shramik Pratishthan:

Share