आषाढी व्हेंचर्स - Aashadhi Ventures

  • Home
  • India
  • Kudal
  • आषाढी व्हेंचर्स - Aashadhi Ventures

आषाढी व्हेंचर्स - Aashadhi Ventures Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आषाढी व्हेंचर्स - Aashadhi Ventures, Community Center, MIDC, Kudal.

24/11/2025

खाद्यतेलाची प्रामाणिक आत्मकथा..
Honest : The Oil Story!

सजग पालकांनी कृपया लक्ष द्यामी आषाढीच्या “गेम्स” डिव्हीजनची घोषणा करतो आहे. आपण सुरूवात एका गेम पासून करत असलो तरी इतरही...
14/07/2024

सजग पालकांनी कृपया लक्ष द्या

मी आषाढीच्या “गेम्स” डिव्हीजनची घोषणा करतो आहे. आपण सुरूवात एका गेम पासून करत असलो तरी इतरही अनेक गोष्टी करण्यासारख्या. ह्या डिव्हीजनचे उद्दिष्ट -
१. मुलांचा स्क्रीन टाईम करून त्यांना परत ज्ञानवर्धक, सामुदाईक स्वरूपाच्या ॲक्टिविटीकडे वळवणे
२. ⁠क्वालिट स्क्रीनटाईम ची योजना करणे जसे की MIT चे स्क्रॅच
३. ⁠मुलांच्या इमोशनल कोशंटवर काम करून तो एक चांगला माणूस, चांगला नागरीक म्हणून कसा होईल ह्यासाठी प्रयत्न करणे
४. ⁠नितीमूल्यांची रुजवात चांगल्या प्रकारे व्हावी ह्यासाठी योजनाबद्ध काम करणे
५. ⁠चाकरीबाह्य विषय मुलांपर्यंत आणून त्यांचा विवीधांगी विकास कसा साधता येईल ह्यासाठी प्रयत्न करणे

पुर्वी जे लोक आषाढीच्या मूळ घडणीवेळेस होते त्यांना आठवत असेल की हा/अशा प्रकारचा प्रोजेक्ट आपण करतो होतो ज्याचे नाव होते “रेघोट्या”. खरे तर आषाढीचा जन्मच रेघोट्यामुळे. आषाढी हे नाव देखील नंतर! त्यामुळे रेघोट्या हेच नाव आपण ह्या प्रोजेक्ट साठी वापरावे असे वाटते.

व्हाईट हॅट ज्युनिअर, बैजूज सारख्या भांडवलशाही आणि १००% कमर्शिअल व्यवस्था कोसळून पडत असताना लोकसहभागातून आपण एक चांगला प्रोफेशनल आश्वासक पर्याय नक्की उभा करू शकतो. हा “गेम” ही फक्त पहिली पायरी असणार आहे, आपला कॉन्फिडन्स चेक करण्यासाठी. आपण केवळ एक वर्षाच्या काळात, म्हणजे २०२५ सालची आषाढी प्रतिपदा यायच्या आधी स्वतंत्र कंपनीचे उद्दिष्ट ठेवून काम केले पाहिजे. त्यासाठी २५ लाख रुपायांचा निधी उभा केला पाहिजे. आणि तो आपण दुसऱ्याकुणाकडून मागायचा नाही. ह्या गेमच्या माध्यमातून आपण आपल्या परीचयातील पालकांमधे विश्वास निर्माण करूया. प्रत्येकी १०००० गुंतवतील असे २५० सजग पालकांचे नेटवर्क उभारूया. हे आपले २५,००,००० चा सिडफंड असेल. ह्यातून आपल्या मुलांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी अनेक आश्वासक कामे करता येतील ज्याचा इतरही अनेक मुले फायदा मिळवू शकतील. मुलांच्या भविष्यासाठी काम करणारी आणि त्यातून एका विकसीत भविष्याची रचना करणारी आश्वासक कंपनी असा ब्रँड आपण उभा करू जो समाजाच्या मालकीचा असेल! कुठल्या भांडवलशाही पैशाला हपापलेल्या उद्योगपतीवा नाही. आणि म्हणूनच हे सारे सामान्य घरातील विद्यार्थ्याला देखील उपलब्ध होईल..

**कृषीसमृद्धी**

आषाढीच्या कृषीसमृद्धी प्रकल्पाची घोषणा झाली असून सदर प्रकल्पात आतापर्यंत २० लोक सामील झाले आहेत. "कृषीसमृद्धी" खेळ आणि कालानुरूप मुलांना स्क्रिनपासून लांब ठेवत त्याना काही सकारात्मक पर्याय देऊ शकेल अशा आषाढीच्या “गेम्स” किंवा “किड्स” डिव्हीजन बाबत सविस्तर आणि उद्बोधक मिटींग कालच झाली. त्यामुळे आपण हा प्रोजेक्ट आता सुरू करतो आहोत. हा प्रोजेक्ट ही फक्त पहिली पायरी आहे. प्रत्यक्ष ही आषाढीमधील एका मोठ्या डिवीजनची सुरूवात असणात आहे.
आषाढीच्या मुख्य धोरणानुसार आषाढी कधीच भांडवलशाहीला थारा देत नाही. त्यामुळेच केवळ ३०००/- मधे हा प्रोजेक्ट सादर केला गेला. मी कोरावरील सर्व पालकांना परत आवाहन करतो. कुठल्याही कारणास्तव तुमचे पैसे भरायचे राहून गेले असल्यास पुढील २-३ दिवसात कमिटमेंट पूर्ण करा. जितके जास्तित जास्त पालक ह्या विषयात सामील होतील तितके दर्जेदार, सामान्यांना देखील परवडतील असे उत्तम पर्याय आपण समाजासमोर आणू शकतो आणि पुढील पिढीला अधिक चांगली मूल्ये देऊ शकतो. प्रत्येक पालकाने हे खूप सिरीअसली घ्यायची गरज आहे. कदाचीत आताच तुम्हाला लहान मूल नसेल, भविष्यात होईल किंवा कदाचीत तुम्हाला नातवंडे असतील. पण एक समाज म्हणून ह्याकडे पहा. जर आपण वेळेत हे केले नाही तर परत कुणी व्हाईट हॅट ज्युनिअर येऊन आपल्याला फसवून जाणार आहे. सगळीकडे गोंधळ माजवून जाणार आहे..

**तेव्हा अधिकाधिक संखेने सामील व्हा. आपण पुढील आठवड्यात ह्या प्रोजेक्टला प्रत्यक्ष सुरूवात करतो आहोत.**

ह्या प्रकल्पात सामील होण्यासाठी प्रत्येक पार्टिसिपंटने किमान ३०००/- अधिकाधिक ७५००/- आषाढीच्या अकाऊंटवर भरायचे आहेत. हे पैसे खेळाचे भरल्यानंतर २ किंवा ५ सेट तुम्हाला मिळतील. ह्यातील एक सोडून उरलेले विकू शकता किंवा सारे विकू शकता. जरी ४० जणांनी ३०००/- ची कमिटमेंट घेतली असली तरी माझी विनंती आहे की अधिकाधिक लोकांनी ७५०० भरावे ह्यासाठी की जितके चांगले कॅपिटल उभे राहील तितकी चांगली रिस्क आपण घेऊ शकतो आणि एकूणच प्रोजेक्टचा अवाका वाढतो.
हा गेम डेव्हलप करायला खर्च किती येतो आहे आणि त्याची किंमत काय आहे हे सारे प्रोजेक्ट पार्टिसिपंटनीच मिळून ठरवायचे आहेत. आम्ही प्रोजेक्ट पार्टिसिपंटना “प्रोमोटर” म्हणतो. प्रोमोटर्सचा स्वतंत्र ग्रुप असेल, तिथे ह्या गेमबाबत सारे धोरणात्मक निर्णय घेतले जातील. गरज पडल्यास आपण काही एक्स्ट्रा कॉपी डेव्हलप करू शकतो जे तुम्ही विक्री करून आपले कॅपीटल रिक्लेम करू शकता. प्रोजेक्ट यशस्वी होत असेल तर आपण ही प्रक्रीया चालू ठेवू शकतो. शिवाय वर उल्लेख केल्यानुसार आपल्याला रेघोट्याच्या दृष्टीने वाटचाल करायची आहे. त्यामुळे जर ही पहिली स्टेप उत्तम झाली तर खूप मोठे क्षीतीज खुणावते आहे.

सदर प्रोजेक्टमधे सामील होण्यासाठी आषाढीच्या अकाऊंटवर ३०००/- किंवा ७५००/- भरून त्याचा स्क्रिनशॉट शेअर करणे आवश्यक आहे. पेमेंट करताना रिमार्कमधे तुमचे नाव आणि “Game Project” लिहायला विसरू नका. नाहीतर नंतर ट्रॅक ठेवायला खूप कठीण पडते.

AASHADHI VENTURES PRIVATE LIMITED
ICICI Current A/c 008805006143
IFSC : ICIC0000088
Dombivli MIDC Branch
UPI : aashadhi@icici

तुमच्या मित्रपरीवारातील चांगले पालक सामील होऊ इच्छूक असतील तर त्यांना हा मेसेज फॉरवर्ड करू शकता. त्यांनी पैसे भरल्यावर स्क्रिनशॉट द्यावा. त्यांना आषाढीच्या आणि गेमच्या ग्रुपवर सामील केले जाईल.
आषाढीच्या व्हाट्सॅप ग्रुपवर सामील होण्यासाठी ..
https://chat.whatsapp.com/LcGy8TIvPsn7cL2P5k77si

*गुंतवणूक केली खड्ड्यात गेली योजना*१. नजिकच्या भविष्यात आपल्याकडे भरपूर पैसे असतील पण प्यायला “पाणी” नसेल. आपण फार वेगान...
07/06/2024

*गुंतवणूक केली खड्ड्यात गेली योजना*

१. नजिकच्या भविष्यात आपल्याकडे भरपूर पैसे असतील पण प्यायला “पाणी” नसेल. आपण फार वेगाने ह्याकडे प्रवास करतो आहोत. कोकणासारख्या भरपूर पाऊस असलेल्या प्रदेशात देखील पाणी प्रश्न गंभीर होतो आहे. बोरवेल्स २०० फूट पेक्षा खाली जात आहेत. पहिल्या स्तरांवर १०० फूटाच्या आत मिळणारे भूजल संपत आले आहे. आणि सततची बांधकामे, रस्त्याची कामे ह्यामधे वापरले जाणारे सिमेंट, डांबर अशा गोष्टींमुळे जमीनी कडक झाल्या आहेत. ह्यामुळे पावसाळ्याचे पाणी रस्ते, गटारे, नाले ह्यावरून वहात जाऊन नदीला मिळते आणि समुद्राला. ह्याचा काहीही उपयोग नाही. कारण सारे पाणी वाहून जाते, कुठेही अडवले जात नाही. जर पाणी अडवले जात नाही तर ते जिरत नाही. अशाने भूजल परत रिचार्ज होत नाही. आपण अनेक पावसाळे असे फुकट घालवले आहेत, पण भूजल खणून खणून, शोषून शोषून वापरत आहोत.

२. ⁠पाणी जिरायला पाहिजे तर आधी ते अडवले जायला हवे आणि जमीनीचा वरचा स्तर जो कडक झालेला आहे तो फोडून त्याला जिरायला वाट दिली पाहिजे. सिमेंट, डांबरमुळे कडक झालेला हा स्तर काही फार नाही. फारतर एखाद दिड फूट आहे. पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात ठिकठिकाणी खड्डे खणले असता हे सोपे होऊ शकते. प्रत्येक खड्डा हा भूजल रिचार्ज करणारा चार्जींग पॉईंट होऊ शकतो. पण ह्यातील काही स्वयंप्रेरणेने वगैरे होणार नाही. आता करू, मग करू म्हणून आपण ते टाळत राहणार. ह्यासाठीच ही योजना आहे. आपल्यापैकी बऱ्याचा जणांची इच्छा तर असते पण प्रत्यक्ष सहभाग शक्य नसतो, अडचणी असतात. असे ह्या योजनेत सहज सहभागी होऊ शकतात.

३. पुढील आठवड्यात मी वाडी वरवडे ह्या माझा गावातील सरपंचांना भेटून एक पत्र देणार आहे आणि गावात एक मोठा बोर्ड लावणार आहे. भूजलाचे महत्व समजावून सांगणार आहे. आणि २ फूट खोल, २ फूट रूंदीचा खड्डा करणाऱ्याला ५०/- देणार आहे. १००० खड्डे अशा प्रकारे होई पर्यंत मी प्रती खड्डा ५०/- देणार आहे. हे माझे डोनेशन नाही. ही माझी गुंतवणूक आहे. ह्याचे उत्तम रिटर्न मला भावी काळात मिळणार ह्याची खात्री आहे. कदाचीत भविष्यात माझाकडे कोट्यावधी रुपये असतील पण प्यायला पाणी नसेल, त्यापेक्षा आज मी ५०००० गुंतवतो. आणि भविष्यात पाणी मिळत राहील ह्या बद्दल खात्री करतो! अशा स्वरूपाची ही योजना मी *गुंतवणूक केली खड्ड्यात गेली* ह्या नावाने सुरू करत आहे.

४. ⁠ ज्यांना सहभागी व्हायची आहे त्यांनी कृपया ह्या स्किमचा मेसेज स्वत:च्या नावाने प्रसारीत करा. कुणालाही मला, आषाढीला किंवा दुसऱ्या कुणाला पैसे द्यायचे नाहीत. नाव देखील घ्यायची गरज नाही. तुम्हाला जमतील तितक्या खड्ड्यांची जबाबदारी घ्या. ज्याने कुणी खड्डा खणला त्याला ५०/- द्या. जमतील तितके खड्डे खणून घ्या. १० - २० - १०० - १००० .. आपल्या सोसायटीला प्रवृत्त करा. आपल्या नगरसेवकाला भेटा. आपल्याला पाणी पुरवठा करणारी बोरवेल, विहीरी, तळी, बांधारे आणि सगळीकडे खड्डे खणा. पाण्याच्या स्त्रोतांजवळ खड्डे खणताना १० फूट लांबीवर खणा. ठिकठिकाणी पाणी जमीनीत जिरूदे. कोट्यावधी लिटर पाणी जिरवायचे आहे लक्षात घ्या. कराल तितके खड्डे कमी आहेत. गेल्या अनेक वर्षात जे पाणी आपण भूगर्भातून काढले आहे, त्याचा परतावा आपल्याला करायचा आहे. आणि ही गुंतवणूक आहे. आपल्याला परत अनेक वर्षे उपयोगी पडणार आहे.

५. ⁠पावसाळा अखेरीस ह्या खड्ड्यांमधे भरपूर मूळसांभार असलेले एक मोठे झाड आपल्याला लावायचे आहे. ज्यांना महावृक्ष म्हणतात अशी झाडे जसे की आंबा, फणस, वड, पिंपळ, औदुंबर, चिंच. ह्यांची मुळे जमीनीत खोलवर आणि दूरवर पसरत राहतात, जमीन भुसभुशीत ठेवतात आणि लाखो लिटर पाणी दरवर्षी जमीनीत मुरवत राहतात. हे वृक्ष भूजलाचे कायम स्वरूपी चार्जींग पॉईंट असतात.

मी आजवर जेव्हा जेव्हा काही कल्पना मांडली आहे तेव्हा तुम्ही मला नेहमीच सपोर्ट केला आहे. आजदेखील मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. हा मेसेज प्रचंड व्हायरल करायला मला मदत करा. अधिकाधिक लोकांपर्यंत पोचूया. लाखो खड्डे मारूया. कोट्यावधी लिटर पाणी मुरवूया. ही संधी परत ८ महिन्यांनी येणार हे विसरू नका. हा मॉन्सून खूप चांगला आहे, पुढचा कसा असेल माहित नाही.

*चला खड्ड्यात पैसे घालूया!*

आषाढी व्हेंचर्स - Aashadhi Ventures तर्फे मी पार्टिसिपेट करतो आहे. अजून कोण कोण येतंय?
01/06/2024

आषाढी व्हेंचर्स - Aashadhi Ventures तर्फे मी पार्टिसिपेट करतो आहे. अजून कोण कोण येतंय?

ऑनेस्ट : द ऑईल स्टोरीराधा आज खूप खूष होती! बरेच वर्षांनी मोठ्ठी सुट्टी सँक्शन झाली होती. ‘आजोळी जाऊन तर कितीतरी वर्षे झा...
21/05/2024

ऑनेस्ट : द ऑईल स्टोरी

राधा आज खूप खूष होती! बरेच वर्षांनी मोठ्ठी सुट्टी सँक्शन झाली होती. ‘आजोळी जाऊन तर कितीतरी वर्षे झाली. आता फारसे आठवतही नाही. लास्ट इअरला असताना शेवटची गेले होते', राधाच्या मनात अनेक वर्षांचा इतिहास घोळत होता. कधी त्या आठवणींच्या गल्लीबोळात हरवत १४ वर्षे मागे गेली कळलेच नाही...

"मामाची शेती म्हणजे पारंपारीकता आणि आधुनिकतेचा अनोखा संगमच. 'घरी खातो ते आपणच पिकवायचे' हा पणजोबांचा दंडक मामा आजही कसोशीने पाळत असे. अजूनही सर्व भावंडांना घरचे तांदूळ, हरभरे, चवळी तो आवर्जून पाठवतो. पण केवळ पारंपारीक समजूती कवटाळून न बसता आवश्यक तिकडे ट्रॅक्टर, ड्रिप सारखे आधुनिक तंत्रानाची कास धरत त्याने उत्तम समतोल साधला आहे.” ...
.. "शिरीष देखील मामाच्या पठडीत छान तयार झालेला आहे. मामाच्या पिढ्यानुपिढ्यांच्या अनुभवाला त्याने आपल्या बिएससी एग्रीच्या शिक्षणाची जोड देत अनेक बदल कालानुरूप केले आहेत. त्याच्या इमेल्स आणि व्हिडीओकॉल्समधून सारे अपडेट्स मिळत असतात!”...

"अगं आई तुझा बॅगा भरून झाल्या का? उशीर होतोय".. रमाची हाक आली आणि राधा भानावर आली. रमा देखील खूप एक्सायटेड होती 'मामाच्या गावाला' जायचे म्हणून. रमाच्या वडीलांना गावच नाही. त्यांचे वडीलच शहरात स्थलांतरीत झाल्याने रमाच्या वडीलांचे सारे लहानपण गेले शहरात. इंजिनिअरींग नोकरी सारे शहरात. लग्नानंतर पिकनीक्स आणि प्रवास खूप झाले. पण रमाला गाव म्हणजे काय ते फारसे कधी अनुभवायलाच मिळाले नाही. वडीलांचे आयटी इंजीनिअरचे करीअर आणि आई आंतरराष्ट्रीय रिफाईंड तेलाच्या कंपनीत सिनीअर फूड टेक्नॉलॉजिस्ट ह्या भोवतीचे रमाचे लहानपण घुटमळत राहीले होते. खरेतर केवळ ३५० मैलावर असलेले आजोळ, पण हे अंतर ओलांडायला तिच्या वयाची १४ वर्षे लागली होती..

गावोगावच्या सीमा ओलांडताना हळूहळू बदलत जाणारी भाषा, संस्कृती ती अनुभवत होती. महाराष्ट्रात आल्यावर तर तिला मराठी शब्द कानावर पडल्यावर मजाच वाटली. घरी आई-बाबांची ही सिक्रेट भाषा असल्यासारखी होती. बरेचवेळा तिला ते काय बोलतात हे कळतच नसे. इंग्रजी शाळा, दाक्षीणात्य सहकारी ह्यामुळे मराठी, मातृभाषा असुनही तिला परकीच होती. आता तर रेडीओवर देखील FM मराठीत होते! ज्वारीची भाकरी तिने पहिल्यांदाच खाल्ली. ज्वारीची भाकरी आणि शेंगदाण्याची चटणी हे कॉम्बिनेशनच तिला खूप आवडले. यथावकाश ते मामाच्या गावी पोचले. ८ तासांचा प्रवास पण त्या उत्साहात अगदी छान पार पडला..

घरी गेल्याबरोबर पहिल्यांदाच आलेल्या भाचीचा काय पाहूणचार विचारू नका. मामी आणि आजीचा उत्साह - आनंद तर गगनात मावत नव्हता. शेतातला ताजा हुर्डा काय, पोपटी काय, बागेतली फ्रेश फळे काय. धमाल चालू होती. सकाळी गायींना चरायला सोडायचे, भरपूर नाष्ता करायचा, मोकळ्या माळावर फिरायला जायचे, सायकल चालवायची, तळ्यावर आंघोळ करायची आणि उन वर आले की जेवायला घरी यायचे असा मस्त कार्यक्रम होता. गावाकडची संध्याकाळ तर खूपच छान. थंडी पडायची. शेकोट्या पेटायच्या. शेकोटीवर कणसे भाजून खायची. मग गप्पांचा फड लागायचा...

“अरे तेल संपायला आलेय, शेठच्या घाण्यावरून घेऊन ये”, मामी म्हणाली

“कुठले तेल वापरता तुम्ही? माझा कंपनीने हल्लीच राईस ब्रान तेल आणलेय. एकदम हलके, दर्जेदार आणि आरोग्यवर्धक” .. “हृदयासाठी तर एक नंबर!”, राधा सांगत होती..

“कायपण काय ताई? अगं तांदळाच्या ब्रानमधे तेल ते किती? ८-१०%. किती तांदूळ पिकतो देशात? देशभरातील सारा ब्रान एकत्र करून जितके तेल निघणार नाही त्याच्या हजारो पटीने राईसब्रान तेल हे बाजारात विकत आहेत", इती शिरीष ...
.. आणि राधा एकदम भानावर आली. स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या 'तेलाच्या खरेदीचे ऑर्डरबुक्सच' तिच्या डोळ्यासमोरून झर्रकन गेले. त्यात पाम तेल, मिनरल तेल, एक्सपायर झालेले तेल, प्राण्यांची चरबी असे सर्व काही असायचे. मग हे सारे तेल ३००-४०० डिग्री पर्यंत तापवले जायचे जेणे करून ते एकमेकांत चांगले मिसळले जाई. मग त्यावर हेक्झेन सारख्या केमिकलच्या प्रक्रीया, त्याचे वास-रंग काढून टाकायला ब्लिचींग असे अनेक प्रकार केले जात. मग "रिफाईंड तेल" नावाचा एक तरल पदार्थ तयार होत असे. मग त्यामधे हवा तो एसेंस मिसळला की झाले हवे ते तेल. राईस ब्रान हवे तर तो एसेंस, शेंगदाणा हवे तर तो एसेंस. मूळ केमीकल तेच! आणि मग हे कसे हलके, आरोग्यदायी हे पटवून द्यायला सेलीब्रिटींना घेऊन जाहिरातींचा भडीमार...

राधा तर ह्या सर्व प्रकरणांचा भागच होती. ॲड आणि सेल्स डिपार्टमेंट सोडले तर बहुतेक सर्वच विभाग आणि प्रक्रीयांशी तिचा संबंध होता. पण राधा केवळ करीअरसाठी भुकेलेली प्रोफेशनल नव्हती. अत्यंत स्टुडीअस अशा राधाने प्रचंड अभ्यास करून तिचे करीअर साकारले होते. मोठ्या मेहनतीने ही पोस्ट मिळवली होती आणि प्रचंड स्पर्धेला तोंड देत ती टिकवली होती. “शिऱ्या तुझे म्हणणे जरी खरे असले तरी प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानामागे एक खोल विचार असतो, संशोधन असते. चला काहीतरी खराब वस्तू विकून लोकांना फसवूया अशा प्रकारे कुणी प्रॉडक्ट बनवत नाही की संशोधन करत नाही"

“पूर्वी गावोगावी तेलाचे घाणे होते. लोक आपापल्या शेतात पिकणाऱ्या तेलबिया घेऊन जात व फ्रेश तेल गाळून आणत. अधिकचे तेल इतरांना विकले जात होते. पण जसे शहरीकरण वाढीस लागले तसे मोठ्या प्रमाणात गाव खेड्यातून लोक शहरात स्थलांतरीत झाले. छोट्या छोट्या शहरात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढली. तिथे वसणाऱ्या माणासांची व्यस्तता गावातील लोकांपेक्षा खूप जास्त होती. त्यामुळे "पॅकेज" केलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा वापर वाढला. तेलातील आर्द्रतेसारख्या घटकांमुळे तेल पटापट खराब होत असे. त्यामुळे तेलावर प्रक्रीया आवश्यक होती. शिवाय विवीध प्रकारची तेले वेगवेगळी उपलब्ध करणे हे देखील एक आव्हान होते. ह्याहून पुढील आव्हान होते त्याच्या किमती. ह्यासाठी तेलावरील विवीध प्रक्रीया करून त्याचे 'रिफाईंड' हे नविन स्वरूप साकारले गेले. हे तेल दीर्घकाळ खराब होत नसे, वारंवार तळणासाठी वापरले तरी काळे पडत नसे.” ...

“मोठ्या प्रमाणावर जेव्हा आपण एखादी गोष्ट बाजारात आणतो तेव्हा ती जबाबदारी देखील असते. घाण्याच्या तेलाच्या कच्च्या मालाची क्वालिटी बदलली की लगेच त्याचा रंग आणि चव बदलत असे. पण रिफाईंड तेल कितीही मोठ्या प्रमाणात, कुठल्याही बॅचचे घेतले तरी त्याचा रंग, चव व गुणधर्म कधीच बदलत नाही. वर्षानूवर्षे हा एकसमान दर्जा सातत्याने टिकवणे हे खरेच एक मोठे आव्हान आहे जे रिफाईंड तेला इंडस्ट्रीने लिलया पेलले!” ...

“अगं हे जरी खरे असले तरी मुळात जे तेल म्हणून आपण जे वापरतो ते तेलच नसेल तर काय? एकसमानता म्हणजे uniformity ला जितके महत्व आहे तितकेच महत्व 'कच्च्या मालाच्या खात्रीला' म्हणजे conformity ला आहे ना. जे तेल मी शेंगदाणा तेल म्हणून खातोय ते नसेलच शेंगदाणा तेल तर? त्यात ६०% पर्यंत दुसरेच काहीतरी मिक्स केलेले असेल तर? आणि सगळ्यात वाईट म्हणजे ती भेसळ प्रामाणीकपणे कबूलही केलेली नाही. मला शुद्ध शेंगदाणा तेल म्हणून भेसळ केलेले केमिकल विकत असतील तर ही फसवणूक नाही का?”, शिरीषने एकाच मुद्यात राधाला निरूत्तर केले होते. “ह्या अनेक तेलांच्या भेसळीला 'एकसमानता' मिळवून देण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात तापवतात, त्यात जे केमिकल घालतात आणि ज्या प्रकारे त्याचे मूळ गुणधर्म बदलतात त्याच्या शरीरावर होणाऱ्या दुष्परीणामांचे काय? साध्या सांधेदुखी पासून सुरूवात होऊन हळूहळू बिपी, शुगर, हार्ट, कॅन्सर सारख्या अनेक आजारांना ह्यामुळेच सबळ कारण मिळते हे तथ्य नाकारता येत नाही ना?”

"रिफाइंड तेलाच्या माध्यामातून आपण रोज स्लो पॉयझनला बळी पडतो आहोत”... राधाचा चेहरा पडला होता. तिच्याकडे डिफेंसला शब्दच नव्हते. खरेच तर बोलत होता शिऱ्या. आणि शहरीकरणाच्या अपरीहार्यतेमुळे आपण हे वर्षानुवर्षे सहन करतोय हे देखील तिला जाणवत होते...

“चल मला पण बरीच वर्षे झाली घाण्याचे तेल पाहून. मी पण येते तुझा सोबत", राधा म्हणाली.

“मी पण, मी पण", रमाने देखील उडी मारली..

तिघेही घाण्यावर जायला निघाले. वाटेत शिरीष राधाला लाकडी घाण्याचे तेल आणि त्याचे आरोग्यवर्धक फायदे सांगत होता. पूर्वी त्यांच्या गावात लोखंडी घाणे होते. पण बरेच वर्षे रिफाईंड तेलामुळे पारंपारीक तेलघाणे भंगारमधे विकले गेले. गेल्याच वर्षी गावात नविन लाकडी घाणा आला होता. आणि तेलाची क्वालिटी खूपच छान होती. लोखंडी घाण्याच्या कोल्डप्रेस ऑईलपेक्षा हे तेल थोडे महाग होते पण त्याचा अरोमा खूप छान होता. लाकडी घाण्यामुळे तेल गाळले जाताना करपत नसे. त्यातील सात्विक गुणधर्म तसेच रहायचे...

दुकानात पोचताच रमाची पहिली प्रतिक्रीया, “शी, हे किती गढूळ दिसते. त्यापेक्षा आईच्या कंपनीचे तेल किती छान पारदर्शक, सोनेरी असते" ...

“अगं ते १००% नैसर्गिक आहे ना. ते गढूळ असणे हीच त्याच्या शुद्धतेची परीक्षा आहे!”, दुकानदार काका हसत म्हणाले. राधा काही म्हणाली नाही पण दुकानातील अस्वच्छपणा, कामगारांचा गलीच्छपणा, घाण्याची अवस्था आणि तेलातील गाळ तिच्या देखील मनात काहूर माजवत होते. परत येत असताना ती शिरीषला म्हणाली, “शिऱ्या, घाण्याच्या तेलाचे '१००% नैसर्गिक' हे जरी खरे असले तरी त्यातील गढूळपणा आणि अस्वच्छता आपण कसे दुर्लक्षीत करू शकतो?”. त्यावर शिरीष म्हणाला, “अगं नैसर्गिक जे काही असते ते नेहमीच आरोग्यासाठी उत्तम असते. त्यावर प्रक्रीया करून तुम्ही ते शुद्ध, पारदर्शक वगैरे करायला जाता तेव्हाच खरा गोंधळ चालू होतो"..

“अरे मामा, नैसर्गिक म्हणून आपण केळे सालासकट खातो का? डाळींबातील बिया खातो का? नैसर्गिक ते सारेच खाण्यायोग्य असे कधीच नसते.”, रमाने मधे नाक खुपसलेच. “मी नाही ह्या तेलातले कुठले पदार्थ खाणार मामा. चिखलात तळल्यासारखे वाटेल ... इईइईइई".. तिच्या डोक्यातून काही केल्या तो गढूळपणा जात नव्हता!

“शिऱ्या, आजोबा सांगायचे ना, तसे आपल्याला सुवर्णमध्य गाठता यायला हवा. रिफाईंड वाइट ह्या बद्दल आता मनात शंका नाही. पण केवळ '१००% नैसर्गिक' म्हणून कुणी आपल्या गळ्यात गढूळ, घाणेरडे काही मारत असेल तर कसे चालेल? तिथे जे लोक काम करत आहेत त्यांच्या आरोग्याचे, स्वच्छतेचे काय? एक मावशी तिकडे तेल भरताना खोकत होती आणि परत त्याच हाताने तेल भरत होती. ते देखील नरसाळ्यातून. हल्लीच आपण कोरोना सारख्या भयावह प्रकरणातून कुठे सावरतोय. अशा अस्वच्छतेमुळे, गलीच्छपणामुळे जो संसर्ग होऊ शकतो ह्याची कल्पना तरी केली आहे का? आणि हे सारे आपण महाग तेल विकत घेऊन करतोय. जणू दुखणे विकत घेतोय की काय!”, इती राधा.

शिरीष म्हणाला, “अगं सुरूवातीला त्याने कापडाच्या फिल्टरमधे ते फिल्टर करायचा प्रयत्न केलेला. पण तो गाळ जो आहे तो तेलातच आहे. तो नाही सहजपणे निघत. आणि तो कपडा पण इतका चिकट होतो की सहजपणे धुतला जात नाही. मग त्याने तसेच विकायला सुरूवात केली.” ... “पण तिथे असलेल्या कामगारांच्या आरोग्याचा, अस्वच्छपणाचा आणि संसर्गाचा मुद्दा मात्र योग्यच आहे. पण करणार तरी काय ना? घरी आणून जरी आपण फिल्टर केले तरी सगळा गाळ जाणार नाही आणि जंतूसंसर्ग तर राहणारच!”

राधा म्हणाली, “करणार काय हा वेगळा विषय! एकदा आपण काय चूक करतोय हे कळले आणि काय साध्य करायचे आहे हे लक्षात आले की ते करायचे कसे हे तितकेही कठीण नसते. सोशल मीडियाचा जसा जवळच्या लोकांच्या संपर्कात रहाण्यासाठी फायदा होतो तसाच अनेक प्रयोगशील, उद्यमशील लोकांशी ओळख देखील होते. काही महिन्यापूर्वी माझी एका अशाच समूहाशी ओळख झाली जे 'कोरा' नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रीय आहेत. कोरावरील काही धडपड्या मराठी लोकांनी मिळून 'आषाढी व्हेंचर्स' नावाची एक संस्था चालू केली आहे. तिथे ते अशा वेगळ्या विषयांवर काम करतात. आपण त्यांच्यासमोर हा विषय मांडूया. बघू काय होते"...

मग तो विषय आला 'आषाढी व्हेंचर्स' च्या प्लॅटफॉर्मवर. बघता बघता ३० जण एकत्र आले आणि लाकडी घाण्याचे परंतू 'विश्वासार्ह' तेल कसे बनवायचे ह्या विषयावर काम चालू झाले. कुठलेही केमीकल वापरायचे नाही, तापमान द्यायचे नाही हे तर आषाढीअन्सच्या डिएनएमधेच आहे जणू. त्यामुळे तेलाच्या शुद्धीकरणावर काम चालू झाले. कपड्याचे किंवा स्क्रीनचे फिल्टर फारसे परीणामकारक नव्हते. आणि गाळाचे तेलाशी बॉण्डिंग खूप घट्ट होते. त्यामुळे ते सहज फिल्टर होत नसे. त्यातील एकाचा आयुर्वेदातील अनुभव कामी आला. आयुर्वेदात काही काढ्यांचे शुद्धीकरण करून एकदम तरल काढा मिळवायचा असेल तर सेंट्रीफ्यूज पंप वापरतात. मग अशा प्रकारचा एक विशेष सेंट्रीफ्यूज पंप डिझाईन करून त्यावर प्रयोग केले. तेव्हा साधारण ५-६% गाळ वेगळा झाला. मग ही प्रक्रीया अजून परफेक्ट करण्याकडे बराच वेळ गेला. त्या दरम्यान तेल निर्जंतूक व्हावे ह्यासाथी नैसर्गिक रित्या काय करता येईल ह्यावर देखील काम चालू होते. त्यावर पर्याय निघाला समुद्री मिठाचा. अशा प्रकारे तेलातील अनावश्यक गाळ काढून, जंतू संसर्ग काढून नैसर्गिक पण दर्जेदार तेल तयार झाले. ह्यावर चांदीचे फिल्टर वापरून ॲक्टीवेशन केले गेले. चांदीच्या संपर्कात आलेली गोष्टीला रजोगुण प्राप्त होतो जो शरीरासाठी खूप फायदेशीर असतो. अशा प्रकारे तयार झाले नैसर्गिक, कुठलेही केमीकल न वापरता शुद्ध आणि निर्जंतूक केलेले आणि चांदीने प्रभावीत केलेले दर्जेदार तेल!

मग प्रश्न होता, ह्याला नाव काय द्यायचे? तर ज्या मुद्यावर ह्या प्रोजेक्टची रचना झाली तो म्हणजे 'विश्वासार्हता' आणि 'खरेपणा'. म्हणून नाव ठेवले 'ऑनेस्ट' आणि ही आहे ऑनेस्ट ऑईल स्टोरी!

रामनवमीच्या शुभमुहूर्तावर ऑनेस्ट ऑईल मार्केटमधे सादर झाले. चांगला रिस्पॉन्स आहे. तुम्ही देखील नक्की वापरून पहा. आणि तुमचा अनुभवदेखील आमच्या बरोबर शेअर करा. आम्ही नवीन राधा, शिरीष, रमा शोधतच आहोत. जे आम्हाला असे व्यापक प्रोजेक्ट करायच्या संधी देतील!

आम्ही आहोत आषाढी! सोशल मीडियावरील अनोळखी पण उद्यमशील लोकांनी चालू केलेली लिडरलेस वारी! आणि ही वारी सर्वांसाठी खुली आहे. अविरत आहे..

https://aashadhi.com/
https://aashadhi.com/product/honest-groundnut-oil/

आमचा व्हाट्सॕॅप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/LcGy8TIvPsn7cL2P5k77si

आषाढीच्या तिन कॉम्बो फ्रँचाईजी!केवळ १५००० ची गुंतवणूक करून ३०% पर्यंत नफा मिळवा आणि स्वत:चे व्यवसाईक करीअर चालू करा..
19/04/2024

आषाढीच्या तिन कॉम्बो फ्रँचाईजी!

केवळ १५००० ची गुंतवणूक करून ३०% पर्यंत नफा मिळवा आणि स्वत:चे व्यवसाईक करीअर चालू करा..

आषाढी व्हेंचर्सने हल्लीच बरीच नविन प्रॉडक्ट लॉन्च केली व आपली नविन फ्रँचाईजी पॉलीसी डिक्लेअर केली. त्यानुसार आषाढीच्या क...
19/04/2024

आषाढी व्हेंचर्सने हल्लीच बरीच नविन प्रॉडक्ट लॉन्च केली व आपली नविन फ्रँचाईजी पॉलीसी डिक्लेअर केली. त्यानुसार आषाढीच्या कुठल्याही एका प्रॉडक्टची किंवा तुमच्या आवडीनुसार फ्रँचाईजी घ्यायची असल्यास खालील पर्याय आहेत. अगदी ५०००/- भरून फ्रँचाईजी घेता येते आणि उद्यमशीलतेकडे, स्वयंरोजगार कडे, सेकंड इनकमकडे वाटचाल करू शकता..

ही सारी उत्पादने विकायला तुम्हाला दुकान असायची गरज नाही. शिक्षणाची, आर्थिक परीस्थितीची काही अट नाही. सेक्युरिटी डिपॉझिट भरावे लागत नाही. परीक्षा द्यावी लागत नाही काही नाही. घरून, व्हाट्सॅप, फेसबुकचा वापर करून तुम्ही फ्रँचाईजी घेऊ शकता. कमीतकमी रिस्क आणि चांगला फायदा ह्याचे उत्तम समीकरण म्हणजे आषाढी! मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणात व्यवसायाकडे वळावे ह्यासाठी अत्यंत कमी गुंतवणूक करून हे पर्याय उपलब्ध केलेले आहेत.

आरोग्याच्या चिंतेमुळे, आजकाल लोक मोठ्या प्रमाणात तेलमुक्त आहार स्वीकारतात. पण तेल हा आपल्या शरीरासाठी आवश्यक घटक आहे. ते...
19/04/2024

आरोग्याच्या चिंतेमुळे, आजकाल लोक मोठ्या प्रमाणात तेलमुक्त आहार स्वीकारतात. पण तेल हा आपल्या शरीरासाठी आवश्यक घटक आहे. तेल हे अनेक उपयिक्त फॅटी ऍसिडचे स्त्रोत आहेत. तेल आपल्याला ऊर्जा देते, पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये रक्तावाटे शोषण्यास मदत करते. नैसर्गीक तेल विशेषतः रोगप्रतिकारक आणि अंतःस्रावी प्रणालींना समर्थन देतात आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत, निरोगी जीवनशैलीसाठी आवश्यक आहेत.

खाद्यतेलाचे दोन मुख्य प्रकार आहेत: रिफाईंड तेल आणि घाण्याचे तेल. ही गोष्ट आहे तुम्ही रोजच्या स्वयंपाकासाठी वापरत असलेल्या तेलाची…

रिफाइंड ऑइल : वनस्पतींमधून अधिकाधिक प्रमाणात पिळवटून तेल काढण्यासाठी उच्च तापमान, दाब आणि रासायनिक विद्रावके वापरतात. यामुळे तेल एक प्रकारे सडते, धूसर होते आणि त्यांचे अनेक नैसर्गिक गुणधर्म आणि चांगुलपणा गमावतात. रिफाइंड तेल हे अशा प्रकारे सोल्वंट एक्स्ट्रॅक्ट करून काढलेले तेल, पामतेल, खनिज तेल आणि अगदी खराब झालेले तेल यांसारख्या सर्व प्रकारच्या स्वस्त तेलांना अतिउच्च तापमानात गरम करून बनवलेले रासायनिक मिश्रण आहे. गंधमुक्त आणि रंगहीन करण्यासाठी अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात. हेग्झेन सारखे घातक पदार्थ वापरतात. हायड्रोजन इंजेक्शन वापरून शेल्फलाईफ वाढवतात. हे करत असताना सर्व तेलामधील सर्व मौल्यवान आणि नैसर्गिक घटक काढून टाकले जातात. त्याऐवजी, ट्रान्स फॅटी ऍसिडचे प्रमाण वाढते, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. शेवटी त्यात राईसब्रान, शेंगदाणा किंवा इतर वनस्पती तेलांसारखी चव देण्यासाठी कृत्रिम चव आणि रंगद्रव्ये मिसळली जातात. ह्यामुळे मुळात तुम्ही जे शेंगदाणा तेल म्हणून घेता ते मुळात शेंगदाणा तेल नाहीच. ते शेंगदाणा तेलाची चव असलेले एक तेलासारखे रसायन आहे.

त्या सर्व प्रक्रियांमुळे जे “तेलासारखे रसायन” बनते ते शरीरातील चांगले एचडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आणि इन्सुलिन, ट्रायग्लिसरायड्स आणि हानिकारक LDL कोलेस्टेरॉलचे स्तर वाढवण्यासाठी सुप्रसिद्ध आहे. शिवाय घशाची खवखव किंवा इंफेक्शन, वजन वाढणे, श्वास/दम लागणे, हृदयाच्या समस्या, रक्तदाब, बद्धकोष्ठता, चिंता, मधुमेह अशा सर्व प्रकारच्या वाईट मार्गांनी ते तुमच्या आरोग्याशी गडबड करू शकते! शिवाय ह्यातील ट्रान्स फॅट्समुळे कर्करोग, मधुमेह आणि रोगप्रतिकारक प्रणाली समस्या देखील होऊ शकतात हे अनेक प्रयोगात सिद्ध झालेले आहे. ह्यात पोषण अत्यंत कमी पण आरोग्याला धोके जास्त आहेत. खरे तर रिफाइंड तेल हे स्लो पॉयझन मानले जाते.

मग पर्याय राहतो घाण्याचे तेल!

हे तेल ताज्या तेलबिया ठेचून पारंपारिक पद्धतीने बनवले जाते. कुठलेही रसायन नाही की प्रक्रीया नाही! छान वाटतंय ना?
बरं, पण हे अर्धसत्य आहे. हे तेल अतिशय घाणेरडे आणि अशुद्धतेने भरलेले आहे. आपण तेलात तो अविद्राव्य गाळ प्रत्यक्षात तरंगताना पाहू शकतो, तो नीट फिल्टरही केलेला नाही. शिवाय घाणा, उपकरणे आणि ते हाताळणारे लोक किती स्वच्छ आहेत याबद्दल नेहमीच शंका असते.

घाण्याच्या तेलावर जेव्हा आम्ही वैज्ञानिक पद्धतीने अपारंपारीक फिल्टर वापरून पाहिले तेव्हा आम्हाला मिळाली चिकट घाण. दुधाची अटवलेल्या घट्ट सायी सारखी. आपल्याला शुद्ध वाटणऱ्या “घाण्याच्या तेलात" प्रचंड घाण, अशुद्ध अविद्राव्य घटक असतात. साधारण 4–5% ह्या impurities आणि contamination आपण रोज खातोय.. का? अहो घाण्याचे तेल म्हणजे 100% नैसर्गिक, काही त्रास होऊच शकत नाही अशी आपली (गैर)समजूत ना?

बरे घाणावाल्याला विचारले की फिल्टर का करत नाही तर तो म्हणतो की, “आम्ही नैसर्गिक तेल विकतो” .. अरे पण आपण नैसर्गिक म्हणून केळं सालीसकट खातो का? माकडापासून प्रगत होत आपण माणूस झालो ना? काय घ्यायचे आणि काय टाळायचे इतके तर आपल्याला कळतेच ना!

आता तुम्ही बुचकळ्यात पडला असाल की घाण्याच्या तेलाचे इतके प्रॉब्लेम तर नक्की खायचे तरी काय? पण काळजी करू नका. आषाढीमधे आम्ही प्रॉब्लेम्सवर काम करत नाही, चर्चा करत बसत नाही. आषाढी मधे आम्ही जबाबदारी घेतो, अभ्यास करतो, प्रयोग करतो आणि प्रॉब्लेमवर उपाय काढतो! पर्याय उपलब्ध करतो.

पारंपरिक विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान ह्याची योग्य सांगड घालत आम्ही, आषाढी व्हेंचर्स, सादर करत आहोत “Honest Oil”. 100% नैसर्गिक, पण काळजीपूर्वक शुद्ध केलेलं, कुठलेही केमिकल न वापरता, उष्णतेचा वापर न करता, समुद्री मिठाने निर्जंतुक केलेलं आणि चांदीने प्रभावित केलेले सुरक्षित, विश्वासार्ह व्हर्जिन प्रतिचे खाद्यतेल. त्यामुळे तुम्ही लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबासाठी त्यावर विश्वास ठेवू शकता.तेव्हा आता काळजी सोडा आणि बिनधास्त ऑनेस्ट तेलाने आपल्या स्वयंपाकाचा आनंद घ्या!

https://aashadhi.com/product/honest-groundnut-oil/

Address

MIDC
Kudal
416528

Alerts

Be the first to know and let us send you an email when आषाढी व्हेंचर्स - Aashadhi Ventures posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to आषाढी व्हेंचर्स - Aashadhi Ventures:

Share