Kolhe Samarthak - कोल्हे समर्थक

Kolhe Samarthak - कोल्हे समर्थक Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kolhe Samarthak - कोल्हे समर्थक, Nonprofit Organization, Kopargaon.

विश्वास, शिस्त आणि प्रामाणिकपणाचा आदर्श म्हणजे छबुराव आव्हाड ‘अण्णा’. सहकार आणि शेती क्षेत्रात त्यांनी आयुष्यभर निष्ठेने...
28/03/2026

विश्वास, शिस्त आणि प्रामाणिकपणाचा आदर्श म्हणजे छबुराव आव्हाड ‘अण्णा’. सहकार आणि शेती क्षेत्रात त्यांनी आयुष्यभर निष्ठेने काम करत तळागाळातील लोकांपर्यंत विकास पोहोचवला. उच्च शिक्षण, व्यापक दृष्टिकोन आणि आंतरराष्ट्रीय अनुभव यांच्या जोरावर त्यांनी कोपरगाव परिसराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचलला. सहकार चळवळीत ते एक विश्वासू आणि एकनिष्ठ सहकारी म्हणून ओळखले जातात. ९५ व्या वर्षातही त्यांची कार्यतत्परता आणि जीवनमूल्ये प्रेरणादायी आहेत. अशा महान व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

त्यांना संजीवनी उद्योग समूहाकडून शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी व्हा. चेअरमन ज्ञानेश्वरबापू परजणे, शरदनाना थोरात, अरुणदादा येवले, औद्योगिक वसाहत व्हा. चेअरमन केशवराव भवर, विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, शिवाजीराव वक्ते, दिनकर आव्हाड व डॉ. चंद्रशेखर आव्हाड उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक १ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोपरगाव (ब्रँच) येथे प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्त...
27/03/2026

प्रभाग क्रमांक १ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कोपरगाव (ब्रँच) येथे प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रत्येकी २ अशा Milton कंपनीच्या दर्जेदार पाणी बाटल्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले, ज्यामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमास ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. सुरेश विठ्ठल बोळीज सर, कोपरगाव नगरपालिकेचे आरोग्य सभापती श्री. वैभव सुधाकर आढाव, श्री. वैभव गिरमे, श्री. पाळंदे सर, कल्पेश नरोडे, निखिल साबळे, रोहित आढाव, योगेश आमले, देव बागुल तसेच मित्र फाउंडेशनचे सदस्य व प्रभाग क्रमांक १ मधील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांचीही उपस्थिती लाभली.

23/03/2026

माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या नेतृत्वाखाली उभारलेला रुमणं मोर्चा हा शेतकऱ्यांच्या संघर्षाची जाज्वल्य गाथा ठरला!
व्याजदर कमी करण्यासाठीची ही ऐतिहासिक लढाई देशभर गाजली.
एकजुटीच्या ताकदीने शासनालाही निर्णय बदलायला भाग पाडलं.
शेतकरी जागा झाला… आणि त्याला आपल्या शक्तीची खरी जाणीव झाली!

23/03/2026

साखर उद्योगातील भीष्म पितामह

मौजे आपेगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा (वर्ष – ९६वे) याची सांगता महं...
19/03/2026

मौजे आपेगाव येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा (वर्ष – ९६वे) याची सांगता महंत मठाधिपती गुरुवर्य ह.भ.प. रामगिरीजी महाराज (गोदावरी धाम, बेट सरला) यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

या पवित्र कार्यक्रमास युवानेते मा. श्री विवेकभैय्या कोल्हे साहेब यांनी उपस्थिती लावून काल्याच्या कीर्तनाचा लाभ घेतला. यावेळी त्यांनी महंत रामगिरीजी महाराज यांचा सत्कार करून त्यांचे शुभाशीर्वाद घेतले तसेच आपेगाव व पंचक्रोशीतील भाविकांना अखंड हरिनाम सप्ताहाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलताना विवेकभैय्या कोल्हे साहेब म्हणाले की, आपेगाव व पंचक्रोशीतील भाविकांचा सरला बेटाशी अतूट संबंध आहे. विशेषतः महिलांचा सहभाग प्रत्येक कार्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. घरची जबाबदारी सांभाळून महिला दर महिन्याला बेटावर सेवेसाठी जातात. त्यांच्या या परमार्थ कार्यामुळे आमच्यासारख्या युवकांना प्रेरणा मिळते, हे अत्यंत मोलाचे कार्य आहे.

ग्रामस्थांच्या वतीने श्री अंबादास पाटोळे व श्री किसनराव गव्हाळे (उपसरपंच) यांनी विवेकभैय्या कोल्हे साहेबांचा सत्कार केला. तसेच गावातील युवकांनी त्यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमादरम्यान भाविकांनी ज्ञानामृत श्रवण करून महाप्रसादाचा लाभ घेतला.

या प्रसंगी सरपंच सौ. मंगल ज्ञानेश्वर भुजाडे, श्री दत्तू हनुमंता पाटोळे, श्री ज्ञानदेव आसाराम गायके, श्री वाल्मीक राव भुजाडे, श्री हरिभाऊ रंगनाथ गव्हाळे, श्री शांताराम शंकर भुजाडे, श्री संतोष राधू पगारे, श्री प्रकाश रंगनाथ गव्हाळे, श्री हरिश्चंद्र वेनुनाथ गव्हाळे यांसह गावातील मान्यवर, पंचक्रोशीतील भजनी मंडळे, ग्रामस्थ, महिला व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

17/03/2026

परमपूज्य शंकररावजी कोल्हे साहेब, यांनी मनं जिंकली होती, देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी सर्वजण त्यांना नावाने ओळखत होते, तसेच आपल्या आजोबांची बौद्धिक क्षमता पुढे घेऊन श्री विवेक भैय्या कोल्हे काम करत आहे!!

सहकारमहर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त, सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे...
17/03/2026

सहकारमहर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त, सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब विचारधारा ट्रस्ट आयोजित, धर्माचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे (मंचर, पुणे) यांच्या सुश्राव्य वाणीतून, तहसील कार्यालय मैदान येथे परमपूज्य संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत आणि शुभाशीर्वादाने, कीर्तन सेवेचे आणि महाप्रसाद कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला!!

यावेळी धर्माचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांनी आपल्या सुश्राव्य वाणीतून संत परंपरेचे विचार, भक्ती, सेवा आणि सदाचाराचा संदेश देणारे कीर्तन सादर केले. सहकारमहर्षी स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या समाजसेवेच्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी उपस्थितांना समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या ओजस्वी वाणीतून सादर झालेल्या कीर्तनामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला!!

या प्रसंगी, आदरणीय माई, मा.श्री. नितीनदादा कोल्हे साहेब, मा.श्री. बिपीनदादा कोल्हे साहेब, सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे, सौ. रेणुका विवेकभैय्या कोल्हे, नगराध्यक्ष मा.श्री. परागजी संधान साहेब, मा.श्री. ईशानभैय्या कोल्हे, सौ. श्रद्धाभाभी कोल्हे तसेच विविध मान्यवर, कोपरगांवकर भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते!!!

सहकारमहर्षी, माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पवित्र...
17/03/2026

सहकारमहर्षी, माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पवित्र कीर्तन सेवेचा हा संपूर्ण व्हिडिओ.

धर्माचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे (मंचर, पुणे) यांच्या सुश्राव्य वाणीतून सादर झालेले हे भावपूर्ण कीर्तन, उपस्थित सर्वांना अध्यात्मिक आनंद देणारे ठरले.

सहकारमहर्षी, माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आल.....

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात मोलाचे व दूरदर्शी योगदान देणारे सहकार महर्षी स्व. शंकररावजी ...
15/03/2026

महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात मोलाचे व दूरदर्शी योगदान देणारे सहकार महर्षी स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांची पुण्यतिथी. त्यांच्या कार्याची आठवण ही केवळ स्मरणाची नव्हे, तर प्रेरणेचीही ठरते.

राज्यातील कृषी क्षेत्रात प्रयोगशीलतेला नवी दिशा देण्याचे काम त्यांनी केले. शेतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी अमेरिकेत जाणाऱ्या शिष्टमंडळात विद्यार्थीदशेतच त्यांना स्थान मिळाले होते, हे त्यांच्या जिज्ञासू वृत्तीचे द्योतक आहे. साखर उद्योग आणि आधुनिक शेती पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी जगभ्रमंती करून मोठा व्यासंग केला.

अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव व संजीवनी सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलून टाकला. पाटपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले, खंडकरी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी चळवळ उभी केली आणि सहकाराच्या बळावर ग्रामीण विकासाची भक्कम पायाभरणी केली.

सहकारी संस्थांसोबतच शिक्षणसंस्थांचे विस्तृत जाळे उभारून त्यांनी ग्रामीण भागातील पिढ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. ग्रामीण विकासासाठी असलेली त्यांची आंतरिक तळमळ, प्रखर दूरदृष्टी आणि कार्यासाठीची अथक जिद्द ही आजही अनेक कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे.

त्यांच्या कार्याचा वारसा समाजाच्या सेवेतूनच पुढे नेण्याचा संकल्प करत,
सहकार महर्षी स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण विनम्र अभिवादन.

12/03/2026

सहकारमहर्षी शंकररावजी कोल्हे साहेब विचारधारा ट्रस्ट, कोपरगाव यांच्या वतीने माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकररावजी गेणुजी कोल्हे साहेब यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त धर्माचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे (मंचर, पुणे) यांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली आहे.

📅 सोमवार, १६ मार्च २०२६
🕕 सायं. ६.०० वा.
📍 तहसील कार्यालय मैदान, कोपरगाव

सर्व भाविकांनी उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.

Address

Kopargaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kolhe Samarthak - कोल्हे समर्थक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share