Prakash Naiknavare Official

Prakash Naiknavare Official मा.नगरसेवक कोल्हापूर महानगरपालिका

भावपूर्ण श्रद्धांजली..! 🕯️💐ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साहेब यांच्या निधनाचे वृत्त...
04/08/2026

भावपूर्ण श्रद्धांजली..! 🕯️💐
ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साहेब यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात त्यांनी दिलेले अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कार्यातून अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏🌹
OmShanti

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेअंतर्गत प्रवाशांच्या सुलभ आणि गतिमान प्रवासासाठी NCMC (N...
04/08/2026

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेअंतर्गत प्रवाशांच्या सुलभ आणि गतिमान प्रवासासाठी NCMC (National Common Mobility Card) नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

​5 ऑगस्ट रोजी शिबीर असून, हे सकाळी १०.३० ते दुपारी ५.०० या वेळेत सुरू राहणार आहे.
​कार्डचे फायदे व महत्त्वाच्या गोष्टी:

👉 आता एसटी, मेट्रो आणि रेल्वे प्रवासासाठी सुट्ट्या पैशांची कटकट संपणार!
👉 महिला सन्मान योजना (५०% सवलत) आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतींसाठी हे कार्ड अनिवार्य आहे.

​आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक (OTP साठी प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक).

​📍 ठिकाण: पंचमुखी गणेश मंदिर सांस्कृतिक हॉल, शाहुपुरी कुंभार गल्ली कोल्हापूर.
⏰ वेळ: सकाळी १०:३० ते दुपारी ५:००
💰 नोंदणी फी: ₹२५०/-
​सर्व नागरिक आणि सवलतधारक प्रवाशांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी कृपया त्वरित संपर्क साधावा आणि शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहावे!

*​श्री. प्रकाश नाईकनवरे मा.नगरसेवक*
*सौ. पुजा नाईकनवरे मा.नगरसेविका*

निस्वार्थ समाजसेवा आणि खंबीर नेतृत्व...!✨कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि सतत जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारे नेतृ...
31/05/2026

निस्वार्थ समाजसेवा आणि खंबीर नेतृत्व...!✨
कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि सतत जनतेच्या प्रश्नांसाठी झटणारे नेतृत्व, मा. श्री. प्रकाश रा. नाईकनवरे यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा! 💐
आपले सामाजिक कार्य आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी आहे. आपल्याला उत्तम आरोग्य, सुख, शांती आणि दीर्घायुष्य लाभो, हीच आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना. 🙏
शुभेच्छुक: बाळ नाईकनवरे फौंडेशन आणि भागातील सर्व तरुण मंडळे.

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा..!” 🚩छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, संतांच्या शिकवणीने सम...
01/05/2026

“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा..!” 🚩
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, संतांच्या शिकवणीने समृद्ध झालेल्या आणि शूरवीरांच्या पराक्रमाने घडलेल्या आपल्या संयुक्त महाराष्ट्राचा आज वर्धापन दिन. तसेच, आपल्या घामातून आणि कष्टांतून देशाच्या प्रगतीचा पाया रचणाऱ्या सर्व कष्टकरी बांधवांचा आज ‘कामगार दिन’!
सर्व कोल्हापूरकरांना आणि मराठी बांधवांना महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या मनःपूर्वक आणि मंगलमय शुभेच्छा. जय महाराष्ट्र!

पुण्यनगरीचे शक्तिपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे थोर संत श्री शंकर महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नम...
24/04/2026

पुण्यनगरीचे शक्तिपीठ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे थोर संत श्री शंकर महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी नमन!

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त निसर्गाचे संवर्धन करण्याची आणि आपली पृथ्वी भावी पिढीसाठी सुरक्षित ठेवण्याची शपथ घेऊया. सर्व न...
22/04/2026

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त निसर्गाचे संवर्धन करण्याची आणि आपली पृथ्वी भावी पिढीसाठी सुरक्षित ठेवण्याची शपथ घेऊया. सर्व नागरिकांना जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अंधश्रद्धा आणि विषमतेवर प्रहार करून समाजाला समतेचा आणि एकतेचा विचार देणारे महान समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर...
19/04/2026

अंधश्रद्धा आणि विषमतेवर प्रहार करून समाजाला समतेचा आणि एकतेचा विचार देणारे महान समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त क...
19/04/2026

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त कोटी कोटी नमन! 🚩
सर्व शिवभक्तांना आणि नागरिकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी! 🙏

माझ्या सर्व कोल्हापूरकर बांधवांना साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘अक्षय्य तृतीया’ सणाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨
18/04/2026

माझ्या सर्व कोल्हापूरकर बांधवांना साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या ‘अक्षय्य तृतीया’ सणाच्या हार्दिक शुभेच्छा! ✨

भारताचे पहिले उपराष्ट्रपती, दुसरे राष्ट्रपती आणि एक थोर शिक्षणतज्ज्ञ भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पुण्यतिथीनि...
17/04/2026

भारताचे पहिले उपराष्ट्रपती, दुसरे राष्ट्रपती आणि एक थोर शिक्षणतज्ज्ञ भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🇮🇳

Address

Shahupuri
Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prakash Naiknavare Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share