Riti Oonjal

Riti Oonjal समाजकार्य..
समाजाने समाजासाठी केलेली मदत...
माणसातली माणुसकी जिवंत ठेवण्याचा छोटासा प्रयत्न....

www.ritioonjal.com
9067025113

06/06/2026

LODGE ) यांचा अर्थ 🙏🙏🙏🙏

निवासस्थान / राहण्याची सोय🏠🏠🏠
प्रवासी किंवा पर्यटकांसाठी कमी खर्चात राहण्याची व्यवस्था असलेली जागा.
आपल्या कडे ही संकल्पना आपली मूळ पसरवत आहे... लोक आपली हॉटेल बंद करून lodge सुरु करत आहेत तर काही आपल्याला शेतात lodge बांधत आहेत.... काय म्हणायचं याला?
पण आज काल ही जागा अनैतिक संबंधान साठी चर्चेत आहे.
काही महिन्या पूर्वी पेपर मध्ये बातमी होती एका"अल्पवयीन मुलीवर" 3 मुलांनी वेगळ्या वेगळ्या "LODGE" मध्ये न्हेऊन अत्याचार केला... आणि आजकाल चालू असलेला विषय म्हणजे प्रेमाच्या जाळ्यात अडकऊन काही मुलांनी 1 मुलीवर अत्याचार केला.. खरच या अशा बातम्या ज्या वेळी येतात त्यावेळी
खूप राग राग होतो पण तो नक्की कुणाचा हे समजत नाही...
आई - वडिलांचा?
तिथे जाणाऱ्या लोकांचा?
कि हफ्ते देऊन, अल्पवयीन मुलांचें कोणत्याही प्रकारच रेकॉर्ड न ठेवता त्यांना तासावर रूम देणाऱ्या LODGE ?
नक्की कळवा या साठी काय केल पाहिजे???? Kokan Angan Hindustan Times

Send a message to learn more

नक्की एकदा विचार करा
29/05/2026

नक्की एकदा विचार करा

2026 या नवीन वर्षाच्या "Riti Oonjal " परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा.....
01/01/2026

2026 या नवीन वर्षाच्या "Riti Oonjal " परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा.....

बालपण, तारुण्य, प्रौढत्व म्हणजे (पुन्हा बालपण...) हे माणसाच्या आयुष्यातले महत्वाचे 3 टप्पे....  यातील 2 टप्पे माणसाचे कर...
28/12/2025

बालपण, तारुण्य, प्रौढत्व म्हणजे (पुन्हा बालपण...) हे माणसाच्या आयुष्यातले महत्वाचे 3 टप्पे....

यातील 2 टप्पे माणसाचे करिअर आणि इतर जीवनाच्या धकाधकीत कसे संपतात हेच कळतं नाही पण, प्रौढत्व हा टप्पा संपण्याची वाट बघावी लागते....
काही दिवसा पूर्वी एका वृद्धाश्रमात जाण्याचा योग आला होता. तिथे खूप सारे "आजी आजोबा" भेटले प्रत्येकाचा अनुभव हा डोळ्यात पाणी आणणाराच होता..
(( पण, सगळ्यांच्या अनुभवातील शेवटच्या वाक्याने माझं मन मात्र कासावीस झालं... ))
“आई - वडील झाल्यावर आंम्हाला खूप आनंद झाला होता ” हे म्हणणारे आजी - आजोबा आज “मुलं नसती तर बरं झालं असत "
"आता कुठे राहिली माणुसकी" (असं सहजच बोलून गेले....)

आपल्या समोर भीक मागण्यासाठी हात पसरणाऱ्याला… आपण काही हातावर दिले की त्याला नेहमीच भीक मागून खाण्याची सवय लागते.. कष्ट न...
11/12/2025

आपल्या समोर भीक मागण्यासाठी हात पसरणाऱ्याला… आपण काही हातावर दिले की त्याला नेहमीच भीक मागून खाण्याची सवय लागते.. कष्ट नको वाटतात.. असे प्रत्येक ठिकाणी असते असे नाही.
मुंबईतल्या एका सिग्नल वर गाडी थांबलेली असताना एक प्रसंग बघितला. एक आई आपल्या कडेवर एका मुलाचे ओझं सांभाळत थोरल्या मुलाच्या पाठीत दोन धपाटे घातले आणि पेन विकायला पाठवते.
बिचारा, पायात चप्पल नाही, अंगात शर्ट नाही, धुळीने माखालेला, डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहणारा तो मुलगा आईचा मार खाऊन पेन विकायला गाडी जवळ आला आणि सिग्नल सुटला...
जेम-तेम 8-9 वर्षाचा असेल तो मुलगा शिकायचं वय पण, जबाबदारी च ओझं आजच त्याच्या वाट्याला आलेलं पाहून खूप वाईट वाटलं...
अशा मुलांसाठी खूप सारे लोक काम करत आहेत... तरीही आपण आपल्या परीने काय करु शकतो याचा शोध सुरू होतो….

Kokan Angan
Swapniil Paatil
Artist Swapniil Paatil

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Riti Oonjal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share