Nisargpremi Mitra, Peth Vadgaon

Nisargpremi Mitra, Peth Vadgaon Environmental conservation organisation to keep harmony in Environment by protecting Biodiversity.

*चिल्लर पार्टी ,कोल्हापूर , निसर्गप्रेमी मित्र मंडळ, पेठ वडगाव आणि श्रीराम सिटीप्लेक्स* यांच्या विद्यार्थ्यांसाठी रविवार...
25/06/2026

*चिल्लर पार्टी ,कोल्हापूर , निसर्गप्रेमी मित्र मंडळ, पेठ वडगाव आणि श्रीराम सिटीप्लेक्स* यांच्या विद्यार्थ्यांसाठी रविवारी *सुमी* चित्रपटाचे मोफत प्रदर्शन....

'सुमी' (सुमती) ही ग्रामीण भागातील एक १२ वर्षांची एका गरीब कुटुंबातील मुलगी. तिचे वडील दगडखा0णीत मजुरी करतात आणि आई गृहिणी आहे. सुमीला शिकून डॉक्टर व्हायचे आहे, परंतु तिची शाळा घरापासून खूप दूर आहे. तिथे जाण्यासाठी तिला सायकलची गरज आहे, जी विकत घेण्याची तिची आर्थिक परिस्थिती नाही. प्रतिकूल परिस्थितीतही सुमी शिक्षण सोडत नाही. ती सायकल चालवायला शिकते. तिचा मित्र चिन्मय तिला सायकल शिकण्यास मदत करतो आणि तिचे मनोबल वाढवतो. सुमी सायकलसाठी पैसे वाचवते, परंतु दुर्दैवाने तिचे पैसे चोरीला जातात. त्यातच तिच्या वडिलांची नोकरी जाते, कुटुंबावर आर्थिक संकट येते. पुढे सुमी आणि तिचे कुटुंब पुन्हा उभे राहतात का? वडील आणि आई काय करतात? सुमीचे शिक्षण सुरू राहते का या आणि इतर प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर रविवारी चिल्लर पार्टी चित्रपट चळवळीमार्फत विनामूल्य दाखवण्यात येणारा हा सिनेमा पाहायला या. आपल्या बालमित्रांना सोबत आणण्यास विसरू नका. भेटूया, रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता श्रीराम सिटीप्लेक्स मध्ये...

चित्रपट : सुमी
दिग्दर्शक : अमोल गोळे
स्थळ : श्रीराम सिटीप्लेक्स, पेठ वडगाव
वेळ : सकाळी ८.३० ते १०.३०

पेठ वडगाव आणि आसपास च्या खेड्यातील बालमित्रांसाठी निसर्गप्रेमी मित्र,पेठ वडगाव,चिल्लर पार्टी कोल्हापूर आणि श्रीराम सिटीप...
18/02/2026

पेठ वडगाव आणि आसपास च्या खेड्यातील बालमित्रांसाठी निसर्गप्रेमी मित्र,पेठ वडगाव,चिल्लर पार्टी कोल्हापूर आणि श्रीराम सिटीप्लेक्स पेठ वडगाव यांच्या वतीने 'चिडीया ' सिनेमा विनामुल्य दाखवविणेत येणार आहे.
शानू व बुवा ही दोन भावंडं आईबरोबर मुंबईच्या एका चाळीत रहात असतात. घरच्या परिस्थितीमुळे आपल्या मामाबरोबर ती सिनेमा शुटींच्या इथे कामाला जात असतात. त्यांना बॅडमिंटन खेळण्याची खुप इच्छा असते. पण परिस्थिती नसते. एकदा सिनेमाच्या सेटवर श्रेयस तळपदे हा हिरो शानूला बॅडमिंटनचे फुल भेट देतो.पण इथेच समस्या सुरु होतात.
रॅकेट कुठून आणायची ? मैदानाचे काय करायचे ? नेट कुठून आणायची ? शेवटी काय होते ? शानू व बुवाला बॅडमिंटन खेळता येते का नाही ?
हे पहायला या. आपल्या बालमित्रांना घेऊन या.
सिनेमा - चिडीया
रविवार दि. २२ फेब्रुवारी २०२६.
स. ८.३० वाजता
स्थळ - श्रीराम सिटीप्लेक्स, पेठ वडगाव

(पालकांनी ९ ते १४ वर्षे वयातील मुलांना चित्रपट गृहात वेळेत सोडून सहकार्य करावे )

Address

Sarjeshri Tower, Palika Chowk, Peth Vadgaon
Kolhapur
416112

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nisargpremi Mitra, Peth Vadgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share