श्रीमंत संभाजीराजे छत्रपती सोशल फौंडेशन जुना राजवाडा,कोल्हापूर.

  • Home
  • India
  • Kolhapur
  • श्रीमंत संभाजीराजे छत्रपती सोशल फौंडेशन जुना राजवाडा,कोल्हापूर.

श्रीमंत संभाजीराजे छत्रपती  सोशल फौंडेशन जुना राजवाडा,कोल्हापूर. वसा दुर्ग सेवेचा

आमचे मार्गदर्शक श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती...करवीर छत्रपतींचे निवासस्थान न्यू पॅलेस मध्ये...
28/03/2026

आमचे मार्गदर्शक श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती...
करवीर छत्रपतींचे निवासस्थान न्यू पॅलेस मध्ये...

24/03/2026

यायला लागतंय

आपल्या फाउंडेशनचे सदस्यकु. ओम राजू माकणे-पाटीलयांचे आकस्मिक दुःखद निधन झाले, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे.फाउंडेशनतर्फे त...
18/01/2026

आपल्या फाउंडेशनचे सदस्य
कु. ओम राजू माकणे-पाटील
यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे.
फाउंडेशनतर्फे त्यांच्या आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो..
🙏🏼🙏🏼🙏🏼

01/10/2025

कोल्हापूरचा शाही दसरा संदर्भात विस्तृत माहिती सांगताना श्री ऋतुराज जी इंगळे साहेब..
श्रीमंत संभाजीराजे छत्रपती सोशल फौंडेशन जुना राजवाडा,कोल्हापूर.

26/09/2025

शारदीय नवरात्र उत्सव निमित्त युवराज्ञी श्रीमंत संयोगिताराजे छत्रपती यांची मुलाखत...

12/07/2025

छत्रपती शिवरायांच्या ज्वाजल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले, महाराष्ट्राच्या पराक्रमी परंपरेच्या पाऊलखुणा अभिमानाने अंगावर बाळगून उभे असलेले गडकोट जागतिक वारसा स्थळांच्या यादीत यावेत, यासाठी #युवराज_संभाजीराजेंनी गेली अनेक वर्षे अथक परिश्रम घेतले.

या परिश्रमांना अखेर यश लाभले आणि महाराष्ट्रातील राजगड, रायगड, पन्हाळगड, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, विजयदुर्ग, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी आणि साल्हेर हे किल्ले UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले.

याबद्दल सर्वप्रथम युवराज संभाजीराजेंचे मन:पूर्वक अभिनंदन!

महाराष्ट्राचा, युगपुरुष छत्रपती शिवरायांचा इतिहास जागतिक पटलावर यावा, जगभरातील अभ्यासक व संशोधक या गडकोटांचा अभ्यास करावा, यासाठी खरे, प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्न जर कोणी केले असतील, तर ते संभाजीराजेंनीच!

२०१६ पासून त्यांनी सातत्याने या संदर्भात पाठपुरावा केला.
२०१७ साली युनेस्कोचे प्रतिनिधी भारतात आले असता, त्यांनी स्वतः पन्हाळगड, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि इतर किल्ल्यांवर त्यांना नेले.
त्या ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व, त्यांची शौर्यगाथा, युद्धशास्त्रीय दृष्टिकोन आणि सांस्कृतिक मूल्य यांची सविस्तर माहिती दिली.

खासदार असताना संसदेत त्यांनी हा विषय मांडून केंद्र व राज्य सरकारचे याकडे लक्ष वेधले.
त्यामुळेच आज हे ऐतिहासिक पाऊल शक्य झाले.

आज अनेकजण या ऐतिहासिक गोष्टीचे श्रेय घेण्यासाठी सरसावत आहेत, पन्हाळगडावर जाऊन साखर वाटत आहेत — आनंदाची गोष्ट आहे.
पण, यातील एकालाही हे सुचले नाही की, "ज्यांनी हे सर्व घडवून आणले, त्या संभाजीराजेंचं नाव तरी घ्यावं!"

हा करंटेपणा कोठून आला?
ही कोल्हापूरची संस्कृती नव्हे!

असो!

राजे, आपण केलेले प्रयत्न, सातत्य, आणि कष्ट आम्हा शिवभक्तांना ज्ञात आहेत.
गडकोटांवर निवडणूक जिंकता येत नाही, मतं मिळवताही येत नाही — म्हणूनच अनेक दशके राज्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं.
पण, त्यांनी आता तरी जागं व्हावं आणि हा आपला समृद्ध ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रयत्न करावेत.

राजे, आपल्या प्रामाणिक प्रयत्नांना तुळजाभवानी असेच यश देवो!
शिवभक्त सदैव आपल्या पाठीशी राहतील...!

छत्रपती शिवरायांच्या ज्वाजल्य इतिहासाचे साक्षीदार असलेले, महाराष्ट्राच्या पराक्रमी परंपरेच्या पाऊलखुणा अभिमानाने अंगावर ...

शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड 6 जून 2025 च्या नियोजनासाठी  पुणे येथे राज्यस्तरीय बैठक झाली त्या बैठकीला श्रीमंत युवर...
19/05/2025

शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड 6 जून 2025 च्या नियोजनासाठी पुणे येथे राज्यस्तरीय बैठक झाली त्या बैठकीला श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती आणि श्रीमंती संयोगिताराजे छत्रपती व श्रीमंत शहाजीराजे छत्रपती उपस्थित होते.

Address

Juna Rajwada, Bhavani Mandap
Kolhapur
416002

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीमंत संभाजीराजे छत्रपती सोशल फौंडेशन जुना राजवाडा,कोल्हापूर. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to श्रीमंत संभाजीराजे छत्रपती सोशल फौंडेशन जुना राजवाडा,कोल्हापूर.:

Share