Ganaavdhut Maharaj Langar

Ganaavdhut Maharaj Langar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ganaavdhut Maharaj Langar, Nonprofit Organization, Survey no 83-A, Marbel line, Kolhapur - Sangli Hwy, Shiroli,, Kolhapur.

Initiated by the divine instructions (Aadesh ) of Pujya Ganaavdhut Maharaj we Welcome you to "Ganaavdhut Maharaj Swami Samartha Jagdamb Shankar Baba Annachatra Langar (Community Kitchen), Kolhapur" गणाअवधूत महाराज (गणा महाराज)

महाराजांना त्यांचे हजारो भक्तगण “गणा महाराज “म्हणून ओळखतात. महाराष्ट्र आणि परदेशातही भक्तांची महाराजांवर “अवलिया ” म्हणून निस्सीम श्रद्धा आहे. अवलि

या म्हणजे परमेश्वराशी एकरूप झालेला संत, ज्यांनी सिद्धी प्राप्त केली आहे.
भक्तगण गणा महाराजांना भगवान दत्तात्रेय (दत्तगुरु), श्री स्वामी समर्थ, शंकर महाराज आणि चिलें महाराज यांचा अवतार मानतात. महाराजांच्या एका नजरेने आपल्या भक्तांवर असीम कृपा होते, अशी भक्तांची श्रद्धा आहे. महाराज आपल्या चमत्कारिक कृतींसाठी आणि कोणत्याही शब्दांशिवाय माणसाच्या अडचणी अचूक ओळखण्यासाठी प्रसिध्द आहेत. त्यांची केवळ उपस्थिती जीवनातील कोणत्याही आव्हानांवर आणि समस्यांवर तोडगा काढून देणारी मानली जाते.
महाराजांचे व्यक्तिमत्व खूप वेगळे आहे. बाह्यस्वरूप विशेष गरज असलेल्या व्यक्तीसारखे ... हावभाव आणि वागणे एखादया लहान बालकाला साजेसे . .. हे असे महाराजांचे स्वरूप दर्शवते ते केवळ दैवी प्रेम, निखळ आनंद आणि साधेपणा . ते अपारंपरिक वाटू शकतात, कारण ते अनेकदा सिगरेट ओढताना दिसून येतात, परंतु अशी ही विलक्षणता, असे हे बाह्यस्वरूप धारण करतात ते लोकांचे त्यांच्यावरील अनावश्यक लक्ष टाळण्यासाठी , लोकांपासून दूर राहण्यासाठी .

नामांकित उद्योजक, राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते अशा उच्चपदस्थ व्यक्तींपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्व स्तरातून महाराजांचे भक्त येतात. आपलं आयुष्य बदलून टाकणारे महाराजांचे कृपार्शिवाद आणि गुरु म्हणून महाराजांवर असलेले नितांत प्रेम, निस्सीम श्रद्धा ह्यातून ही सर्व लोक एकत्र येतात . .

महाराज जरी कोल्हापूरस्थित असले तरी, त्यांच्यावरील भक्तीचा प्रभाव महाराष्ट्र आणि परदेशातही पसरला आहे, म्हणूनच अनेक श्रद्धाळू भाविक पुणे, मुंबई आणि इतर शहरांमधून त्यांचे दिव्य आशिर्वाद मिळवण्यासाठी येतात .

महाराजांच्या सहवासात सर्व दुःख दूर होतात. जीवनात त्याची जागा दैवी आध्यात्मिक आनंद घेतो.. जीवनाला पूर्णता येते. येथे मिळते ती फक्त आणि फक्त आपल्या प्रिय गुरूंची असीम कृपा.

 ,
12/08/2024

,

Address

Survey No 83-A, Marbel Line, Kolhapur - Sangli Hwy, Shiroli,
Kolhapur
416122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganaavdhut Maharaj Langar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share