Kolhapur Chamber Of Commerce & Industries -KCCI

Kolhapur Chamber Of Commerce & Industries -KCCI KCCI- Federal body of Trade, Commerce, Industry, Banking, Service Industry and Transport

*व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र चेंबरचा ठाम पाठिंबा!*UPI ला विरोध नाही, पण MDR नको!व्यापाऱ्यांवर येणाऱ्या MDR च्या...
23/09/2026

*व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र चेंबरचा ठाम पाठिंबा!*

UPI ला विरोध नाही, पण MDR नको!

व्यापाऱ्यांवर येणाऱ्या MDR च्या अतिरिक्त आर्थिक भाराच्या प्रश्नावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर (MACCIA) यांनी *पत्रकार परिषद घेऊन व्यापारी वर्गाच्या भूमिकेला ठाम पाठिंबा दर्शविला.*

या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी *२ ऑक्टोबर २०२६ रोजी “NO UPI DAY* ” हा सांकेतिक उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.*एक दिवस UPI ऐवजी फक्त Cash ने व्यवहार करूया आणि MDR च्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधूया!*

UPI ला विरोध नाही — व्यापाऱ्यांवरील MDR चा अतिरिक्त भार नको!

या महत्त्वाच्या व्यापारी प्रश्नाला आपल्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ दिल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे आणि न्यूज मीडिया प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार. आपल्या सहकार्यामुळे हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे.

23/09/2026

जे छोटे छोटे उद्योजक,व्यापारी आहेत ते अर्थव्यवस्थेला बळकटी देत असतात. थोडक्यात ती अर्थव्यवस्था म्हणजे तळागाळापर्यंत रुजलेली असते आणि अर्थव्यवस्थेचा ती पाया सांभाळत असते. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज व ॲग्रीकल्चर चे उपाध्यक्ष व कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मा. संजय शेटे यांचा अवघ्या एक मिनिटाचा हा व्हिडिओ पहा, म्हणजे तो पाया डळमळीत व्हायची सुरुवात होत आहे असे तुम्हाला वाटू लागेल. यूपीआय व्यवहारांवरील व्यापारी सवलत शुल्क अर्थात एमडीआर च्या प्रस्तावित आकारणीला आपण सर्व व्यापारी संघटनांनी व नागरिकांनी विरोध दर्शवायला हवा.

0.04 आज हा आकडा आहे उद्या यामध्ये वाढ झाली तर आश्चर्य वाटायला नको. म्हणून याच आकड्याला आपण विरोध करायचा आहे.अन्यथा रोगाप...
23/09/2026

0.04 आज हा आकडा आहे उद्या यामध्ये वाढ झाली तर आश्चर्य वाटायला नको. म्हणून याच आकड्याला आपण विरोध करायचा आहे.अन्यथा रोगापेक्षा इलाज भयंकर. सर्विस चार्जेसच्या नावाखाली पैसे तर कट होतातच. त्यामध्ये किती वाढ होईल हे काही सांगता येत नाही. कारण आम्हाला आता यूपीआयची सवय झाली आहे. बंद करावं तरी पंचाइत, चालू ठेवावं तरी पंचाइत. ग्राहकावर बोजा पडला की महागाई वाढेल. यूपीआयला जनता पर्यायांचा विचार करेल. अर्थव्यवस्थेमध्ये गोंधळ होऊ शकतो. पण कुठेतरी आपण जनतेने एकत्र येऊन याचा विरोध करायला हवा, अन्यथा वरचेवर आपणाला अशा चार्जेसची सवय करून घ्यावी लागेल.

आई अंबाबाई व श्री ज्योतिबा ही दोन कोल्हापूरची दैवत आहेत. यांच्या दर्शनासाठी रेल्वे प्रवास करून पर्यटक व भाविक कोल्हापूरल...
22/09/2026

आई अंबाबाई व श्री ज्योतिबा ही दोन कोल्हापूरची दैवत आहेत. यांच्या दर्शनासाठी रेल्वे प्रवास करून पर्यटक व भाविक कोल्हापूरला येत असतात. रेल्वेतून उतरल्यानंतर मुख्य दरवाजातून स्टेशन बाहेर येत असताना उजव्या व डाव्या बाजूला दोन दैवतांच्या छायाचित्रांचे दर्शन 🙏आपणाला इथून पुढे होत राहील. सहज नजरेत येथील अशा व लाइटिंगने सुशोभित केलेल्या या दोन उत्कृष्ट छायाचित्रांचे अनावरण आज कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मा. संजय शेटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. दातृत्वाच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या वर्धमान इलेक्ट्रिकल्सच्या कोठारी कुटुंबीयांनी ही छायाचित्रे उपलब्ध करून दिली आहेत.

विक्री व्यवस्थेत बदल होत असल्याने व्यापाऱ्यांना कमी मार्जिन मध्ये व्यापार करावा लागत आहे. अशा टप्प्यातच दोन हजारांमध्ये ...
17/09/2026

विक्री व्यवस्थेत बदल होत असल्याने व्यापाऱ्यांना कमी मार्जिन मध्ये व्यापार करावा लागत आहे. अशा टप्प्यातच दोन हजारांमध्ये जास्त पैसे यूपीआयने स्वीकारल्यास शुल्क आकारणी होणार आहे. शुल्क व्यापाऱ्यांच्या बँक खात्यातून कट होणार आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी ग्राहकाकडून अधिकचे पैसे घ्यावे लागू शकतात. ग्राहकांवर अतिरिक्त बोजा टाकला तर ते रोख व्यवहाराकडे वळतील. खरेदी इतके पैसे त्यावेळी खिशात नसतील तर उधारी. वाढण्याचाही धोका आहे.
संजय शेटे
अध्यक्ष -कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज

कोल्हापूर चेंबरच्या वतीने आयोजित कार्यशाळेत मा.डॉक्टर विजय पाटील, सहाय्यक आयुक्त कोल्हापूर महानगर पालिका यांनी मार्गदर्श...
09/09/2026

कोल्हापूर चेंबरच्या वतीने आयोजित कार्यशाळेत मा.डॉक्टर विजय पाटील, सहाय्यक आयुक्त कोल्हापूर महानगर पालिका यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्षस्थानी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मा.संजय शेटे हे होते.

प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी व्यापाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करून त्यांना शिक्षा देण्याऐवजी शिक्षण द्या या भूमिके...
09/09/2026

प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीसाठी व्यापाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करून त्यांना शिक्षा देण्याऐवजी शिक्षण द्या या भूमिकेतून व्यापाऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मा. संजय शेटे यांनी केली . याचवेळी प्लास्टिक मुक्त कोल्हापूर घडवण्यासाठी व्यापारी आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पर्यायी पिशव्यांचा वापर स्वीकारावा,असे आवाहन महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त मा. डॉ.विजय पाटील व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी मा.रोहीत मातकर यांनी केले. कार्यशाळेस ६० हून अधिक व्यापारी उपस्थित होते.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर मा.*सौ. रुपाराणी संग्रामसिंह निकम* यांच्या कोल्हापूर महानगरपालिका इमारतीमधील नुतनीकृत ...
03/09/2026

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर मा.*सौ. रुपाराणी संग्रामसिंह निकम* यांच्या कोल्हापूर महानगरपालिका इमारतीमधील नुतनीकृत केलेल्या दालनाचा प्रवेश *कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्रीमहोदयांच्या* प्रमुख उपस्थितीत *गुरुवार दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वा.* पार पडला..सदर कार्यक्रमास *कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने 💐शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष मा.अध्यक्ष संजय शेटे, मानद सचिव प्रशांत शिंदे, अजित कोठारी, अविनाश नासिपूडे

🚫 प्लास्टिक बंदीबाबत संभ्रम आहे?आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा!> सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ सायं. ५.३० वा.> शिवाजीराव द...
03/09/2026

🚫 प्लास्टिक बंदीबाबत संभ्रम आहे?
आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवा!

> सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ सायं. ५.३० वा.
> शिवाजीराव देसाई सभागृह, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, राजाराम रोड, कोल्हापूर.

*कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज*
*कोल्हापूर महानगरपालिका*
*महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ*

यांच्या संयुक्त विद्यमाने
*प्लास्टिक बंदीबाबत संयुक्त कार्यशाळा*

कोणते प्लास्टिक वापरावे? | कोणते प्लास्टिक वापरू नये? | नियम काय आहेत?
दंड व जप्तीची कारवाई कधी होऊ शकते?

प्लास्टिक विक्रेते • उत्पादक • बेकरी व्यावसायिक • व्यापारी
सर्व लहान-मोठ्या व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्त्वाची कार्यशाळा!

📢 आपल्या शंका व अडचणी थेट संबंधित अधिकार्‍यांसमोर मांडा!

संभ्रम दूर करा, योग्य माहिती मिळवा!
सर्व संबंधित व्यावसायिकांनी आवर्जून उपस्थित रहावे.

मासिक सभा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ची कार्यकारणी मंडळाची मासिक सभा संस्थेचे अध्यक्ष मा. संजय शेटे यांच्य...
28/08/2026

मासिक सभा कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ची कार्यकारणी मंडळाची मासिक सभा संस्थेचे अध्यक्ष मा. संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सात वाजता सुरू झाली.
उपस्थित यांचे स्वागत मानद सचिव मा. प्रशांत शिंदे यांनी केले.
सुरुवातीला ज्ञात अज्ञात संस्था संबंधित व्यक्तींचे दुखद निधनाबद्दल🥀 श्रद्धांजली म्हणून दोन मिनिटे स्तब्धता पाळण्यात आली.
सभेच्या सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. सभासदासाठी आलेल्या नवीन अर्जांना मंजुरी देण्यात आली. तसेच जुलै महिन्यांमधील जमाखर्चाचे वाचन संस्थेचे खजानिस विज्ञान मुंडे यांनी केल्यानंतर त्यास मंजुरी देण्यात आली.
या महिन्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सेस रद्द होण्याबाबत झालेल्या राज्यव्यापी व्यापारी परिषदेचा संपूर्ण आढावा या बैठकीत घेण्यात आला. त्याची सविस्तर माहिती मा. अजित कोठारी यांनी दिली. सैनिक टाकळी येथील एमआयडीसी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त रोजगार मेळाव्याचे नियोजन करण्याबाबत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्राकडून आलेल्या पत्रावर चर्चा, स्मार्ट ट्रेडर्स,स्मार्ट इन्फॉर्मेशन,स्मार्ट डिसिजन अंतर्गत चेंबरच्या सहाय्याने प्रशिक्षण उपक्रमाचे नियोजन लवकरच करण्यात येणार आहे त्याची माहिती सभेमध्ये देण्यात आली. महानगरपालिका व्यवसाय परवाना व गाळेधारकांच्या भाडे प्रश्नासंबंधी राज्यातील संघटनेकडे केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती सभेमध्ये देण्यात आली.
कोल्हापूर जीएसटी कार्यालयामध्ये कोल्हापुरातील यशस्वी उद्योजिका व जीएसटी आयुक्त यांचे समवेत नियोजित बैठक घेण्यात आली त्याचा सविस्तर आढावा मा.सीमा जोशी यांनी दिला.
आजच्या सभेमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर या महाराष्ट्रातील शिखर संस्थेवर निवड झालेल्या सर्वांचा 💐सत्कार करण्यात आला.👏
ऐनवेळी आलेल्या विषयावर चर्चा झाल्यानंतर सभा संपन्न झाली. आभार प्रदर्शन मा. विज्ञान मुंडे यांनी केले.
आजच्या सभेमध्ये मा.राजू पाटील, राहुल मेंच, सीमा जोशी, लक्ष्मण पटेल यांनी प्रामुख्याने भाग घेतला

Address

1086 E 104 Kalptaru Plaza First Floor, , Rajaram Road
Kolhapur
416002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kolhapur Chamber Of Commerce & Industries -KCCI posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Kolhapur Chamber Of Commerce & Industries -KCCI:

Shortcuts

Share