पर्णाल इतिहास संशोधन मंडळ , पन्हाळा

  • Home
  • India
  • Kolhapur
  • पर्णाल इतिहास संशोधन मंडळ , पन्हाळा

पर्णाल इतिहास संशोधन मंडळ , पन्हाळा पन्हाळ्यासह कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण अभ्यास करण्याकरिता १९ फेब्रुवारी २०१६ रोजी मंडळाची स्थापना

 #सांगली नगरीचे उदंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!!!*सांगली नगरीत सलग चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या  #ऐतिहासिक_शस्त्र...
25/09/2026

#सांगली नगरीचे उदंड प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार!!!*

सांगली नगरीत सलग चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या #ऐतिहासिक_शस्त्रास्त्रे_नाणी_कागदपत्रे व विविध ऐतिहासिक साधनांच्या प्रदर्शनास सांगलीकरांनी दिलेला उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद हा माझ्यासाठी अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी अनुभव आहे. इतिहास, संस्कृती आणि वारसा यांविषयी समाजमनात असलेली आस्था या प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रकर्षाने जाणवली.

या प्रदर्शनाचे उद्घाटन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख * #श्री_संभाजीराव_भिडे_गुरुजी यांच्या शुभहस्ते झाले, तर सांगता समारंभास मिरज संस्थानचे युवराज #श्रीमंत_माधवराजे_पटवर्धन यांची उपस्थिती लाभली.* या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमुळे प्रदर्शनाला विशेष प्रतिष्ठा आणि ऐतिहासिक संदर्भ प्राप्त झाला.

प्रदर्शनाच्या चारही दिवसांत सांगली, मिरज आणि कुपवाड परिसरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेले लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, इतिहासप्रेमी, संशोधक, अभ्यासक, संग्राहक तसेच हजारो गणेशभक्त यांनी प्रदर्शनास आवर्जून भेट दिली. #सांगली_मिरज_कुपवाड महानगरपालिकेचे #महापौर_श्री_धीरज_सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली शहराध्यक्ष #प्रा_पद्माकर_जगदाळे, श्रीयुत #अजिंक्यजी_पटवर्धन, #मा_नितीनजी_शिंदे (माजी आमदार, सांगली), भारतीय जनता पक्षाच्या नेत्या #मा_जयश्रीताई_पाटील, #श्री_विज्ञान_माने, #छत्रपती_शासन समूहाचे कार्यकर्ते, विविध माध्यमांचे प्रतिनिधी* तसेच असंख्य इतिहासप्रेमी व गणेशभक्त यांनी दिलेल्या सदिच्छा, प्रोत्साहन आणि प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो.

हे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ओम सम्राट मित्र मंडळ, खण भाग, सांगलीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी घेतलेले परिश्रम व दिलेले सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या सक्रिय सहभागाशिवाय या उपक्रमाची यशस्वी सांगता शक्य झाली नसती.

या ऐतिहासिक उपक्रमाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मंडळाचे श्री. अमोल आरगे, सांगली जिल्ह्यातील युवा इतिहास संशोधक #श्री_महेशजी_कदम, तसेच मंडळाचे सहकारी राजू यांनी केलेले योगदान विशेष उल्लेखनीय आहे. #पर्णाल_इतिहास_संशोधन_मंडळ_पन्हाळा आणि ओम सम्राट मित्र मंडळ, सांगली यांच्यामधील समन्वय साधण्यात श्री. महेशजी कदम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याबद्दल त्यांचे विशेष आभार.

या प्रदर्शनास प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या असंख्य व्यक्ती, संस्था, माध्यम प्रतिनिधी, इतिहासप्रेमी, अभ्यासक, संग्राहक, कार्यकर्ते आणि सांगलीकर नागरिक यांची नावे विस्ताराच्या मर्यादेमुळे स्वतंत्रपणे नमूद करता येत नाहीत. तथापि, या सर्वांचे ऋण मी मनःपूर्वक स्वीकारतो.

इतिहास हा केवळ भूतकाळाचा दस्तऐवज नसून वर्तमानाला दिशा देणारी आणि भविष्याशी संवाद साधणारी ज्ञानपरंपरा आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने ऐतिहासिक साधनांविषयी निर्माण झालेली जिज्ञासा, अभ्यासाची प्रेरणा आणि जनसहभाग हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती आहे.

सांगलीकरांनी या उपक्रमावर व्यक्त केलेला विश्वास, प्रेम आणि आपलेपणा आम्ही सदैव स्मरणात ठेवू.

आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!

– शिवप्रसाद शेवाळे
अध्यक्ष तथा संग्राहक
*पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा* 🚩

#ऐतिहासिक_शस्त्रप्रदर्शन #श्री_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्तान
पर्णाल इतिहास संशोधन मंडळ , पन्हाळा

*गणेशोत्सवानिमित्त भव्य ऐतिहासिक शस्त्र व दुर्मीळ कागदपत्रे प्रदर्शन*सांगलीकरांसाठी आणि विशेषतः इतिहासप्रेमींसाठी या वर्...
16/09/2026

*गणेशोत्सवानिमित्त भव्य ऐतिहासिक शस्त्र व दुर्मीळ कागदपत्रे प्रदर्शन*

सांगलीकरांसाठी आणि विशेषतः इतिहासप्रेमींसाठी या वर्षीच्या गणेशोत्सवात एक खास पर्वणी उपलब्ध झाली आहे. ओम सम्राट मित्र मंडळाच्या वतीने खण भाग, सांगली येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या देदीप्यमान इतिहासाची साक्ष देणाऱ्या दुर्मीळ शस्त्रांचे व दस्तऐवजांचे भव्य प्रदर्शन भरवण्यात येत आहे.

*प्रदर्शनाची मुख्य वैशिष्ट्ये*
४००+ दुर्मीळ शस्त्रे, शिवकाळ आणि मराठेशाहीतील विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा अभूतपूर्व संग्रह.
*खास आकर्षण: दुर्मीळ 'सलामी धोप' आणि ऐतिहासिक 'विजयनगरी पट्टा'*, ब्रिटिश कालीन बाँडपेपर व इतर महत्त्वाची अस्सल कागदपत्रे.

:- संग्राहक :-

*श्री. शिवप्रसाद शेवाळे*
अध्यक्ष - पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा 🚩

*वेळ व स्थळाचा तपशील*
दिनांक:
*१८ ते २१ सप्टेंबर २०२६*
*सकाळी ११:०० ते दुपारी १:०० वा.*
*सायंकाळी ४:०० ते रात्री १०:००*

*स्थळ*
*श्री विठ्ठल मंदिर, खण भाग, सांगली*

*आयोजक*
*ओम सम्राट मित्र मंडळ, खण भाग, सांगली*

या गणेशोत्सवात भेटू... आपल्या गावात... आपल्या शहरात...जागर करू इतिहासाचा... #ऐतिहासिक_शस्त्रप्रदर्शन*अधिक माहितीसाठी :- ...
30/08/2026

या गणेशोत्सवात भेटू... आपल्या गावात... आपल्या शहरात...
जागर करू इतिहासाचा...

#ऐतिहासिक_शस्त्रप्रदर्शन*

अधिक माहितीसाठी :-
शिवप्रसाद शेवाळे (9860870940)
ऋतुराज काशिद (9595159002)

पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा

या गणेशोत्सवात भेटू...आपल्या गावात... आपल्या शहरात...जागर करू इतिहासाचा *ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन*अधिक माहितीसाठी :- शिवप...
28/08/2026

या गणेशोत्सवात भेटू...
आपल्या गावात... आपल्या शहरात...
जागर करू इतिहासाचा
*ऐतिहासिक शस्त्रप्रदर्शन*

अधिक माहितीसाठी :-
शिवप्रसाद शेवाळे (9860870940)
ऋतुराज काशिद (9595159002 )

पर्णाल इतिहास संशोधन मंडळ, पन्हाळा

24/08/2026

⛳ “सेनापती श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन (तासगांवकर)” या संशोधनात्मक चरित्रग्रंथाचा नेत्रदीपक ऐतिहासिक प्रकाशन सोहळा तासगांव येथील श्रीगणपति पंचायतन देवस्थान संस्थानच्या प्रांगणात दिमाखात संपन्न झाला -
मराठा साम्राज्याचे पराक्रमी सेनापती, तसेच तासगांव नगरी व संस्थानचे जनक श्रीमंत परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या जीवनकार्यावर मी लिहिलेल्या या संशोधनात्मक चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा मिरज संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत श्री. गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन मिरजकर, युवराज श्रीमंत श्री. माधवराजेसाहेब पटवर्धन मिरजकर तथा श्रीमंत युवराज्ञी सौ.अनुसयाराजे माधवराजे पटवर्धन यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात व ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला. 💐

या सोहळ्याने तासगांवच्या ऐतिहासिक वैभवाला आणि सेनापती परशुरामभाऊंच्या पराक्रमाच्या स्मृतींना एक नवा उजाळा मिळाला.👏🏼

मुलुखगिरी प्रकाशन, कोल्हापूर ⚔️

22/08/2026

महेश कद‌म लिखित, 'सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन' या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा

"हिज हायनेस श्रीमंत श्री.गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन (राजेसाहेब मिरज संस्थान) आणि श्रीमंत माधवराजे पटवर्धन(युवराज साहेब मिरज)" यांच्या शुभहस्ते, रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीगणपति मंदिर, तासगांव येथे साजरा होणार आहे.

या प्रसंगी आपण आवर्जुन उपस्थित राहावे ही विनंती.

आपले नम्र,
श्रीमंत राजेन्द्र परशुराम पट‌वर्धन आणि कुटुंबीय
मुलुखगिरी प्रकाशन, कोल्हापूर

#तासगांव

महेश कद‌म लिखित, 'सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन' या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा "हिज हायनेस श्रीमंत श्री.गंगाधरराव बाळासाह...
22/08/2026

महेश कद‌म लिखित, 'सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन' या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा

"हिज हायनेस श्रीमंत श्री.गंगाधरराव बाळासाहेब पटवर्धन (राजेसाहेब मिरज संस्थान) आणि श्रीमंत माधवराजे पटवर्धन(युवराज साहेब मिरज)" यांच्या शुभहस्ते, रविवार दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीगणपति मंदिर, तासगांव येथे साजरा होणार आहे.

या प्रसंगी आपण आवर्जुन उपस्थित राहावे ही विनंती.

आपले नम्र,
श्रीमंत राजेन्द्र परशुराम पट‌वर्धन आणि कुटुंबीय
मुलुखगिरी प्रकाशन, कोल्हापूर

#तासगांव

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!!!💐💐💐
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो!!!💐💐💐

Address

Main Road Panhala, Pimple T. Satave (Bambarwadi), Tal/Panhala
Kolhapur
416201

Alerts

Be the first to know and let us send you an email when पर्णाल इतिहास संशोधन मंडळ , पन्हाळा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to पर्णाल इतिहास संशोधन मंडळ , पन्हाळा:

Shortcuts

Share