महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, कोल्हापूर

  • Home
  • India
  • Kolhapur
  • महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, कोल्हापूर

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, कोल्हापूर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, कोल्हापूर, Community Organization, kolhapur, Kolhapur.

संविधान आणि लोकशाहीने दिलेला शांततापूर्वक आंदोलनाचा हक्क जपण्यासाठी आज संध्याकाळी 5:30 वाजता बिंदू चौक येथे जमूया.
18/07/2026

संविधान आणि लोकशाहीने दिलेला शांततापूर्वक आंदोलनाचा हक्क जपण्यासाठी आज संध्याकाळी 5:30 वाजता बिंदू चौक येथे जमूया.

*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कोल्हापूर*  *जिल्हा बैठकीसाठी उपस्थित राहाण्याचे...*  *नम्र आवाहन....* जिल्...
02/07/2026

*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कोल्हापूर*

*जिल्हा बैठकीसाठी उपस्थित राहाण्याचे...*
*नम्र आवाहन....*

जिल्ह्यातील सर्व शाखांचे कार्यकर्ते व पदाधिकारी, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व राज्य पदाधिकारी,

*मित्रहो, नमस्कार .*

नुकतीच ५ ते ७ जून २०२६ असे तीन दिवस अहिल्यानगर येथे विस्तारित राज्य कार्यकारिणीची बैठक अतिशय उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीत विविध विषयांवर झालेली महत्त्वपूर्ण चर्चा, सर्व सहमतीने झालेले निर्णय आणि त्यांची शाखांच्या पातळीवर माहिती देणे व तपशीलांची, निर्णयांची काटेकोरपणे अंमलबजावणी शाखा पातळीवर होईल, असे नियोजन करणे, जिल्ह्यातील प्रत्येक शाखेने पुढील चार महिन्यात करावयाचे संघटनात्मक व उपक्रमात्मक कामकाज, केलेल्या कामाचा अहवाल त्या त्या वेळी तयार करणे, यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होईल. *यावेळची जिल्हा बैठक ही दोन दिवसीय चिंतन बैठक स्वरूपात घ्यावी असा राज्य कार्यकारिणी मध्ये निर्णय झाला आहे* त्यानुसार या जिल्हा बैठकीचे आयोजन केले आहे.

आपल्या विभागाचे राज्य सरचिटणीस *कृष्णात स्वाती* यांच्या उपस्थितीत ही जिल्हा बैठक होईल. याची नोंद घ्यावी.

जिल्हा बैठकीसाठी येताना जिल्ह्यातील प्रत्येक शाखेचे कार्याध्यक्ष ,प्रधान सचिव, प्रमुख कार्यकर्ते यांनी आपल्या शाखेच्या मागील चार महिन्यांच्या कामकाजाचा सविस्तर ,लेखी अहवाल सोबत आणणे आवश्यक आहे.

तसेच जिल्ह्यातील सर्व शाखांचे सर्व कार्यकर्ते, जिल्हा पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्व राज्य पदाधिकारी यांनी बैठकीला वेळेत उपस्थित राहून पूर्णवेळ बैठकीत सहभागी होणे, अनिवार्य आहे .

बैठक दिनांक - 4 व 5 जुलै, 2026
बैठकीचे स्थळ - सेंटर फॉर रेनान्स, हेर्ले
वार- शनिवार दुपारी १:०० ते रविवार दुपारी १:००


*विवेकाचा आवाज बुलंद करू या..*

आपले सहकारी,
प्रमोद शिंदे
*जिल्हा कार्याध्यक्ष.*

रामदास देसाई
अमृता जाधव
प्रकाश नाईक
*जिल्हा प्रधान सचिव*

🌕 वटपौर्णिमा विशेष मुक्त ऑनलाईन संवाद 🌕*"सावित्री : जोतिबाची की सत्यवानाची?"*वटपौर्णिमेच्या निमित्ताने परंपरा, इतिहास, स...
28/06/2026

🌕 वटपौर्णिमा विशेष मुक्त ऑनलाईन संवाद 🌕

*"सावित्री : जोतिबाची की सत्यवानाची?"*

वटपौर्णिमेच्या निमित्ताने परंपरा, इतिहास, स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक वास्तव या संदर्भात खुला, चिकित्सक आणि विचारमंथनात्मक संवाद आयोजित करण्यात आला आहे.

🗣️ या संवादात सर्व स्त्री-पुरुषांना आपले मत मांडण्याची संधी असेल.

💬 प्रमुख मांडणी : तनुजा शिपुरकर (सामाजिक कार्यकर्त्या)

📅 दिनांक : सोमवार, २९ जून २०२६
🕣 वेळ : रात्री ८:४५ वाजता

💻 माध्यम : Google Meet लिंक meet.google.com/wsq-gers-mqg

आयोजक : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर-करवीर शाखा

*"परंपरेकडे श्रद्धेपेक्षा चिकित्सक नजरेने पाहूया... संवादातून विचार समृद्ध करूया."*

सर्वांनी सहभागी व्हा आणि इतरांनाही सहभागी होण्यासाठी आवर्जून निमंत्रित करा.

https://www.facebook.com/share/1EUAz4EcKe/
16/06/2026

https://www.facebook.com/share/1EUAz4EcKe/

शहीद डाॅ नरेंद्र दाभोलकर स्थापित (१९८९)महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,
विवेक जागर संस्थांतर्गत
वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प विभाग आणि
सर्वेक्षण व संशोधन विभाग
आयोजित
डॉ. जयंत नारळीकर वैज्ञानिक जाणीवा लर्निंग फेलोशिप २०२६–२७
(Youth for Scientific Temperament)

📚 फेलोशिपमध्ये काय शिकायला मिळेल?
MAGIC Learning Model
M – Mindful Observation
A – Analytical Thinking
G – Gender & Human Values
I – Inquiry & Evidence
C – Constitutional Scientific Citizenship

🏫 या फेलोशिप मधून फेलोंमध्ये कोणत्या क्षमता विकसित होतील?
माध्यमिक शाळांमध्ये वैज्ञानिक जाणीवा सत्रे घेणे
विज्ञान क्लब स्थापन करणे
"चमत्कारामागील विज्ञान" प्रात्यक्षिके सादर करणे
अंधश्रद्धा, अफवा आणि छद्मविज्ञान यांवर संवाद घडवणे
पर्यावरण विषयक संवाद घडवणे
किशोरावस्था, लैंगिकता आणि लिंगभाव विषयक संवाद
संविधान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विषयक उपक्रम
राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रम आयोजित करणे
मासिक चिंतन व अनुभव नोंदी लिहिणे

🎓 फेलोशिपची वैशिष्ट्ये
✅ निवासी प्रशिक्षण शिबिर
✅ अनुभवी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन
✅ प्रत्यक्ष शाळांमध्ये काम करण्याची संधी
✅ अभ्यास साहित्य
✅ मासिक चिंतन बैठक
✅ प्रमाणपत्र
✅ उत्कृष्ट फेलो पुरस्कार

🌱 आम्ही कोणाला शोधत आहोत?
प्रश्न विचारणारे
शिकण्याची तयारी असणारे
समाजपरिवर्तनाची जाणीव असणारे
वैज्ञानिक दृष्टिकोनावर विश्वास ठेवणारे
विद्यार्थ्यांसोबत काम करण्याची आवड असणारे युवा

👥 कोण अर्ज करू शकतात?
१८ ते ३५ वयोगटातील -
पदवीधर / पदव्युत्तर विद्यार्थी
शिक्षक
सामाजिक कार्यकर्ते
विज्ञानप्रेमी नागरिक
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते

📋 निवड प्रक्रिया
ऑनलाइन अर्ज
मुलाखत

✍️ अर्ज करण्याची अंतिम तारीख
30 जून 2026

"प्रश्न विचारूया... पुरावा शोधूया... विवेकाने विचार करूया!"
डॉ. जयंत नारळीकर वैज्ञानिक जाणीवा लर्निंग फेलोशिपमध्ये सहभागी व्हा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची नवी पिढी घडविण्याच्या चळवळीत सहभागी व्हा.
अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म ची लिंक -
https://forms.gle/LiPcENV2vQoaQWPa8
📞 संपर्क
दिगंबर कट्यारे 98603 11322
राज्य कार्यवाह
वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प विभाग आणि
डॉ. हरीश पेटकर 94036 18375
राज्य सह कार्यवाह
सर्वेक्षण व संशोधन विभाग
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
कृष्णात - 8600230660
आरती - 8652223803

झेप शिबिर, राधानगरी 30 व 31 मे, 2026 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा राधानगरी यांच्या वतीने महिला व युवतींसाठ...
03/06/2026

झेप शिबिर, राधानगरी
30 व 31 मे, 2026

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा राधानगरी यांच्या वतीने महिला व युवतींसाठी "झेप – एक भरारी आत्मसन्मानासाठी" हे दोन दिवसीय निवासी शिबिर दिनांक 30 व 31 मे 2026 रोजी उत्साहात पार पडले. सामाजिक भान, आत्मविश्वास, समता, स्व-ओळख आणि साहस यांचा संगम असलेल्या या शिबिरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागींशी संवाद साधला.
शिबिराची सुरवात जोतिबा 200 या थीम ने झाली. आपल्या आयुष्यातली तोडायची इच्छा असणारी चौकट, बंधन किंवा एक इच्छा जी पूर्ण करायचीय असं दिलेल्या फुलावर लिहून ती चिकटवायला सांगितली आणि मध्यभागी होती साऊ जोती. दुसरी थीम होती दरवाजाच्या चौकटीला बांधलेली मुली महिलांना लावलेली बंधनं जी सर्रास ऐकवली जातात ती कापून आत हॉल मध्ये प्रवेश केला सर्व शिबिरार्थीनी आणि सोबत शिवानी होती.
पहिल्या दिवशी लिंगभाव समानता व लैंगिकता या विषयावर नुकत्याच कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झालेल्या शिवानी गजबर यांनी मार्गदर्शन केले. पारलिंगी समुदायाचे वास्तव, त्यांचे संघर्ष आणि सामाजिक स्वीकाराचे महत्त्व त्यांनी प्रभावीपणे मांडले. त्यानंतर अभिनेता स्वप्नील राजशेखर आणि चित्रपट समीक्षक अनमोल कोठडिया यांनी शिबिराला भेट देऊन सहभागींसोबत दिलखुलास संवाद साधला.
संध्याकाळी मेरी पहचान या स्व-ओळख विषयक सत्रात महिलांनी स्वतःच्या अनुभवांबद्दल आणि आयुष्यातील प्रवासाबद्दल मनमोकळा संवाद साधला. त्यानंतर आयोजित रॅम्प वॉकमध्ये सहभागी महिलांनी उत्साहाने सहभाग घेत आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण केले.
रात्री महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने "ऐसे कैसे झाले भोंदू?" या विनोदी बतावणीचे आयोजन करण्यात आले. अंधश्रद्धेवर प्रहार करत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकाची गरज या कार्यक्रमातून अधोरेखित करण्यात आली.
रात्री "मेरी रातें, मेरी सड़कें" या उपक्रमांतर्गत सर्व सहभागी महिलांनी आईस्क्रीमचा आनंद घेत काजव्यांच्या सान्निध्यात रात्रीचा वॉक केला. सार्वजनिक जागांमध्ये महिलांच्या मुक्त व निर्भय वावराचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात नेहा हुपरीकर यांच्या झुंबा सत्राने झाली. त्यानंतर वनमित्र संस्थेचे कार्यकर्ते अशोक शिरोळे व विक्रम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जंगल भ्रमंती आयोजित करण्यात आली.
शिबिरातील सर्वाधिक रोमांचकारी उपक्रम म्हणजे रॅपलिंग. डॉ. प्रवीण जाधव, अतुल तेली, नीलिमा जाधव, सोहम आणि जुई यांच्या टीमने अत्यंत सुरक्षिततेने व आत्मविश्वास वाढवत हा साहसी अनुभव सहभागींसाठी अविस्मरणीय केला.
समारोप सत्रात नीलम माणगावे यांनी "पैंजण" या विषयावर संवाद साधत महिलांनी समाजाने घातलेल्या अनावश्यक बंधनांमधून मुक्त होत स्वतःच्या इच्छेनुसार, आत्मविश्वासाने आणि स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला.
शिबिरात बौद्धिक, सांस्कृतिक, साहसी आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. सहभागी महिलांनी आत्मविश्वास, मैत्री, स्व-ओळख, समता आणि स्वातंत्र्य यांचे नवे आयाम अनुभवत "झेप – एक भरारी आत्मसन्मानासाठी" या संकल्पनेचा खऱ्या अर्थाने अनुभव घेतला.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी रेश्मा खाडे, वेला निल्ले, विभावरी नकाते, मयुरी कांबळे, रुचिता पाटील, अश्विनी शोभा रामचंद्र, सुनील कांबळे, कृष्णात स्वाती, आरिफा सलीम, दामोदर कोळी, वैभव निल्ले, हर्षल जाधव आणि अर्श व नैतिका यांनी पूर्ण वेळ देऊन परिश्रम घेतले. कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते व हितचिंतक साथीनी जमेल ती मदत करून सहकार्य केले आहे. सर्वांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे शिबिर सुरळीत, आनंददायी आणि संस्मरणीय ठरले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीने बकरी ईद निमित्त रक्तदान शिबिर सं...
27/05/2026

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीने बकरी ईद निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये “त्याग” हे महत्त्वाचे मूल्य आहे. इस्लाम धर्मातही उच्च ध्येय साध्य करण्यासाठी “कुर्बानी” किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण दिली जाते. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) हा सण इस्लाम धर्मीयांमध्ये साजरा केला जातो. या निमित्ताने बकरे अथवा इतर प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते.
आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, सर्व धर्मीयांनी धार्मिक सण अधिकाधिक समाजाभिमुख आणि मानवतावादी पद्धतीने साजरे करणे हे धर्माचेच उन्नयन ठरेल.
हाच विचार समोर ठेवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीने “बकरी ईद” निमित्त पशूंची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा आणि या प्रथेला पर्याय म्हणून बुधवार, दि. २७ मे २०२६ रोजी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.

“मुस्लीम बांधवांसमवेत आपण सर्वांनी धर्म-जातीपलीकडे जाऊन मानवतेसाठी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन जपूया,” असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सलीम कागवाडे, दिलदार मुजावर, जावेद शेख, शाहरुख मुल्ला, तोहीब चाबुकस्वार, आदिती भोकरे, स्वाती कृष्णात, करिष्मा रिकीबदार, तनिष्क जगतकर, संघसेन जगतकर, तेजस सुस्वरे, महादेव बधिर, उमाकांत पिसे, दत्तात्रय यादव, अंशुमन कांबळे, सतीश ओटणे, रवींद्र वाळवेकर, अमित माने, तुषार चोपडे, डॉ. तुषार काटकर, श्रेयस मालवणकर, किरण गवळी, कृष्णात स्वाती, सिद्धार्थ कांबळे, सतीश चौगुले, अशोक पलांडे, निशांत शिंदे, संग्राम भोसले, देवेंद्र बोळावे, डॉ. भूषण मिरजे, सुधीर पाटील, विनायक रसाळ, सुशांत कदम, नितीन माळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी रक्तदान केले.
यावेळी मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे गुलाब अत्तार, सूरज गायकवाड तसेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद शिंदे, जिल्हा प्रधान सचिव रामदास देसाई, डॉ. अनमोल कोठडिया, कपिल मुळे, रमेश वडणगेकर, सुभाष कांबळे, इर्शाद वडगावकर, इशरत तांबोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सीपीआर च्या वतीने डॉ. रोहित आर्वीकर, दत्तात्रय ऐवळे, आकांक्षा पाटील, रोहित लोखंडे, सुप्रियांका बिडकर, राहुल धनवडे, प्रशांत काटकर, स्वरूप मगदूम यांचे सहकार्य लाभले.

दिलीप कांबळे
कार्याध्यक्ष, करवीर शाखा,
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
स्वाती कृष्णात
कार्याध्यक्ष, कोल्हापूर शहर शाखा,
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
गुलाब अत्तार
मुस्लीम सत्यशोधक मंडळ कोल्हापूर

साथी, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बकरी ईद निमित्त बकऱ्याची कुर्बानी देण्याला पर्याय म्हणून स्वतःच्या रक्ताची कुरबानी द...
26/05/2026

साथी, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बकरी ईद निमित्त बकऱ्याची कुर्बानी देण्याला पर्याय म्हणून स्वतःच्या रक्ताची कुरबानी द्यावी असा संदेश देणारा रक्तदान उपक्रम आपण राबवत आहोत. हा उपक्रम फक्त मुस्लिम बांधवांसाठी नाही तर मुस्लिम बांधवांचा सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी सर्व धर्मीय बांधवांनी या रक्तदानात सहभागी व्हावे अशी अपेक्षा आहे. आपण सर्वांनी सदर रक्तदान शिबिरात सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा ही विनंती.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा राधानगरी आयोजित🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸👭युवती व महिलांसाठी👭   🎈 झेप  🎈एक भरारी ‘आत्मसन्मानासाठ...
18/05/2026

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
शाखा राधानगरी आयोजित

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸

👭युवती व महिलांसाठी👭
🎈 झेप 🎈
एक भरारी ‘आत्मसन्मानासाठी’

दोन दिवसीय निवासी शिबीर
🔶 जंगलातली भटकंतीला जावूया.
🔸 झुंबा, एरोबिक्सची आवड जपुया.
🔸 व्हॅली क्रॉसिंग, झुमारिंगचा थरार अनुभवू या.

🔰गप्पा 🔰मुलाखत 🔰गटचर्चा 🔰केस स्टडीज 🔰प्रात्यक्षिके 🔰 साहस आणि बरंच काही 🦋

⛺ विशेष : विशेष बतावणीचे सादरीकरण
🔸 थोडी मांडणी, थोडी मस्ती, थोडी चर्चा, तेवढीच दोस्ती तीही निसर्गाच्या सोबतीने
💥 दि. 30, 31 मे 2026
💥 ठिकाण : राधानगरी

🏚निवास व्यवस्था आहे.

🔷 अधिक माहिती व पूर्वनोंदणीसाठी संपर्क 😘
रेश्मा : 9421114879
वेला : 9922101903
अश्विनी : 7387464049
मयुरी : 90759 01826

👭युवती व महिलांसाठी👭   🎈 झेप  🎈एक भरारी ‘आत्मसन्मानासाठी’ दोन दिवसीय निवासी शिबीर🔶 जंगलातल्या भटकंतीला जावूया. 🔸 झुंबा, ...
09/05/2026

👭युवती व महिलांसाठी👭
🎈 झेप 🎈
एक भरारी ‘आत्मसन्मानासाठी’

दोन दिवसीय निवासी शिबीर
🔶 जंगलातल्या भटकंतीला जावूया.
🔸 झुंबा, एरोबिक्सची आवड जपुया.
🔸 व्हॅली क्रॉसिंग, झुमारिंगचा थरार अनुभवू या.

🔰गप्पा 🔰मुलाखत 🔰गटचर्चा 🔰केस स्टडीज 🔰प्रात्यक्षिके 🔰 साहस आणि बरंच काही 🦋

⛺ विशेष : बतावणीचे सादरीकरण

🔸 थोडी मांडणी, थोडी मस्ती, थोडी चर्चा, तेवढीच दोस्ती तीही निसर्गाच्या सोबतीने

💥 दि. 30, 31 मे 2026
💥 ठिकाण : राधानगरी

🏚निवास व्यवस्था आहे.

🔷 अधिक माहिती व पूर्वनोंदणीसाठी संपर्क 😘
रेश्मा : 9421114879
वेला : 9922101903
अश्विनी : 7387464049
मयुरी : 90759 01826

मर्यादित संख्या असल्याने आधी जे नोंदणी फी भरतील ते कन्फर्म होतील.

Address

Kolhapur
Kolhapur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, कोल्हापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share