शबरी सेवा समिती.(Shabari Seva Samiti)

  • Home
  • India
  • Kashele
  • शबरी सेवा समिती.(Shabari Seva Samiti)
Call Directions

शबरी सेवा समिती.(Shabari Seva Samiti) Pramod & Ranjana Karandikar’s Shabri Seva Samiti has been transforming tribal lives since 2003 by eradicating child malnutrition with care and dedication.

वनवासी क्षेत्रातील
लाखो बालकांचे कुपोषण...
या कुपोषणामुळे होणारे
हजारो बालमृत्यू...

हे दुर्दैवी चित्र बदलण्याचा आम्ही
अगदी मनापासून प्रयत्न केला.

कुपोषण...बालमृत्यू...
ते सुदृढ बालकांचा आनंदोत्सव !!

होय, आठ वर्षाच्या अथक प्रयत्नाने
आम्ही हे थक्क करणारे परिवर्तन घडवू शकलो !
-------------------------------------------------------
🌱✨ In 2003, malnutrition cast a dark shadow over tribal children — lakhs were affected, and thousands of little lives were lost. 💔

But with relentless dedication, Pramod Karandikar & Ranjana Karandikar worked for 8 years to change this picture. Today, the tears of loss have turned into the smiles of parents, holding the hands of their healthy, happy children. This is no less than a festival of life. 🌸👶💚

शबरी सेवा समिती च्या वतीने आज बर्‍याच  ठिकाणी राख्या तयार केल्या झाडांच्या संरक्षणासाठी त्या राख्या झाडांना बांधल्यात.
27/08/2026

शबरी सेवा समिती च्या वतीने आज बर्‍याच ठिकाणी राख्या तयार केल्या झाडांच्या संरक्षणासाठी त्या राख्या झाडांना बांधल्यात.

शबरी सेवा समितीची पालघर जिल्ह्यातील  कार्यकर्ती वंदना चौधरीने किशोरी प्रबोधन शिबीर घेतले. तिने लिहिलेले  त्या शिबीराचे व...
21/08/2026

शबरी सेवा समितीची पालघर जिल्ह्यातील कार्यकर्ती वंदना चौधरीने किशोरी प्रबोधन शिबीर घेतले. तिने लिहिलेले त्या शिबीराचे वृत्त पाठवत आहे. कार्यकर्ते कसे घडत आहेत याचे, हे उत्तम उदाहरण आहे.
दिनांक 19/08/2026 वार -बुधवार, शासकीय, माध्यमिक आश्रम शाळा , साखरे येथे किशोरी विकास उपक्रम घेण्यात आला. एकूण 136 मुलीउपस्थित होत्या,8वी, 9वी, 11वी
खालील मुद्यावर चर्चा झाली.
कार्यक्रमाची सुरुवात गीत म्हणून झाली.मुलींचे सामाजिक दृष्टीकोन, स्थान, व्यक्तिमत्व विकास ,आरोग्य,आहार,स्वच्छता ,रागावर नियंत्रण ,
चांगला-वाईट स्पर्श ,प्रेम आणि आकर्षण फरक ,चांगले कर्म करा, त्याचे फळ चांगले मिळते. निःस्वार्थी राहा, आनंदी रहा.
या मुद्यांवर हसत खेळत चर्चा झाली.समाजात घडणारी चांगली- वाईट उदाहरणे सांगितली, मध्ये गाणे,तीन मूर्ती ची गोष्ट, शेवटी खेळ घेऊन कार्यक्रम संपवला.
खूप छान प्रतिसाद मिळाला, पूर्ण वेळ श्रीमती.घाटाळ मॅडम उपस्थित होत्या.आपले मुद्दे त्यांना खूप आवडले. त्या म्हणाल्या की वर्षांतून 2 वेळा का,महिन्याला एक फेरी तरी झाली चालेल.
तुमच्या सवडीने मुलींना मार्गदर्शन करा.

शबरी सेवा समितीतर्फे दरवर्षी शिवणकाम शिकविणा-या शिक्षिकांसाठीचा प्रशिक्षण वर्ग कर्जतला आयोजित केला जातो. ह्यावर्षी दि. 1...
18/08/2026

शबरी सेवा समितीतर्फे दरवर्षी शिवणकाम शिकविणा-या शिक्षिकांसाठीचा प्रशिक्षण वर्ग कर्जतला आयोजित केला जातो.
ह्यावर्षी दि. 11 ते 13 ऑगस्ट 2026 ह्या दरम्यान हा वर्ग घेण्यात आला. ह्या वर्गात नऊ शिक्षिका सहभागी झाल्या आहेत.
रेक्झिनच्या पर्स व प्रवासी बॅग आणि आरीवर्क ह्या गोष्टी त्यांना शिकविण्यात आल्या. शिक्षिकांना काय शिकायचे आहे, त्याचीच योजना केली जाते.
ड्रेस, ब्लाऊज शिवण्यात तर या सगळ्या तरबेज आहेतच. पण त्यावर आरीवर्क केले तर लगेच त्याची शिलाई वाढते. त्यामुळे त्यांना आरीवर्क शिकण्याची इच्छा होती. सर्व जणी अगदी मनापासून व चिकाटीने हे सगळं शिकतात. दिवसभरात एका जागेवरून हलतही नाहीत. त्यांची चिकाटी व शिकण्याची ओढ बघून आमचाही नवनवीन शिकविण्याचा उत्साह वाढतो.
रेक्झिनच्या बॅग शिकवायला डोंबिवलीतून भाग्यश्री पटवर्धन आल्या होत्या.
आरीवर्क शिकवायला कर्जतमधीलच आरती हांडे आली होती. आरती आपल्या शिवणक्लासमधूनच शिवण शिकून गेली आहे व आता आरीवर्कचे क्लास चालवते.
कर्जतमधील शबरीच्या कार्यकर्त्यांनी प्रशिक्षण वर्गाच्या अन्य व्यवस्था सांभाळल्या.
कर्जतच्या डोंबिवली नागरी सह. बॅंकेच्या मॅनेजर श्रीमती. स्वाती घांग्रेकर व बॅंकेतील अन्य सर्व कर्मचारी यांनी या वर्गाला भेट दिली. घांग्रेकर यांनी थोडक्यात बचतीचे महत्त्वही समजावून सांगितले.
तीन दिवसाच्या या प्रशिक्षणाचा उपयोग या सर्व जणी आपापल्या शिवणक्लासमध्ये निश्चितच करून देतील. म्हणूनच आज शबरी सेवा समितीच्या शिवणक्लासमध्ये शिकून बाहेर पडलेल्या महिला स्वयंरोजगारासाठी सक्षम होतात.
प्रशिक्षण वर्गात कर्जत, वाडा, विक्रमगड, जव्हार, डहाणू या तालुक्यातील शिक्षिका आल्या आहेत.

18/08/2026

रायसिंगपूर जि.नंदुरबार येथे शबरी सेवा समितीने गत वर्षी एक सभागृह, मुलींचे निवासस्थान, स्वच्छतागृह असे एकूण 40 लाख रुपयांचे बांधकाम करुन दिले. या वर्षी त्याच आश्रमशाळेस चार वर्गखोल्या बांधून देत आहोत. वर फोटो टाकले आहेतच. काही बांधकाम झाले आहे. काही राहिले आहे. बांधकामावर आपण रु एक लाख व त्याहून अधीक देणगी या बांधकामाकरीता दिली त्यांची वर्गावर नावे लिहीणार आहोत. ज्यांना अजुनही या बांधकामाकरीता काही देणगी द्यायची असेल त्यांनी या बांधकामास अवश्य मदत करावी. मात्र एक लाख वा त्याहून अधीक देणगी देतील त्यांचीच नावे बांधकामावर लिहीणार आहोत.
वरील बांधकाम नवरात्रापर्यंत पूर्ण होईल असा प्रयत्न आहे. त्यानंतर त्या संस्थेशी विचार विनिमय करुन ऊद्घाटनाचा कार्यक्रम ठरवला जाईल.धन्यवाद.

दि. 11/08/26 मु.सांगवी ता. शिरपूर.    दोन दिवसापूर्वीच   वर फोटोत असणाऱ्या कु. दिव्या विलास कोळी.इयत्ता पाचवी या निराधार...
18/08/2026

दि. 11/08/26 मु.सांगवी ता. शिरपूर. दोन दिवसापूर्वीच वर फोटोत असणाऱ्या कु. दिव्या विलास कोळी.इयत्ता पाचवी या निराधार विद्यार्थीनी स शबरी सेवा समितीने काल सर्व शैक्षणिक साहित्य, कपडे, चपला असे सर्व साहित्य घेऊन दिले आहे. तीचे आईवडील करोनाकाळात गेले. वयस्कर आजी व आजीची बहीण मोल मजुरी करुन तिचा सांभाळ करीत आहेत.
या लहानशा दिव्या चे शिक्षण सुरु रहावे व तीचे पालनपोषण योग्य रितीने व्हावे म्हणून शबरी सेवा समिती योग्य ती सर्व मदत करणार आहे. पुढील दोन महिने पुरेल असे किराणा साहित्य(शिधा) आपण तीच्या आजीकडे घेऊन देणार आहोत.
शबरी सेवा समिती कडे जमा होणारी देणगी अशा नितांत गरजूं करीता आपण नेहमीच वापरत असतो.

शुक्रवार  दिनांक  31/07/26 रोजी खुडेद(तिवसापाडा) येथील शासकीय आश्रमशाळेत  किशोरवयीन  युवतींकरीता  एक दिवसाचा वर्ग  घेतला...
18/08/2026

शुक्रवार दिनांक 31/07/26 रोजी खुडेद(तिवसापाडा) येथील शासकीय आश्रमशाळेत किशोरवयीन युवतींकरीता एक दिवसाचा वर्ग घेतला. या वयातील मुलींच्या अनेक समस्या असतात. त्यांना समजून घेऊन त्यांचेशी मोकळेपणाने संवाद झाला पाहीजे असा प्रयत्न शबरी सेवा समिती मार्फत होत असतो. त्यांच्या आरोग्यविषयक अडचणी समजून त्यावर योग्य प्रबोधन होणे आवश्यक असते. या वयातील मुलींचे भावविश्व उमलत जाण्याकरता योग्य भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न होतो.
शबरी सेवा समितीच्या माध्यमातून आता जव्हार, वाडा या तालुक्यात सक्षम कार्यकर्त्या निर्माण होत आहेत. आजच्या किशोरी वर्गात एकूण 72 युवती उपस्थित होत्या. वंदना चौधरी, प्रियंका टोपले या स्थानिक कार्यकर्त्यांनीच वर्गाचे आयोजन सांभाळले. गाणी,गोष्टी, खेळ, संवाद अश्या विविध प्रकारे कार्यक्रम सजवल्यामुळे मुलीही मोकळेपणाने बोलू लागल्या. आपल्या समस्या बोलू लागल्या. आश्रम शाळेच्या शिक्षकांनीही या प्रकारचे युवती वर्ग नेहमी घ्यावे असे आग्रहाने सांगितले.

04/08/2026

(1) तळोदे तालुक्यात  बंधारा येथील  श्री. धनसिंग पाडवी या शेतक-यांस  आपण विहीर बांधून दिली आहे.त्या शेतक-याने आता शेत तळे...
30/07/2026

(1) तळोदे तालुक्यात बंधारा येथील श्री. धनसिंग पाडवी या शेतक-यांस आपण विहीर बांधून दिली आहे.
त्या शेतक-याने आता शेत तळे केले आहे. या शेततळ्यात मत्स्यपालन व्यवसाय तो शेतकरी करणार आहे. शेततळ्यातील पाणी कमी झालेतर विहिरीतील पाण्याचा उपयोग करणार आहे. तसेच विहीरीचा उपयोग नंतर बारमाही सिंचनासाठी करणारच आहे.

(2) तळोदा येथील शिवणकाम केंद्रातून शिकलेल्या रेखा कलाल या महिलेला शबरी सेवा समितीने एक शिवणयंत्र मदत म्हणून दिले आहे. ती महिला घरातील सर्व कामे करुन शिवणकामाचा व्यवसाय करते आहे.व रोज रु. 300/350 पर्यंत कमावते आहे.

(3) धडगाव येथील 'आदिवासी सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळ' यांच्या धडगाव येथील महाविद्यालयाचे पहीला मजला वास्तुचे बांधकामाचा शुभारंभ दिनांक 19 जुलै 2026 रोजी शबरी सेवा समितीच्या सचिव सौ. रंजना करंदीकर यांचे शुभहस्ते करण्यात आला.
एकूण 47×23 असा हाॅल व 23×30 चे दोन वर्ग खोल्या पुढे व्हरांडा, जिना व स्वच्छतागृह गृह असे बांधकाम आहे. एकूण बांधकामास 72लाख खर्च येणार असून त्यापैकी 30 लाख रुपये शबरी सेवा समिती या महाविद्यालयाच्या बांधकामास देणार आहे.
धडगाव सारख्या दुर्गम व जनजाती क्षेत्रात चांगले महाविद्यालय व्हावे या साठी आपण मदत करणार आहोत. आता पर्यंत अनेक शाळा, आश्रमशाळा, मुलींचे निवासस्थान, स्वच्छतागृह व अनेकप्रकारची मदत शबरी सेवा समितीने निरपेक्षपणे केलेली आहे.
सर्व ठिकाणी त्याचा योग्य उपयोग होत आहे.

दि. 17/07/2026  प्रमोद करंदीकर, रंजना करंदीकर व  कल्याण येथील श्रीमती वसुधा काशीकर असे आम्ही पालघर जिल्ह्यातील  वाडा ताल...
30/07/2026

दि. 17/07/2026 प्रमोद करंदीकर, रंजना करंदीकर व कल्याण येथील श्रीमती वसुधा काशीकर असे आम्ही पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात प्रवास केला. संस्थेचे पालघर जिल्ह्यातील शंकर मेढे, मोहन वाघ, संदिप व वंदना चौधरी, प्रियंका भुसारे व अन्य असे सर्व स्थानिक कार्यकर्ते होतेच. नुकतेच शबरीचे माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फळवृक्ष लागवड झाली त्याचा आढावा घ्यायचाहोता. तसेच कावळे या विक्रमगड तालुक्यातील आश्रम शाळेतील युवतीं बरोबर रंजनाला किशोरी विकास या बद्दलही संवाद साधायचा होता. आम्ही शेतीच्या कामाच्या दिवसातच गेलो होतो. तरीही ज्यांनी फळवृक्ष लागवड केली ते शेतकरी भेटण्यास आले होते. विशेषता महिला शेतकरी जास्त आल्या होत्या. आपल्या फळवृक्ष लागवड योजने विषयी शेतक-यांना ऊत्सुकता होती. आपल्या परंपरागत शेती बरोबरच फळवृक्ष लागवडीवर शेतकरी आता जास्त प्रयत्न करणार आहेत. काही शेतक-यांना त्यातून चांगले पैसेही मिळू लागले आहेत.
आजच शबरी सेवा समितीच्या माध्यमातून शिरपूर तालुक्यात 1000 कलमे वितरित करण्यात आली. शिरपूर तालुक्यात सर्व महिला कार्यकर्त्यां आहेत तरीही त्यानी खूप चांगले प्रयत्न ही फळझाडे लावली आहेत.

गेले तीन दिवस मुसळधार  पाऊस  कोसळत होता तरीही त्याच पावसाच्या धुआंधार  सरी  अंगावर घेत  शबरी सेवा समितीचे पालघर जिल्ह्या...
14/07/2026

गेले तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता तरीही त्याच पावसाच्या धुआंधार सरी अंगावर घेत शबरी सेवा समितीचे पालघर जिल्ह्याञतील 4 कार्यकर्ते फलवृक्ष वितरणाचे कार्य शांतपणे करत होते. दररोज सकाळी 9-00 वा. 25/30 कि.मी. अंतरावरील रोपवाटिकेतून रोपे काळजीपूर्वक ऊचलणे, टेम्पोमध्ये ती व्यवस्थित लावणे. प्रत्येक शेतक-याची आधीच नोंद केलेली रोपे मोजून ,पाहून,निरखून घेणे महत्वाचे. कोणतेही रोप चांगल्या दर्जाचे घेणे महत्वाचे. नाहीतर शेतक-याचे कष्ट, पैसे, व वेळ ही विनाकारण मातीमोल ठरते. कारण शेतक-यांनी एक महिना आधी नोंद करुन निम्मी किंमत जमा केलेले आहेतच.त्यांचा अनुभव विपरीत आला तर शबरी सेवा समिती वर विश्वास राहणार नाही. याच जाणिवेतून कार्यकर्ते प्रत्येक कलम निरखून भरत होते. स्थानिक महिला कार्यकर्त्या वेगवेगळ्या पाड्यातून 'आज रोपे येणार आहेत अशा सुचना देऊन शेतक-यांस एकत्रीत करीत होत्या. टेम्पो पोहचताच भर पावसात नोंदणी प्रमाणे प्रत्येक शेतक-यास कलमे वाटप होत होते. सर्व शेतक-यांची कलमे वाटप झाल्यावर कार्यकर्ते व टेम्पो पुढील पाड्याकडे रवाना व्हायचा व स्थानिक महिला कार्यकर्ती कलमे व्यवस्थित लावण्याच्या सुचना करण्यासाठी थांबायची.
दिनांक 4/5/6असे तीन दिवस सकाळी आठ ते सायंकाळी आठ-नऊ पर्यंत हाच एककलमी महत्वा चा कार्यक्रम होता. या तीन दिवसात वाडा, विक्रमगड व तलासरी तालुक्यात 2750 कलमे वितरण झालीत. कलमे व रोपांमध्ये आंबा केशर(कलमे), नारळ, फणस(कलमे) जांभूळकलमे, पेरु, लिंबू कलमे, अशा वैविध्यपूर्ण 10प्रकारची कलमे होतीञ. दोन ठिकाणच्या रोपवाटिकेतून हे फळवृक्ष घेण्यात आलेत. परंपरागत शेतकरीवर्ग केवळ भाताचे पीक घेतो. या फलवृक्ष लागवडीतून त्यांना रोख पैसे मिळतील बरोबरच घरीसुद्धा फळांचे आहारातील प्रमाण वाढेल. वृक्ष लागवडीतून पर्यावरण संवर्धन होईल तेसुद्धा आवश्यक आहेच.
फोटोत तळोदे तालुक्यातील एका शेतक-याने फुलवलेली निसर्गरम्य आमराई.

Address

Kashele
Kashele
410201

Telephone

+919920516405

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शबरी सेवा समिती.(Shabari Seva Samiti) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share