13/05/2026
अभिरुची फिल्म क्लबचे नवे वर्ष मागच्या महिन्यापासून सुरू झाले. नव्या दिग्दर्शकाच्या अतिशय तरल संवेदनशीलतेने हाताळलेल्या चित्रपटाने आपण या वर्षीची सुरूवात केली. टीव्ही, ओटीटीच्या आगमनाने जवळ जवळ कुठलाही चित्रपट आपण घरबसल्या पाहू शकतो, अशा काळात आपण आहोत. परंतु चित्रपट नाटक संगीत नृत्य या सारख्या दृकश्राव्य कलाकृतींचा आस्वाद आपण जर आपल्या मित्र-मैत्रिणीं समवेत घेतला तर अधिक मजा येते. तेव्हा या महिन्याच्या चित्रपटाच्या अगोदर सदस्य व्हा.
या वर्षीही मागील वर्षप्रमाणेच वार्षिक सभासद शुल्क रुपये दोन हजार फक्त (रु.२०००/-) निर्धारित करण्यात आले आहे.
यामध्ये दर महिन्याला एका चित्रपटाचे स्क्रीनिंग आणि इतरही कार्यक्रम होतील.
१८ वर्षे पूर्ण विद्यार्थ्यांसाठी सभासद शुल्क रु. १,००० असेल.
या पुढील सर्व चित्रपट हे प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी सायंकाळी ७.०० वाजता अभिरुची हॉल, सुमन क्लिनिक, ७४२ मंगळवार पेठ, कऱ्हाड येथे दाखवले जातील.
लक्षात ठेवा, या महिन्याचा चित्रपट तिसऱ्या बुधवारी, २० मे २०२६ या दिवशी.