माऊली ग्रामविकास प्रतिष्ठान शेरे

  • Home
  • India
  • Karad
  • माऊली ग्रामविकास प्रतिष्ठान शेरे

माऊली ग्रामविकास प्रतिष्ठान शेरे !! खरे काम निष्काम ही ग्रामसेवा!!
!! झटू स?

आपल्या गावात वास्तव्यास असणारे श्री सुभाष कृष्णा चव्हाण यांनी एक वर्षांपूर्वी पायाला जखम होऊन सेप्टिक झाल्यामुळे त्यांना...
11/01/2026

आपल्या गावात वास्तव्यास असणारे श्री सुभाष कृष्णा चव्हाण यांनी एक वर्षांपूर्वी पायाला जखम होऊन सेप्टिक झाल्यामुळे त्यांना उजवा पाय गमवावा लागला. त्यांनी माऊली प्रतिष्ठानला संपर्क करून त्यांना पाय उपलब्ध करून देण्याबद्दल विनंती केली. *आज माऊली ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून भारत विकास परिषदेने आयोजित केलेल्या शिबिरामध्ये विलो मॅटर अँड प्लेट या कंपनीच्या सीएसआर फंडातून श्री सुभाष कृष्णा चव्हाण यांना 60,000 रुपये किमतीचा अत्याधुनिक कृत्रिम पाय बसवण्यात आला*. हा पाय फोल्ड सुद्धा करता येतो. आता ते या कृत्रिम पायाच्या मदतीने स्वतः चालू शकतील. त्यांना माऊली ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने पुढील आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
*भारत विकास परिषद पुणे यांच्या वतीने कृत्रिम पाय कृत्रिम हात अशा प्रकारे बसवण्याचा उपक्रम वर्षभर चालू असतो. कुणाही दिव्यांग व्यक्तीला अशा प्रकारच्या मदतीची गरज असल्यास त्यांनी आम्हास संपर्क साधावा. धन्यवाद. राम कृष्ण हरी II*

28/10/2025
 #झाडांचे गाव
04/07/2025

#झाडांचे गाव

महावृक्षारोपण 2025
27/06/2025

महावृक्षारोपण 2025

🌳 “शेरे महावृक्षारोपण अभियान २०२५” 🌳🍃 “वृक्ष लावा – जीवन वाढवा!” 🍃प्रिय ग्रामस्थांनो आणि मित्रांनो,प्रत्येक माणसाच्या आय...
25/06/2025

🌳 “शेरे महावृक्षारोपण अभियान २०२५” 🌳
🍃 “वृक्ष लावा – जीवन वाढवा!” 🍃

प्रिय ग्रामस्थांनो आणि मित्रांनो,
प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असे काही क्षण येतात जे त्याच्या निस्वार्थपणाची खरी कसोटी पाहतात.
२९ जून २०२५ हा असाच एक दिवस आहे —
जिथे आपण आपल्या गावासाठी, पर्यावरणासाठी आणि भावी पिढ्यांसाठी एक ऐतिहासिक योगदान देणार आहोत.

🌱 ७०० झाडं… म्हणजे ७०० जीवांचे भवितव्य.
ही फक्त लागवड नाही, ही आपल्या मातीशी, आपल्या निसर्गाशी जोडलेली आपुलकीची गाठ आहे.

🗓️ शनिवार व रविवार, ,२८ व २९ जून २०२५
🕖 सकाळी ७:०० वाजता
📍 स्थान: शेरे कॅनाल परिसर

🙏 हा मेसेज वाचताना तुमच्यातील निस्वार्थ कार्यकर्ता हलत असेलच… कारण ही वेळच तशी आहे!
तुम्ही जेव्हा त्या मातीवर पहिले पाऊल ठेवाल, जेव्हा त्या झाडाच्या मुळांवर आपल्या हातांनी माती टाकाल,
तेव्हा एक वेगळंच समाधान तुमच्या अंतःकरणात उतरेल.

🌍 आज गरज आहे ती केवळ झाडं लावण्याची नाही, तर सामाजिक प्रभाव निर्माण करण्याची.
आपलं गाव मागे राहणार नाही,
आपलं ध्येय आहे “झाडांचं गाव – आपलं गाव शेरे”
याला जगाच्या नकाशावर अभिमानाने ओळख मिळवून देण्याचं!

⏩ आपण भूतकाळात अडकून बसणार नाही,
आता वेळ आहे भविष्याकडे वाटचाल करण्याची.
जिथे शाश्वतता, हरित विकास आणि एकतेचं बळ आपल्या गावाची ओळख असेल.

💚 चला…
स्वतःसाठी नाही, स्वतःपलीकडचं काहीतरी करण्यासाठी
एकत्र या, झाडं लावा आणि आपल्या शेरे गावाचं हिरवं भविष्य घडवा!

तुमची उपस्थिती हीच या अभियानाची खरी उर्जा आहे!
तुम्ही येणारच आहात… कारण हे केवळ आमंत्रण नाही,
ही निसर्गाची साद आहे — जी थेट तुमच्या अंतःकरणाला भिडते!🌳

सर्व शेरेकर ग्रामस्थ, बंधू भगिनी, युवक, युवती, नोकरवर्ग, व्यावसायिक, गणेश मंडळाचे कार्यकर्ते सर्वांना यावर्षीच्या वृक्षा...
22/06/2025

सर्व शेरेकर ग्रामस्थ, बंधू भगिनी, युवक, युवती, नोकरवर्ग, व्यावसायिक, गणेश मंडळाचे कार्यकर्ते सर्वांना यावर्षीच्या वृक्षारोपणासाठी आग्रहाचे निमंत्रण 🙏🙏
या निसर्ग सेवेच्या संधीचा सर्वांनी अवश्य फायदा घ्या 🙏🙏

भारतीय जवानांच्या प्रति कृतज्ञता म्हणून शेरे गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी  युवक युवती विद्यार्थी विद्यार्थिनींच्या स...
17/05/2025

भारतीय जवानांच्या प्रति कृतज्ञता म्हणून शेरे गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी युवक युवती विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सहभागाने *उद्या* *रविवारी ठीक 6.00 वाजता तिरंगा फेरीचे* आयोजन करण्यात आले आहे. सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे
*आपले नम्र :- माऊली ग्रामविकास प्रतिष्ठान शेरे* 🙏🏻🌴🌴

काल सार्थक दीपावली निमित्त गावातून गोळा केलेली ज्वारी, कडधान्य, डाळी, गहू, तांदूळ, साखर, चटणी, तेल, साबण निरमा इत्यादी व...
04/11/2024

काल सार्थक दीपावली निमित्त गावातून गोळा केलेली ज्वारी, कडधान्य, डाळी, गहू, तांदूळ, साखर, चटणी, तेल, साबण निरमा इत्यादी वस्तू जिजाऊ अनाथाश्रम, कोळे यांना सुपूर्त करण्यात आल्या. तसेच व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते श्री. तुषार देशमुख साहेब (सद्गुरु पॅकेजिंग, जेजुरी) यांनी या अनाथ मुलांसाठी प्रत्येकी दहा किलो असे मुग, चवळी, उडीद, मुगडाळ, तुरडाळ, उडीद डाळ, या वस्तू दान केल्या. सर्व शेरेकर ग्रामस्थ बंधू-भगिनींचे आपण दान स्वरूपात दिलेल्या वस्तूंबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्री तुषार देशमुख साहेबांचे ही मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏 छोटी सी का असेना पण आपल्या सर्वांच्या हातून या अनाथ मुलांची सेवा घडली. एक दिवसासाठी का होईना पण आपण त्यांचं पालकत्व स्वीकारलं. पुनश्च एकदा आपणा सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक धन्यवाद 🙏🙏
*सेवेसाठी तत्पर IIआम्ही शेरेकर II*

Address

Karad

Telephone

9833905080

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माऊली ग्रामविकास प्रतिष्ठान शेरे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to माऊली ग्रामविकास प्रतिष्ठान शेरे:

Share