Vijaya Arvind Pote

Vijaya Arvind Pote Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vijaya Arvind Pote, Community Center, beturkarpada, Kalyan.

शिवसेना उपनेत्या l नवनिर्वाचित नगरसेविका – कल्याण-डोंबिवली महानगरपालिका २०२६
Social Worker | Politician
Dedicated to public service, development, and women empowerment.

 #ज्ञान, सेवा आणि समाजप्रबोधनाचे दीपवत आयुष्य जगणाऱ्या महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांना पुण्यतिथीनिमित्त व...
08/07/2026

#ज्ञान, सेवा आणि समाजप्रबोधनाचे दीपवत आयुष्य
जगणाऱ्या महाराष्ट्र भूषण

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी
यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

आपल्या विचारांनी आणि कार्यांनी समाजाला जागवणारे
डॉ.नानासाहेब धर्माधिकारी लाखो अनुयायांच्या जीवनात प्रेरणास्रोत ठरतात !
त्यांच्या जीवनमूल्यांचा आदर ठेवत, आपल्याही कृतीतून
समाजहित साधण्याचा आपण प्रयत्न करूया, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल !

— सौ. विजयाताई अरविंद पोटे
शिवसेना उपनेत्या तथा नगरसेविका
स्थायी समिती सदस्य, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका

#जनसेवा #विजयाताईपोटे #शिवसेना #एकनाथशिंदे #कल्याण

🚩 ६० व्या शिवसेना वर्धापन दिनाच्या तमाम शिवसैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा...! 🚩छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या व...
19/06/2026

🚩 ६० व्या शिवसेना वर्धापन दिनाच्या तमाम शिवसैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा...! 🚩

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विचारातून प्रेरणा घेत हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी व सर्वसामान्यांच्या न्यायासाठी शिवसेनेची स्थापना केली. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारांचा वारसा धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेबांच्या शिकवणीतून आज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि संसदीय गटनेते, युवा संसदरत्न खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या युवा संघटन कौशल्यातून अधिक व्यापक होत आहे.

मा. एकनाथजी शिंदे साहेबांची पक्षनिष्ठा, संघर्षातून घडलेले नेतृत्व आणि सर्वसामान्य जनतेशी असलेली आपुलकीची नाळ यामुळे शिवसेना आज प्रत्येक घटकाच्या विश्वासाची लोकचळवळ बनली आहे. "जनतेत शिवसेना, मनामनात शिवसेना" या तत्त्वानुसार मायबाप जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारी शिवसेना सेवा आणि विकासाचा मार्ग पुढे नेत आहे.

लोकप्रिय खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या युवा नेतृत्वातून, आधुनिक विचारसरणीतून आणि संघटन कौशल्यातून नव्या पिढीतील शिवसैनिकांना समाजकारणाची नवी ऊर्जा मिळत असून शिवसेनेचा भगवा विचार घराघरात पोहोचत आहे.

आज मा. एकनाथजी शिंदे साहेबांचे अनुभवी नेतृत्व आणि मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेबांचे युवा नेतृत्व यांच्या माध्यमातून शिवसेना सेवा, संघर्ष, विश्वास आणि जनसामान्यांच्या हक्कासाठी कार्य करणारा परिवार म्हणून अधिक बळकट होत आहे.

🚩 ६० व्या शिवसेना वर्धापन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! 🚩

शुभेच्छुक,
श्री. अरविंद पोटे
मा. नगरसेवक, कल्याण डोंबिवली महानगरपालिका
कल्याण-मुरबाड उपजिल्हाप्रमुख, शिवसेना

सौ. विजयाताई अरविंद पोटे
उपनेत्या – शिवसेना
नगरसेविका – कल्याण डोंबिवली महानगरपालिका 🚩




#शिवसेना #एकनाथशिंदेसाहेब #श्रीकांतशिंदे #महाराष्ट्रासाठीएकनाथशिंदे
#कल्याणपश्चिम


🚩 शिवदुर्गा – शिवसंवाद दौरा : महिला शक्तीचा विराट जागर..! 🚩 दिवस दुसरा....शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्...
19/06/2026

🚩 शिवदुर्गा – शिवसंवाद दौरा : महिला शक्तीचा विराट जागर..! 🚩
दिवस दुसरा....

शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि शिवसेनेचे संसदीय गटनेते, युवा नेतृत्व मा. ना. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या राज्यव्यापी “शिवदुर्गा – शिवसंवाद दौऱ्या” अंतर्गत आज बीड – माजलगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना महिला आघाडीची भव्य व उत्स्फूर्त बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला आघाडीचे संघटन अधिक सक्षम, गतिमान आणि मजबूत करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. गाव ते बूथ स्तरापर्यंत महिला नेतृत्व घडविणे, नवीन महिला शाखाप्रमुखांची निवड, संघटन विस्तार, मतदारयादी पुनरिक्षण (SIR), घराघरांत जनसंपर्क वाढवणे आणि आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी यावर विशेष भर देण्यात आला.
छत्रपती शिवरायांच्या विचारांनी प्रेरित नारीशक्ती आणि मा. शिंदे साहेबांची लाडकी बहीण आज सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे यावी. बचत गटांच्या माध्यमातून महिला एकत्र येऊन स्वतःचे नेतृत्व निर्माण करावे, समाजाच्या विकासासाठी योगदान द्यावे आणि शिवसेना संघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

या बैठकीस राष्ट्रीय सचिव श्रीमती शायना ताई एन.सी., राज्यसभा खासदार व शिवसेना प्रवक्त्या श्रीमती ज्योतीताई वाघमारे व माझ्यासह शिवसेना उपनेत्या श्रीमती प्रीती बंड ताई, शिवसेना उपनेत्या श्रीमती संगीता ठोंबरे ताई, शिवसेना उपनेत्या श्रीमती कला शिंदे ताई, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अनिलदादा जगताप, महिला संपर्कप्रमुख श्रीमती संगीताताई चव्हाण, महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीमती चंद्रकलाताई बांगर, नगरसेविका श्रीमती शितलताई चक्रे, उपजिल्हाप्रमुख श्रीमती शारदाताई डोईजड आणि तालुकाप्रमुख (बीड) श्रीमती जयश्रीताई वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच शिवसेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि महिला कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी माझ्यासह व उपस्थित सर्वांनी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या भगिनींशी संवाद साधत ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. महिला आघाडीच्या माध्यमातून त्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी विचारविनिमय करण्यात आला.
“महिला सक्षमीकरण – सक्षम संघटन – जनतेचा विश्वास” या त्रिसूत्रीच्या माध्यमातून शिवसेना महिला आघाडी आगामी काळात अधिक ताकदीने कार्य करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

🚩 हिंदुत्व आमचा श्वास आहे,
बाळासाहेबांचा विचार आमचा विश्वास आहे,
धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आमचं बळ आहे,
मा. शिंदे साहेबांचे नेतृत्व आमची ताकद आहे,
आणि महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास आहे..! 🚩

जय हिंद..!
जय महाराष्ट्र..! 🚩

— श्रीमती विजया पोटे
उपनेत्या, शिवसेना


🚩 शिवदुर्गा - शिवसंवाद दौरा : नारीशक्तीच्या संघटनाचा निर्धार..! 🚩शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री म...
18/06/2026

🚩 शिवदुर्गा - शिवसंवाद दौरा : नारीशक्तीच्या संघटनाचा निर्धार..! 🚩

शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि शिवसेनेचे संसदीय गटनेते मा. ना. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या राज्यव्यापी “शिवदुर्गा - शिवसंवाद दौऱ्या” अंतर्गत आज जालना जिल्ह्यात विधानसभा निहाय आढावा बैठकीचा पहिला दिवस उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या दौऱ्यादरम्यान सकाळी ११ वाजता जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. अर्जुन खोतकर साहेब यांच्या नियोजनानुसार जालना विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक संपन्न झाली.

तसेच दुपारी ३ वाजता घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. हिकमत उढाण साहेब यांच्या नियोजनानुसार घनसावंगी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक यशस्वीरीत्या पार पडली.

दोन्ही बैठकांमध्ये शिवसेना महिला आघाडीच्या संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागामध्ये शिवसेना अधिक सक्षम व मजबूत कशी करता येईल, शिवसेनेचा विचार गावागावात आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत कसा पोहोचवता येईल, तसेच या कार्यामध्ये नारीशक्तीची भूमिका अधिक प्रभावी कशी राहील, याबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यात आला.

ग्रामीण भागातील महिला भगिनींशी संवाद साधून त्यांच्या स्थानिक समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. त्या प्रश्नांवर महिला आघाडीच्या माध्यमातून संघटनात्मक पातळीवर प्रभावी काम करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

छत्रपती शिवरायांच्या विचारांनी प्रेरित नारीशक्ती आणि मा. शिंदे साहेबांची लाडकी बहीण आज कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामा नये. सामाजिक सक्षमीकरण, समाजाचा सर्वांगीण विकास आणि सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी पुढे यावे, सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग वाढवावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.

महिला बचत गटांच्या माध्यमातून एकत्र येऊन परस्पर सहकार्य, आर्थिक सक्षमीकरण आणि समाजकार्याला चालना देत शिवसेनेची संघटना गावागावात अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक भगिनीने योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले.

गावपातळीवर महिला नेतृत्व निर्माण करणे, महिला आघाडीचा विस्तार करणे, शाखास्तरापर्यंत संघटना मजबूत करणे आणि प्रत्येक घरापर्यंत शिवसेनेचा विचार पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या दौऱ्यास खासदार तथा प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे ताई, राष्ट्रीय सचिव तथा राष्ट्रीय प्रवक्त्या श्रीमती शायना एन.सी. ताई, तसेच माझ्यासह शिवसेना उपनेत्या, श्रीमती संगीता ठोंबरे ताई आणि श्रीमती कला शिंदे ताई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी शिवसेना नेत्या श्रीमती मीनाताई कांबळी यांनी विडिओ कॉल द्वारे संवाद साधला.

तसेच जालना जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, महिला आघाडीच्या पदाधिकारी, विधानसभा व स्थानिक पातळीवरील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजच्या पहिल्या दिवसातील दोन्ही विधानसभा निहाय आढावा बैठकींमधून महिला आघाडीचे संघटन अधिक सक्षम करण्यासाठी, जनतेशी थेट संवाद वाढवण्यासाठी आणि शिवसेनेचा भगवा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली.

🚩 हिंदुत्व आमचा श्वास आहे,
बाळासाहेबांचा विचार आमचा विश्वास आहे,
धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आमचं बळ आहे,
मा. शिंदे साहेबांचे नेतृत्व आमची ताकद आहे,
आणि महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास आहे..! 🚩

जय हिंद..!
जय महाराष्ट्र..! 🚩

— विजया पोटे
उपनेत्या, शिवसेना

॥ दुःखद निधन ॥अत्यंत दुःखाने कळविण्यात येते की,शिवसेनेच्या ज्येष्ठ माजी विभाग संघटक व राजमाता जिजाऊ महिला सहकारी पतसंस्थ...
16/06/2026

॥ दुःखद निधन ॥

अत्यंत दुःखाने कळविण्यात येते की,
शिवसेनेच्या ज्येष्ठ माजी विभाग संघटक व राजमाता जिजाऊ महिला सहकारी पतसंस्थेच्या ज्येष्ठ संचालिका
आदरणीय *श्रीमती आशा ताई रुपकर*
यांना आज सकाळी ९ वाजता देवाज्ञा झाली.

आशा ताईंच्या निधनाने सामाजिक, सहकार, महिला सक्षमीकरण आणि जनसेवेच्या क्षेत्रातील एक निष्ठावान, कर्तृत्ववान व समर्पित नेतृत्व आपल्यातून हरपले आहे.

त्यांनी आपल्या कार्यकाळात समाजातील विविध घटकांसाठी आपुलकीने काम केले. महिलांच्या प्रगतीसाठी, संघटनात्मक कार्यासाठी आणि सहकार चळवळीच्या बळकटीकरणासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांचा प्रेमळ स्वभाव, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती आणि सेवाभावी विचार अनेकांसाठी प्रेरणादायी राहतील.

त्यांच्या जाण्याने रुपकर परिवारासह शिवसेना परिवार, राजमाता जिजाऊ महिला सहकारी पतसंस्था परिवार व त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आशा ताईंना भावपूर्ण आदरांजली... 🙏💐

📍 अंत्ययात्रा: आज सायंकाळी ६ वाजता
📍 स्थळ: राहते घर, लोढा गार्डन येथून निघेल.@

ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो व रुपकर परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

शोकाकुल:
शिवसेना – बेतूरकर पाडा विभागीय शाखा

राजमाता जिजाऊ महिला सहकारी पतसंस्था ...

13/05/2026
मतदान हा आपला हक्कच नाही,तर लोकशाही मजबूत करण्याची जबाबदारी आहे.चला, मतदार दिनानिमित्तसंकल्प करूया —नक्की मतदान करूया!  ...
25/01/2026

मतदान हा आपला हक्कच नाही,
तर लोकशाही मजबूत करण्याची जबाबदारी आहे.
चला, मतदार दिनानिमित्त
संकल्प करूया —
नक्की मतदान करूया!







🌸 हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ 🌸✨ महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ✨राजमाता जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कल्याण...
23/01/2026

🌸 हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ 🌸
✨ महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम ✨

राजमाता जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कल्याण व शिवसेना, बेतुरकरपाडा आयोजित

📅 दिनांक: रविवार, रथसप्तमी निमित्त
🗓 २५ जानेवारी २०२६
⏰ वेळ: सायं. ५.३० वा.
📍 स्थळ: पतसंस्थेच्या कार्यालयासमोर, बेतुरकरपाडा, कल्याण (प.)

दरवर्षीप्रमाणे यंदाही रथसप्तमी निमित्त हळदी कुंकू व तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी आपल्या सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. 🙏

सौ. विजयाताई अरविंद पोटे (संस्थापिका – अध्यक्षा) शिवसेना उपनेत्या (नवनिर्वाचित नगरसेविका क.डो.मा.)

सौ. मंदाकिनी गरुड (खजिनदार)
सौ. विद्या चौधरी (सचिव)

🔸 संयोजक:
सौ. सोनाली रामचंद्र औटी (पोटे)

🎁 लकी ड्रॉ | 🎁 आकर्षक बक्षिसे

🌺 सर्व महिलांचे हार्दिक स्वागत! 🌺

Address

Beturkarpada
Kalyan
421301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijaya Arvind Pote posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share