सावली फाउंडेशन एक हात मदतीचा आपुलकीचा

  • Home
  • India
  • Kalyan
  • सावली फाउंडेशन एक हात मदतीचा आपुलकीचा

सावली फाउंडेशन एक हात मदतीचा आपुलकीचा सावली फाउंडेशन एक सामाजिक संस्था आहे जी शोषित पीडित गरीब गरजू लोकांसाठी काम करते
नोंदणी क्रमांक = ठाणे 0000679/2023

03/05/2026

गावाच्या कडेला राहणारे… पण प्रत्येकाच्या शेवटच्या प्रवासात साथ देणारे…
स्मशानभूमीत काम करणाऱ्या डोम समाजातील या हातांना कधीच टाळ्या मिळाल्या नाहीत,
पण त्यांच्याशिवाय कुणाचंही शेवट पूर्ण होत नाही…
आज सावली फाउंडेशन तर्फे त्यांच्या या निःशब्द सेवेचा सन्मान 🙏
मनापासून सलाम त्या खऱ्या सेवकांना ❤️

गावाच्या कडेला राहणारे… पण प्रत्येकाच्या शेवटच्या प्रवासात साथ देणारे…स्मशानभूमीत काम करणाऱ्या डोम समाजातील या हातांना क...
03/05/2026

गावाच्या कडेला राहणारे… पण प्रत्येकाच्या शेवटच्या प्रवासात साथ देणारे…
स्मशानभूमीत काम करणाऱ्या डोम समाजातील या हातांना कधीच टाळ्या मिळाल्या नाहीत,
पण त्यांच्याशिवाय कुणाचंही शेवट पूर्ण होत नाही…
आज सावली फाउंडेशन तर्फे त्यांच्या या निःशब्द सेवेचा सन्मान 🙏
मनापासून सलाम त्या खऱ्या सेवकांना ❤️

03/05/2026

सावली फाउंडेशनतर्फे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा भावनिक सन्मान सोहळा संपन्न
सावली फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांतर्गत स्मशानभूमीत निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. समाजात अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याला योग्य मान्यता मिळावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी कल्याणच्या आमदार सुलभाताई गायकवाड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच वाशिंद येथील नामांकित वकील चेतन भोसले यांनीही आपली उपस्थिती दर्शवून उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंत जाधव, यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक जाधव,किशोर खरात,धनंजय कुमुदकर, विकी भोईर, रमाकांत चव्हाण, प्रशांत चव्हाण, रवींद्र रत्नपारखी, सतीश वर्मा आणि प्रवीण जगताप हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी समाजसेवक विक्रांत शिंदे, संजय मोरे आणि संजय शिर्के या दानशूर यांचे आभार आणि अभिनंदन तसेच दानशूर प्रशांत पाटील वाशिम , गणेश रामदेव प्लाझा , सचिन चव्हाण, हे गडमल साहेब ,पवार साहेब वसई, यांचं सुद्धा अभिनंदन आणि आभार
कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्यासाठी मलंग रत्नपत्रकार तसेच MBP माझा चे मुख्य पत्रकार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन किशोर सुखलाल खरात यांनी केले.
यावेळी आपल्या मनोगतातून सावली फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. “आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी सन्मानाने निरोप देण्याची जबाबदारी उचलणारे हेच खरे समाजातील निस्वार्थ सेवक आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हीच खरी माणुसकी आहे,” असे भावनिक उद्गार व्यक्त करण्यात आले.
समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी सन्मानित कर्मचाऱ्यांना उभे राहून टाळ्यांच्या गजरात गौरविले.

12/04/2026
12/04/2026

आपले आदरणीय वायरमन व लाईनमन बांधव
समाजासाठी करत असलेली सेवा अत्यंत महत्त्वाची व प्रेरणादायी आहे.
उजेड असो किंवा अंधार, पाऊस असो किंवा कोणतीही अडचण – आपण नेहमीच आपल्या कर्तव्यावर ठाम उभे राहून सेवा देतात
आपल्या या निस्वार्थ कार्याचा सन्मान करण्यासाठी सावली फाउंडेशन तर्फे आपल्या सन्मानार्थ स्वागत व सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला
🎖️ या कार्यक्रमात आपल्याला मेडल देऊन सन्मान करण्यात येणार असून, गिफ्ट देऊन गौरविण्यात येणार आले

12/04/2026

सावली फाउंडेशन तर्फे वायरमन व लाईटमन बांधवांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई (प्रतिनिधी) – सावली फाउंडेशन तर्फे दि. १२ एप्रिल २०२६ रोजी वायरमन व लाईटमन बांधवांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

उजेड असो किंवा अंधार, पाऊस असो किंवा कोणतीही अडचण – सतत आपले कर्तव्य बजावणाऱ्या या बांधवांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी समाजसेवक विक्रांत जगन्नाथ शिंदे, भालचंद्र परब, विजय भाई (गिरगाव, मुंबई) तसेच सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.

तसेच संस्थेचे अध्यक्ष जयवंत जाधव यांच्या सोबत दीपक जाधव, किशोर खरात, जितु गुरव, सतीश वर्मा, रवींद्र रत्नपारखी, विकी भोईर, प्रशांत चव्हाण, रमाकांत चव्हाण, विलास दळवी, सुनील आमले आणि प्रवीण जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते वायरमन व लाईटमन बांधवांचा सन्मान करण्यात आला व त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.

कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांनी हार्दिक शुभेच्छा देत उपक्रमाचे कौतुक केले.

सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला

15/03/2026

सावली फाउंडेशन तर्फे सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ संपन्न
कल्याण : समाजासाठी निःस्वार्थपणे सेवा बजावणाऱ्या सफाई कर्मचारी बांधवांचा गौरव करण्यासाठी सावली फाउंडेशन तर्फे आमराई फाउंटन, कल्याण येथे सफाई कर्मचारी सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुलभाताई गायकवाड तसेच नगरसेविका मनीषा ताई गायकवाड सुद्धा उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विविध महानगरपालिकांमध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचारी बंधू-भगिनींचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सावली फाउंडेशन चे अध्यक्ष जयवंत रघुनाथ जाधव सोबत,दीपक जाधव, प्रवीण जगताप, जितू गुरव, शंकर नवघणे, सतीश वर्मा, जानवी जाधव, रमाकांत चव्हाण, प्रशांत चव्हाण, विकी भोईर तसेच कदम साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच नागपूर महानगर पालिका मध्ये कर विभागात रुजू झालेल्या साक्षी किरण भवर सुद्धा उपस्थित होत्या.त्याचबरोबर पल्लवी यादव, माधवी शिलवन्त, जयश्री परदेशीं सुद्धा उपस्थित होत्या.
त्याच बरोबर दानशूर संजय मोरे,संजय शिर्के, जितु गुप्ता,रवी निकम आणि शिवाजी भोसले यांचं सुद्धा आभार.
कार्यक्रमात बोलताना सावली फाउंडेशनचे सचिव किशोर सुखलाल खरात यांनी सांगितले की, “सफाई कर्मचारी हे आपल्या समाजाचे खरे स्वच्छता योद्धे आहेत. त्यांच्या अथक परिश्रमामुळे आपले शहर स्वच्छ आणि सुंदर राहते. समाजाने त्यांच्या कार्याचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे.”
या उपक्रमामुळे सफाई कर्मचारी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थित मान्यवरांनी सावली फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे आयोजन सावली फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.

15/02/2026

सावली फाउंडेशन तर्फे आर्मी सेवक, NSG कमांडर व सबमरीन मेंटेनन्स विभागाचा भव्य सत्कार
सावली फाउंडेशनच्या वतीने देशसेवेसाठी अहोरात्र परिश्रम करणाऱ्या आर्मी सेवकांचा, NSG कमांडर तसेच सबमरीन मेंटेनन्स विभागात कार्यरत असलेल्या वीर जवानांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
देशाच्या संरक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या या शूरवीरांचा सन्मान करताना संपूर्ण मंडप अभिमानाने भारावून गेले. त्यांच्या शौर्य, त्याग आणि निस्वार्थ सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी तसेच माननीय आमदार सुलभा गायकवाड उपस्थित होत्या तसेच समाजसेवक विक्रांत शिंदे सुद्धा उपस्तित होते. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला विशेष उंची लाभली.
सावली फाउंडेशन नेहमीच समाजातील गरजू, सैनिक व देशसेवकांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे आणि पुढेही असेच कार्य सुरू राहील.
🇮🇳 “ज्यांच्या शौर्यावर देश उभा आहे, त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे.” 🇮🇳

Address

आमराई
Kalyan
421102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सावली फाउंडेशन एक हात मदतीचा आपुलकीचा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share