Jeevan Sanvardhan Foundation - जीवन संवर्धन फौंडेशन

  • Home
  • India
  • Kalyan
  • Jeevan Sanvardhan Foundation - जीवन संवर्धन फौंडेशन

Jeevan Sanvardhan Foundation - जीवन संवर्धन फौंडेशन Sustainable development is our motto. In Pune district Katkari is the only PTG’S identified mostly in the region of Sahyadri. Most of the Katkari are the labors.


Triabal Development – Mulshi, Pune :
Katkari Tribal Village Development: The Katkari are a Primitive tribal group of indigenous hunter gatherers who live in the Indian state of Maharashtra. Their ongoing survival is threatened by years of systemic exploitation, racial prejudice, abject poverty and loss of their traditional lands. This group is located in 9 different blocks (Taluka). According to the census of 2001 Total Katkari primitive tribe’s population is around 14091 in Pune District. There are two sub groups of the community namely Dhor-Katkari and the Son –Katkari. This tribe is one of the most primitive tribes in Maharashtra. Besides earning through daily wage labor they are known for hunting, fishing, collecting roots etc. Mulshi Tehsil has 48 Colonies each having 15-30 families. Every colony has population of around 150-350 male who are mainly engaged in labor & farm work. 75% ladies are also engaged in similar activities. Young children of age group 2.5 to 6 just roam and there is nobody to look after them. Students in age group 6-10 go to school but they are very irregular. The education stops at the age of 10-12. Life style of this community is primitive, undisciplined and has no culture. They do not follow basic cleanliness like bath, washing cloths etc. They get settled wherever they find a place. These communities are extremely poor and live in very worse and unhygienic conditions. The percentage of consuming alcohol is very high in these communities. A survey was done in the beginning in some villages to understand the social-economically condition and situation of the tribal people. The findings of the survey also helped us to know about the various problems that they face due to their backwardness. Educational status
There are no supporting documents with the government which can focus the literacy rate among the tribes. It was only after our survey work and data analysis that we found that the literacy rate among the Katkari is only 12%. The migratory nature of the tribe in search of jobs hampers the unremitting flow in education of the tribes
Economical status
Economically this tribe is poor and backward, still relying on their traditional occupation for day to day needs. They continue to live in isolation and practice primitive or no agricultural practice. Most of them are still in food gathering and seasonal occupation stage which make them almost a stagnant population. Summary of Jeevan samvardhan Foundation Intervation
Since the year 2012 Jeevan samvardhan Foundation has started working with these communities. Initially we conducted survey of these tribes in Mulshi block. Till date we have surveyed 48 villages and collected basic information about these tribes. The basic needs of such colonies are :
Education for all ages, We would like to start a ekal vidyalaya (Balwadi) and also providing Nutrition to these children. To inculcate civilization in Entire Community
Health Awareness and Medical Aid.Sanitation and cleanliness habit cultivation
And lastly for final development, Vocational Training to youth and ladies for earning their Lively hood in # # # # # manner. Utkarsh Women Empowerment Center : Dhule
Objective - To unite & empower women so as to face the challenges of day to day life. Rural ladies are unorganized. Their life style is full of hardships. They have a hectic schedule consisting of water collection, agricultural work, fuel wood collection and storage etc. A typical rural woman takes care of the entire family but does not pay attention towards her health. She does not her own problems and cannot share it with her family members easily. She has to take care of her husband, children & other family members. Many times habits of husband, in laws and children become the cause of deep anxiety. Ladies have to depend financially on husband and family members. They have no say in decision making. Women in villages are not united and cannot meet regularly due to their busy life style. They need a common platform to come together & share their views. Self help group (SHG) is one such platform. Activities :
Cilai Center, Dhule : makes eco friendly bags from old sarees and clothes. Helth checkup camp
Womens Day Celebration.

बेघर मुलांसाठी हक्काचे घर !!!समाजातील बेघर, आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरजु मुलांच्या निवारा- शिक्षण आणि उज्वल भविष्यासा...
31/08/2026

बेघर मुलांसाठी हक्काचे घर !!!

समाजातील
बेघर, आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरजु मुलांच्या निवारा- शिक्षण आणि उज्वल भविष्यासाठी उभारण्यात येणाऱ्या मुलांच्या वस्तीगृहाचे भुमिपूजन २९ ऑगस्ट २०२६ रोजी म्हस्कळ, टिटवाळा येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

बेघर मुले आणि त्या संबंधित विविध विषयांत प्रदीर्घ काळापासून जीवन संवर्धन फाउंडेशन ही संस्था कल्याण आणि परिसरात कार्यरत आहे. या संस्थेच्या नवीन वस्तीगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन काल म्हस्कळ टिटवाळा येथे पार पडले.

गरजु विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता, या नवीन वास्तूची आवश्यकता प्रकर्षाने जाणवत होती. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबद्दल सध्या विविध स्तरावर घडामोडी घडत असतांना, समाजातील जागरुक नागरिकांनी, सज्जन शक्तीने पुढे येऊन या प्रकल्पास सहाय्य केले आहे अशी भावना संस्थेचे अध्यक्ष श्री सदाशिव चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.

संस्थेच्या या प्रकल्पास आवश्यक जागेसाठी पुढाकार घेऊन सिंहाचा वाटा उचलणारे समाजसेवक श्री राजाभाऊ पातकरजी तसेच रस्तोगी इस्टेटचे श्री संजयजी गुप्ता हे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणुन उपस्थित होते.

संस्थेचे आजपर्यंतचे काम या वास्तूमुळे आणखी जोमाने पुढे जाईल, आणि परिसरातील शेकडो गरजु विद्यार्थ्यांना याचा भरघोस फायदा होईल. अशी भावना राजाभाऊंनी यावेळी व्यक्त केली. त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हितचिंतक म्हणुन आम्ही नेहमी उपलब्ध असु, अशी हमी श्री संजयजी गुप्ता यांनी दिली.

कार्यक्रमास टिटवाळा महागणपती मंदिराचे श्री सुभाष जी जोशी, बदलापूर येथील माजी नगरसेवक शरदजी म्हात्रे, तसेच संस्थेचे कित्येक आश्रयदाते उपस्थित होते. या इमारतीचे रेखाटन अंबरनाथ येथील प्रसिद्ध वास्तू विशारद माननीय श्री प्रमोद जी कांबळे यांनी केलेले आहे व बांधकाम व्यवसाय प्रशांतजी बुटेरे हे या कामात लक्ष देत आहेत. सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

जीवन संवर्धन फाउंडेशन ठाणे गुरुकुल दिनांक 29/08/2026 रोजी चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट, वृंदावन विश्व आणि नाट्यतुषार या संस्था...
30/08/2026

जीवन संवर्धन फाउंडेशन ठाणे गुरुकुल

दिनांक 29/08/2026 रोजी चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट, वृंदावन विश्व आणि नाट्यतुषार या संस्थांच्या विद्यमाने समर्थ कट्टा प्रस्तुत श्लोक तथा स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जीवन संवर्धन फाउंडेशन ठाणे गुरुकुलातील मुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मुलींनी श्लोक व स्तोत्राचे पठण करून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. या स्पर्धेमध्ये गणपती स्तोत्र पठणात गुरुकुलातील विद्यार्थीनी आराध्या चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळविला. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या खुशी गुट्टे, तनुजा खान, रुक्मिणी मंजुळकर, अंजली चौहान, पूनम सूर्यवंशी, ललिता वाघे, पूजा पाटील, हिरकण बागुल इ. विद्यार्थ्यांना त्यांच्या सहभागाबद्दल प्रोत्साहन मिळावे म्हणून पेन आणि पुस्तके देण्यात आली.

30/08/2026

जीवन संवर्धन फाउंडेशन च्या स्वतःच्या जागेतील आजचा भूमिपूजन सोहळा!

आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वाद आणि प्रेमामुळेच आजचा हा स्वप्नपूर्तीचा भूमिपूजन सोहळा
आम्ही साजरा करू शकलो
याची काही क्षणचित्रे खास आपणासाठी!

कार्यक्रमाला नक्की या..
26/08/2026

कार्यक्रमाला नक्की या..

🇮🇳 *स्वातंत्र्यदिनानिमित्त गुरुकुलातील विद्यार्थ्यांचा देशभक्तीचा जागर**टिटवाळा* : स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाची गेल्या अ...
15/08/2026

🇮🇳 *स्वातंत्र्यदिनानिमित्त गुरुकुलातील विद्यार्थ्यांचा देशभक्तीचा जागर*

*टिटवाळा* : स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाची गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहणाऱ्या जीवन संवर्धन फाउंडेशन गुरुकुल, टिटवाळा येथील विद्यार्थ्यांचा उत्साह अखेर १५ ऑगस्ट रोजी देशभक्तीच्या जल्लोषात पाहायला मिळाला. गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी नृत्य, गायन, देशभक्तीपर गीत, भाषण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा कसून सराव करत होते. आजच्या कार्यक्रमात त्यांच्या मेहनतीचे आणि कलागुणांचे सुंदर सादरीकरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमाची सुरवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन, ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीत, राज्यगीत , ध्वजगीत सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री. उदयकुमार गायकवाड सर तसेच प्रमुख मार्गदर्शक श्री. जगदिश कुलकर्णी सर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व समजावून सांगत, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती दिली. देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, गीत, नृत्य, कवायत तसेच कराटेतील ब्लॅक बेल्ट काथा सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. विशेषतः विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध कवायतीने आणि कराटे प्रात्यक्षिकाने कार्यक्रमात जोश निर्माण केला.

यासोबतच विद्यार्थ्यांनी झाडांच्या वेली आणि पानांचा वापर करून तिरंग्याजवळ सुंदर रांगोळी काढली. या रांगोळीमुळे कार्यक्रमाच्या ठिकाणचे वातावरण अधिक सुंदर झाले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून आपली कला आणि देशभक्ती सुंदर पद्धतीने व्यक्त केली.

विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सादरीकरणातून देशप्रेम, आत्मविश्वास, शिस्त आणि संस्कार यांचे दर्शन घडत होते. गुरुकुलातील कर्मचारीवर्गानेही कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

“देशभक्ती केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती आपल्या आचरणातून दिसली पाहिजे,” हा संदेश देत स्वातंत्र्यदिनाचा सोहळा उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात संपन्न झाला.

जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्!

जीवन संवर्धन फाउंडेशन ठाणे गुरुकुलात उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा आज दिनांक, 15/08/2026 रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्स...
15/08/2026

जीवन संवर्धन फाउंडेशन ठाणे गुरुकुलात उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा

आज दिनांक, 15/08/2026 रोजी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी सर्वजण एकत्र जमले. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीत गायले. या कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रमेश यादव, डॉ. विजय निगम, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. स्वप्नाली साळवी, सौ. रक्षा यादव, सौ. सीमा वैष्णव उपस्थित होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नगरसेविका सौ. माधुरी मेटांगे ताई व डॉ. रमेश यादव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच गुरुकुलातील मुलींनी देशभक्तिपर गीते, भाषणे, नृत्य सादर केले. मुलींनी स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने कौतुक केले. व प्रमुख मार्गदर्शक नगरसेविका सौ. माधुरी मेटांगे ताई यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व स्पष्ट केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्यागाचे स्मरण करून देत, विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच शिस्त, प्रामाणिकपणा, परिश्रम आणि देशप्रेम ही मूल्ये अंगीकारावीत, असे आवाहन केले. देशाच्या प्रगतीमध्ये युवकांची भूमिका महत्त्वाची असून, प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच डॉ. रमेश यादव सरांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्व व शिक्षणाचे महत्व सांगितले. सदर कार्यक्रम उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

जीवन संवर्धन फाउंडेशन- आंबेशिव ,बदलापूर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात  साजरा.  जीवन संवर्धन फाउंडेशन, संचलित श्रीमती लक्ष...
15/08/2026

जीवन संवर्धन फाउंडेशन- आंबेशिव ,बदलापूर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा.

जीवन संवर्धन फाउंडेशन, संचलित श्रीमती लक्ष्मीबाई जयराम म्हात्रे गुरुकुल आंबेशिव,बदलापूर येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ध्वजारोहण व राष्ट्रगीताने झाली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री प्रभाकर ताम्हाणे उपस्थित होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. शरद भाऊ म्हात्रे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, गीत, कविता, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, देशाची एकता, राष्ट्रप्रेम आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये याबाबत मनोगत व्यक्त केले.
प्रमुख मार्गदर्शक श्री.शरद भाऊ म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व समजावून सांगत शिक्षण, स्वच्छता ,शिस्त, संस्कार आणि राष्ट्रसेवा यांचा जीवनात अंगीकार करण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे प्रभाकर ताम्हाणे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर श्रीमती.सुहासिनी आंबेकर मॅडम यांनी मुलांना वेगवेगळ्या फिल्डमध्ये करियर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असा संदेश दिला व आपल्या सुप्त कला गुणांना वाव द्यावा असे सुचवले
कार्यक्रमादरम्यान सादर करण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांनी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जीवन संवर्धन फाउंडेशनचे पदाधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. राष्ट्रप्रेम, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत हा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात संपन्न झाला.
जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्!

*जीवन संवर्धन फाउंडेशन गुरुकुल - आंबेशिव,बदलापूर* येथे  न्यानदिप बहुउद्देशीय संस्था, अंबरनाथ  यांच्या मार्फत १०१ झाडांचा...
09/08/2026

*जीवन संवर्धन फाउंडेशन गुरुकुल - आंबेशिव,बदलापूर* येथे न्यानदिप बहुउद्देशीय संस्था, अंबरनाथ यांच्या मार्फत १०१ झाडांचा वृक्षारोपण करून दिला पर्यावरणाचा संदेश.

जीवन संवर्धन फाउंडेशन गुरुकुल आंबेशिव बदलापूर येथे ८ऑगस्ट रोजी पर्यावरणाचे संवर्धन, हरित परिसर निर्मिती , शुद्ध हवा, सावली आणि विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेमाची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने वसतिगृह परिसरात न्यानदिप बहुउद्देशीय संस्था यांच्या सहकार्याने वेगवेगळी प्रकारची १०१ झाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये फळ झाडे, फुल झाडे, औषधी झाडे, मसाल्याचे झाडे असे झाडे लावण्यात आली. या वृक्षारोपण उपक्रमात लायन्स क्लब ठाणे येथील श्री.प्रसाद खोपकर , श्री सागर कुलकर्णी, श्रीमती नेहा कारेकर,व न्यानदिप बहुउद्देशीय संस्था अंबरनाथ यांच्या कडून श्रीमती.श्रावणी पाठक ताई , श्रीमती.अनुराधा जुवेकर, श्रीमती लता केळकर व पदाधिकारी वसतीगृहातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच सर्व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय व सामाजिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. त्यानंतर वस्तीगृहाच्या परिसरात विविध प्रकारच्या फळझाडे, सावली देणारी झाडे आणि पर्यावरणपूरक देशी वृक्षांची लागवड करण्यात आली.
“एक विद्यार्थी–एक झाड” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची नियमित देखभाल करण्याची जबाबदारीही स्वीकारली. झाडांना पाणी देणे, त्यांचे संरक्षण करणे, वाढीची नोंद ठेवणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे यासाठी विद्यार्थ्यांचे गट तयार करण्यात आले.
वृक्षारोपणामुळे वसतीगृहाचा परिसर भविष्यात अधिक हिरवागार व सुंदर होण्यासोबतच विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात शिकण्याची आणि पर्यावरणाची जबाबदारी प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळणार आहे.
या उपक्रमातून “आजचे वृक्षारोपण म्हणजे उद्याच्या पिढीसाठी सुरक्षित पर्यावरणाची गुंतवणूक” असा संदेश देण्यात आला. या प्रसंगी भविष्यातही मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धन व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमात सहभागी सर्व मान्यवरांचे जीवन संवर्धन फाउंडेशन तर्फे खूप खूप आभार.

अधिक मासात दान हे महादान मानले जाते. आपल्या छोट्या मदतीने मुलांचे आयुष्य उभे राहू शकते..
25/05/2026

अधिक मासात दान हे महादान मानले जाते.
आपल्या छोट्या मदतीने मुलांचे आयुष्य उभे राहू शकते..

Address

Gurukul, Behind Bharat Gas Services, Mhaskal, Titwala East
Kalyan
421605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jeevan Sanvardhan Foundation - जीवन संवर्धन फौंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jeevan Sanvardhan Foundation - जीवन संवर्धन फौंडेशन:

Shortcuts

Share