05/06/2024
जाणता प्रतिष्ठाण
दहा वर्षे विश्वासाची
रोपटं लावा, सेल्फी काढा, बक्षीस जिंका
ऑक्सिजनची किंमत सगळ्यांना कळली असेलच
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त,जाणता प्रतिष्ठाण, महाराष्ट्र - आयोजित सर्वांसाठी खुली वृक्षारोपण स्पर्धा_
कुटुंबीय, मित्र वा मैत्रिणीसोबत आपण फोटो काढतो पण आता तुम्ही रोपटं (झाड) लावायचं आणि त्याच्यासोबत एक फोटो काढून पाठवायचा. तुमच्या फोटोची निवड झाली तर तुम्हाला बक्षीस मिळेल, तसेच प्रत्येकाला प्रमाणपत्र दिले जाईल.
'एक रोपटं लावा' त्या रोपट्यासोबत सेल्फी फोटो काढून ईमेल करा
[email protected]
किंवा व्हाट्स ऍप करा
+91 98212 52911
(सेल्फी एकाच ठिकाणी पाठवावा)
*नियम व अटी
1) झाड देशी असावे
2) रोपटं लावतांनाचा फोटो काढतांना उभा मोबाईल ठेवावा (धरावा), तारीख आणि वेळ सेल्फी फोटोत आवश्यक.
3) संपूर्ण रोपटं आणि आपला चेहरा दिसेल असा सेल्फी असावा
4) सेल्फी सोबत आपली माहिती पाठवावी : संपूर्ण नाव, वय, पत्ता, मोबा नंबर, व्हाट्स ऍप नंबर, आपला पासपोर्ट फोटो, कोणते झाड लावले त्याचे नाव, इ माहिती आवश्यक आहे. ही माहिती न पाठविल्यास सेल्फीचा विचार केला जाणार नाही.
5) मागील वर्षांचा जुना सेल्फी, कुंडीतील रोपटं, कुठलीही बनवेगिरी, खोटेपणा करू नये, केल्यास तो फोटो बाद करण्यात येईल. शिक्षक ध्येय चे प्रतिनिधी रोपटं लावलेल्या स्थळाला भेट देऊ शकता.
6) रोपट्याचे संगोपन करण्याची जबाबदारी घ्यावी.
7) या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्वांना डिजिटल प्रमाणपत्र व्हाट्स ऍप वर पाठविण्यात येईल.
8) या स्पर्धेसाठी कोणतीही फी नाही. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.
9) परिक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहील.
अंतिम दिनांक 25 जून रविवार रात्री 12 वाजेपर्यंतच फक्त
_या मोहिमेचा उद्देश झाडाबरोबरच पर्यावरण जनजागृती व संवर्धनाचा असून निसर्ग वाचवण्यासाठी एक निकोप स्पर्धा घडवून आणून प्रत्येक माणसाच्या मनात झाडं रुजवण्याचा असल्यामुळे या स्पर्धेत प्रत्येकाने शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक यांनी* - सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे.
व्यवस्थापन -
संतोष लामखडे
सुभाष सांगळे
वनिता साळुंख
प्रभाकर ताम्हणकर - जाणता प्रतिष्ठाण
9702938521
www.jaanta.wordpress.com