Satkarma Ashram Badlapur

Satkarma Ashram Badlapur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Satkarma Ashram Badlapur, Charitable organisation, Archarya Atre Rang Mandir, Kalyan.
(1)

https://satkarmbalakashram.com/
Stay Education Personality Development of needy with the support of kind hearted Donors like U and Social and Welfare trusts run by social minded people.

29/04/2026
भगवान महावीर आपल्याला सत्कर्म करण्यासाठी प्रेरणा देत असतात. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर वंदन. Makarand Wadhaveka...
31/03/2026

भगवान महावीर आपल्याला सत्कर्म करण्यासाठी प्रेरणा देत असतात. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर वंदन.
Makarand Wadhavekar Secretary 9322956100 Satkarma Ashram Badlapur Vijay Jadhav Satkarma Balakashram Raghavendra Anantrao Deshpande Modern GENTS Parlor Ashirwad Group Tutions Badlapur Aditya More Ashutosh Kulkarni Hemant Bhangale Nagnath Kanhere Sunil Vishwasrao Dinesh Soman Satkarma Aashram Badlapur Charuhas Gupte DrArchana Kulkarni Pratibha Wadile Satkarma Balakashram Harshada Dhotre

🌻 नव वर्षाभिनंदन🌻आनंदाची उधळण करीतचैत्र प्रतिपदा दारी आली!हिंदू वर्षातील पहिल्या दिनीगुढ्या तोरणांची गर्दी झाली!🌻🌿🌻🌿🌻🌿🌻ग...
19/03/2026

🌻 नव वर्षाभिनंदन🌻

आनंदाची उधळण करीत
चैत्र प्रतिपदा दारी आली!
हिंदू वर्षातील पहिल्या दिनी
गुढ्या तोरणांची गर्दी झाली!

🌻🌿🌻🌿🌻🌿🌻

गाठीच्या माळा लिंबाचे लेणे
नऊवारी साडीचे लपेटून घेणे
फुलांच्या माळांचे बहरून येणे
तांब्याच्या घटाचे उंच झेपावणे!

🌻🌿🌻🌿🌻🌿🌻

नक्षीदार सुबक रांगोळी रेखाटणे
घराच्या दारी फुलांची तोरणे!
श्रीखंड बासुंदी गोडाची जेवणे
सुख समृद्धी आनंद उधळणे!

🌻🌿🌻🌿🌻🌿🌻

नवा ऋतु, नव्या जिवनी
उत्साहाची पालवी फुलावी!
प्रसन्नतेचा नव साज घेउनी
सुख समृद्धी सर्वांना मिळावी

🌿 पालवी

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या तुम्हांला सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!!

🍃🌻🍃🌹🍃🌻🍃

दिनांक 28 फेब्रुवारी रोजी आमच्या सत्कर्म आश्रमाची शैक्षणिक सहल छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई येथे आयोजित क...
18/03/2026

दिनांक 28 फेब्रुवारी रोजी आमच्या सत्कर्म आश्रमाची शैक्षणिक सहल छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आम्हाला तुषार सर भेटले आणि त्यांनी या सत्राची माहिती दिली. त्यानंतर आम्ही त्वरित मा. मकरंद वढवेकर सरांना याबाबत कळवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्याचे ठरवले.
म्हणूनच आज आमच्या सत्कर्म आश्रम, बदलापूर येथे या वस्तुसंग्रहालयातील मा. श्री. शिवम खेडेकर सर आणि मा. श्री. देवेश पाले सर यांनी मुलांसाठी कार्यशाळा घेतली. हे सत्र अत्यंत सुंदर, ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी वातावरणात उत्साहात पार पडले.
शिवम खेडेकर सरांनी इजिप्त संस्कृतीविषयी अतिशय रंजक, सोप्या आणि प्रभावी पद्धतीने माहिती दिली. लघुचित्रांच्या माध्यमातून त्यांनी विषय अधिक जिवंत केला, ज्यामुळे मुलांना समजणे खूप सोपे झाले. मुलांनीही उत्साहाने सहभाग घेतला आणि नवीन ज्ञान आत्मसात केले.
शिवम खेडेकर सर आणि तुषार सर यांच्या सहकार्यामुळे आजचे सत्र अत्यंत यशस्वी आणि अविस्मरणीय ठरले.
तसेच, या उपक्रमासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल मा. मकरंद वढवेकर सरांचे विशेष आभार!
अशा ज्ञानवर्धक व प्रेरणादायी उपक्रमासाठी सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार! 🙏 Makarand Wadhavekar Secretary Satkarma Ashram Badlapur 9322956100

आज सत्कर्म आश्रमात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माननीय पेशने सर आणि महेंद्र सर ...
08/03/2026

आज सत्कर्म आश्रमात आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माननीय पेशने सर आणि महेंद्र सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण झाला. महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करत त्यांचे समाजातील योगदान अधोरेखित करण्यात आले. सर्व महिला भगिनींना महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸Makarand Wadhavekar Secretary Satkarma Ashram Badlapur 9322956100

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीजाहलो खरेच धन्य ऎकतो मराठीधर्म पंथ जात एक जाणतो मराठीऎवढ्या जगात माय मानतो मराठीबोलतो मराठ...
27/02/2026

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी
ऎवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जानतो मराठी मानतो मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥
आमच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमच्या लहानग्यात रांगते मराठी
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फ़ुलाफ़ुलात नांदते मराठी
येथल्या फ़ुलाफ़ुलात भासते मराठी
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळी कळीत लाजते मराठी॥
येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऎकतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी..
स्पंदते मराठी.. स्पर्षते मराठी..
गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते
मराठी ||
〰〰〰〰〰〰〰〰
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
〰〰〰〰〰〰〰〰🚩

Address

Archarya Atre Rang Mandir
Kalyan
421301

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 9am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Satkarma Ashram Badlapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share