SAJAG

SAJAG SAJAG aims to address the information and exposure gap faced by the students. SAJAG, in Marathi, means to be alert, aware & respond appropriately.

We, with your support, aspire to be a SAJAG and aims to come with practical results on various significant issues.

भाषेची भिती ते पुस्तकांशी मैत्री: 'सजग'च्या वर्गातील एक प्रवास"अजिबात नाही, मला इंग्रजी शिकायचे नाही!" वर्गात इंग्रजीचे ...
09/04/2026

भाषेची भिती ते पुस्तकांशी मैत्री: 'सजग'च्या वर्गातील एक प्रवास

"अजिबात नाही, मला इंग्रजी शिकायचे नाही!" वर्गात इंग्रजीचे चित्रमय पुस्तक पाहताच ५ वी मधील सनीने आपला स्पष्ट विरोध दर्शवला. त्याच्यासाठी इंग्रजी म्हणजे केवळ अडचण आणि अपयश होते; ती भाषा वर्गात केवळ चुका काढण्याशी आणि शरम वाटण्याशी जोडलेली होती.

अनेकदा अशा परिस्थितीत आपण मुलांवर सक्ती करतो किंवा त्यांना शिक्षा करतो. पण एका वर्गातील शिक्षिकेने वेगळा मार्ग निवडला. तिने सनीवर कोणतीही सक्ती न करता, चुका करणे हा शिकण्याचाच एक भाग कसा आहे यावर वर्गात मोकळी चर्चा केली. त्यानंतर तिने इंग्रजी चित्रमय पुस्तकांचे 'प्रकट वाचन' (मोठ्याने वाचून दाखवणे) सुरूच ठेवले. आणि मग वर्गात एक सूक्ष्म बदल घडू लागला. सनी आणि इतर मुले भाषेतील ध्वनी आणि रचना (patterns) यांच्याकडे लक्ष देऊ लागली. कोणत्याही औपचारिक शिक्षणाशिवाय, केवळ ऐकण्याने त्यांना शब्दांची लय समजू लागली आणि हळूहळू इंग्रजीची भिती नाहीशी झाली. याचा विलक्षण परिणाम असा झाला की, काही काळाने सनीने स्वतःहून ग्रंथालयाच्या तासाला इंग्रजी चित्रमय पुस्तके घेणे आणि ती वाचणे सुरू केले.

वाचन 'कसे' करायचे आणि 'का' करायचे?

सनीची ही गोष्ट केवळ एका विद्यार्थ्याची नाही, तर ती एका महत्वाच्या सिद्धांताची प्रचिती आहे. अभ्यासक जिम ट्रीलीज यांनी त्यांच्या 'रीड अलाउड हँडबुक' (Read Aloud Handbook) मध्ये नेमका हाच प्रभावी मुद्दा मांडला आहे. ट्रीलीज यांच्या मते, मुले केवळ औपचारिक शिक्षणातूनच वाचायला शिकत नाहीत, तर ती भाषेच्या संपर्कातूनही शिकतात.

आपण अनेकदा मुलांकडून 'डिकोडिंग'चा (विसांकेतिकरण किंवा अक्षरओळख) सराव करून घेतो, जो मुलांना फक्त 'कसे' वाचायचे हे शिकवतो. पण ट्रीलीज यांच्या विचारानुसार, कथेमध्ये रमून जाणे आणि शब्दांचा अर्थ कसा उलगडतो हे ऐकणे यातून मुले वाचन 'का' महत्त्वाचे आहे, हे समजून घेतात. जे मूल फक्त साधे शब्दच वाचू शकते, ते प्रकट वाचनाने गुंतागुंतीच्या कथा, विनोद आणि भावना समजून घेण्यास आधीच सक्षम बनू शकते. भाषेची भिती कमी करून शिकण्याचे दरवाजे उघडण्यासाठी प्रकट वाचन एका पुलासारखे काम करते.

जेव्हा कथेमध्ये स्वतःची झलक दिसते...

प्रकट वाचनाची जादू केवळ वाचण्यात नाही, तर मुलांच्या विश्वाशी जोडल्या जाणाऱ्या योग्य कथेच्या निवडीतही आहे. एका वर्गात शिक्षिकेने सुरुवातीला 'काळा चित्ता =' आणि 'आमचा

अधिक समजून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शिका (guidebook) जोडली आहे.

तुमचे विचार नक्की कळवा 🌿

https://drive.google.com/file/d/1z3QxVBos3pZIMaeuljQO5z7Qefl1e3Ex/view?usp=sharing

 has been an important part of SAJAG’s journey this past year, and we’re happy to share that we’ve been recognized among...
22/03/2026

has been an important part of SAJAG’s journey this past year, and we’re happy to share that we’ve been recognized among the top 5 organizations in the cohort.

Our work is deeply rooted in the field — understanding why a child is not engaging in class, supporting teachers through everyday challenges, or figuring out how to keep things running when a team member is unwell. These are constant realities.

What we began to see more clearly is that while we are immersed in these situations, having simple and strong systems can make a big difference in how we respond.

For instance, a daily check-in with the team — something Aparna had suggested early on — helped us stay connected, anticipate challenges, and support each other better. When someone was absent, work didn’t stall; we were able to redistribute and move forward together.

Working on the logic model during the ATMA cohort also brought clarity to our decisions. It helped the team understand the larger purpose behind our work, making everyday choices more aligned and less reactive.

The Wipro Foundation had already nudged us to think in this direction, and within SAJAG, these conversations had begun. ATMA’s frameworks and mentoring helped us take this forward in a more structured and intentional way.

Thank you to the ATMA team for walking with us in this journey.

We carry this forward with more clarity, and stronger systems to support the work that matters to us.

On the occasion of Holi,  our guest teacher and Environment Specialist students at Vidyasadan conducted discussion on th...
03/03/2026

On the occasion of Holi, our guest teacher and Environment Specialist students at Vidyasadan conducted discussion on the harmful effects of using chemical colors. Students shared how colors can cause skin irritation and are difficult to wash off. They also pointed out that throwing plastic bags and water balloons can injure someone’s eyes.

Going further, she encouraged the children to think about how natural colors can be prepared at home. The students made red color using beetroot juice and corn flour. They also prepared green color from spinach juice and orange color from marigold flowers. During the activity, the children experimented with different quantities of ingredients to understand how to make the colors darker or lighter.

In the end, the students enthusiastically declared that this year they would celebrate Holi using only natural colors so that no one would be harmed.

होळीच्या निमित्ताने विद्यासदन येथे आमच्या पाहुण्या शिक्षिका व पर्यावरण तज्ज्ञ ललिता यांनी रासायनिक रंगांच्या वापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली. विद्यार्थ्यांनी सांगितले की हे रंग त्वचेला खाज आणू शकतात आणि लवकर निघत नाहीत. तसेच प्लास्टिकच्या पिशव्या आणि पाण्याचे फुगे फेकल्यामुळे डोळ्यांना दुखापत होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

पुढे त्यांनी मुलांना घरी नैसर्गिक रंग कसे तयार करता येतील याबद्दल विचार करण्यास प्रवृत्त केले. विद्यार्थ्यांनी बीटाचा रस आणि मक्याचे पीठ वापरून लाल रंग तयार केला. तसेच पालकाच्या रसापासून हिरवा आणि झेंडूच्या फुलांपासून नारिंगी रंग तयार केला. या उपक्रमादरम्यान मुलांनी विविध प्रमाणात साहित्य वापरून रंग कसा गडद किंवा फिकट होतो, हे प्रत्यक्ष करून पाहिले.

शेवटी विद्यार्थ्यांनी उत्साहाने जाहीर केले की यावर्षी ते फक्त नैसर्गिक रंगांचा वापर करूनच होळी साजरी करतील, जेणेकरून कोणालाही त्रास होणार नाही.

नुकतेच 'सजग'च्या सहकार्याने मुलांनी एका नाटकाचे सादरीकरण केले. हा लेख म्हणजे  नाटकाचा  मंचापर्यंतच्या प्रवासाचा थोडक्यात...
02/03/2026

नुकतेच 'सजग'च्या सहकार्याने मुलांनी एका नाटकाचे सादरीकरण केले. हा लेख म्हणजे नाटकाचा मंचापर्यंतच्या प्रवासाचा थोडक्यात घेतलेला आढावा आहे. नाटक बसवण्याची ही प्रक्रिया कशी होती आणि यातून मुलांनी पुस्तकाबाहेरचे कोणते धडे गिरवले, याची ही एक छोटीशी झलक!

सजगच्या ‘विद्यासदन’ मधील वर्गात पाऊल ठेवताना वाटलं होतं की, शिक्षणाचे सगळे सिद्धांत आपल्याला ठाऊक आहेत आणि याआधी आदिवासी मुलांसोबत काम केल्याचा अनुभव इथे नक्कीच उपयोगी पडेल. पण तो अनुभव या शहरी वस्तीतल्या मुलांसोबत काम करताना अपुरा पडेल, याची पुसटशीही कल्पना नव्हती. या मुलांमधली हुशारी आणि त्याच वेळी दिसणारी हतबलता इतकी टोकाची होती की, नक्की आपण कोणाशी संवाद साधतोय, हेच अनेकदा समजायचे नाही. वयाच्या अवघ्या १०-१५ वर्षांत त्यांनी जेवढं जग पाहिलं होतं, तेवढं कदाचित आपणही पाहिलं नव्हतं. त्यामुळे मुळाक्षरे किंवा बेरजा-वजाबाक्या शिकवण्याचे ठरलेले फॉर्म्युले इथे फार यशस्वी ठरत नव्हते.

वर्गाची सुरुवात छान व्हायची, पण कोणीतरी मागून चिडवलं की लगेच गोंधळ उडायचा. शिक्षणाचे सगळे सिद्धांत पणाला लागत होते. अनेकदा संयम सुटायचा, चिडचिड व्हायची आणि रडूही कोसळायचं. पण राग शांत झाल्यावर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागायची. यातून मुलांचा विश्वास नक्कीच जिंकता आला, पण घरचे प्रश्न आणि नात्यांमधली गुंतागुंत बाजूला ठेवून त्यांनी एका मोठ्या ध्येयासाठी एकत्र कसं यावं? शाळेसारख्या 'बोरिंग' वाटणाऱ्या जागेचं महत्त्व या हुशार मुलांना कसं पटवून द्यावं? हे मोठे प्रश्न होते.

नाटक, चित्रपट आणि पुस्तकांच्या आवडीतूनच एक दिवस मुलांना सहज विचारलं, "आपण या एका पुस्तकावर नाटक करायचं का?" आणि तोच या वर्गाचा खरा 'टर्निंग पॉईंट' ठरला! मुले एका उद्देशासाठी एकत्र आली, त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि ‘जादुई पोतडी’ या नाटकाचा जन्म झाला.

हे नाटक निकोला डेव्हिस यांच्या ‘द प्रॉमिस’ (The Promise) या पुस्तकावर आधारित होतं. एका 'कुरूप', 'कठीण' आणि 'निर्दयी' शहरात राहणाऱ्या मुलीची ही कथा. सुरुवातीला मुलांना या शब्दांचे अर्थ विचारले, तेव्हा गप्पांमधून मुलं व्यक्त होऊ लागली. “मित्राला पडताना पाहूनही मदत न करणं हे ‘निर्दयी’ वागणं आहे” किंवा “घरातली भांडणं ‘कुरूप’ वाटतात,” असे त्यांचेच अनुभव या नाटकाची संहिता बनले. हे कुठल्याही काल्पनिक कथेवर बेतलेलं नव्हतं, तर ते मुलांच्या खऱ्या आयुष्याचं प्रतिबिंब होतं. मुले केवळ अभिनय करत नव्हती, तर "हे वाक्य असं नको, तसं घेऊया," असे सांगत संहितेत बदल सुचवत होती, अनेक कामांमध्ये मदत करीत होती.

या प्रवासात अडचणी भरपूर आल्या. जागेची अडचण आली तेव्हा बागेत जाऊन सराव केला. शिक्षकांसाठीही हा एक वेगळाच अनुभव होता. नेहा ताईंना जेव्हा एका पालकाने विश्वासाने मुलाचे आधारकार्ड दिले, तेव्हा पालकांचा 'सजग'वरचा विश्वास अधोरेखित झाला. तर शैलजा ताईंनी पात्रांचे कपडे ठरवण्यासाठी चक्क लोकल ट्रेनमधल्या प्रवाशांचं निरीक्षण केलं. नियोजनात गोंधळ उडाला, दमछाक झाली, पण मुले मंचावर उभी राहिली तेव्हा सर्व कष्ट सार्थकी लागले.



अनुभवातून शिक्षण…

सुरुवातीला या सरावादरम्यान मुलांमध्ये मतभेद आणि कुरबुरी सुरू झाल्या होत्या. एका मुलीला तिच्या दिसण्यावरून गटातून वगळण्याचा प्रयत्न झाला. तिथेच थांबून एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला "जोपर्यंत कोणाची स्वतःची इच्छा नसेल, तोपर्यंत इथून कोणालाही बाहेर काढलं जाणार नाही". मुलांना सहज विचारलं, "तुमच्यापैकी असा एक जण सांगा ज्याने कधीच काही चूक केली नाही?" तिथे पसरलेली शांतता खूप काही सांगून गेली. या प्रोसेस मध्ये मुले फक्त नाटक करायला शिकली नाहीत, तर स्वतःच्या चुका मान्य करणे आणि ‘क्षमा करणे’ हा मानवी मूल्यांचा धडा देखील गिरवू लागली होती.

हे सगळं घडत असताना जाणवत होतं की, आपण जे शिक्षणाबद्दल तज्ञांचे विचार वाचतो, ते इथे प्रत्यक्ष घडत आहेत. अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ जॉन ड्युई यांच्या मते, शिक्षण हे केवळ शिक्षकाने दिलेल्या माहितीवर नसावे, तर ते प्रत्यक्ष ‘अनुभवातून’ यायला हवे. आपल्या नाटकात हेच घडले. मुलांनी स्वतःचे अनुभव मांडले, त्यावर चर्चा केली. त्याचप्रमाणे, प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ पाउलो फ्रेरे यांनी शिक्षणात ‘संवाद’ आणि ‘चिकित्सक विचार’ यांना महत्त्व दिले. जेव्हा मुलांनी स्वतःच्या भांडणांवर तोडगा काढला आणि क्षमा करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा ते फ्रेरे यांना अपेक्षित असलेले ‘सामाजिक भान’ जपत होते.

सर्वात मजेची गोष्ट म्हणजे, जेव्हा मुले स्वतःच्या गोष्टी सांगू लागली, तेव्हा त्यांना त्या लिहून काढाव्याशा वाटल्या. एकमेकांचे संवाद वाचताना वाचनाची गोडी लागली. साक्षरता हे इथे ध्येय नव्हते, तर नाटकाचा तो एक साहजिक आणि सुंदर परिणाम होता.

पालकांनी देखील मुलांमधील हा बदल अधोरेखित केला. एका विद्यार्थिनीच्या पालक मंगल वाघमारे यांनी सांगितले, “ती रोज घरी येऊन तालमीत काय शिकली हे आनंदात सांगायची. दहावीत असून सुद्धा तिने नाटक आणि अभ्यास दोन्ही छान केले.” तर एका विद्यार्थ्याच्या पालक प्रतिभा शिरसाठ म्हणतात, “नाटकातून माझ्या मुलाला वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्याची सवय लागली आहे.”

या नाटकाला खरा कलात्मक आकार दिला तो अत्यंत गुणी नाट्यकलावंत धनश्री खांडकर यांनी. मुलांचे अनुभव आणि त्यांच्या गोष्टी एका धाग्यात गुंफून त्यांनी ‘जादुई पोतडी'चे लेखन आणि दिग्दर्शन केले. आपल्या उत्तम मार्गदर्शनातून त्यांनी मुलांच्या या प्रवासाला एका जिवंत, रंजक आणि सुंदर नाटकाचे रूप दिले.

‘जादुई पोतडी’ हे आता केवळ एक नाटक उरलेलं नाही, तर ती मुलांच्या आत्मविश्वासाची, एकमेकांना समजून घेण्याची आणि बदलाची एक जिवंत गोष्ट बनली आहे.

२०१६ पासून सजगचा प्रवास वर्गात घडणाऱ्या बदलांभोवती फिरत आहे—मुलांकडे पाहण्याची दृष्टी बदलली, तर शिकण्याचं चित्रही बदलतं....
19/01/2026

२०१६ पासून सजगचा प्रवास वर्गात घडणाऱ्या बदलांभोवती फिरत आहे—
मुलांकडे पाहण्याची दृष्टी बदलली, तर शिकण्याचं चित्रही बदलतं.

या काळात आम्ही अनेक शाळांमध्ये शिक्षकांसोबत काम करताना एक गोष्ट सातत्याने पाहिली आहे:
थोडं थांबून निरीक्षण केलं, मुलांच्या गतीला समजून घेतलं, आणि पद्धतीत छोटे बदल केले—की त्याचा परिणाम थेट वर्गावर दिसतो.

सजग न्यूजलेटरचा हा पहिला अंक अशाच अनुभवांवर आधारित आहे.
वर्गात घडलेले बदल, शिक्षकांचे विचार आणि त्यातून उमटलेली विद्यार्थ्यांची प्रगती—यांचा हा एक नोंदवहीसारखा प्रयत्न आहे.

संवाद सुरू राहावा, शिकणं सामूहिक व्हावं—याच उद्देशाने हा अंक तुमच्यापर्यंत.

Since 2016, SAJAG’s work has focused on what happens inside classrooms.
When teachers slow down, observe children closely, and make small shifts in practice, learning begins to change.

The first edition of the SAJAG Newsletter brings together such classroom experiences—teacher reflections, learning moments, and the progress that follows thoughtful teaching.

This is an attempt to document, reflect, and keep the conversation around meaningful learning alive.
For full article -
https://sajagtrust.org/posts/76

🌟 Warm & Inspiring 🌟📚 School enrolment is just the beginning.For children to truly stay and thrive in school, learning m...
12/10/2025

🌟 Warm & Inspiring 🌟

📚 School enrolment is just the beginning.
For children to truly stay and thrive in school, learning must be joyful and meaningful.

At SAJAG, we make this possible through creative, child-centred teaching that helps children love learning. 💛

✨ With just ₹3,500 per child per year, you can ensure lasting change.
Together, let’s support 2,100 children this year!

You can use this link too - Getepay.dnsablqr478113@icici

➡️ Donate now. Be part of their learning journey.

We are deeply grateful to Shubhangi for her presence at the Book Publication Event. Her heartfelt interaction with paren...
03/10/2025

We are deeply grateful to Shubhangi for her presence at the Book Publication Event. Her heartfelt interaction with parents and children, the way she connected with the audience, and her warm words of appreciation for SAJAG’s work gave the event a special charm.

Her encouragement is not only a recognition of the children’s creativity but also a great moral booster for our entire team.

We are delighted to share a milestone moment at SAJAG. Through the Art with Shreeba – Book Making Workshop, children cre...
03/10/2025

We are delighted to share a milestone moment at SAJAG. Through the Art with Shreeba – Book Making Workshop, children created their own picture books, wordless books, and stories. After three months of dedicated work, these books were officially launched in a special Book Publication Event.

A heartfelt thank you to Cotecna for supporting our EnRead, which enables us to conduct such meaningful events. We are grateful to Shubhangi for lending her presence and making the event more prestigious,
to Shreenivas for conceptualizing and leading this beautiful workshop, and to Prachi for guiding children.

These books are now available as open resources on the SAJAG website, so children and parents everywhere can access and enjoy them. This was made possible thanks to our website managers, Vishal Maurya and Mayur.

We also extend gratitude to the SAJAG team for their tireless effort—especially Bhushan, Hrishikesh Netke , and Anuja—for turning children’s first drafts into finished books. And to the entire team—Shailaja (anchoring), Sunita (decor), Rangoli (guiding children and parents), Sonali & Anuja (guidance), and Kranti (refreshments)—for making the event seamless and memorable.

This event is a celebration of children’s creativity and the collective effort of everyone who believes in SAJAG’s vision. 🌿

For Books - under Resource page, select Children Books and do share your feedback to us.
https://sajagtrust.org/resources-page #

🌸 *पुस्तक प्रकाशन सोहळा* 🌸“आर्ट विथ श्रीबा” या कार्यशाळेमधून तयार झालेल्या पुस्तकांचे प्रकाशन.📅 दिनांक : गुरुवार, २ ऑक्ट...
30/09/2025

🌸 *पुस्तक प्रकाशन सोहळा* 🌸

“आर्ट विथ श्रीबा” या कार्यशाळेमधून तयार झालेल्या पुस्तकांचे प्रकाशन.

📅 दिनांक : गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५
⏰ वेळ : सकाळी १०:३० ते १२:००
📍 स्थळ : EnRead लायब्ररी, पारनाका, कल्याण (पश्चिम)

✨ प्रमुख पाहुणे : सुप्रसिद्ध अभिनेत्री *शुभांगी भुजबळ*

सजगच्या वाटचालीतला महत्वाचा क्षण!

संपर्क : 📞 8452852773
पत्ता : https://maps.app.goo.gl/AuRuS9BEReYRVJEt8

Read Aloud is a powerful teaching method regularly used in SAJAG classrooms. It's an interactive form where the teacher ...
09/09/2025

Read Aloud is a powerful teaching method regularly used in SAJAG classrooms. It's an interactive form where the teacher reads the story in an entertaining way. During this process, questions are asked and discussions are encouraged, thus paving the way to engaged classrooms.
These experiences of Read Aloud are shared by Sajitha, SAJAG's co-founder, along with Manasee Mahajan, educator and language expert associated with Palakneeti Pariwar, in Samuhik Pahel.
Link to the article
प्रकट वाचन ही एक प्रभावी शिकवण्याची पद्धत आहे जी सजगच्या वर्गांमध्ये नियमितपणे वापरली जाते. यात शिक्षक कथा मनोरंजक पद्धतीने वाचतात. या प्रक्रियेदरम्यान प्रश्न विचारले जातात, चर्चा प्रोत्साहित केली जाते आणि त्यामुळे वर्ग अधिक सहभागी व सक्रिय होतो.
प्रकट वाचनाचे हे अनुभव सजगच्या सहसंस्थापक सजिता आणि पालकनीती परिवाराशी संलग्न शिक्षिका व भाषा तज्ज्ञ मानसी महाजन यांनी सामूहिक पहल मध्ये मांडले आहेत.
Link of the Article - https://samuhikpahal.org/reflections-and-opinions/difficult-topics-in-childrens-literature-reflections-from-the-field/

🌟 Join Us as a Volunteer! 🌟At Sajag Charitable Trust, we believe every child deserves the opportunity of learning. We’re...
02/09/2025

🌟 Join Us as a Volunteer! 🌟

At Sajag Charitable Trust, we believe every child deserves the opportunity of learning. We’re looking for passionate volunteers to help children (ages 6–12) improve their English skills.

✅ 2 hours on weekdays and Saturdays
✅ Gain valuable teaching experience
✅ Be part of the change
✅ Make an impact—one word at a time!

Your time and effort can brighten a child’s future. 💙

👉 Register here: https://sajagtrust.org/volunteerRegistration

सजग ची 9 वर्षे   आपल्या घराजवळच्या कचऱ्याच्या डंपिंग ग्राउंडजवळ राहणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्ष...
22/08/2025

सजग ची 9 वर्षे
आपल्या घराजवळच्या कचऱ्याच्या डंपिंग ग्राउंडजवळ राहणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे अशा अगदी स्थानिक पण सजग प्रेरणेतून सजगचा प्रवास सुरू झाला. सामाजिक काम करताना ते मजबूत पायावर उभे असावे ह्या भूमिकेतून सजग ची स्थापना 22 ऑगस्ट 2016 रोजी केली.
मागची 9 वर्षे संस्था म्हणून काम करणे शिकवणारी होती. विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोचण्याची तळमळ, संस्थेसाठी लागणारा निधी उभी करण्याची अविरत विवंचना, संस्थात्मक निधीसहाय्य मिळवताना त्यांच्या अपेक्षांना पुरे पडण्यासाठी नव्या नव्या गोष्टी करणे आणि ते करताना आपण कोणताही विद्यार्थी माहिती आणि संधीच्या अभावत राहणार नाही ह्या उद्दिष्टासाठी काम करत आहोत ही जाणीव सतत जागी ठेवण्याची गरज असा ह्या 9 वर्षांचा लेखाजोखा थोडक्यात मांडता येईल.
काही थोड्या विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला संस्थेचा प्रवास आता हजाराहून अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षक ह्यांच्यासोबत सुरू आहे. कल्याण – डोंबिवली महानगरपालिका शाळांतील शिक्षकांसोबत चालणारे शाळा सांगाती आणि प्रकट वाचन उपक्रम, उंबर्डे येथे चालणारे कम्युनिटी लर्निंग सेंटर म्हणजे विद्यासदन, आणि 12 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठीची खेळणी आणि पुस्तकांची प्रयोगशील लायब्ररी एनरिड अशा प्रकल्पांतून सुरू आहे.
शिक्षण हा संवाद असतो ज्यांत एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करत असते. तंत्रज्ञान, साधने ह्यांच्याहून महत्वाचे ठरतात ते संवादाच्या सामर्थ्याची जाणीव असलेल्या व्यक्ती. मुलांशी, पालकांशी, शिक्षकांशी, समविचारी संस्थांशी, शासनाशी संवाद साधणाऱ्या व्यक्ती, म्हणजे आमची टीम, ही सजगची खरी शक्ती आहे आणि आमची भविष्यातली गरजही. तुम्हाला आमच्या ह्या दृष्टिकोनात स्वारस्य असेल तर अनेक मार्गांनी, ज्याला तन मन धन असं थोडक्यात म्हणता येईल, आपण सोबत काम करू शकतो. सर्वांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या स्वप्नाच्या जवळ जाऊ शकतो.

Address

Adharwadi
Kalyan West
421301

Alerts

Be the first to know and let us send you an email when SAJAG posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to SAJAG:

Share