Swarajya Paryatan Sanwardhan Sanstha Junnar

Swarajya Paryatan Sanwardhan Sanstha Junnar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Swarajya Paryatan Sanwardhan Sanstha Junnar, Non-Governmental Organization (NGO), Junnar.

This is an organization created by Bhumiputras of Junnar taluka who are aware of the need to preserve and conserve the biodiversity and historical heritage of Junnar taluka.

14/01/2026
२७ एप्रिल महाराष्ट्र राज्य घोषणा दिना निमित्त स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्था यांच्या वतीने जुन्नर शहर व किल्ले शिवनेरी य...
29/04/2025

२७ एप्रिल महाराष्ट्र राज्य घोषणा दिना निमित्त स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्था यांच्या वतीने जुन्नर शहर व किल्ले शिवनेरी येथे पुन्हा इतिहास जागवीला.
भारत स्वतंत्र झाल्या नंतर देश कारभारासाठी भाषावर राज्य निर्मिती करण्याचे ठरले आणि त्या प्रमाणे राज्यांची निर्मिती झाली पण महाराष्ट्र राज्याची निर्मिती मुबंई वागळून करण्याचा घाट घातला गेला आणि संपूर्ण महाराष्ट्र जनता पेटून उठली आणि मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरु केली आणि त्या मध्ये 108 जणांना बलिदान द्याव लागलं.त्या नंतर
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६०साली झाली पण त्याच्या निर्मितीची घोषणा २७ एप्रिल 1960 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शंकर रावजी चव्हाण यांनी जुन्नर शहर येथील नगरपालिका इमारती समोर छत्रपती शिवरायांचा पुतळा स्थापित करून केली.
महाराष्ट्रातील सर्व नद्याचे पाणी आणि सर्व गडाची माती एकत्र केलेला अमृत कलश जुन्नर शहरातून वाजत गाजत किल्ले शिवानेरीवर नेला गेला आणि तिथे त्याचे पुजन करून शिवकुंज इमारतीचा पायाभरणी सोहळा केला गेला.
हा उत्सव जुन्नर शहर आणि परिसरात सात दिवस सुरु होता जवळपास तीन ते साडेतीन लाख लोक ह्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातुन उपस्थिती होती आणि ह्या अश्या मंगल मायी आणि चैतन्य पूर्ण वातावरणा मध्ये १ मे १९६० रोजी मुंबई सह स्वतंत्र महाराष्ट्राची घोषणा झाली.
त्या दिवसाची आठवण आणि त्या बलिदानाला नमन म्हणून आपला इतिहास आपण जपण्यासाठी स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्थेने २७ एप्रिल रोजी नगरपालिका समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून घोषणा दिनाच्या वेळी जे नगरपालिका सदस्य होते त्यांच्या वारसांचा सन्मान केला.
आणि अमृत कलश किल्ले शिवनेरी येतील शिवकुंज इमारती मधील बाल शिवबा आणि जिजामाता यांच्या पायाशी ठेवून पुजन केले.
मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र चाळवळीचा इतिहास विनायक खोत सरांनी उपस्थिताना सांगलीतला.
किल्ले शिवनेरी पायथ्याशी मर्दानी युद्ध कला राज्य स्तरीय स्पर्धा आयोजित केली होती आणि संध्याकाळी महाराष्ट्र गीत आणि पोवाडा गायनाचा सोहळा संपन्न झाला.

21/04/2025

२७ एप्रिल १९६० — ज्या दिवशी महाराष्ट्राच्या अस्मितेचा हुंकार उठला,
त्या ऐतिहासिक घोषणेला आज ६५ वर्षे पूर्ण!

शिवनेरीच्या कुशीत,
अस्मितेच्या गजरात,
पुन्हा एकदा साजरा होणार आहे
आपल्या महाराष्ट्राचा अभिमान —

इतिहास. परंपरा. आणि वारसा.

महाराष्ट्र घोषणा दिन उत्सव २०२५

आयोजक: स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्था

#शौर्यपर्व #घोषणादिन

Address

Junnar
410502

Telephone

+917400001236

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swarajya Paryatan Sanwardhan Sanstha Junnar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Swarajya Paryatan Sanwardhan Sanstha Junnar:

Share