भारत एक खोज

भारत एक खोज Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from भारत एक खोज, Hutatma smarak, Jintur.

30/04/2025

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात नातलगाकडे आलेल्या तीस वर्षीय तरुणा मागे मोकाट कुत्रे लागले. त्याच्यापासून बचाव करत पळत असताना तरुण खोल विहिरीत पडला. दोन दिवस, दोन रात्र त्याच विहिरीत विहिरीतील दोरीला धरून त्याने स्वःतचा जीव वाचविला. तिसऱ्या दिवशी हा सर्व प्रकार लोकांच्या लक्षात आलं. ग्रामस्थ, पोलिसांच्या मदतीने अखेर त्याला विहिरीबाहेर सुखरूप बाहेर काढल्याने त्याचा जीव वाचला.

छत्रपती संभाजी राजेंचे शेवटचे काही शब्द "आबासाहेब, तुम्ही आभाळाच्या डोळ्यांनी पाहत असाल मला,पण मला तुमचं आभाळाएवढं रुप प...
28/04/2025

छत्रपती संभाजी राजेंचे शेवटचे काही शब्द
"आबासाहेब, तुम्ही आभाळाच्या डोळ्यांनी पाहत
असाल मला,
पण मला तुमचं आभाळाएवढं रुप पाहायला डोळेच
राहिले नाहीत हो,
आग्र्याहुन येताना तुमचा हात विश्वासाने हातात
घेऊन म्हणालो होतो,
"आमची फिकीर करु नका आबासाहेब, आम्ही सुखरुप
गडावर पोहोचु "
तसा तुम्हीही माझा विश्वासाने हात हाती घ्याल
का आबासाहेब?
पण ते हातही उरले नाहीत आता,
अन् तुम्हाला "आबासाहेब!!!"
अशी साद घालायला जीभही उरली नाही हो,
पण एक सांगतो आबासाहेब,
रक्ताचा अभिषेक घालूनच स्वराज्याचं मंदीर पवित्र
होणार असेल,
आणि शिवपूत्र म्हणून अशीच मृत्युशी ओळख होणार
असेल,
तर मी रायगडीच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेन....
"हजारवेळा जन्म दे, पण शिवपूत्र म्हणूनच दे".
जगायचं कसं हे तुम्ही जगाला शिकवलत
पण
मरायच कसं हे मी शिकवेन.
🚩 !! जय महाराष्ट् !!??
#शिवाजी #सनातनहमारीपहचान #सामाजिक

27/04/2025

21/04/2025

_*उष्माघात*_

*उन्हामुळे मृत्यू का होतो* ?

आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो?

*आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७° अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात*.

घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७° अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, *सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक* आहे.

पाणी शरीरात इतरही अधिक महत्त्वाची कामं करतं, त्यामुळे शरीरातला पाण्याचा साठा कमी झाला, तर शरीर घामाच्या रूपाने पाणी बाहेर टाकणं टाळतं.

- जेव्हा बाहेरचं तापमान ४५°अंशाच्या पुढे जातं आणि शरीरातली कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचं तापमान ३७°च्या पुढे जाऊ लागतं.

*शरीराचं तापमान जेव्हा ४२° डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचतं, तेव्हा रक्त तापू लागतं आणि रक्तातलं प्रोटिन अक्षरशः शिजू लागतं* (उकळत्या पाण्यात अंड उकडतं तसं!)

- *स्नायू कडक होऊ लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायू ही निकामी होतात*.

*रक्तातलं पाणी कमी झाल्या* मुळे *रक्त घट्ट होतं, ब्लडप्रेशर अत्यंत कमी होतं, महत्त्वाच्या अवयवांना* (विशेषतः मेंदूला) रक्त पुरवठा थांबतो.
- माणूस कोमात जातो आणि त्याचे एक-एक अवयव अवघ्या काही क्षणांत बंद पडतात आणि त्याचा मृत्यू ओढावतो.

उन्हाळ्यात असे अनर्थ टाळण्यासाठी सतत थोडे थोडे पाणी पित रहावे, व *आपल्या शरीराचे तापमान 37° अंशच कसे राहिल याकडे लक्ष द्यावे*..

*ऊष्माघात टाळा*.

*उन्हाचा पारा चढत आहे*.. त्यामुळे *उष्माघात टाळण्या* साठी खालील उपाययोजना करा..
शेतातील कामे सकाळी ६ ते ११ व दुपारी ४ते ६.३० या कालावधीत करा.

- *काम करत असताना मध्ये मध्ये थोडावेळ थांबुन पाणी प्या*.

शक्यतो सुती (काँटन) व पांढऱ्या रंगाचे कपडे वापरा.

- *डोक्यावर रुमाल टोपी इत्यादीचा वापर करा*.

- आहारात ताक दही इत्यादीचा वापर करा. तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ, मद्यपान व मांसाहार टाळा.

- कोल्ड्रींक ऐवजी लिंबु सरबत, नारळपाणी याचा वापर करा.

*दुपारी ११ ते ४ पर्यंत काम, प्रवास टाळा*.

- लहान मुलांना, गरोदर मातांना, आजारी व्यक्तींना दुपारच्या वेळी बाहेर पडु देऊ नका.

*अशक्तपणा,थकवा, ताप-उलट्या इ. लक्षणे आढळल्यास* तत्काळ डाॕक्टरांचा सल्ला घ्या.
🙏🙏🏼



Natrupathist &

11/04/2025

बान स्तंभ एक रहस्य

11/04/2025
20/09/2024

Address

Hutatma Smarak
Jintur
431509

Telephone

9860487210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भारत एक खोज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to भारत एक खोज:

Share