Vayam movement

Vayam movement Vayam is a voluntary movement for inclusive development, environment, and democracy. Vayam - this Sanskrit word means 'we'.

And this Vayam movement believes in inclusion of all Indians forgetting all petty identities and squabbles. Vayam has succeeded in strengthening democracy at its roots. The villagers from hundreds of most remote villages are running this movement - asserting their democratic rights, conserving their forests and water, improving their livelihood, becoming assets in the macro world. Join us if you b

elieve in democracy, if you believe in India!
आपल्या विकासाची आपली चळवळ
‘वयम्’ म्हणजे आपण सगळे. विकासाच्या दिशेने चाललेला प्रवास सर्वांच्या विचाराने-सहमतीने आणि प्रयत्नाने व्हावा असं म्हणणारी चळवळ म्हणजे वयम्. असा सर्वसमावेशक विकास सक्षम स्थानिक नेतृत्त्वातून घडेल असा वयम्’ला विश्वास वाटतो.
वयम्’चे कार्यक्षेत्र...
2006 साली वयम् चळवळ सुरू झाली. पालघर जिल्ह्यात (जव्हार-मोखाडा-विक्रमगड) आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबक तालुक्यांतील शेकडो गावात ही चळवळ आज कार्यरत आहे.
वयम्’चे काम असे चालते...
गावातले लोक वयम् च्या शिबिरात कायदे शिकतात. कायदा कसा चालवायचा हे शिकतात. लोकशाहीत लोकांचे राज्य - हे नाणे खणखणीत वाजवतात. सव्वाशे गावांतल्या 13हजार लोकांनी रोजगार हमी कायदा वापरून गावातच काम मिळवले. स्थलांतर थांबले. पेसा कायदा शिकून 47 गावांच्या ग्रामसभा स्वशासन चालवू लागल्या. तर वनहक्क कायदा वापरून साडेतीन हजार शेतकऱ्यांनी जगण्याचे (शेतीचे) हक्क मिळवले. सामुहिक वन संसाधन हक्क वापरून शेकडो हेक्टर जंगल आज गावकरी जपत आहेत. तर वयम् ने दिलेले पाणी आराखड्याचे तंत्र आणि वयम् ची आर्थिक मदत यावर सातशे शेतकरी पाऊसपाणी साठवून नवी पिके घेत आहेत.
वयम् चळवळीचे लोकशाही जागर केंद्र बांधकाम करायला 15 गावांनी श्रमदान केले. यातच सिद्ध होते की ही लोकांची चळवळ आहे. कोणीही यातल्या एखाद्या गावात जा आणि विचारा - ही चळवळ चालवतं कोण - अन् लोक म्हणतील 'आम्ही'!

06/08/2026

स्वावलंबन ऐक जीवनपद्धत

"त्यांचा स्वावलंबी स्वभाव मला खूप प्रभावित करतो. भाजी, कपडे, औषधे… सगळं ते जंगलातून आणि स्वतःच्या शेती-पशुपालनातून तयार करतात. बाजारात जाण्याची गरज फार कमी पडते. शहरात आपण फक्त पैसे कमवतो आणि सर्वकाही बाहेरून विकत आणतो… त्यांचं मात्र स्वतःचं असतं."

— हा अनुभव आहे सत्यमचा, आदिवासी समाजासोबत काही दिवस राहिल्यानंतरचा.

ह्या समाजाकडून कमीत कमी गोष्टींमध्ये निसर्गाशी जोडून आपण कसे जगू शकतो हे नक्कीच शिकण्या सारखं आहे.

तुम्हीही या... आणि आयुष्याला एका वेगळ्या नजरेतून अनुभवून पाहा.

---

Self-Reliance: A Way of Life

"What inspires me the most is their self-reliant way of living. Vegetables, clothes, medicines... almost everything comes either from the forest or from their own farms and livestock. They rarely need to visit the market. In cities, we mostly earn money and buy everything from outside. They, on the other hand, create so much on their own."

— This is Satyam's reflection after spending a few days with the Adivasi community.

There is so much we can learn from this way of life, how to stay connected to nature and live meaningfully with fewer needs.

Come, experience it for yourself... and see life from a completely different perspective.

न्याय हा केवळ कायद्यात असणे पुरेसे नाही. तो प्रत्यक्षातही दिसला पाहिजे.गाव-पाड्यातील सामान्य आदिवासी शेतकरी पिढ्यानपिढ्य...
01/08/2026

न्याय हा केवळ कायद्यात असणे पुरेसे नाही. तो प्रत्यक्षातही दिसला पाहिजे.

गाव-पाड्यातील सामान्य आदिवासी शेतकरी पिढ्यानपिढ्या आपल्या जमिनीवर शेती करत राहतो. पण वनहक्काच्या दाव्यासाठी त्याच्याकडून पुरावे मागितले जातात. विडंबना अशी की, हे पुरावे बहुतांश वेळा सरकारकडेच उपलब्ध असतात.

वनविभागाकडे अनेक दशकांपासूनच्या गुन्हा नोंदवही आहेत. ज्या जमिनींना वन घोषित करण्यात आले, त्या जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे याच नोंदींमध्ये आढळतात. वनहक्क कायद्यानुसार हे सरकारी रेकॉर्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे गावस्तरीय समित्यांना उपलब्ध करून देणे, तसेच आदिवासी शेतकऱ्यांना पुरावे गोळा करण्यासाठी मदत करणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी आहे.

परंतु प्रत्यक्षात मदत करण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर दावे फेटाळले जात आहेत.

#वयम् चळवळीने नाशिक विभागीय समितीसमोर कायद्यातील ही जबाबदारी स्पष्टपणे मांडली आहे.

जोपर्यंत सरकारी नोंदी आणि २००५ पूर्वीच्या उपग्रह प्रतिमा गावोगावच्या समित्यांना उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत वनहक्क दावे फेटाळणे थांबवावे.

न्यायाचा मार्ग सुलभ करणे ही शासनाची जबाबदारी आहे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे ही आपली.

---

Justice is not served simply because it exists in law. It must be upheld in practice.

Across villages and hamlets, tribal farmers have cultivated their land for generations. Yet, when they file claims under the Forest Rights Act (FRA), they are asked to produce evidence of their occupation. The irony is that much of this evidence already exists within government records.

For decades, the Forest Department has maintained offence registers containing the names of cultivators on lands later classified as forests. The Forest Rights Act clearly requires these records to be made available to village-level committees. It also places a responsibility on the authorities to assist semi-literate tribal claimants in gathering the evidence needed to support their livelihood claims.

Instead of extending this support, many claims continue to be rejected.

Vayam has reminded the Nashik Divisional Committee of its responsibilities under the Forest Rights Act.

Until government records and pre-2005 satellite imagery are made available to village-level committees, the wrongful rejection of Forest Rights claims must stop.

Justice begins with a fair process. Ensuring that every genuine claimant has a fair opportunity is not just good governance—it is a legal responsibility.

#वयम् #वनहक्क

27/07/2026

काही अनुभव शिकवले जात नाहीत. ते जगावे लागतात.

वृष्टी, IIT Roorkee ची विद्यार्थिनी, कुरुक्षेत्रजवळील लाडवा गावातील.

वयम् सोबत तीन दिवसांच्या अनुभव शिबिरानंतर ती म्हणाली:

"या लोकांना भाजी-किराणाची गरज नाही. ते निसर्गातून घेतात आणि स्वतंत्रपणे जगतात. जर एक महिना बाजारचे अन्न मिळाले नाही, तरीही हे लोक जगू शकतात... आम्ही नाही."

कधी कधी खरे शिक्षण वर्गखोल्यांमध्ये मिळत नाही. ते माणसांमध्ये, त्यांच्या जीवनपद्धतीत आणि निसर्गाशी असलेल्या नात्यात सापडते.

वृष्टी म्हणतेय, वयम् मदत फक्त आजच्या पुरती करत नाही. वयम् ज्ञानाची ताकद देते, जेणेकरून लोकं स्वतः उभे राहू शकतील आणि आपल्यासारखी इतरांनाही सक्षम करण्यास मदत करू शकतील.

तुम्ही सुद्धा या... आणि आयुष्याला एका वेगळ्या नजरेतून अनुभवून पाहा.

---

Some experiences cannot be taught. They have to be lived.

Meet Vrishti, a student from IIT Roorkee, originally from Ladwa near Kurukshetra.

After spending just three days with Vayam, she said:

"These communities don't depend on grocery stores. They take what they need from nature and live independently. Even if food wasn't available in markets for a month, they would still survive... we wouldn't."

Sometimes, the most meaningful education isn't found inside classrooms. It is found in people, their way of life, and their relationship with nature.

Vayam doesn't just provide support for today. It nurtures knowledge and self-reliance, enabling people to stand on their own feet and, in turn, empower others around them.

Come, experience life from a different perspective with Vayam.

14/07/2026

निसर्गाचा आघात आपल्या हातात नाही, पण माणूस म्हणून आपण काय करतो, याची जबाबदारी मात्र आपलीच असते.

मागच्या वर्षी आम्ही १००० रोपे लावली. पण मानवकृत वणव्यामध्ये ती जळून गेली. तरीही यावर्षी पुन्हा तेवढीच, किंबहुना अधिक मेहनत घेऊन १२०० रोपे लावायचे ठरवले आहे.

या प्रत्येक रोपाला निसर्गाची साथ लाभो आणि कोणत्याही मानवनिर्मित संकटाची नजर त्यांच्यावर पडू नये, हीच प्रार्थना. 🌱🙏

---

Natural calamities are not in our hands, but as human beings, the responsibility for our actions certainly is.

Last year, we planted 1,000 saplings, but they were destroyed in a human-caused forest fire. Even then, we have decided to begin again this year with the same determination—if not greater—and plant 1,200 saplings.

We pray that each of these saplings is protected by nature and remains safe from any human-caused harm. 🌱🙏

🚩पारंपरिक रूढी,परंपरा, कला आणि संस्कृती संवर्धनकवळी भाजी/कोवळी भाजी/कोळी भाजी           कवळे भाजीचा सण आम्ही जेठ (ज्येष्...
06/07/2026

🚩पारंपरिक रूढी,परंपरा, कला आणि संस्कृती संवर्धन

कवळी भाजी/कोवळी भाजी/कोळी भाजी
कवळे भाजीचा सण आम्ही जेठ (ज्येष्ठ) महणेत मंजे जुन महनेचे तिसरे किंवा चौथे आठवडेत करू.पण अवंदं एक महना वाढीव होता तंय पाणी जून महणेत पडला नाही,उशीर केला. पाणी पडला काय पहले पानेत रानोमाळात कवळी भाजी उंगुन निघ.तेच वक्तालं पिरणी पण करून होय.कवळी भाजी उंगून निघली काय मग मंगळवार पाहून आख्ख गावकरी गावदेवीचे देवळात जात,अन् तठ गावदेवाच पुंजारी/भगत अन् बारा पाडेच गावकरी असं आख्ख मिळून गावदेवीची,वाघ देवाची पुंजा करू. ना मग देवाल शेंदूर लावून कवळे भाजीचा निवद दावत अन् पुंजारी आख्खेलं उद्देशून सांगत काय "चार महणेची रात आली आहे ,कोणी भांडण - तंडन करायचा नाय,आपली धरतरी चांगली कसायची,चांगली लागवड करायची, सुख दुःखात एकमेकांहल मदत करायची" असा भगत लोक आख्खेल सांगत. देवाल पूंजा अन् निवद दावून झाला काय मग नांगरेची मजुरी कोढीक, मयताची वरगणी कोढीक,दुसऱ्याचे कामावर जायाची कामगारांची मजुरी कोढीक,दारू चालू ठवायची काय बंद ठवायची अन् चालू ठवायची त मग एक बाटली ची किमत कोढीक त्या आम्ही सगळ गावकरी मिळून देवळातच ठरवू, कनचे महणे परत गावतरी(गायी वासरे, बैल )चारायची अन् कयपासून उसाट/मोकाट दियेची त्या पण ठरवू.तोरणदेव अन रवाळीत रहायचा होवा त काय काय वरजाय लागल त्या सगळा भगत लोक देवळातूच सांगत.घरी आला काय मग गावाच्या पाड्या- पाड्यांवर घराघरांत सगळी लोकां आपापल्या माळातले वीर, सवऱ्या अन् दपित देवाहलं शेंदूर लावून घरी कुळ देवाहल दिवा लावून कवळे भाजीचा नीवद दावत अन् घरातली आखी माणसा एकुच जागं बसून कवळी भाजी खायेचा सण करत .कवळे भाजीचे हेच दिसापासून आम्ही कांबड्या नाचाय, गवरीवर नाचाय सुरावात करूं.आमचे हे कवळे भाजीचे सणाल घरातली सगळी सगे सोयरे अन् नवीन लगीन करून दिधेल ते पोरघील अन् जावायल खास करून बोलवून हो सण आम्ही करूं .
अन् तेच आठवडेत रयीवारी खादीचा देव करून भात लावायल सुरवात करू.असा हो आमचा कवळे भाजीचा सण ,आमचे कवळे भाजीचे सणाल तुम्ही पण इजास.मग आपले गावठी कोंबडा ना धार पाडाय मुहाची आणू अन आंखीजणा मिळून कवळे भाजीचा सण फार बेस करू...............

भारत पाटारा (वयम् कार्यकर्ता)

#वयम् #कवळीभाजी #संस्कृतीसंवर्धन

काल जनजाती सल्लागार परिषदेच्या (TAC) बैठकीत वनहक्क धारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.यापुढे वनहक्क धारकांचे ना...
03/07/2026

काल जनजाती सल्लागार परिषदेच्या (TAC) बैठकीत वनहक्क धारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

यापुढे वनहक्क धारकांचे नाव सातबाऱ्यावर स्वतंत्रपणे नोंदवले जाईल. त्यासाठी शासनाने 7E आणि 12E हे दोन नवीन सातबारा नमुने मान्य केले आहेत.

याचबरोबर, ग्रामसभेच्या गौण वनोपजावरील अधिकारात हस्तक्षेप करणारे दोन शासन निर्णय (GR) रद्द करण्याचे आदेशही मा. मुख्यमंत्री यांनी दिले.

या निर्णयामागे अनेक वर्षांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आहे. वयम्‌चे कार्यकर्ते आणि जनजाती सल्लागार परिषदेचे (TAC) सदस्य मिलिंद थत्ते यांनी हा विषय सातत्याने मांडला आणि त्या प्रयत्नांना आज यश मिळाले.

हा फक्त कागदावरील बदल नाही. वनहक्क धारकांच्या अधिकारांना अधिक स्पष्ट मान्यता देणारे आणि ग्रामसभेला अधिक बळ देणारे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

#वयम् #वनहक्क #ग्रामसभा #आदिवासीहक्क #जनजातीसल्लागारपरिषद #जमिनीचाहक्क #गौणवनोपज

-----

An important decision for Forest Rights holders was taken yesterday at the Tribal Advisory Council (TAC) meeting.

From now on, the names of Forest Rights holders will be recorded separately on the 7/12 land record. To enable this, the Government has approved two new land record formats — 7E and 12E.

The Hon'ble Chief Minister also directed the withdrawal of two Government Resolutions (GRs) that interfered with the Gram Sabha's rights over Minor Forest Produce.

These decisions are the outcome of years of persistent follow-up. Milind Thatte, a Vayam worker and a member of the Tribal Advisory Council (TAC), consistently raised these issues and those efforts have finally led to this important milestone.

This is more than a procedural change. It is a significant step towards giving clearer legal recognition to the rights of Forest Rights holders and strengthening the role of Gram Sabhas in community-led governance.

पाडोपाडी स्वराज्याची, वाटचाल वैयक्तिक वनहक्काची! 🌿राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सचिव व क्षेत्रीय संचालक यांनी दिलेल्य...
25/06/2026

पाडोपाडी स्वराज्याची, वाटचाल वैयक्तिक वनहक्काची! 🌿

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सचिव व क्षेत्रीय संचालक यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार वैयक्तिक वनहक्काच्या लढ्याला आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठता आला.

वयम्‌च्या तीर कार्यालयात विविध गावपाड्यांतील दावेदार एकत्र आले. उपविभागीय व जिल्हास्तरीय वनहक्क समित्यांनी फेटाळलेल्या अपीलांबाबत, वाढीव क्षेत्रासाठीच्या मागण्या तसेच इतर तक्रारींवर सविस्तर चर्चा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया निश्चित करण्यात आली.

यानंतर नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयात वैयक्तिक वनहक्कासाठी अपिले व निवेदने सादर करण्यात आली.

या प्रक्रियेत बर्डापाडा, काथवडपाडा, धायटीपाडा, सादडपाडा, देवडोंगरा, बाफनविहीर आणि बोरमाळ येथील ग्रामस्थांनी शासनासमोर आपल्या हक्काचे ठोस पुरावे मांडले. जागेवरील पंचनामा, दंड पावत्या, ज्येष्ठ नागरिकांचे जबाब, २००५ पूर्वीचे गुगल प्रतिमांचे पुरावे, तसेच बांधबंदिस्ती, वृक्ष व फळबाग लागवड, झोपडी आणि जैविक कंपाऊंड यांसारख्या अनेक पुराव्यांच्या आधारे आपल्या दाव्यांची कायदेशीर बाजू सादर करण्यात आली.

एकूण १३१ वैयक्तिक वनहक्क दावेदारांनी लेखी अर्ज दाखल केले. त्यापैकी ८८ अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात आणि ४३ अर्ज जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्यात आले. सर्व अर्जदारांना त्यांच्या अर्जांची अधिकृत पोचही प्राप्त झाली.

ही केवळ अपील प्रक्रिया नाही; तर संविधानाने दिलेल्या अधिकारांसाठी ग्रामसभेच्या सामूहिक शक्तीने उभारलेली लोकशाहीची वाटचाल आहे.

जय स्वराज्य, जय ग्रामसभा! 🌿

#वयम् #आपल्याविकासाचीआपलीचळवळ #वनहक्क #वैयक्तिकवनहक्क #स्वराज्य #आदिवासीहक्क #संविधानिकहक्क

-----

From Hamlet to Hamlet, Advancing the Journey for Individual Forest Rights 🌿

Guided by the recommendations of the Secretary and Regional Director of the National Commission for Scheduled Tribes, another significant step has been taken towards securing Individual Forest Rights.

Claimants from several hamlets came together at Vayam's Teer Office to discuss appeals rejected by the Sub-Divisional and District Level Forest Rights Committees, applications for additional land, and other pending grievances. After collective deliberation, the movement moved forward by submitting appeals and representations at the District Collector's Office and the Divisional Commissioner's Office in Nashik.

Communities from Bardapada, Kathavadpada, Dhaytipada, Sadadpada, Devdongra, Bafanvihir and Bormal presented strong legal evidence supporting their claims, including site inspections, penalty receipts, testimonies of senior citizens, pre-2005 Google imagery, and proof of land development through bunding, orchards, huts and bio-fencing.

A total of 131 Individual Forest Rights appeals were formally submitted—88 to the Divisional Commissioner's Office and 43 to the District Level Committee. Every claimant received an official acknowledgement of their application.

This is more than an appeal process. It is a collective assertion of constitutional rights, driven by empowered Gram Sabhas and people's participation.

Jai Swarajya, Jai Gram Sabha! 🌿

प्रयोगशाळाच आणली गावातजगभर मातीच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जाते, विविध धोरणं आखली जातात आणि उपक्रम राबवले जातात. ...
13/06/2026

प्रयोगशाळाच आणली गावात
जगभर मातीच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जाते, विविध धोरणं आखली जातात आणि उपक्रम राबवले जातात. पण पालघर आणि नाशिकच्या डोंगररांगांमधल्या आदिवासी गावांमध्ये मातीची काळजी घेण्याचं काम प्रत्यक्ष शेतकरी करत आहेत.

या दुर्गम भागांमध्ये माती परीक्षणाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची स्थिती समजून घेणं कठीण जातं. ही गरज ओळखून वयम्‌ने माती परीक्षण प्रयोगशाळा गावातच आणली. २५० शेतांमधील मातीचे नमुने तपासून नत्र, स्फुरद, पालाश आणि सेंद्रीय कर्ब या घटकांचा अभ्यास करण्यात आला.

आता शेतकऱ्यांच्या हातात त्यांच्या मातीची आरोग्यपत्रिका आहे. मातीची स्थिती काय आहे, उत्पादनक्षमता कशी वाढवता येईल आणि मातीचं आरोग्य कसं जपता येईल याबाबत चर्चा सुरू आहेत.

#मातीचेआरोग्य #मातीपरीक्षण #शाश्वतशेती #आदिवासीशेती #वयम्

---

Bringing the Soil Lab to the Village

Around the world, soil health is a growing concern, driving policies, research, and large-scale initiatives. But in the tribal villages nestled in the hills of Palghar and Nashik, farmers are contributing to this effort every day through their close relationship with the land.

In these remote regions, access to soil testing facilities is limited, making it difficult for farmers to understand the condition of their soil. Recognising this need, Vayam brought a soil testing laboratory directly to the villages. Soil samples from 250 farms were analysed for nitrogen, phosphorus, potassium, and organic carbon.

Today, farmers have access to their own soil health reports. Discussions are underway on understanding soil conditions, improving productivity, and adopting practices that help restore and protect soil health.

Healthy soil is the foundation of sustainable farming. While global efforts continue to focus on soil conservation, these farmers are playing a vital role as local custodians of the land.

06/06/2026

कृष्णा दादांच्या हातात कागद नव्हता, बोलण्यात तीव्र वेदना होती. वयाच्या ५व्या वर्षापासून ज्या शेतजमिनीवर कष्ट काढले, ती जमीन पन्नाशी झाली तरी हक्काची होत नाही. ही वेदना त्यांच्या शब्दात इतकी तीव्र होती... ती व्हिडीओत लक्षपूर्वक ऐकाच.
काही शब्द स्थानिक उच्चारामुळे कदाचित कळणार नाहीत, पण तरी ऐका. भावना तर काळजात शिरेलच.
तशी ती आयोगाच्या अधिकाऱ्यांनाही जाणवलीच.

#वयम् #वनहक्क #आदिवासीहक्क #ग्रामसभा #जनआवाज #जमिनीचाहक्क #काथवडपाडा

-----

“I submitted every document and piece of evidence that was asked for while filing my Forest Rights claim. I attended every hearing I was called to. Yet, my claim was rejected. Our lives depend on this land. Please consider that reality before declaring our claims ineligible.”

These were the heartfelt words of Krishna Dada from Kathwadpada, shared before the Secretary and Regional Director of the National Commission for Scheduled Tribes.

Land is not merely an entry in government records. It is a family's livelihood, its future and a bond that stretches across generations. That is why, while evaluating Forest Rights claims, it is equally important to understand the human reality behind every application.

After listening to the concerns and representations of the villagers, the Commission officials assured them that all possible efforts would be made to address the matter.

वनहक्क कायदा लागू होऊन 20 वर्षे झाली. ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता. तरीही अन्याय शिल्लक आहेच...
31/05/2026

वनहक्क कायदा लागू होऊन 20 वर्षे झाली. ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी हा कायदा करण्यात आला होता. तरीही अन्याय शिल्लक आहेच.

एका ठिकाणी वनहक्क दावे मंजूर होतात, तर दुसऱ्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या जमीन कसणाऱ्या लोकांचे दावे केवळ तांत्रिक कारणांमुळे फेटाळले जातात. त्यामुळे वनहक्क कायदा सर्वांसाठी समान असला, तरी त्याची अंमलबजावणी मात्र सर्वत्र सारखी होत नाही.

हे वास्तव समजून घेण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सचिव श्री. प्रशांत कुमार सिंह व क्षेत्रीय संचालक श्री. पूर्णेंदू कांत यांनी त्र्यंबक तालुक्यातील बर्डापाडा येथे भेट दिली.

तेरा गावांमधील सुमारे 300 आदिवासी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या आणि वनहक्क दाव्यांमधील अडथळे थेट त्यांच्यासमोर मांडले. पिढ्यानपिढ्या कसत असलेल्या जमिनीवरील हक्क मान्य व्हावेत, यासाठी त्यांनी आपली बाजू मांडली.

दावे केवळ तांत्रिक कारणांमुळे नाकारले जात असल्याचे ऐकून सचिव श्री. प्रशांत कुमार सिंग यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दावेदारांना अधिक मदत मिळावी, अशी शिफारसही केली.

या भेटीमुळे पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे. पिढ्यानपिढ्या जपलेली, कसलेली जमीन आता खऱ्या अर्थाने आपल्या हक्काने मिळेल, हा विश्वास पुन्हा जागा झाला आहे.

#लोकशाहीजागर #कसेलत्याचीजमीन #वनहक्क

---

It has been 20 years since the Forest Rights Act (FRA) was enacted to address historical injustice. Yet, injustice continues to persist.

While forest rights claims are approved in some districts, in others, claims made by families who have cultivated the land for generations are rejected on mere technical grounds. This highlights how, despite the law being the same for everyone, its implementation remains uneven.

To understand this reality, Mr. Prashant Kumar Singh, Secretary of the National Commission for Scheduled Tribes (NCST), and Regional Director Mr. Purnendu Kant visited Bardapada village in Trimbakeshwar taluka.

Around 300 tribal farmers from 13 villages directly shared their concerns and the obstacles they face in securing recognition of their forest rights. They presented their case for the lands they have cultivated for generations to be legally recognized as their own.

On hearing that claims were being rejected for technical reasons, Mr. Prashant Kumar Singh expressed concern. He later met the District Collector and recommended greater support for claimants seeking recognition of their rights.

This visit has rekindled hope among the people. It has strengthened their belief that the lands they have nurtured and cultivated for generations will finally be recognized as rightfully theirs.

Address

Vayam, At Jambhulvihir
Jawhar
401603

Opening Hours

Monday 9:45am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 1pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 11am - 1pm

Telephone

+919421564330

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vayam movement posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Vayam movement:

Shortcuts

Share