27/07/2026
CSR निधीची गरज जिथे सर्वाधिक, तिथेच निधी सर्वात कमी का?
एका वृत्तपत्रातील अहवालानुसार, महाराष्ट्रातील CSR निधीच्या वितरणात मोठी भौगोलिक तफावत दिसून येते.
मुंबईसारख्या विकसित भागात CSR निधीचा मोठा हिस्सा खर्च होतो; तर मराठवाडा, विदर्भ आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागास जिल्ह्यांना तुलनेने अत्यल्प निधी मिळतो.
CSR चा खरा उद्देश केवळ निधी खर्च करणे नाही, तर जिथे गरज सर्वाधिक आहे, तिथे विकासाची संधी पोहोचवणे हा असायला हवा.
शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकासासाठी आजही अनेक भाग संघर्ष करत आहेत.
CSR चा प्रभाव तेव्हाच खऱ्या अर्थाने सामाजिक परिवर्तन घडवेल, जेव्हा निधी गरजेनुसार पोहोचेल — केवळ सोयीच्या ठिकाणी नाही.
आमचा प्रश्न साधा आहे —
“जिथे गरज सर्वाधिक आहे, तिथे CSR पोहोचत आहे का?”
🌱 Let CSR reach where it matters the most.
— Satyam Foundation
सविनय त्यागाची मशाल..