Thane district ckp community

Thane district ckp community To connect ckp community

यां यादीतील ग्रीन टिकमार्क केलेली पुस्तके सोडून ईतर पुस्तके किंवा त्याची pdf किंवा झेरॉक्स मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आ...
19/03/2026

यां यादीतील ग्रीन टिकमार्क केलेली पुस्तके सोडून ईतर पुस्तके किंवा त्याची pdf किंवा झेरॉक्स मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या पैकी कोणाकडे असल्यास जरूर कळवावे. 8483810012.सिद्धार्थ

16/03/2026

येन केन प्रकारे साम, दाम, दंड, भेद नीती चा वापर करून इराण च्या सत्ताधिशाचे दमन करणे आणि अप्रत्यक्ष पणे इराण चे दमन करणे अमेरिका आणि त्याच्या टोळीतील चोर सदस्य देशांना अपरिहार्य झाले होते. इराण वर आक्रमण करण्या अगोदर वेनेझूएला देश त्याच्या साधन संपत्ती सकट तिथल्या तेल खाणींचे नुकसान होऊ ना देता ताब्यात घेणे आवश्यक होते. चीन सोबत तैवान, आणि रशिया सोबत युक्रेन च्या वाटाघाटी करून, वेनेझुएला वर ड्रग तस्करी करणाऱ्या लोकांना अभय दिल्याचा आरोप करून तिथल्या लष्कराला पैसे चारून अमेरिकेने तेथील राष्ट्राध्यक्षाला अर्ध्या रात्री बायको सोबत उचलून नेले . वेनेझुएला येथे मिळणारे तेला मध्ये सल्फर ( गंधक ) खुप जास्त प्रमाणात असतें. ते प्रोसेस करायची आणि रीफाईन करून विकायची क्षमता जगात ज्या उद्योग समूहाकडे आहे त्यात भारतातील reliance उद्योग समूह येतो. वेनेझुएला भारताला हे तेल स्वस्त दरात द्यायला तयार असूनही अमेरिकेच्या दबावामुळे 2014 नंतर भारताला ते नाकारावे लागले.वेनेझुएला ताब्यात आल्यावर तिथल्या जनतेने विद्रोह करू नये म्हणून तिथले तेल भारत विकत घेणार (अर्थात अमेरिकन डॉलर मध्ये )अशी घोषणा ट्रम्प ने करून टाकली. काही दिवसानंतर reliance अमेरिकेत वेनेझुएला चे तेल शुद्ध करण्यासाठी 300 billion डॉलर चा प्रकल्प उभारणार अशीही घोषणा करून टाकली. मुळात भारतात इथल्या सर्व पर्यावरण मानकांचे पालन करून 3 billion डॉलर खर्चात तेव्हढेच तेल प्रोसेस होत असेल तर अमेरिकेत प्लांट उभा करायची गरज काय,जर भारतालाच प्रोसेस्ड तेल विकणार असाल तर. यां धोरणामागे अमेरिकेची नीती साफ आहे कि यां पुढे ते भारताला जास्त स्वावलंबी होऊ देऊ इच्छित नाही. तसेंच प्रोसेस्ड क्रूड ऑइलच्या क्षेत्रात इंडियन करन्सी ₹ चे जागतिक महत्व वाढू देऊ इच्छित नाही. अमेरिकन डेप्युटी सेक्रेटरी christopher landau याने 2026 रायसीना डायलॉग मीटिंग मध्ये 20 वर्षांपूर्वी चीन ला मोठे करण्यात जी चूक अमेरिकेने केली ती आम्ही भारताला मोठे करून करणार नाही असे भाषणात सांगितले. याचा अर्थ त्यांची विदेश नीती रशिया,चीन वगळता उर्वरित सर्व देशांचे शोषण करून पोट भरण्याची राहणार हे उघड आहे. भविष्यात हेच वेनेझूएलाचे तेल अमेरिकी डॉलर मध्ये भारताला किंवा इतर देशांना विकत घ्यावे लागणार आणि त्या वेळी artificial inteligence मुळे IT क्षेत्रातील, BPO, KPO क्षेत्रातील भारताचे revenue generation योगदान नगण्य झालेले असणार म्हणजे आज 92 rs च्या बदल्यात मिळणारा एक डॉलर हा 200 rs च्या बदल्यात मिळत असणार. गुजरात बुलेट ट्रेन चे जपान कडून घेतलेले कर्ज 20 वर्षानंतर भारताला याच डॉलर मध्ये फेडायचे आहे हे लक्षात असू द्या. जपान कडे पडून असलेले surplus अमेरिकी डॉलर,अमेरिकी ट्रेझरी बॉण्ड्स मध्ये गुंतवावे लागू नये तसेंच तिथल्या बंद पडू लागू राहिलेल्या उद्योगांना उर्जीतावस्था यावी म्हणून तिथल्या सरकारने भारताला ही विशेष सुविधा दिली.surplus अमेरिकी डॉलर विकसनशील देशांना पायाभूत उद्योग उभारणी करीता 15,20 वर्षा करीता बिनव्याजी देऊन त्या पायाभूत उद्योग सुविधांचे कॉन्ट्रॅक्ट जपानी कंपनीना मिळतील अशी योजना ते राबवत होते. त्याची किंमत जपान च्या इतिहासातील सर्वात जास्त वेळ प्रधानमंत्री पद भूषवलेल्या शिंझो एबे यांना जीव देऊन चुकवावी लागली. बुलेट ट्रेन कराराने ने त्यांनी तिसरी टर्म ( 2006-07, 2012-22 ) जिंकली होती. 8 जुलै 2022 रोजी चौथ्या टर्म साठी ते प्रचार करत असताना मारेकऱ्याने त्यांना गोळ्या झाडून मारले. यां पाठीमागे कोणत्या आतंकवादी संघटनेचा हात होता हे सांगायची गरज नाही. क्रमश:सिद्धार्थ सोनाळकर जळगांव.

15/03/2026

लगेगी आग तो आयेंगे कई मकान जद में, यहाँ सिर्फ हमारा मकान थोडी है! - राहात इंदोरी यांचा कुठल्याही काळात समर्पक ठरेल असा हा शेर आहे. आतंकवादी देश असलेल्या इस्राएल आणि अमेरिका यांनी आतापर्यंत शेकडो राजकारण्यांच्या जगभरात हत्या केल्यात. मोसाद ने तर अमेरिकेच्या प्रेसिडेंट J F केंनेडी यांनाही मारले आहे असे म्हटले जाते. केनेडी यांना मारणाऱ्या oswald याचा खून करणारा जॅक रुबी हा पोलिश ज्यू होता. केनेडी च्या खुनाचे रहस्य oswald च्या डेड बॉडी सोबत दफन झाले.महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, होमी भाभा यांच्या ही हत्येच्या पाठीमागे CIA चा हात होता असे म्हटले जाते. महात्मा गांधी यांनी एकदा सर्वां समोर पाकिस्तान मध्ये जाऊन कायम स्वरूपी राहण्याचा विचार बोलून दाखवला होता,तसे घडले असतें तर अमेरिकेला, पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि भू- सामरिक क्षेत्रात आपल्या सोयीने वापरता आले नसते म्हणून महात्मा गांधींचा काटा काढायचे ठरवले गेले अशी एक कॉन्स्पिरेसी थेअरी आहे. खरी खोटी फक्त CIA जाणे. आज पर्यंतचा CIA आणि deep state असलेल्या अमेरिका सारख्या देशाचा इतिहास बघता ही थेअरी खरी असण्याची संभावना जास्त आहे. Deep state म्हणजे जो देश आपल्याच नागरिकांना मारून दुसऱ्या देशावर खापर फोडतो, ज्या देशाला स्वतःच्या देशातील नागरिकांच्या जीवाची किंमत नसते त्या देशाला deep state म्हणतात. 9/11 अटॅक हे त्याचे लाईव्ह उदाहरण आहे असे अनेकांचे मत आहे. जगभरातल्या nuclear सायंटिस्ट , मिलिटरी जनरल्स,राष्ट्रध्यक्ष, पंतप्रधान यांना pre emptive strike च्या नावाखाली मारणे हे या देशांना स्वतःचे लोक कल्याणकारी कर्तव्य वाटते. इराकी प्रेसिडेंट सद्दाम हुसेन तसेंच लिबिया चा प्रेसिडेंट गद्दाफी या वर अटॅक करण्यासाठी या देशा कडे विनाशकारी chemical weapons आहे असा एक खोटा रिपोर्ट MI5 यां गुप्त हेर संस्थे कडून काढून त्यां देशांवर अमेरिका त्याच्या धार्जिन्या इंग्लंड, फ्रान्स सारख्या 40 चोर सदस्य मंडळातील देशांनी हल्ला करून ते देश बेचिराख करून टाकले. Venezuela, सिरिया या देशांचाही आर्थिक नाकेबंदी, सामरिक हल्ला करून तसेच हाल केलेत. Venezuela सारख्या स्वतंत्र देशातील राष्ट्राध्यक्षाला तर रात्रीच्या वेळी झोपेत असताना बायको सहित उचलून नेले. प्रत्यक्ष nuclear weapon असलेल्या नॉर्थ कोरिया देशाकडे डोळे वटारून ही पाहायची यांची हिम्मत नाही. इराण हा भारताला इंडियन करन्सी ₹ मध्ये मागील कित्येक दशकापासून तेल विकत आहे, तसेंच या देशात त्यांना कंट्रोल करता येईल अशी सेंट्रल बँकिंग सिस्टिम नसल्यामुळे या देशाला axis of evil असे अमेरिका आणि त्याच्या 40 चोर युरोपीयन आणि इतर देशांकडून संबोधले जाते. इंडो चीन युद्धाच्या अगोदर पर्यंत भारतीय रुपया middle east मध्ये त्या देशांची अधिकृत करन्सी होती. चिंतामणी देशमुख RBI चे गव्हर्नर असतांचा त्यांची स्वाक्षरी असलेला एक रुपया आजही तिथल्या प्रत्येक देशातील सेंट्रल बँकेच्या करन्सी musium मध्ये ठेवलेला असतो. जगावर राज्य करण्यासाठी पेट्रोडॉलर करार करून डॉलर चा influence वाढवण्यासाठी त्या अनुषंगाने सर्व प्रथम भारताच्या आर्थिक ताकदीचे खच्चीकरण करण्यासाठी 1962 चे indochina युद्ध भारतावर अमेरिकेच्या नवमित्र झालेल्या चीन देशा कडून अमेरिके च्या गुपचूप सांगण्या वरून लादण्यात आले. त्या वेळेस अमेरिकेकडून कुठलीही हवाई मदत किंवा इतर मदत ( पॅराशूट, युद्ध सामग्री )भारताला केली गेली नाही. भारतीय करन्सी त्या वेळेस सोन्याशी इंटिरलिंक असल्यामुळे आणि युद्धात प्रचंड आर्थिक नुकसान झाल्यामुळे पुरेशा प्रमाणात करन्सी छापणे शक्य नव्हते म्हणून Middle east मधून भारतीय करन्सी काढून घेण्याचे ठरल्यावर चीन कडून युद्ध थांबवण्यात आले. या चीन कडून भारतावर लादलेल्या युद्धाच्या मोबदल्यात चीन च्या राजकीय,सामरिक,तांत्रिक,आर्थिक प्रगतीस अमेरिकेकडून सढळ हाताने मदत करण्यात आली. भारतानेही हुशारीने middle east मधील करन्सी बंद करतांना त्या सर्व देशांस स्वतःची करन्सी बनविण्यास आणि सेंट्रल बँक सिस्टिम उभी करण्यास मदत केली. पुढे अमेरिकेने पेट्रोडॉलर करार केल्यावर जेव्हा सोन्याशी इंटिरलिंक असलेले डॉलर छापणे अवघड होऊ लागले तेव्हा 1971 मध्ये सोन्याशी असलेले लिंकिंग बंद केले आणि वाटेल तेव्हढे डॉलर छापणे सुरु केले. पुढे सर्वच देशांनी त्यांचे अनुकरण केले. 1944 ते 1971 पर्यंत जग भरातल्या 44 देशांनी ( ज्यात अमेरिका धार्जीणे 40 देश ) अमेरिकेशी bretton woods system या नावाचे लँडमार्क मोने्टोरी ऍग्रीमेंट केले होते ज्यात अमेरिकन करन्सी सोन्याशी 35$ per 1 gold ounce या rate ने peg केली होती. पुढे निक्सन ने peg system बंद केल्यावर त्या करन्सी ला टॉयलेट पेपर एवढीही किंमत असायला नको होती परंतु आपल्या धटिंगणशाहिच्या जोरावर अमेरिकेने त्याची दादागिरी चालवून निव्वळ कागद छापून स्वतःची संपत्ती,(crude ऑइलची व त्या अनुषंगाने पेट्रोडॉलर ची इतर देशांना गरज असल्यामुळे)इतर देशांचे आर्थिक शोषण करून वाढवली. ब्राझील, रशिया, इंडिया, चीन या उदयोनमुख देशाच्या अर्थ व्यवस्थांनी स्वतःच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराकरिता स्वतःचे चलन ( ब्रिक्स )तयार करायचे ठरवल्यावर आणि त्यात इराण सारख्या भारताला नेहमी आर्थिक,राजकीय ( काश्मीर सारख्या मुद्द्यावरही),सामरिक मदत करणाऱ्या देशाचा प्रवेश झाल्यावर अमेरिका आणि त्याची पिल्लावळ घाबरली. जर जगाला petrodollar ची गरज पडली नाही आणि डॉलर चा डोलारा कोसळला तर अमेरिका आणि त्यांच्या पिल्लावळ देशांनी विकत घेतलेल्या अमेरिकेच्या खरबो डॉलर च्या treasury बॉण्ड्स ना कवडिचीही किंमत राहणार नाही हे यां सर्वांनाच कळून चुकले होते. क्रमश : सिद्धार्थ सोनाळकर, जळगांव.

14/03/2026
14/03/2026
13/03/2026

एखादा पदार्थ, धान्य किंवा भाजी खाण्याजोगे करण्यासाठी आपण किती प्रकारच्या प्रक्रिया त्यावर करतो ?
बघूया किती आठवतात ते .....

०१) खुडून
०२) निवडून
०३) पाखडून
०४) चाळून
०५) वेचून
०६) दळून
०७) कांडून
०८) मळून
०९) भिजवून
१०) शिजवून
११) भाजून
१२) परतून
१३) गाळून
१४) धुवून
१५) वाळवून
१६) आटवून
१७) मुरवून
१८) तळून
१९) लाटून
२०) पसरुन
२१) वाफवून
२२) कुटून
२३) वाटून
२४) कालवून
२५) साठवून
२६) खारवून
२७) पाकवुन
२८) ठेचून
२९) सोलून
३०) चिरुन
३१) कापून
३२) नासवून
३३) फेटून
३४) ढवळून
३५) उकळवून
३६) वळुन
३७) थापून
३८) उकडून
३९) उलथवून
४०) तिंबून
४१) मिसळून
४२) घुसळून
४३) चोचवून
४४) कातरून
४५) फोडून
४६) पाडून
४७) ओतून
४८) काढून
४९) झाकून
५०) खरवडून
५१) विरजून
५२) गुंडाळून
५३) बांधून
५४) टांगून
५५) रांधून
५६) कुस्करुन
५७) चापून /चोपून
५८ ) पेरून
५९) कोचून
६०) उगाळून
६१) आंबवून
६२) उकडून

13/03/2026

*LPG गॅस न वापरता बनवता येणारे 100 शाकाहारी पदार्थ 🔥*

1. स्प्राउट्स चाट
2. भेळपुरी
3. सेवपुरी
4. दहीपुरी
5. फ्रूट चाट
6. दही भात
7. दही पोहे
8. लिंबू पोहे
9. मूग डाळ कोसिंबीर
10. चणा चाट
11. काकडी रायता
12. बूंदी रायता
13. कचुंबर सॅलड
14. शेंगदाणा सॅलड
15. दही सँडविच
16. हिरवी चटणी सँडविच
17. पनीर भुर्जी सँडविच
18. भरलेली काकडी
19. लस्सी
20. मसाला ताक
21. मोड आलेल्या कडधान्यांची कोशिंबीर
22. फळांचे सॅलड
23. काकडी-टोमॅटो सॅलड
24. शेंगदाणा-काकडी कोशिंबीर
25. केळी-दही मिक्स
26. खजूर-ड्रायफ्रूट मिक्स
27. ड्रायफ्रूट लाडू (गॅसशिवाय)
28. मध-लिंबू पाणी
29. पुदिना-दही डिप
30. अंकुरित मूग सॅलड
31. सफरचंद-शेंगदाणा सॅलड
32. काकडी रोल (स्प्राउट्स भरून)
33. टोमॅटो-कांदा-कोथिंबीर सॅलड
34. पनीर सॅलड
35. भिजवलेले ओट्स-दही बाउल
36. चिया सीड्स-दही बाउल
37. शेंगदाणा-गूळ मिक्स
38. नारळ-गूळ मिश्रण
39. फळांची स्मूदी
40. ताक-पुदिना ड्रिंक
41. अंकुरित मटकी कोशिंबीर
42. अंकुरित हरभरा सॅलड
43. पनीर क्यूब्स सॅलड
44. टोमॅटो चाट
45. काकडी-गाजर सॅलड
46. गाजर-बीट कोशिंबीर
47. दही-मध बाउल
48. सफरचंद-दही सॅलड
49. ड्रायफ्रूट सॅलड
50. खजूर-बदाम मिक्स
51. अंजीर-ड्रायफ्रूट मिक्स
52. नारळ-खजूर बॉल
53. शेंगदाणा-गूळ लाडू
54. फळांचा योगर्ट बाउल
55. पनीर-काकडी सॅलड
56. अंकुरित मूग-शेंगदाणा सॅलड
57. काकडी-दही डिप
58. पुदिना ताक
59. लिंबू-मध पाणी
60. गाजर स्टिक्स सॅलड
61. बीट स्टिक्स सॅलड
62. काकडी स्टिक्स मीठ-लिंबूसह
63. टोमॅटो-लिंबू सॅलड
64. कांदा-लिंबू सॅलड
65. अंकुरित चणा कोशिंबीर
66. पनीर-टोमॅटो सॅलड
67. पनीर-कोथिंबीर मिक्स
68. ड्रायफ्रूट योगर्ट
69. ओट्स-फळ बाउल
70. चिया सीड्स-फळ बाउल
71. शेंगदाणा-कोथिंबीर सॅलड
72. काकडी-पुदिना सॅलड
73. टोमॅटो-पुदिना सॅलड
74. दही-पुदिना डिप
75. अंकुरित कडधान्य मिक्स सॅलड
76. कच्चा पपई सॅलड
77. सफरचंद-केळी सॅलड
78. फळ-दही मिक्स
79. काकडी-शेंगदाणा सॅलड
80. गाजर-कोथिंबीर सॅलड
81. बीट-लिंबू सॅलड
82. अंकुरित मूग-टोमॅटो सॅलड
83. अंकुरित मटकी-शेंगदाणा सॅलड
84. काकडी-टोमॅटो-पनीर सॅलड
85. दही-ड्रायफ्रूट मिक्स
86. शेंगदाणा-लिंबू सॅलड
87. फळ-ड्रायफ्रूट मिक्स
88. केळी-मध बाउल
89. सफरचंद-मध बाउल
90. पपई-लिंबू सॅलड
91. कलिंगड सॅलड
92. खरबूज सॅलड
93. मिश्र फळ बाउल
94. पुदिना-लिंबू पाणी
95. ताक-जीरा ड्रिंक
96. लिंबू सरबत
97. पनीर-फळ सॅलड
98. अंकुरित मूग-फळ सॅलड
99. काकडी-दही कोशिंबीर
100. शेंगदाणा-दही मिक्स

*पुढील 10/12 दिवसांसाठी किंवा युद्ध संपेपर्यंत उपयुक्त*

*जनहितार्थ जारी* 😊🙂

11/03/2026

"घर" उरत नाही, उरते फक्त "वास्तू"... जयवंत दळवींच्या लेखणीतून कोकणाचे एक 'कातर' वास्तव! 🏠🌊
​कधीतरी जयवंत दळवींचे 'सारे प्रवासी घडीचे' वाचताना काळजात इतकं चर्र होतं की डोळ्यांतल्या धारा थांबत नाहीत. आजच्या धावपळीच्या युगात, आपण मुळांपासून तुटलेली जी माणसं आहोत, त्या प्रत्येकाच्या मनाची ही व्यथा आहे.

​⚓ देवगडचा खोळंबा आणि मनातील काहूर:
कथेची सुरुवातच एका विलक्षण आठवणीने होते. देवगड बंदरात बोट बिघडते आणि लेखकाला लहानपणीचा शब्दप्रयोग आठवतो— गावात कुणी वारलं की म्हटलं जायचं, "म्हातारो देवगडाक गेलो!" आज लेखक स्वतः त्या बंदरात अडकलाय आणि मनाशीच हिशोब मांडतोय की गावातले कोण कोण जुने चेहरे कायमचे 'देवगडाला' गेले असतील.

​👵 ती आजीची विडी आणि हरवलेले बालपण:
घरात शिरल्यावर लेखक तडक कोठीच्या खोलीत जातो. तिथे दाट काळोख आहे, कोळीष्टकं आहेत. पण त्याच अंधारात त्याला भास होतो— आपली आजी तिथे बसून चोरून विडी ओढत असावी. खिडकीच्या बारीवर हात फिरवल्यावर धुळीत विझलेली विडी सापडते. ती आजीचीच का? तो शेवकांडीच्या लाडवांचा गोडवा, आजीला विड्या आणून देताना केलेली ती निष्पाप फसवणूक... या आठवणींनी लेखकाचे मन कातर होते.

​💔 'नांदते' घर आणि रिता देव्हारा:
कथेतील सर्वात हृदयद्रावक प्रसंग म्हणजे आपटे भटजींनी देवापुढे घातलेलं गाऱ्हाणं:

​"देवा महाराजा, या घराचा धनी तुझ्या पायाशी आला आहे... हे घर नांदते राहू दे!"

​पण सत्य काय आहे? देव्हाऱ्यातली समई तेलाअभावी विझत आली आहे. लेखक म्हणतात, "माझा वंश वाढला, पण हे घर मात्र नांदले नाही." आपण शहरात मोठे झालो, मुलंबाळं झाली, पण ज्या घराच्या भिंतींनी आपल्याला मोठं केलं, त्या आज पोरक्या झाल्या आहेत.

​😔 नाऱ्या गडी आणि झिलू केदारची ती निष्ठा:
पूर्वी गावात येणं म्हणजे एक उत्सव असायचा. झिलू केदार मटण-भाकरी घेऊन बंदरावर वाट पाहायचा. 'आपू' आला म्हणून त्याला होणारा आनंद हा रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठा होता. नाऱ्या गड्याचा तो भाबडा प्रश्न, "त्रास झाला का प्रवासात?"... त्या वेळी या माणसांच्या निष्ठेची किंमत कळली नाही, पण आज जेव्हा घरात स्वागत करायला कुणीच नाही, तेव्हा त्या मायेची किंमत काळजाला भिडते.

​🔥 चूल पुन्हा पेटायला हवी होती...
आपटे भटजींच्या डब्यातले घास गळ्यात रेटताना लेखकाला ठसका लागतो. हा ठसका कुणाच्या आठवणीचा असेल? ज्या घरात कधीकाळी पंगती उठायच्या, तिथे आज मालक 'परक्या उतारूसारखा' जेवतोय.
​"मुंबईहून बायका-मुलांना बरोबर आणायला हवे होते. या घरातली चूल खूप दिवसांनी पुन्हा एकदा पेटवायला हवी होती... कौलांवर निळा धूर तरंगायला हवा होता."

आपणही वर्षातून एकदा तरी आपल्या गावी, त्या जुन्या घरात जायला हवं. तिथली चूल पेटवायला हवी. घराला घरापण देणारी माणसं गेली, तरी त्या वास्तूत आपल्या पूर्वजांचे आत्मे आजही आपली वाट पाहत असतात.

​ #कोकण #गावचीआठवण #सारेप्रवासीघडीचे

09/03/2026

ज्यू लोकांच्या श्रीमंतीचं ते एक 'गुपित';जे आपल्या मराठी माणसाला अजून उमजलेलं नाही!
ठाण्यातील एका गजबजलेल्या मिसळपावच्या दुकानात दोन मित्र समोरासमोर बसले आहेत. वाफाळलेल्या चहाचा घोट घेत एक जण उत्साहाने सांगतो, "अरे, आपल्या विनायकने नवीन गाडी घेतली, टॉप मॉडेल आहे!" समोरचा मित्र कौतुकाऐवजी कपाळावर आठ्या घालून म्हणतो, "काय माहिती बुवा, एवढे पैसे येतात कुठून याच्याकडे? नक्कीच काहीतरी काळंबेरं असणार!"
****
आपल्याकडे कुणी प्रगती केली की आधी संशय येतो, मग असूया आणि शेवटी टीका. पण ज्यू (यहुदी) समाजात एक शब्द आहे जो त्यांच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या यशाचा खरा पाया आहे - 'फार्गिन' (Fargin). हा शब्द केवळ शब्द नाही, तर ती एक वृत्ती आहे. याचा अर्थ होतो, दुसऱ्याच्या यशात मनापासून आनंदी होणं आणि त्याचं यश अजून कसं वाढवता येईल, याचा सक्रिय विचार करणं.
समजा एखाद्याने नवीन हॉटेल सुरू केलं, तर ज्यू माणूस फक्त 'अभिनंदन' म्हणून थांबत नाही. तो विचार करतो की, 'मी याला दुसरा मोठा कॉन्ट्रॅक्ट कसा मिळवून देऊ शकेन?' किंवा 'कमी दरात भाजीपाला देणारा एखादा ओळखीचा वेंडर याला सुचवू का?' यामुळे त्या व्यावसायिकाचं मार्जिन वाढतं आणि पर्यायाने संपूर्ण समाजाची आर्थिक ताकद वाढते.
****
जेव्हा एखादा समाज 'फार्गिन' संस्कृती स्वीकारतो, तेव्हा तीन गोष्टी घडतात. पहिलं म्हणजे ज्ञानाचं आदानप्रदान वाढतं,ज्यामुळे नवीन पिढीला व्यवसायात येणं सोपं जातं. दुसरं म्हणजे समाजात 'पत' (Credit) निर्माण होते. व्यवसायात विश्वास असेल तरच उधारी मिळते आणि उधारीवरच मोठे उद्योग उभे राहतात. आणि तिसरं म्हणजे, विश्वासाच्या माणसांसोबत काम करताना जो आनंद मिळतो, त्याने कामाची उत्पादकता कैक पटीने वाढते.
यहुदी समाज आपल्या महाराष्ट्रात स्थायिक होऊन १५००+ वर्षं लोटली आहेत पण
****
ताज्या जागतिक आर्थिक अहवालानुसार, ज्या समुदायांमध्ये 'को-ऑपरेटिव्ह कॅपिटलिझम' आहे, त्यांची प्रगती इतरांपेक्षा ४० टक्क्यांनी जास्त आहे. यहुदी समाज आपल्या महाराष्ट्रात स्थायिक होऊन १५००+ वर्षं लोटली आहेत पण आपल्या महाराष्ट्रात आपण 'खेकडा वृत्ती'बद्दलच खूप बोलतो आहोत, पण आता ती वृत्ती सोडून ही 'फार्गिन' संस्कृती अंगीकारण्याची गरज आहे. दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून पोटात दुखण्यापेक्षा, त्याच्या यशात आपला काय सकारात्मक वाटा असू शकतो हे पाहणं जास्त फायद्याचं आहे.
ज्यू समाज आज जगात सर्वात श्रीमंत का आहे, याचं उत्तर त्यांच्या तिजोरीत नसून त्यांच्या या मानसिकतेत दडलं आहे. दुसऱ्याच्या यशाचा दिवा विझवून आपला प्रकाश कधीच वाढत नाही, उलट दुसऱ्याचा दिवा लावायला मदत केली तर अख्खा रस्ता उजळून निघतो.

08/03/2026

शिवस्वराज्याची सर्वात पहिली लढाई! शिवरायांनी या लढाईसाठी सेनापती केले एका 'खास' वीराला! या वीराचे खास शस्त्र होते ...

08/03/2026

राजकुमारी गायत्री देवी यांचे महिलांच्या सक्षमीकरण आणि शिक्षणासाठी योगदान

राजस्थानच्या जयपूर संस्थानातील राजघराण्यातील एक प्रभावशाली आणि प्रगत विचारांच्या स्त्री म्हणून राजकुमारी गायत्री देवी यांचे नाव भारताच्या सामाजिक इतिहासात अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांचे व्यक्तिमत्त्व केवळ राजघराण्यापुरते मर्यादित नव्हते; त्यांनी समाजातील महिलांच्या उन्नतीसाठी, विशेषतः शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी, मोठे आणि दूरदृष्टीपूर्ण कार्य केले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजातील महिलांची स्थिती अजूनही अनेक ठिकाणी मागासलेली होती. विशेषतः राजस्थानसारख्या पारंपरिक राज्यांमध्ये महिलांना शिक्षणाच्या संधी कमी मिळत होत्या. या परिस्थितीची जाणीव राजकुमारी गायत्री देवींना होती. त्यांनी ठामपणे विश्वास ठेवला की शिक्षण हे महिलांच्या सक्षमीकरणाचे सर्वात प्रभावी साधन आहे.

या विचारातूनच त्यांनी १९४३ साली जयपूर येथे “महाराणी गायत्री देवी गर्ल्स पब्लिक स्कूल” या मुलींसाठीच्या शाळेची स्थापना केली. त्या काळात मुलींना शाळेत पाठवणे अनेक कुटुंबांना मान्य नव्हते. पण गायत्री देवींनी पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. सुरुवातीला काही मोजक्या विद्यार्थिनींनी सुरू झालेली ही शाळा पुढे देशातील सर्वोत्कृष्ट मुलींच्या शाळांपैकी एक बनली.

या शाळेमध्ये केवळ पुस्तकांपुरते शिक्षण दिले जात नव्हते, तर विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जात होता. खेळ, कला, संस्कृती, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास यांचा विकास करण्यावरही विशेष लक्ष दिले गेले. त्यामुळे अनेक मुलींना समाजात आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.

शाळांच्या स्थापनेव्यतिरिक्त गायत्री देवींनी महिलांना सार्वजनिक जीवनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी स्वतःही राजकारणात प्रवेश करून महिलांसाठी आदर्श निर्माण केला. त्या लोकसभेच्या निवडणुकीत विजयी होऊन संसदेत पोहोचल्या आणि महिलांच्या प्रश्नांबाबत ठामपणे आवाज उठवला.

त्यांचे कार्य केवळ शिक्षणापुरते मर्यादित नव्हते; त्यांनी महिलांच्या स्वावलंबनावरही भर दिला. समाजातील महिलांनी शिक्षण घेऊन आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम व्हावे, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक मुलींना उच्च शिक्षण, चांगल्या नोकऱ्या आणि स्वावलंबी जीवनाचा मार्ग खुला झाला.

आज भारतातील महिलांच्या प्रगतीकडे पाहताना राजकुमारी गायत्री देवी यांच्या योगदानाचे महत्त्व अधिक स्पष्टपणे जाणवते. त्यांनी दाखवून दिले की दूरदृष्टी, शिक्षणावरील विश्वास आणि सामाजिक बांधिलकी यांच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता येतो.

म्हणूनच राजकुमारी गायत्री देवी या केवळ राजघराण्यातील व्यक्ती नव्हत्या, तर त्या महिलांच्या शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या चळवळीतील एक प्रेरणादायी नेतृत्व होत्या. त्यांच्या कार्यामुळे भारतातील अनेक महिलांना शिक्षणाची आणि प्रगतीची नवी दिशा मिळाली. महाराणी गायत्री देवी यांनी स्वतः पडदा प्रथा बंद करून उजळ माथ्याने समाजात वावरण्यास सुरुवात केली त्या नंतर अनेक स्त्रियांनी त्यांचे अनुकरण करण्यास सुरुवात केली.

Address

Flat No. 2, Priyadarshani Apt, Samarth Colony
Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Thane district ckp community posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share