26/05/2026
🎒✨ बालसंस्कार वर्गातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप ✨🎒
दि. २५ मे २०२६ रोजी मोहाडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेसमोर, केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित सेवा वस्ती विभाग आणि रोटरी क्लब ऑफ इलाईट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नवचैतन्य बालसंस्कार वर्गातील ३० विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ इलाईटचे अध्यक्ष श्री. संदीप झवर व सदस्या सौ. किरण झवर यांचे विशेष सहकार्य लाभले.
सौ. किरण झवर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना सांगितले की, "सामान्य परिस्थितीतूनही मोठे यश मिळविता येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चहा विक्रेत्यापासून देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास केला. त्याचप्रमाणे या बालसंस्कार वर्गातील प्रत्येक मुलामध्ये मोठे होण्याची क्षमता आहे." त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी भविष्यात कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक असल्यास निःसंकोचपणे संपर्क साधण्याचे आवाहनही केले.
यानंतर विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. सेवा वस्ती विभागाचे सदस्य अभय खांदे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी प्रकल्प प्रमुख सौ. मनीषा खडके, सौ. देवयानी कोल्हे, श्री सचिन चोरडिया, श्री अभय खांदे, व्यवस्थापिका सौ. सपना श्रीवास्तव, कार्यकर्त्या रविना भगत व शीतल सोनवणे उपस्थित होत्या.
📚 शिक्षणाच्या प्रवासात छोटासा हातभार, उज्ज्वल भविष्यासाठी मोठी प्रेरणा! 🌟