Surykanya Tapikeshwar Bahuddeshihya Trust Anturli सूर्यकन्या तापीकेश्वर

  • Home
  • India
  • Jalgaon
  • Surykanya Tapikeshwar Bahuddeshihya Trust Anturli सूर्यकन्या तापीकेश्वर

Surykanya Tapikeshwar Bahuddeshihya Trust Anturli  सूर्यकन्या तापीकेश्वर STB Trust is social organization in maharashtra. Working in field of Spiritual well being, Health, Education and Environmental Well being.

Founder of Trust is Deonath Maharaj Anturli.

सूर्यकन्या तापीकेश्वर बहुउद्देशीय ट्रस्ट तर्फे आज कॅन्सर ग्रस्त, अर्धांगवायू, दीर्घकालीन आजारी व्यक्तींची प्रत्यक्ष घरी ...
20/02/2026

सूर्यकन्या तापीकेश्वर बहुउद्देशीय ट्रस्ट तर्फे आज कॅन्सर ग्रस्त, अर्धांगवायू, दीर्घकालीन आजारी व्यक्तींची प्रत्यक्ष घरी जाऊन तपासणी करण्यात आली. यावेळी डॉक्टर भूषण देव यांनी तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. व पुढील सेवांसाठी संस्थेतर्फे आश्वासित केले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 19/02/2026 रोजी सूर्यकन्या तापेश्वर बहुउद्देश्य ट्रस्ट अंतुर्ली तर्फे, व प्राथमिक आर...
20/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 19/02/2026 रोजी सूर्यकन्या तापेश्वर बहुउद्देश्य ट्रस्ट अंतुर्ली तर्फे, व प्राथमिक आरोग्य केंद्र अंतुर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने कॅन्सर निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यादरम्यान बहुसंख्य रुग्णा तपासणीसाठी आले होते आले होते.
या तपासणी करता स्त्री रोग तज्ञ व दंत रोग तज्ञ जळगाव उपस्थित होते.

🌿✨ ओळख – पालकत्वाची खरी दिशा ✨🌿आज पार पडलेल्या “ओळख – पालकत्व वेबिनार” ला पालकांकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला 🙏...
02/11/2025

🌿✨ ओळख – पालकत्वाची खरी दिशा ✨🌿

आज पार पडलेल्या “ओळख – पालकत्व वेबिनार” ला पालकांकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला 🙏
सुमारे १०० हून अधिक पालक या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते —
पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद, बेंगळुरू, जळगाव अशा विविध शहरांतून पालक या उपक्रमाशी जोडले गेले 🌍

या वेबिनारमध्ये पालकत्व म्हणजे नेमकं काय, त्याची सुरुवात कुठून होते,
प्रत्येक वयाच्या टप्प्यावर पालकांनी आपल्या बालकाला कसं समजून घ्यावं,
आणि कशा उपाययोजना कराव्यात — यावर सखोल मार्गदर्शन देण्यात आलं.

महाराजांनी अत्यंत सोप्या आणि भावनिक पद्धतीने
अनेक प्रश्नांची उत्तरं दिली —
मुलांमधील मोबाईलच्या सवयी, चिडचिडपणा, आणि बदललेलं वर्तन
यामागची खरी कारणं आणि त्यामध्ये पालकांची भूमिका काय असावी हे त्यांनी प्रभावीरीत्या स्पष्ट केलं 💬

या चर्चात्मक संवादात डॉ. भूषण देव यांनी महाराजांशी अर्थपूर्ण संवाद साधला,
तर श्री मयूर भंगाळे, प्रसन्न पुजारी आणि आशुतोष जोशी
यांनी हे वेबिनार यशस्वीपणे आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली 👏

हा उपक्रम सूर्यकन्या तापीकेश्वर बहुउद्देशीय ट्रस्ट तर्फे पूर्णपणे मोफत आयोजित करण्यात आला होता ☀️
पालकांनी या माध्यमातून स्वतःकडे आणि आपल्या मुलांकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला —
अनेकांनी पुढील वेबिनारमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली ❤️

आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल आणि सकारात्मक प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार 🙏
हा प्रवास इथंच थांबणार नाही —
लवकरच अशाच अर्थपूर्ण विषयांवर आपण पुन्हा भेटू 🌸

📺 आमच्यासोबत जोडलं राहा –
अध्यात्म, संस्कार आणि समाजकार्य यांचा सुंदर संगम 🙏
महाराजांच्या मार्गदर्शनातून अनेकांना जीवनाचा नवा अर्थ सापडला आहे.या सत्कार्याशी जोडलेले राहा आणि दर आठवड्याला नवे प्रेरणादायी विचार जाणून घ्या 🌸

📺 YouTube – जीवन उपनिषद
🔗 https://youtube.com/?si=hfUu3G-ZbiKcX2RO
🌐 Website – Suryakanya Trust
🔗 https://suryakanya.org/
📸 Instagram – Suryakanya Trust
🔗 https://www.instagram.com/surykanyatrust?igsh=emM5OGNpMmtid3Y=
📘 Facebook – श्री देवनाथ महाराज
🔗 https://www.facebook.com/share/19t1Udaevi/
📘 Facebook – Suryakanya Trust
🔗 https://www.facebook.com/share/1M5TXZJRQH/

#ओळख #पालकत्व #जीवनउपनिषद

🌱 “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात...” 🌱पण खरंच का? ते कसे दिसतात?कुठल्या गोष्टींमधून आपण ओळखू शकतो कीआपल्या मुलात कोणती ऊर्ज...
28/10/2025

🌱 “बाळाचे पाय पाळण्यात दिसतात...” 🌱

पण खरंच का? ते कसे दिसतात?
कुठल्या गोष्टींमधून आपण ओळखू शकतो की
आपल्या मुलात कोणती ऊर्जा, कौशल्य किंवा देणगी दडलेली आहे?

आजचा काळ झपाट्याने बदलतोय —
AI, स्क्रीन, स्पर्धा, ताण, आणि depression सारखी आव्हाने वाढत आहेत.
अशा वेळी जर आपण आपल्या मुलाच्या मनाचा आरसा लवकर ओळखला,
तर आपण त्याला भविष्याच्या प्रत्येक आव्हानासाठी तयार करू शकतो!

🌟 याच गूढाचं उलगडं करणार आहे एक विशेष webinar – “ओळख” 🌟
ज्यात श्री. देवनाथ महाराज आपल्या अनोख्या दृष्टिकोनातून सांगणार आहेत
👉 बाळाच्या मनातील सुप्त गुण कसे ओळखायचे?
👉 पालक म्हणून आपला दृष्टिकोन कसा बदलावा?
👉 आणि आपल्या मुलाचं भविष्य आजपासूनच कसं घडवावं?

📅 दिनांक: 2 नोव्हेंबर
⏰ वेळ: सकाळी 10 वाजता
🎯 स्थान: Online (नोंदणी आवश्यक)

🔗 आपली जागा आजच निश्चित करा —
फक्त १०० सहभागींसाठी मर्यादित!
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSccH8CLmh2fx3b590ICZzs5LBr7ikKnt9_20ImpA6A0ElvKNA/viewform?usp=dialog

02/10/2025
सूर्यकन्या तापीकेश्वर बहुउद्देशीय ट्रस्ट अंतुरली द्वारा दिनांक 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत आत्मऊर्जा शिब...
15/09/2025

सूर्यकन्या तापीकेश्वर बहुउद्देशीय ट्रस्ट अंतुरली द्वारा दिनांक 12 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2025 या कालावधीत आत्मऊर्जा शिबिर अंतुर्ली येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातून शिबिरार्थी दाखल झाले होते. आजच्या काळामध्ये वाढलेले शारीरिक मानसिक विकार वाढते स्ट्रेस टेन्शन आणि एकटेपणाची भावना किंवा जीवनातील इतरही समस्या सोडवण्याकरता एकच उपाय असतो तो म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा.
ही आपली ऊर्जा कशी मिळवता येईल ही मिळवताना कुठल्या कुठल्या पद्धतीचा अवलंब करता येतो याबद्दलची सविस्तर चर्चा व प्रात्यक्षिक यावेळी श्री देवनाथ महाराज यांनी शिबिरार्थींना समजावून सांगितले व प्रत्यक्ष करून घेतले.
निसर्गासोबत आपण कसे कनेक्ट होऊ शकतो स्वतःशी कनेक्ट कसे होऊ शकतो आणि ही सर्व कनेक्टिव्हिटी आपली आत्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी कशी मदत करते हे या तीन दिवसांमध्ये महाराजांनी समजावून सांगितले.
सोबतच गावाकडील जीवनाचा अनुभव या निमित्ताने विद्यार्थ्यांना घेता आला. गौरीवर बट्ट्या शिकून बघण्याचा अनुभव घेण्यात आला तसेच परिसरातील महत्त्वाचे पीक फळ म्हणजेच केळी या कच्च्या केळी गवऱ्यांच्या विस्तवावर भाजून गरम गरम खाण्याचा आनंद त्यांनी घेतला
सोबतच वनभोजन शेतात जाऊन केळीच्या पानावर जेवणाचा आनंद घेतला.
सोबतच शिरोधारा बस्ती या आयुर्वेदिक चिकित्सांचा अनुभव सुद्धा यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला जेणेकरून त्यांचं शारीरिक मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील या दृष्टीने आयुर्वेदिक चिकित्सा त्यांना अनुभवता आली.

विद्यार्थ्यांनी सुद्धा याचा भरपूर आनंद घेतला आणि ती ऊर्जा अनुभवली.
आपल्या अवतीभोवती सुद्धा आपण अशाच समस्यांशी नेहमीच तोंड देत असतो म्हणूनच सूर्यकन्या ट्रस्ट द्वारे पुढेही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. याबद्दल अधिक माहिती लवकरच आम्ही आमच्या फेसबुक पेज व वेबसाईटवर प्रसारित करणार आहोत.
अधिक माहितीसाठी आपण संपर्क खालील क्रमांकावर करू शकता.

डॉ.भूषण देव
7588010703

#आत्मऊर्जा
#वर्कशॉप
Surykanya Tapikeshwar Bahuddeshihya Trust Anturli सूर्यकन्या तापीकेश्वर

सूर्यकन्या तापीकेश्वर बहुउद्देशीय ट्रस्ट अंतुर्ली द्वारा महिला कल्याण , शिक्षण, पर्यावरण इत्यादी समाज उपयोगी कार्यक्रम र...
11/09/2025

सूर्यकन्या तापीकेश्वर बहुउद्देशीय ट्रस्ट अंतुर्ली द्वारा महिला कल्याण , शिक्षण, पर्यावरण इत्यादी समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात. आज संस्थेचे अध्यक्ष श्री देवनाथ महाराज अंतुर्ली यांचे हस्ते तुळशी माळा बनवण्यासाठीची मशीन एका गरजू महिलेला संस्थे द्वारा भेट देण्यात आली. यातून तुळशीमाळा बनवता येतील व त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती यातून होणार आहेत.

#महिला
#तुळशीमाळा


15/08/2025

श्रीज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त, श्री देवनाथ महाराज यांच्या चिंतनातून एक ब्लॉग (सदर) चालू करत आहोत. जे Surya...
15/08/2025

श्रीज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त, श्री देवनाथ महाराज यांच्या चिंतनातून एक ब्लॉग (सदर) चालू करत आहोत. जे Suryakanya चे वेबसाईट वर ब्लॉग सेक्शन मध्ये publish होतील. आजचा ब्लॉग चां सारांश खाली दिला आहे. आपण लिंक वार जाऊन नक्कीच पूर्ण लेख वाचू शकता.
https://suryakanya.org/blog-2-mr.php

*कैवल्याचा पुतळा | प्रगटला भुतळा | योगियांचा जिव्हाळा | ज्ञानोबा माझा ||*

माऊली श्रीज्ञानेश्वर महाराज यांचा प्रकट दिन श्रावण वद्य अष्टमीला मानला जातो. हीच तिथी भगवान कृष्णाचा अवतारदिनही असल्याने माऊलीला कृष्णाचा अवतार मानले जाते. अवतार व साधारण जन्म यात फरक असा की अवतार स्वतःच्या इच्छेने, योग्य काळ, देश, धर्म व उद्देश निवडून येतो. देव व संत अवतारांचा उद्देश धर्मसंस्थापन, भक्तरक्षण व अधर्मनाश हा असतो. संत अवतार सत्य-असत्याचा विवेक देण्यासाठी येतात.ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानाचाच सगुण अवतार मानले जातात. त्यांचा सर्वात मोठा लोकोपकार म्हणजे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून सर्वांना दिला. गीता ही जशी सोनं, तशी ज्ञानेश्वरी म्हणजे सोन्याचे अलंकार. एका ओवीतही जीवन सुशोभित करण्याची ताकद आहे.या प्रकट दिनी संकल्प असा की रोज किमान एक ओवी ज्ञानेश्वरीची वाचावी किंवा ग्रंथाला नमस्कार करावा. ज्ञानेश्वरी ही माऊलीची वाङ्मयमूर्ती आहे, तिला वाचणं म्हणजे माऊलीच्या सत्संगात राहणं. असं केल्यास माऊलीची कृपा निश्चित मिळून अपेक्षित ज्ञान प्राप्त होतं.

जय श्री नाथ. आपल्या सर्वांना कळवण्यात अत्यंत आंनद होत आहे की अंतुर्ली येथील आपल्या सुर्यकन्या तपिकेश्वर बहुदेशिय ट्रस्ट ...
21/07/2025

जय श्री नाथ.
आपल्या सर्वांना कळवण्यात अत्यंत आंनद होत आहे की अंतुर्ली येथील आपल्या सुर्यकन्या तपिकेश्वर बहुदेशिय ट्रस्ट ची website आता publish झाली आहे . आपण https://suryakanya.org/ या संकेत स्थळावर भेट देऊन जरूर पाहु शकता. आपले आगामी उपक्रम , शिबिर व महाराजांचे कार्यक्रम याची माहिती तिथे भेटेल. या कामासाठी श्री. मयूर भंगाळे आणि कांचन भंगाळे यांनी विशेष मेहनत घेतली , त्यांचे खूप खूप आभार.
टीप: website मराठी आणि english दोन्ही भाषे मध्ये उपलब्ध आहे. आपण खालील इमेज मध्ये दाखवल्या प्रमाणे भाषा बदलू शकता
#वेबसाइट

Address

A/P-Anturli Tah-Muktainagar, Dist-Jalgaon
Jalgaon
425306

Opening Hours

9am - 5pm

Telephone

+917588010703

Alerts

Be the first to know and let us send you an email when Surykanya Tapikeshwar Bahuddeshihya Trust Anturli सूर्यकन्या तापीकेश्वर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Surykanya Tapikeshwar Bahuddeshihya Trust Anturli सूर्यकन्या तापीकेश्वर:

Share