Samarpan Sanstha, jalgaon समर्पण संस्था, जळगाव

  • Home
  • India
  • Jalgaon
  • Samarpan Sanstha, jalgaon समर्पण संस्था, जळगाव

Samarpan Sanstha, jalgaon समर्पण संस्था, जळगाव Samarpan Sanstha in an active organisation of Khandesh region working for the welfare of society! We

समर्पण संस्था संचलित,  शारदाश्रम व श्रीमती. सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालय, जळगाव विद्यालयाने स्थापनेपासून सलग सातव्या व...
13/05/2025

समर्पण संस्था संचलित, शारदाश्रम व श्रीमती. सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालय, जळगाव विद्यालयाने स्थापनेपासून सलग सातव्या वर्षी एसएससी बोर्ड २०२४-२५ मध्ये १००% यश मिळवून अभूतपूर्व कामगिरी केली आहे! हा यशस्वी प्रवास तुमच्या सर्वांच्या विश्वास, सहकार्य आणि प्रोत्साहनामुळेच शक्य झाला आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे समर्पण, संस्थेचे व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे सहकार्य आणि पालकांचा सक्रिय सहभाग यामुळे आम्ही हा टप्पा गाठू शकलो. तुमच्या अमूल्य पाठिंब्यासाठी आम्ही मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. यापुढेही असेच यश मिळवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करूया. मन:पूर्वक शुभेच्छांसह...
# Shradotsav #2025 # Shradotsav

श्रीमती एस. एल. चौधरी विद्यालयात मराठी राजभाषा दिनाचा जल्लोष!"माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा! तिच्या संगे जागल्या,...
28/02/2025

श्रीमती एस. एल. चौधरी विद्यालयात मराठी राजभाषा दिनाचा जल्लोष!

"माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा! तिच्या संगे जागल्या, दर्याखोऱ्यांतील शिळा!"



श्रीमती एस. एल. चौधरी विद्यालयात मराठी राजभाषा दिनाचा जल्लोष!

"माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा! तिच्या संगे जागल्या, दर्याखोऱ्यांतील शिळा!"
(जळगाव): समर्पण संस्थेच्या श्रीमती सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालयात मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषेचा जागर केला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. चेतना नन्नवरे यांच्या हस्ते वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी राहुल सोळुंके, उपमुख्याध्यापिका श्रीमती अर्चना उजागरे आणि समन्वयिका सौ. माधुरी पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते. सौ. अर्चना सनेर यांनी मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व आणि कुसुमाग्रजांचे जीवनचरित्र यावर माहितीपूर्ण भाषण दिले.
इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी "मधमाशीने केली कमाल" या नाटिकेद्वारे मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले, तर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी "मला शिकायचंय" या नाटिकेद्वारे शिक्षणाचे महत्त्व सांगितले. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी स्नेहा भोई यांची स्वरचित मराठी कविता सादर केली. इयत्ता चौथी, पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थिनींनी स्त्री जीवनावर आधारित नाटक आणि नृत्य सादर केले. या कलाविष्कारांमधून विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या विविध छटा आणि संस्कृतीचे दर्शन घडवले.
उपमुख्याध्यापिका श्रीमती अर्चना उजागरे यांनी मराठी अभिजात भाषेचे महत्त्व विशद केले. इयत्ता सहावीची विद्यार्थिनी जान्हवी पाटील हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर सौ. सुषमा पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.


# Shradotsav

Samarpan Sanstha’s Smt S. L. Chaudhari Vidyalay Jalgaon Sport Day - 2024                                                ...
18/12/2024

Samarpan Sanstha’s Smt S. L. Chaudhari Vidyalay Jalgaon Sport Day - 2024

# Shradotsav

समर्पण संस्था संचालित शारदाश्रम विद्यालय आणि श्रीमती सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालाय जळगाव येथे पर्यावरणपूरक गणपतीची स्थ...
10/09/2024

समर्पण संस्था संचालित शारदाश्रम विद्यालय आणि श्रीमती सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालाय जळगाव येथे पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत सहभाग नोंदविला.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांना व पालकांना आपण कशा प्रकारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव सण साजरा करू शकतो, हा सामाजिक संदेश शाळेतर्फे देण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चेतना नन्नवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करण्यात आली.

पर्यावरणशाळेत शाडू मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न!पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने भरटाकत, भारत विकास परिषद आणि ...
30/08/2024

पर्यावरणशाळेत शाडू मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा संपन्न!
पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने भरटाकत, भारत विकास परिषद आणि पर्यावरणशाळा या संस्थांनी संयुक्तपणे शारदाश्रम विद्यालयात शाडू मातीपासून गणपती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेला शहरातील विद्यार्थी आणि पालकांनी उत्साहात सहभाग घेतला.
कार्यशाळेत कुशल कलाकार श्री. उल्हास सुतार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शाडू मातीपासून सुंदर गणपती बनवण्याचे कौशल्य शिकवले. या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट्य होते, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा रुजवणे.
कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी पर्यावरण शाळेच्या संचालिका सौ. चेतना नन्नवरे, जळगाव महानगरपालिका उपायुक्त श्रीमती निर्मला गायकवाड आणि जळगाव महानगरपालिका पर्यावरण सल्लागार गीतांजली कौशिक, जळगाव महानगरपालिका श्री प्रकाश पाटील, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष श्री विशाल चोरडीया, सचिव सौ अनिता नारखेडे, उपसचिव डॉ. विकास चौधरी, सदस्य उमेश पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यशाळा इ. ४ थी ते ७ वी आणि ८वी पेक्षा वरचे वर्ग असे दोन गटांमध्ये विभागली गेली होती. यावेळी १५० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेसाठी आवश्यक असलेली सर्व शाडू माती फाऊंडेशनच्या वतीने पुरवण्यात आली होती.
या कार्यक्रमाद्वारे पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व लहानपणापासून मुलांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारत विकास परिषद आणि पर्यावरणशाळा या संस्थांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत. त्यांचे मुख्य उद्दिष्ट्य, समाजात पर्यावरण जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हे आहे.
या कार्यक्रमात शारदाश्रम विद्यालयाचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील अनेक मुलांसह त्यांचे पालक उपस्थित होते. सर्व सहभागींनी या कार्यशाळेचा उत्साहात आस्वाद घेतला.

,

‘गाव तिथे वन’ ही काळाजी गरज!जळगाव दि. ६- ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी मियावाकी या संकल्पनेवर आधारित वाणां...
07/08/2024

‘गाव तिथे वन’ ही काळाजी गरज!

जळगाव दि. ६- ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी मियावाकी या संकल्पनेवर आधारित वाणांची निर्मिती जगभर उपयोगात आणली जात आहे. भारतातही शासनाने घनवन योजनेच्या माध्यमातून वनांची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन दिले असून, मियावाकी संकल्पनेच्या माध्यमातून आपल्या वनांचे पुनरुज्जीवन करून गाव तिथे वन ही संकल्पना कार्यान्वयित करता येईल, असे प्रतिपादन क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू यांनी केले. ते खेडी शिवारात एस. आय. पी. अकादमीच्या आणि पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेच्या वतीने कार्यान्वयित करण्यात आलेल्या मियावाकी वनसंवर्धन प्रकल्पाच्या वर्षपूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने खेडी येथे बोलत होते.
एक वर्षापूर्वी सुमारे ७ हजार रोपे आंनी ७५ प्रजातींची लागवड करून मियावाकी वनसंवर्धन प्रकल्प कार्यान्वयित करण्यात आला होता, या ठिकाणी एका वर्षात घनदाट जंगल तयार झाले असून जीव विविधता विकसित झाली आहे. पक्ष्यांचा अधिवासही तयार झालेला आहे. डॉ. माहेश्वरी यांनी या प्रकल्पाचे समन्वयक यांच्या कार्याचा गौरव केला आणि अगामी कालखंडात विद्यापीठाच्या माध्यमातून यावर्षी १५ घनवने तयार करण्यात येणार असल्याचे सांगितले. कुलगुरू डॉ. माहेश्वरी यांनी आपल्या भाषणात ग्लोबल वार्मिंगच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधले आणि अशा प्रकारच्या वनसंवर्धन प्रकल्पांच्या महत्त्वावर भर दिला. त्यांनी उपस्थितांना कमीत कमी पाच झाडे लावण्याचे आवाहन केले आणि त्यांची काळजी घेण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी उपस्थित असलेले बारीपाडा येथील वनसंवर्धन चळवळीचे प्रणेते मा. श्री. चैत्राम पवार, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. अशोक जैन, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. श्री भरत अमळकर उपस्थित होते. त्यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. चैत्राम पवार यांनी याप्रसंगी बारीपाडा येथील ११०० हेक्टरवर वनक्षेत्र कार्यान्वयित करण्यात आले यावर मार्गदर्शन केले.
पर्यावरण व निसर्ग संवर्धन शाळेचे संचालक राजेंद्र नन्नवरे यांनी या प्रकल्पाची संकल्पनेबद्दल विस्तृत माहिती दिली. त्यांनी या प्रकल्पाच्या यशासाठी सहयोगी संस्था, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचे आभार मानले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः लावलेली रोपे मोठी झालेली पाहून आनंद व्यक्त केला. त्यांनी या प्रकल्पाच्या यशस्वीतेत आपले योगदान असल्याचा अभिमान व्यक्त केला.


09/07/2024
World Environment Day 2024
05/06/2024

World Environment Day 2024



We are thrilled to announce that our school has achieved 100% SSC board results for the sixth consecutive year! This inc...
28/05/2024

We are thrilled to announce that our school has achieved 100% SSC board results for the sixth consecutive year! This incredible milestone is the dedication, hard work, and unwavering commitment of our entire school community.
Congratulations to our students for their exceptional performance, to the parents for their continuous support, and to our teachers and administrative staff for their relentless efforts. Together, we have set a standard of excellence that we will continue to uphold.
Let's celebrate this remarkable achievement and look forward to many more years of success!



समर्पण संस्था संचालित शारदाश्रम विद्यालय आणि श्रीमती सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालाय जळगाव तर्फे जळगाव आणि रावेर मतदार स...
11/05/2024

समर्पण संस्था संचालित शारदाश्रम विद्यालय आणि श्रीमती सुभद्रा लक्ष्मण चौधरी विद्यालाय जळगाव तर्फे जळगाव आणि रावेर मतदार संघात होणाऱ्या मतदानात १३ मे, २०२४ रोजी मोठ्या उत्साहाने मतदान करून साजरा करूया जगातील सर्वात मोठा लोकशाही उत्सव...



21/03/2024

Address

Jalgaon
425001

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

+919404047034

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarpan Sanstha, jalgaon समर्पण संस्था, जळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Samarpan Sanstha, jalgaon समर्पण संस्था, जळगाव:

Share