Yashwantrao Chavan Centre Jalgaon District

Yashwantrao Chavan Centre Jalgaon District यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, चे जिल्हा केंद्र जळगांव

जळगाव येथे यशवंतराव चव्हाण सेंटर महिला विभाग, आदिवासी विकास केंद्र, आणि लोक समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ...
18/04/2026

जळगाव येथे यशवंतराव चव्हाण सेंटर महिला विभाग, आदिवासी विकास केंद्र, आणि लोक समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी महिला विकास कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान जळगाव जिल्हा अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यावेळी उपस्थित प्रतिभाताई शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष लोकसंघर्ष मोर्चा, डॉ राहुल मयूर, संजनाताई खंडारे हवामान अभ्यासक पत्रकार आणि मान्यवर
Yashwantrao Chavan Centre
Sharad Pawar
Supriya Sule

08/11/2025
माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली
26/12/2024

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली

20/09/2024
14/09/2024

यशवंतराव चव्हाण सेंटरचे कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कार जाहीर

कविवर्य ना. धों. महानोर यांचे निधन झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेनुसार सेंटरने कविवर्य ना. धों. महानोर यांच्या नावाने पुरस्कार देण्याची घोषणा केली. कवी, कादंबरीकार म्हणून महानोर यांनी मराठी साहित्यात जसे स्वतःचे स्थान निर्माण केले, तसेच शेती आणि पाणी ही क्षेत्रे जीवनभर त्यांचा ध्यासविषय होती. महानोरांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि कार्याचे हे पैलू लक्षात घेऊन, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रानकवी ना. धों. महानोर यांच्या नावाने या तीनही क्षेत्रांत एकूण सहा पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. दरवर्षी सहा पुरस्कारांपैकी चार पुरस्कार साहित्यक्षेत्रासाठी तर दोन पुरस्कार शेती व पाणी या क्षेत्रांसाठी असतील. त्यानुसार सन २०२४ च्या कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती-पाणी पुरस्कारासाठी राज्याच्या सर्व विभागांतून शिफारशी मागविण्यात आल्या होत्या. १९ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ५ वा. चव्हाण सेंटर, मुंबई येथे सेंटरचे अध्यक्ष श्री. शरद पवार आणि जैन फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.अशोक जैन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या शिफाराशिमधून यशवंतराव चव्हाण सेंटर आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव या दोन्ही संस्थांच्या संयुक्त निवड समितीने राज्याच्या विविध भागातून पुढील नावे जाहीर केली आहेत. मा. श्री. अशोक जैन, डॉ. जब्बार पटेल, डॉ. नितीन रिंढे, श्री. शंभू पाटील, श्री. अजित भुरे, श्री. दत्ता बाळसराफ इत्यादी मान्यवर पुरस्कार निवड समितीचे सदस्य आहेत.

शेती – पाणी :

१. श्रीमती शीला रामकृष्ण खुणे, लेंडेझरी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया येथील या अल्पभूधारक महिलेने उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून कलिंगडाचे किफायतशीर पीक घेतले आहे.

२. श्रीमती वर्षा नरेंद्र हाडके, आष्टी, ता. कळंब, जि. यवतमाळ. पतीच्या निधनाने खचून न जाता तरुण वयातच वर्षा हाडके निर्धाराने शेती करून सोयाबिनचे भरगोस पीक घेऊन संसाराचा गाडा हाकत आहेत.

साहित्य :
कविता–

३. श्री. गणेश घुले, बजाजनगर, वाळूज, औरंगाबाद. राज्यात अनेक ठिकाणी बालकुमार साहित्य संमेलनात "सुंदर माझी शाळा" कवितेच्या सांगीतिक प्रयोगाचे सादरीकरण करत आहेत.

४. श्री. महेश लोंढे, बारलोणी, ता. माढा, जि. सोलापर. नावाक्षर दर्शन, नव-अनुष्टुभ, अभिधानंतर, परिवर्तनाचा वाटसरू अशा नियतकालिकांमधून नियमित कविता लेखन करत आहेत. सध्या ते आपल्या पहिल्या कादंबरीवर काम करत आहेत.

५. श्री. नामदेव कोळी, कडगाव, ता. जि. जळगाव. काळोखाच्या कविता हा कविता संग्रह प्रकाशित झाला असून वृत्तपत्रे व नियतकालिकांमधून सातत्याने कविता लेखन करत आहेत. त्यांना अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.

कादंबरी –
६. श्री. प्रदीप कोकरे, वडाळा, मुंबई. युगवाणी, खेळ, मुक्त शब्द, अभिधानंतर, कवितारती, लोकसत्ता, काव्याग्रह, वर्णमुद्रा इत्यादी नियतकालिकांमधून कविता प्रकाशित. खोल खोल दुष्काळ डोळे ही कादंबरी प्रकाशित झाली आहे.

पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी परिवर्तन, जळगाव आयोजित, श्री. शंभू पाटील व सहकारी यांचे सादरीकरण असलेला ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ हा अभंग गायनाचा कार्यक्रम होईल.

भारताचे माजी राष्ट्रपती  महामहीम डॉ श्री सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन, तसेच सर्व शिक्षकांना श...
05/09/2024

भारताचे माजी राष्ट्रपती महामहीम डॉ श्री सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन, तसेच सर्व शिक्षकांना शिक्षक दिना निमित्त हार्दीक शुभेच्छा!

16/06/2024

जीवनाचा लपंडाव कसा जिंकायचा ? सांगताहेत यशवंतरावजी चव्हाण साहेब...

सूर्याची किरणं कधी कोवळी कधी कडक असणारच.... कडक उन्हातही चालावंच लागेल धैय्यसिद्धीसाठी
आणि शोधावी लागते कधी सावली विसाव्यासाठी
प्रत्येकाने शोधायचा असतो ज्याचा त्याचा विरंगुळा
जंगलातलं घोटभर झऱ्याचं पाणी, चार जांभळाची गोडीही यशवंतरावांसारख्या 'सह्याद्री'ला उमेद देवून जाते.....
जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची ही यशवंतदृष्टी आजही प्रेरक, तुमच्या आमच्यासाठी !!
-----------------------------------------------------------------------
"काही तरी नवें शोधावें व जे सांपडले त्यांत रस घ्यावा अशा प्रवृत्तीने आपण जीवन जगलों तरच त्याला जगणे म्हणता येईल. ह्यांत काय आहे ? त्यांत काय आहे ? अशा तुसड्या वृत्तीने आपण जर प्रत्येक क्षण वाया घालविला तर जीवनाचा लपंडाव आपण हरलोच असे समजावयाला हरकत नाही. जीवनांत जे सुखाचे क्षण येतात ते सूर्याच्या कोवळ्या किरणांसारखे सोनेरी व सतेज असतात. ते क्षणभर राहतात आणि नंतर कडक होतात. परंतु ज्या वेळी हे किरण कोवळे दिसतात त्या वेळी त्यांचें तें तेज, तें रम्य स्वरूप पाहून मनाला आल्हाद वाटतो, गंमत वाटते. नदीच्या खोल डोहांत दगड टाकला की, पाण्यावर तरंग उठतात, एकांतून एक अशी वर्तुळे उठतात, आणि पाहणाऱ्याला मोठी मजा वाटते. जंगलाच्या वाटेने जात असतांना उन्हाच्या वेळी एखादा झरा दिसला की, त्याचे पाणी पितांना केवढा आनंद होतो. एवढेच कशाला, ओढ्याच्या कांठी भरगच्च जांभळांनी भरलेल्या झाडाची चार जांभळे तोंडांत टाकली की ती किती गोड लागतात. बाजारांतून विकत आणलेल्या जांभळांना त्या गोडीची सर थोडीच येणार ! जीवनामधील आनंदाचे क्षण हे असे असतात.

जुन्यापासून बोध आणि नव्याचा शोध घेत घेत जाणारा हा मानवी जीवनप्रवाह आहे. ह्या प्रवाहांत प्रवाहपतित न बनतां सुजाणपणे मार्ग आक्रमीत जाणे व जगण्याचा आनंद लुटणे हा एक छोटासा आदर्श माझ्यापुढे आहे. हाच माझा खरा विरंगुळा आहे."

- यशवंतराव चव्हाण
#यशंवंतनीती

लोकप्रीय संसदरतन् खा. मा. सौ. सुप्रियाताई सुळे ह्या चौथ्यांदा खासदार म्हणून निवडूण आल्या बद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन! ...
04/06/2024

लोकप्रीय संसदरतन् खा. मा. सौ. सुप्रियाताई सुळे ह्या चौथ्यांदा खासदार म्हणून निवडूण आल्या बद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन!
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
Supriya Sule
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

#मविआ

आधुनीक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
12/03/2024

आधुनीक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

*आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राजकारण,समाजकारण,अर्थकारण तसेच साहित्य लेखनातून ठसा उमटविणारे लोकनेते स्व.यशवंतराव चव्हा...
25/11/2023

*आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राजकारण,समाजकारण,अर्थकारण तसेच साहित्य लेखनातून ठसा उमटविणारे लोकनेते स्व.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या 39 वी पुण्यतिथी निमित विनम्र अभिवादन.....*🌹🌹
जळगाव जिल्हा केंद्र अध्यक्ष श्री भैय्यासाहेब रवींद्र पाटील, सचिव डॉ राहुल मयुर, कोषाध्यक्ष श्री एन डी पाटील, श्री ज्ञानेश मोरे आणि डॉ रेणुका चव्हाण हे उपस्थित होते.

Address

SMIT COLLEGE, B. JAIN NAGAR
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm

Telephone

+912572252209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashwantrao Chavan Centre Jalgaon District posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Yashwantrao Chavan Centre Jalgaon District:

Share