Devgiri Kalyan Ashram

Devgiri Kalyan Ashram Devgiri Kalyan Ahram is a voluntary social organisation serving for the development of Janjati (Trib

२१ जुलै २०२२गुरुवार, १२ करोड जनजाती समाजाचा गौरव आणि पर्यायाने देवगिरी कल्याण आश्रमाकरिता अभिमानास्पद असा अदभुत दिवस.. आ...
22/07/2022

२१ जुलै २०२२गुरुवार,
१२ करोड जनजाती समाजाचा गौरव आणि पर्यायाने देवगिरी कल्याण आश्रमाकरिता अभिमानास्पद असा अदभुत दिवस.. आदिवासी कर्तृत्ववान महिला, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी पर्वात, देशाच्या अतुच्य पदावर विराजमान होण्याचा हा सुवर्णाक्षरांनी नोंद घेणारा ऐतिहासिक दिवस..केवळ औपचारिकता बाकी.. नामांकन झाले त्यावेळीच निवड निश्चित झालेली.. अशा आगळ्यावेगळ्या दिवसाचे साक्षीदार म्हणून आज संध्याकाळी ६ वाजता टॉवर चौकात जळगाव येथे फटाके फोडून आणि सर्वांना साखर वाटून, जल्लोषात साजरा केला. सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. उसृफूर्तपणे भारतमातेच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला..येणारे जाणारे ट्रॅफिक मधिल थांबून मानवंदना देत होते. विलक्षण अशा ह्या प्रासंगिक कार्यक्रमात परिवाराची लक्षणीय उपस्थिती होती त्याची क्षणचित्रे

17 जुलै 2022***     सतत सुरू असलेल्या पावसाने थोडी रजा घेतली आणि हुश्श झाले. सुरम्य वातावरणात 17 जुलै 2022 रोजी रविवारी ...
18/07/2022

17 जुलै 2022***
सतत सुरू असलेल्या पावसाने थोडी रजा घेतली आणि हुश्श झाले. सुरम्य वातावरणात 17 जुलै 2022 रोजी रविवारी सकाळी 9:30 वा. ठरल्याप्रमाणे पानशेवडी ,बडवांणी करिता प्रस्थान केले..वाटेत सर्वांनी वाफाळलेला गुळाच्या चहाचा आस्वाद घेतला आणि देवगिरी कल्याण आश्रमाच्या आरोग्य आयामा अंतर्गत आरोग्य रक्षकांना आरोग्य पेटीचे वाटप व बहुमोल बियाणे वाटप तसेच रोटरी क्लब सेंट्रल यांचे सौजन्याने वृक्षरोपण आणि जळगाव पीपल्सच्या माध्यमातून महिलांना बचतगटाचे प्रशिक्षण अशा चौफेर उद्देशाने गाडीने पानशेवडी गाठले तेव्हा ग्रामवासी वाट पाहतच होते. नियोजनाप्रमाणे महिलांना बचतगट प्रशिक्षणाने सुरुवात झाली जळगाव पीपल्स बँकेच्या सौ. अंजली बोरसे, व शारदा ठाकूर यांनी सहज सोप्या पद्धतीने बचत गटाची सर्व माहिती महिलांना करून दिली यावेळी मंचावर प्रांत संघटन मंत्री विठ्ठलजी मॅकलवाड व क्षेत्रीय आयाम प्रमुख साहेबरावजी जगताप यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक ॲड. अंजली कुलकर्णी यांनी केले. सौ. अंजली धिवसे यांनी गित म्हटले. तोपर्यंत रोटरी क्लब सेंट्रल च्या पदाधिकारी यांचे आगमन झाले. कल्याण आश्रमातर्फे त्यांचे स्वागत परिचयानंतर, रोटरी अध्यक्ष विपुलभाई,पर्यावरण प्रकल्प दिलीप लुणियाजी यांनी लहान मुलांना बिस्कीट वाटप केले.. रोटरीयन डॉ. विद्या चौधरी व डॉ.प्रिती पाटील यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले आणि फुलझाडाचे महत्व पटवून दिले. वृक्षारोपणानंतर रोटरियन यांनी निरोप घेतला. त्यानंतरचे कार्यक्रमात क्षेत्रीय आरोग्य आयाम प्रमुख साहेबरावजी जगताप यांनी आरोग्य रक्षकांना मार्गदर्शन केले यावेळी पानशेवडीचे संजय बारेला, बडवाणीचे चीमा बद्री बारेला, कुंड्यापाणीचे सहदर मुलसिंग पावरा, चांदण्यातलावचे बन्सीलाल रिंगण्या बारेला, बडवाणीचे योगेश मुलसिंग बारेला , अर्जुन गिरधर पावरा या आरोग्य रक्षकांना पेटिचे तथा बियाणांचे वाटप, पूर्णवेळ कार्यकर्ते विरसिंगजी , चित्राताई, प्रांत संघटनमंत्री विट्ठलजी , क्षेत्रिय आरोग्य आयाम प्रमुख साहेबरावजी जगताप, जिल्हा पदाधिकारी, ऍड. अंजली कुळकर्णी,सचिनजी कलभंडे , सौ कांचन साने, सौ. अंजली धवसे. सौ. साधना दामले, यांचे हस्ते करण्यात आले. एव्हाना 3 वाजून गेले होते. सर्वांनी गरम गरम खिचडीचे यथेच्छ सहभोजनाचा आनंद घेवून संस्मरणीय दिवसाची नोंद केली.. सर्व कार्यक्रमाची सर्वांनी जतन केलेली क्षणचित्रे 👇..

अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय उपाध्यक्ष माननीय डॉक्टर श्री हिराकुमार नागोजी यांनी नुकतीच देवगिरी कल्याण...
11/07/2022

अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय उपाध्यक्ष माननीय डॉक्टर श्री हिराकुमार नागोजी यांनी नुकतीच देवगिरी कल्याण आश्रमांतर्गत जळगाव कार्यालयाला दिनांक 9 जुलै 2022 रोजी भेट दिली .हाउसिंग सोसायटीचे रोझ गार्डन हॉलमध्ये झालेल्या ह्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना डी लिस्टिंग आणि वनवासी बंधूंच्या कार्यासंबंधी बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी शाल श्रीफळ देवून त्यांचे स्वागत,प्रांतसचिव,डाॅ.मंदारजी म्हस्कर यांनी केले. कार्यक्रमाला चोपडा धरणगाव पारोळा अमळनेर एरंडोल तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यकर्त्यांचे शंका समाधानही त्यांनी उत्तमरीत्या केले. नंतर झालेल्या कार्यक्रमात जळगावचे आमदार श्री राजू मामा भोळे ही उपस्थित होते त्यांनीही कार्यकर्त्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले .याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री श्री गर्गेजी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री विजयजी ठाकरे , प्रांत खेल कुद आयाम प्रमुख किशोरजी पाटील, बाळासाहेब नाईक, अ.भा.वि.प.,,राष्टसेविकासमितीच्या संगिता अट्रावलकर, श्रीहर्ष खाडीलकरजी,समीरजी साने, ही उपस्थित होते .त्यांचे स्वागत संघटनमंत्री विठ्ठलजी मॅकलवाड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव ऍड.अंजली कुलकर्णी यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय सौ साधना दामले यांनी दिला सौ अंजली धवसे यांनी गीत सादर केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ कांचन साने ,सौ यामिनी निकुंभ ,सौ स्वाती लांडगे, सौ कविता चौधरी ,श्रीमती रेखा भावसार ,श्री सचिनजी कलभंडे ,श्री.पियुषजी श्रावगी, श्री राकेशजी मुंडले यांनी परिश्रम घेतले

Address

गोदाई १८८, बळीराम पेठ जळगाव ४२५००१
Jalgaon

Telephone

+919022535456

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Devgiri Kalyan Ashram posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Devgiri Kalyan Ashram:

Share