22/03/2025
#विद्यापीठाचा_सन_२०२५_२०२६_चा_३१७_कोटी_रुपयांचा #अर्थसंकल्प_एकमताने_मंजूर
कबचौउमविची अर्थसंकल्पीय सिनेट सभा काल दि. २० मार्च २०२५ रोजी उशीरापर्यंत विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये संपन्न झाली. मा.कुलगुरू महोदय यांच्या अध्यक्षतेखाली प्र- कुलगुरू, मा.अधिष्ठाता,सर्व. सन्मा.व्यवस्थापन परिषद सदस्य, सिनेट सदस्य,विद्यापीठाचे अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती याप्रसंगी होती.
या सभेत व्यवस्थापन परिषद सदस्य तथा अंदाजपत्रक समितीचे अध्यक्ष मित्र श्री. नितीन झाल्टे यांनी सन २०२४-२५ चा सुधारीत आणि २०२५-२६च्या ३१७.९६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अनेक विद्यार्थी केंद्रित योजनांसह सादर केला. या अर्थसंकल्पाला सिनेट सभेत एकमताने मंजूरी देण्यात आली.
भारतीय ज्ञान परंपरा कक्षासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवासह अनेक योजनांसाठी भरीव तरतूद करण्यात आली.
तसेच विद्यार्थी विकास विभाग, क्रिडा विभाग,रा.से.योजना विभाग या विभागांसाठीची तरतूद वाढविण्यात येऊन संशोधनावर अधिकाधिक भर देण्यासाठी जास्तीच्या रक्कमेची तरतूद करण्यात आली.
अर्थसंकल्पीय सिनेट सभेत सक्रिय सहभाग नोंदविला.