04/03/2026
ग्रॅव्हिटी 2
एक प्रवास....
अनोखा आनंददायी माणूस म्हणून अजून संवेदनशील, अजून सूक्ष्म बनवण्याची संधी देणारा भन्नाट प्रवास.....
या क्षणांमुळे आश्चर्यचकित करणार एक एक गुपित हे आयुष्य उलगडत आहे, याचा प्रत्यय येतो.
माय मातीचा प्रवास सुरू केला तेव्हा हा किती खोल आणि कुठवर आहे, याची कुठलीही कल्पना नाही. फक्त आता स्वस्त बसवत नाही म्हणून पाऊल पुढे टाकायचं, फक्त एवढाच विचार....
या विचाराला आणि कार्याला क्षणोक्षणी जोड मिळत गेली आणि पाऊल आपसूक पुढे पडत गेलं. असंच काहीसं घडल्याचा मनभर समाधानाचा, तृप्तीचा आजचा क्षण....
हा प्रवास करत असताना बऱ्याच वेळेला निराशा पदरी पडते. कधीतरी दूरवर कुठेतरी आशेचा किरण दिसतो आणि पाऊले झपाझप पुढे पडत राहतात प्रकाशाच्या दिशेने....
अपेक्षित नसतानाही काहीतरी गुपित गवसत, अगदी तसंच....
ही मानवता क्षणोक्षणी प्रत्येकाच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करत असताना मा.श्री .शरद तरडे सर, आणि सौ. सुचिता तरडे मॅम या चळवळीला आपल समजतात. कला आणि समाजसेवा याची सांगड घालू बघतात तेव्हा कितीतरी पटीने हा प्रवास करण्याच बळ वाढतं....
अगदी मनापासून भरभरून प्रेम करणारी ही मंडळी आनंदाने आणि प्रेमाने ओंजळ भरून देतात. अनंतकाळासाठी या समाजाला हे प्रेम देताना आता ही ओंजळ रिकामी होणार नाही, याची खात्री पटते.
श्री.शरद तरडे सर आणि सौ. सुचिता तरडे मॅम,
उमा कुलकर्णी मॅम,
मिलिंद रामचंद्र ढेरे सर,
हेमंत मेढी सर,
प्रकाश नेवासकर सर,
चैतन्य कुबल सर
आपले सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.🙏😊
सौ. प्रभावती पाटील
संस्थापक माय माती फाउंडेशन
रविवार, 1 मार्च 2026
स्थळ पुणे