Nidhi Foundation

Nidhi Foundation Nidhi Foundation is NGO. It's working for women and girls, specially menstrual cycle.

महिलांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा ही गरज आहे, पर्याय नाही.शहरात E-Toilet आणि Sanitary Napkin Vending Machine सारख्या...
15/03/2026

महिलांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा ही गरज आहे, पर्याय नाही.
शहरात E-Toilet आणि Sanitary Napkin Vending Machine सारख्या अत्यावश्यक सुविधांची उपलब्धता व्हावी, यासाठी निधी फाउंडेशनतर्फे महापौरांकडे केलेल्या मागणीची दखल आज लोकशाही वर्तमानपत्रात प्रकाशित झाली.

महिलांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानासाठी केलेल्या या प्रयत्नांना स्थान दिल्याबद्दल लोकशाही वर्तमानपत्राचे मनःपूर्वक आभार.

समाजातील प्रत्येक महिलेला सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानाने जगता यावे, यासाठी निधी फाउंडेशनची वाटचाल अशीच सुरू राहील 🙏


11/03/2026
निधी फाउंडेशनच्या कार्याला स्थान दिल्याबद्दल महाराष्ट्र टाइम्स चे मनापासून आभार 🙏
10/03/2026

निधी फाउंडेशनच्या कार्याला स्थान दिल्याबद्दल महाराष्ट्र टाइम्स चे मनापासून आभार 🙏




09/03/2026

महिलांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा ही कोणतीही लक्झरी नाही, तर त्यांचा मूलभूत हक्क आहे.

निधी फाउंडेशनच्या वतीने महापौर दीपमाला काळे यांना निवेदन देऊन शहरात
🚻 E-Toilet
🩸 Sanitary Napkin Vending Machine

यांसारख्या आवश्यक सुविधांची उपलब्धता करून देण्याची मागणी करण्यात आली आहे, जेणेकरून प्रत्येक महिलेला स्वच्छता आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळू शकेल.

आवाज उठेल तेव्हाच बदल घडेल.
🎥 व्हिडिओ नक्की पहा आणि शेअर करा.

VoiceForWomen NGOWork

“नारीशक्तीचा ऊर्जामय संचार, तर कर्तृत्वाचा हा विनम्र सत्कार.” ✨महिलांच्या सन्मान, आरोग्य आणि सशक्तीकरणासाठी निधी फाउंडेश...
09/03/2026

“नारीशक्तीचा ऊर्जामय संचार, तर कर्तृत्वाचा हा विनम्र सत्कार.” ✨

महिलांच्या सन्मान, आरोग्य आणि सशक्तीकरणासाठी निधी फाउंडेशनच्या माध्यमातून केलेल्या समाजसेवेची दखल घेत “महिला कर्तृत्व सन्मान सोहळा २०२६” अंतर्गत मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण आहे.

हा सन्मान फक्त माझा नाही, तर प्रत्येक त्या स्त्रीचा आहे जी स्वप्न पाहते, संघर्ष करते आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची ताकद ठेवते.
यापुढेही समाजातील महिलांसाठी जागरूकता आणि सशक्तीकरणाच्या कार्यात अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 🌸

NGOWork ProudMoment ✨

08/03/2026

*नारीचा सन्मान फक्त शब्दांत नाही,
तर तिच्या आरोग्याची काळजी घेण्यात आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने जनजागृतीचा संदेश.
— Nidhi Foundation*

दागिने स्त्रीच्या सौंदर्याची ओळख असतात,
पण तिचं आरोग्य आणि स्वच्छता हीच तिची खरी ताकद असते.

समाजात स्त्रीला सजवण्यासाठी दागिने दिले जातात,
पण तिच्या आरोग्याबद्दल, विशेषतः मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल अजूनही अनेक ठिकाणी जागरूकतेची कमतरता आहे.
मासिक पाळी ही लाज किंवा भीतीची गोष्ट नसून ती स्त्रीच्या आयुष्यातील नैसर्गिक आणि महत्त्वाचा भाग आहे.

प्रत्येक मुलगी आणि स्त्रीला सुरक्षित आणि स्वच्छ सॅनिटरी पॅड मिळणं हा तिचा हक्क आहे.
जेव्हा आपण तिच्या आरोग्याची काळजी घेतो, तेव्हा आपण तिच्या सन्मानाचं आणि सशक्ततेचं रक्षण करतो.

या महिला दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून एक संकल्प करूया —
स्त्रीच्या आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोलूया,
मासिक पाळीबद्दलच्या गैरसमजुती दूर करूया,
आणि प्रत्येक स्त्रीला सुरक्षित, निरोगी आणि सन्मानाने जगण्यासाठी साथ देऊया.

सशक्त नारी म्हणजेच सशक्त समाज.

— Nidhi Foundation
🌸

03/03/2026
निधी फाउंडेशनच्या कार्याची दखल घेत आज माध्यमातून प्रसिद्ध झालेले वृत्त. सर्वांचे आभार.🙏🏻
01/02/2026

निधी फाउंडेशनच्या कार्याची दखल घेत आज माध्यमातून प्रसिद्ध झालेले वृत्त. सर्वांचे आभार.🙏🏻

Address

Matoshri Apartment
Jalgaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nidhi Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nidhi Foundation:

Share