05/02/2026
#शेकोटी #पोपटीपार्टी
पोपटी पार्टी म्हणजे हिरव्या भाज्या शेकोटीत भाजून खाण्याचा पारंपरिक,
आणि ग्रामीण आनंदाचा एक छानसा सर्वांच्या सदैव स्मरणात राहील असा कार्यक्रम.
असे एकापेक्षा अनेक हटके, आपली संस्कृतीचा ठेवा नव्याने या पिढीला करून देणारे आणि मुलांच्या आनंदाचे उपक्रम फक्त आणि फक्त आपल्या जयंत बालभवन मध्येच होतात बरं का.... कोणत्याही नवनवीन उपक्रमांची खरी सुरवात ही जयंत बालभवननेच केली आहे..
सविस्तर सांगायचं तर👇
पोपटी पार्टीमध्ये
हिरव्या वाटण्याच्या शेंगा, मक्याची कणसे, भुईमुगाच्या शेंगा, हरभरे, वांगी, बटाटे, कांदे, भोपळा, शेंगदाणे अशा हिरव्या/ताज्या भाज्या
शेकोटीत किंवा राखेत भाजल्या जातात
नंतर त्या मीठ-चटणी-ठेचा लावून
सर्वजण एकत्र बसून, गप्पा मारत खातात..
यात
कोणताही दिखावा नसतो
निसर्गाशी जवळीक असते
यामध्ये मैत्री, आपुलकी जाणवते
शेकोटी आणि पोपटी पार्टीत गावाकडचा मनमोकळा आनंद मिळतो
ही केवळ खाण्याची पार्टी नाही, तर ही आहे ग्रामीण संस्कृती, मातीशी नातं जोडणारी आणि एकत्रपणाची अनुभूती देणारी..
यामध्ये सर्व एकत्र येतात मित्रांसोबत मिसळणे, बोलणे, शेअर करणे
आनंद व्यक्त करणे – नाच-गाणे, हसणे, यातून आत्मविश्वास वाढतो
स्वतः काम केलेने एकमेकांना सहकार्याची भावना वाढीस लागते. शिस्त लागते.
मुलांना अनेक स्मरणीय अनुभव मिळतात आठवणी व भावनिक जुळवणूक होते.
खेळ, थीम, कला-उपक्रमांमुळे कल्पकता वाढते.
इतर पार्ट्या दिखावा/स्पर्धा – मोठी पार्टी, यामुळे मुलांना महागड्या गोष्टींची चढाओढ , स्पर्धा ईर्षा वाढते, आरोग्यावर परिणाम करणारे जंक फूडची सवय लागते. DJ speakers मोबाईल या आवाजाचा अतिरेक झाल्यामुळे – मुलांची एकाग्रता कमी होते
मूल्यांपेक्षा खर्चाला प्राधान्य जास्तअसलेने– ‘आनंद = खर्च’ अशी चुकीची समज निर्माण होते.
परंतु हेच ही ग्रामीण पोपटी पार्टी म्हणजे अगदी साधी, मूल्याधिष्ठित पार्टी मध्ये खेळ, कथा, समूह-उपक्रम यासोबत आरोग्यदायी खाऊ मिळतो. सहभागी खेळ व टीमवर्क मुळे
कृतज्ञता व शेअरिंग शिकवणारे छोटे क्षण मुलांना अनुभवता येतात.
थोडक्यात, योग्य मार्गदर्शन असेल तर पोपटी पार्टी ही मुलांमध्ये आनंद, सामाजिकता आणि आत्मविश्वास रुजवते; अतिरेक टाळला तरच तिचा खरा फायदा होतो.... मुले अशी निसर्गात वाढली खेळली तर आणि तरचं ती सक्षम होतील. त्यांच्यामध्ये जीवनमूल्ये रुजतील...
https://youtube.com/shorts/lfoUv9zIPLk?si=SsBqEJGFxy-Y8b0H