Palak Shikshak Sangh Ichalkaranji

Palak Shikshak Sangh Ichalkaranji Career Counselling for Engineering and Medical Admission. Also conducts MOCK TESTs for MHT-CET / JEE

02/01/2026
आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, पालक शिक्षक संघ, इचलकरंजीचे ज्येष्ठ सदस्य प्रा.डॉ. अनिलकुमार गुप्ता यांची डी.वाय. पाटील ॲग्र...
30/10/2025

आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, पालक शिक्षक संघ, इचलकरंजीचे ज्येष्ठ सदस्य प्रा.डॉ. अनिलकुमार गुप्ता यांची डी.वाय. पाटील ॲग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, (DYP-ATU) तळसंदे च्या कुलगुरू (vice chancellor) पदी नियुक्ती होत आहे. इंजिनिअरिंग शिक्षणा करीता हिमाचल प्रदेश मधून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या अनिलकुमार गुप्ता सरांचा एक विद्यार्थी ते कुलगुरू हा प्रवास विस्मयकारक करणारा आहे. अभ्यासुवृत्ती, कर्तव्याप्रती निष्ठा, कामाचा प्रचंड उरक आणि आत्मविश्वास ही त्यांची बलस्थाने होत.
हार्दिक अभिनंदन गुप्ता सर.
पालक शिक्षक संघ परिवारा कडून खूप साऱ्या शुभेच्छा.

30/07/2025
🔴🔴🔴विद्यार्थी मित्रहो.. मागील 2 वर्षे, ज्या एका दिवसासाठी तुम्ही तयारी केलीत तो आता उद्यावर आहे. 🔹आज शक्यतो शांत राहा, क...
04/05/2024

🔴🔴🔴

विद्यार्थी मित्रहो..
मागील 2 वर्षे, ज्या एका दिवसासाठी तुम्ही तयारी केलीत तो आता उद्यावर आहे.

🔹आज शक्यतो शांत राहा, कोणताही ताण येऊ देऊ नका.
🔹नवीन कोणताही अभ्यास करू नका.
🔹 रात्री लवकर झोपा आणि 7-8 तास पुरेशी झोप घ्या.
🔹पालकांनी उद्या सकाळचा नाश्ता, जेवण हे मुलांच्या आवडीचे बनवावे आणि 12 च्या आत जेवू घालावे.
जेवणाचा मूड वर खूप परिणाम होतो.
🔹परीक्षेला नेण्याच्या, घालण्याच्या गोष्टी आधीच तयार करून ठेवा, ऐनवेळी शोधाशोध करत बसू नका.
🔹ड्रेस कोड नीट पाळा म्हणजे तपासणी (frisking) मधे अजिबात त्रास होत नाही.
🔹जर काही कारणाने बरोबर नेलेला फोटो हरवला, तर परीक्षा केंद्रात बाहेर फोटोग्राफर असतात आणि लगेच फोटो काढून मिळतो.
🔹काही कारणाने आधार कार्ड किंवा अन्य कोणते Photo ID proof बरोबर नेले आहे ते गहाळ झाले, तर जवळच्या नेट कॅफे मधून e-Adhar कार्ड काढून घेता येते, ते चालते. म्हणून शक्यतोवर Photo ID म्हणून आधार कार्ड वापरावे.
🔹कोणत्याही परिस्थितीत गोंधळून गडबडून न जाता, समस्या आली तर त्यावर लवकरात लवकर उपाय शोधावा. नाही तर ग्रुप वर किंवा फोन करून आम्हाला लगेच विचारा. We are always with you all..
🔹हे सगळं होऊ नये म्हणूनच नेण्याच्या गोष्टींचे(allowed things) 2 सेट बनवा, एक विद्यार्थ्याकडे द्या, एक पालकांकडे ठेवा.
🔹आत जातेवेळी कॅडबरी, एनर्जी बार खा. Cold drink/soda असणाऱ्या ड्रिंक्स पेक्षा Glucose D/Enerzal/ लिंबू सरबत प्या. पुढे 4-5 तास ग्लुकोज चा पुरवठा व्हायला हवा.
🔹12 ते 12.30 च्या दरम्यान आत जा, म्हणजे तपासणी होऊन जागेवर बसू पर्यंत 1 ते 1.30 होतात.
🔹आपल्या जागेवर बसल्यानंतर 10 मिनिटे संथ गतीने अनुलोम विलोम हा प्राणायाम करा. श्वसनाच्या गतीत, हृदयाच्या ठोक्यात, आणि आपल्या मनात एक correlation असते. जितका श्वसनाचा वेग कमी, तितके हृदयाचे ठोके कमी आणि जितके ठोके कमी तितके मन शांत..
🔹एकदा परीक्षाकेंद्रात आत गेल्यावर पुन्हा आतबाहेर करू नये. 1.30 नंतर कोणत्याही कारणाने परत प्रवेश मिळत नसतो.
🔹OMR हातात मिळाल्यावर सर्वप्रथम *Test booklet code and OMR Answer sheet code हे दोन्ही एकसारखे आहेत ना हे तपासा.* नसेल तर लगेच लक्षात आणून द्या. ते छापील असतात.
🔹*शक्यतितक्या शांत पणे, विचारपूर्वक आपला रोल नं, booklet number भरा. त्याद्वारेच तुमची OMR ही OMR reader वर scan होऊन तुम्हाला योग्य ते मार्क मिळणार आहेत.*
🔹आजवर ज्या पद्धतीने पेपर सोडवण्याची strategy वापरत आहात त्या नुसारच वागा.
🔹आपण योग्य त्या नंबरच्या प्रश्नाचे उत्तर योग्य त्या ठिकाणी bubble करत आहे ना हे वेळोवेळी तपासा.
🔹परीक्षे दरम्यान किमान 6-7 वेळा तुम्हाला सही करावी लागते, thumb impression करावे लागते, पर्यवेक्षक या ना त्या कारणाने तुमच्या कडे येतात, बोलतात.. अशा कारणांनी विचलित न होता आपण आपल्या पेपर कडे लक्ष द्यावे लागते.
🔹कायम लक्षात ठेवा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या अनेक परीक्षांपैकीच ही एक परीक्षा आहे. This is just an exam, no more no less.. अशाच स्वरूपाच्या अनेक मोठ्या, वेगवेगळ्या संधी भविष्यात पण मिळणार आहेत..
So instead of worrying, stressing out, panicking.. just face it head on, with great confidence and calmness..

*सर्व विद्यार्थ्यांना NEET परीक्षेच्या खूप साऱ्या शुभेच्छा*
*Do your Best 👍🏻*

Palak Shikshak Sangh, Ichalkaranji.

NEET UG 2024 MOCK TEST PAPER AND SOLUTIONS
30/04/2024

NEET UG 2024 MOCK TEST PAPER AND SOLUTIONS

*Edustart 2023*पालक शिक्षक संघ इचलकरंजी आणि इचलकरंजी महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफिस इचलकरंजी, इचलकरंजी तहसील माहेश्वरी सभ...
31/12/2023

*Edustart 2023*

पालक शिक्षक संघ इचलकरंजी
आणि इचलकरंजी महानगरपालिका, रोटरी क्लब ऑफिस इचलकरंजी, इचलकरंजी तहसील माहेश्वरी सभा यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या
"दहावीनंतर काय? "
याविषयी मार्गदर्शन व चर्चासत्र 20 डिसेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी पालकांचा प्रचंड असा प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाला मा केदार टाकळकर यांनी दहावी नंतरचे वेगवेगळे करिअर पर्याय याबद्दल विस्तृत असं विवेचन केलं. यावेळी
डॉ. अजित पाटील यांनी करिअर कसे निवडावे याबद्दल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रा प्रमोद पाटील यांनी केलं.
पालक शिक्षक संघ गेली पंधरा वर्षे सातत्याने विविध विद्यार्थी आणि पालकांच्या हिताचे कार्यक्रम राबवत असतो. अतिशय निस्पृह पणे ही मंडळी विद्यार्थ्यांचा भवितव्य घडवण्यासाठी कायम धडपडत असतात.
डॉ.आर एन पाटील सर, डॉ मनीषा शेट्टी, उमेश राठी, शिरीष मुरदंडे,आदित्य मुरदुंडे, प्रा वेंकटेश बडवे डॉ जयश्री पाटील, प्रवीण कुरडे यांनी दररोज वेळ देऊन कार्यक्रमाचे छान नियोजन केले.
या उपक्रमाच्या आयोजना मध्ये इचलकरंजी महानगरपालिका, उपयुक्त श्री ठेंगल सो, महानगरपालिका शिक्षण मंडळ, बिरनगे सो, इरफान पठाण सर, घोडके सर, शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक पवार सर तसेच इचलकरंजीतील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांचे मोठे सहकार्य होते. श्री सुनील पाटील यानी मा. केदार टाकळकर सरांना या कार्यक्रमास निमंत्रित केले, त्यांचे विशेष आभार.

आदरणीय कस्तुरे अण्णा, प्रा एस जे पाटील सर, प्रा एच ए पाटील सर, रवी नेगलूर, प्रमोद कावरे, श्री देवकारे सर, श्री रत्नाकर विटेकरी, डॉ. पूजा रुईकर, श्री अशोक बुगड, श्री मिलिंद जगदाळे यांनीही वेळोवेळी सहभाग दिला.
डॉ. ए के गुप्ता सर, डॉ. विक्रम पाटील सर, डॉ आरती कोळी, खेडकर मॅडम, श्री प्रकाश भागाजे याचेही मार्गदर्शन या कार्यक्रमाला मिळाले..
आणि या सर्वांना स्वतः पडद्यामागे राहून, एका धाग्यामध्ये गुंफणारे , श्री राजेंद्र निंबाळकर सर यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत ...

Address

Near Post Office
Ichalkaranji
416115

Telephone

+919823227218

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Palak Shikshak Sangh Ichalkaranji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Palak Shikshak Sangh Ichalkaranji:

Share