सद्गुरू आण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, अ. लाट

  • Home
  • India
  • Ichalkaranji
  • सद्गुरू आण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, अ. लाट

सद्गुरू आण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, अ. लाट प.पु. सद्गुरू आण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, अ. लाट

21/05/2026

प.पु सद्गुरू आण्णा महाराज…🙇🏻‍♂️🌸

23/01/2023

*प. पू. सद्गुरु आण्णा महाराज यांचे प्रथम पुण्यतिथीनिमित्त होणारे धनगरी ओव्या चे कार्यक्रम....

गुरु पौर्णिमा 2022
11/07/2022

गुरु पौर्णिमा 2022

https://youtu.be/4-ohiEssz5A
19/05/2022

https://youtu.be/4-ohiEssz5A

#बिरदेव #जन्मोत्सव #सोहळा #अब्दुललाट Koli

23/02/2022
23/02/2022

प.पु सदगुरु अण्णा महाराज चरणकमल अभिषेक सोहळा

पादुका प्रतिष्ठापना सोहळा live पाहण्यासाठी...
23/02/2022

पादुका प्रतिष्ठापना सोहळा live पाहण्यासाठी...

22/02/2022

*प,पू,सद्गुरू आण्णा महाराज चरणकमल पादुका प्रतिष्ठापना सोहळा बुधुवारी दि 23 फेब्रुवारी 2022*
*महत्वाचे निवेदन*
१) आण्णा महाराज दत्त मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते दुचाकी,3 चाकी व 4 चाकी साठी बंद रहाणार आहेत
2 ) मंदिरात आत जाऊन दर्शन घेता येणार नाही
3 ) रांगेतून लावलेल्या बॅरिकेट्स मधूनच मंदिरा बाहेरून दर्शन घेऊन पुढे प्रसादासाठी जायचे आहे
4 ) व्हळीआगसे घराकडून प्रवेश आहे तर रिंग रोड वरून भाऊसाहेब चौगुले सोसायटी मार्गे बाहेर जाण्यासाठी रस्ता चालू आहे
5) गावकऱ्यांनी आपल्या टू व्हीलर सुद्धा बाहेर काढू नयेत घरीच लावाव्यात
6 ) वरील मार्गावर खाजगी 4 चाकी,रिक्षा,ट्रॅक्टर, ट्रक अथवा मोठी वाहने न लावता एक दिवस गावाबाहेर गाड्या लावाव्यात जेणे करून प्रवेश रांगेला अडचण होणार नाही
7 ) बाहेरगावच्या भाविकांच्या पार्किंग ची सोय बाजार कट्टा,तसेच आप्पासो चौगुले लगमान यांच्या शेतात केलेली आहे
8 ) जागेची कमतरता आणि होणाऱ्या गर्दीचा विचार करून मंदिराजवळ बाहेरून दर्शन आणि महाप्रसाद घेऊन ताबडतोब परिसर सोडणेचा आहे जेणे करून जास्तीत जास्त भाविकांना दर्शन व महाप्रसाद घेता येईल
9 ) मंदिर परिसरात ट्रस्ट ने नेमलेल्या अधिकृत स्वयंसेवकांशिवाय कुणीही थांबू नये
11 ) मिटिंग मध्ये ठरलेल्या विभागानुसारच आपण आपली सेवा द्यायची आहे ऐनवेळी कोणत्याही कामात हस्तक्षेप करू नये म्हणजे नियोजन बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी
10 ) आजपर्यंत आपण केलेल्या सहकार्यामुळेच हे पवित्र काम होत आलेले आहे उद्याही सर्वांनी सहकार्य कराल ही विनंती
कळावे
प,पू आण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि समस्त भाविक

*चला एका अदभुत आणि अपूर्व सोहळ्यात सामील होऊया,,,आपल्या लाडक्या दैवताच्या पवित्र चरणपादुकांची ग्रामप्रदक्षिणा यशस्वी करू...
22/02/2022

*चला एका अदभुत आणि अपूर्व सोहळ्यात सामील होऊया,,,आपल्या लाडक्या दैवताच्या पवित्र चरणपादुकांची ग्रामप्रदक्षिणा यशस्वी करूया,,,!*
प,पू सद्गुरू आण्णा महाराज यांना देवाज्ञा झाल्यानंतर त्यांच्या समाधीचे काम पूर्ण झाले आहे ,शास्त्रातील रिवाजानुसार 16 व्यदिवशी म्हणजे दि 23 फेब्रुवारी रोजी सदर समाधीवर अभिषेक,पुष्पवृष्टी आणि संस्कार करून त्यावर प,पू,सद्गुरू अण्णांच्या चरण पादुका स्थापित करावयाच्या आहेत
*तत्पूर्वी दि, 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता सदर पादुकांची ग्रामप्रदक्षिणा रथाथुन निघणार आहे* *प, पू,सद्गुरू,अण्णांच्या अंत्यदर्शन मार्गावरूनच ही प्रदक्षिणा निघणार आहे*
23 तारखेला होणारी गर्दी आणि त्यातून प्रत्येक ग्रामस्थांला पादुकांचे दर्शन होणे शक्य नाही म्हणून पादुका दर्शन हे ग्रामप्रदक्षिणा दिवशीच घ्यावे
सदर ग्रामप्रदक्षिणा मार्गावर होणारी गर्दी आणि बाहेरून येणाऱ्या भक्तांची संख्या विचारात घेऊन या मार्गावरील वाहने,बांधकाम साहित्य अथवा इतर अडथळे काढून घ्यावेत
ग्रामप्रदक्षिणा मार्गावर स्वच्छता,सडा, रांगोळी घालून गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी साठी रस्त्याच्या दुतर्फा उपस्थिती लावावी
प्रदक्षिणा मिरवणूक पाणी घालणे,आरती करणे यासाठी कुठेही थांबणार नाही अथवा पादुका दर्शनासाठी रथावर कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही याची नोंद घ्यावी
सुरुवातीला वाजंत्री,झान्ज पथक,वारकरी भजन यासह अन्य
लवाजमा असेल त्यामागे रथ असेल आणि रथापाठीमागे सर्व गावकरी आणि भाविक असतील हा क्रम बदलला जाणार नाही
रथासोबत मोजके ट्रस्ट ने नेमलेले स्वयंसेवक असतील याची दखल घ्यावी
*चला पुन्हा एकदा एका अदभुत अपूर्व आणि अद्वितीय* *सोहळ्याच्या तयारीला लागूया,,* *गावच्या एकीचे,सर्वधर्मसमभावाचे आणि प,पू,सद्गुरू अण्णांच्या संस्काराचे दर्शन घडवूया,,,* !
*श्री गुरुदेव दत्त !*

टीप,,,ग्रामप्रदक्षिणा मार्गावर स्वागत कमानी उभारणाऱ्या मंडळांना विनंती ऊसाची वाहतूक
सुरू आहे याचा विचार करून उंची ठेवावी

Address

Abdullat
Ichalkaranji
416143

Telephone

+918390032030

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सद्गुरू आण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, अ. लाट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share