Rotary club of Goregaon

Rotary club of Goregaon ROTARY CLUB OF GOREGAON

साउथ-ईस्ट एशिया च्या रिजनल ग्रॅंट्स् ऑफिसर *कु. कॅरोलिन क्वाक* यांनी आज आरसी गोरेगावला भेट दिली; त्यांच्यासोबत डीजी संतो...
28/11/2025

साउथ-ईस्ट एशिया च्या रिजनल ग्रॅंट्स् ऑफिसर *कु. कॅरोलिन क्वाक* यांनी आज आरसी गोरेगावला भेट दिली; त्यांच्यासोबत डीजी संतोष आणि फर्स्ट लेडी तनुजा होत्या. या भेटीचा उद्देश २०२२ मध्ये सुरू झालेला आमचा प्रतिष्ठित सौर प्रकल्प तेजोनिधीचे मूल्यांकन करणे हा होता.
हा एक ९६००० अमेरिकन डॉलर्स किमतीचा एक ग्लोबल ग्रॅंट प्रोजेक्ट आहे.

त्यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी केली आणि काही अतिशय अभ्यासपूर्ण, समर्पक आणि मुद्देसूद प्रश्न विचारून प्रकल्पाच्या बारीकसारीक तांत्रिक बाबी जाणून घेतल्या.
प्रकल्पाची रचना, अंमलबजावणी आणि कार्यान्वित करण्याच्या पद्धतीबद्दल आणि त्याचा केवळ आर्थिकच नव्हे तर पर्यावरणावर होणारा सकारात्मक परिणाम याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी अशी आशा देखील व्यक्त केली की हा प्रोजेक्ट केवळ आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात भविष्यातील रोटरीच्या प्रकल्पांसाठी एक आदर्श ठरेल.
आरसी गोरेगावच्या सदस्यांव्यतिरिक्त, गोरेगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांनीही त्यांचे हार्दिक स्वागत केले. आणि गावाच्या वतीने आपली कृतज्ञता व्यक्त केली.
क्लब सदस्यांनी आदरणीय पाहुण्यांसोबत आनंददायी जेवण घेऊन भेटीचा समारोप झाला. अँन्स नी पुरणपोळी, बेसन लाडू, उकडीचे मोदक, खमन ढोकळा आणि खांडवी (सुरळीच्या वड्या) सारखे पारंपारिक भारतीय पदार्थ बनवून सुश्री कॅरोलिन ला आनंदाचा धक्का दिला! त्यांना जेवण खूप आवडले हे सांगायला नकोच!
आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आम्ही डीजी संतोष, सुश्री कॅरोलाइन क्वाक आणि रोटे. तनुजा यांचे ॠणी आहोत!

Mahavir Jain Hitesh Shah Tushar Patel Mandar Mohan Metha Pritam Gandhi Abhijitt Ggandhi Pramod Savadatti Vikas Bhuskute Girishkumar Metha

06/11/2025

💔 अत्यंत दुःखद घोषणा: या वर्षाचा 'कला मंच' उपक्रम स्थगित 💔
प्रिय नाट्यप्रेमी रसिकहो,
रोटरी क्लब ऑफ गोरेगाव गेली १० वर्षे आपल्या छोट्या गावात मराठी नाटकांची 'नाट्यधारा' अखंडितपणे वाहत ठेवत आहे. आपला उत्साह आणि मिळालेला प्रतिसाद हेच या उपक्रमाचे खरे यश होते.
यावर्षीचा उपक्रम सुरू ठेवण्यासाठी क्लबने एक महत्त्वाचा संकल्प केला होता: ४०० वार्षिक सभासद पूर्ण करणे. हे ध्येय व्यावसायिक फायद्यासाठी नसून, नाटकांच्या आयोजनाचा खर्च आणि कार्यकर्त्यांचे दर-ओ-दार फिरणे थांबवून, अधिक चांगली सेवा देण्यासाठी निश्चित करण्यात आले होते.
परंतु...
अत्यंत जड अंतःकरणाने आम्हाला कळवावे लागत आहे की, अपेक्षित ४०० सभासद संख्येच्या उद्दिष्टाला मिळालेला कमी प्रतिसाद आणि सदस्य नोंदणी पूर्ण न झाल्यामुळे, रोटरी क्लब ऑफ गोरेगाव या वर्षाचा (२०२५-२०२६) 'कला मंच' अर्थात वार्षिक नाट्य उपक्रम स्थगित करत आहे.
🙏 आम्ही दिलगीर आहोत!
• ज्या 300सदस्यांनी तत्परतेने प्रतिसाद दिला आणि संस्थेवर विश्वास ठेवला, त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत.

🤔 भविष्यासाठी एक प्रश्न:
केवळ ४०० सभासदांची पूर्तता न करू शकल्याने, आपल्या गावात नाट्यगृहाची अनुपस्थिती भरून काढणारा हा सांस्कृतिक ठेवा थांबवावा लागत आहे.
हा ब्रेक अंतिम नाही!
आम्हाला विश्वास आहे की, भविष्यात आपल्याला नाट्यकलेचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे पटेल आणि आपण सर्वजण एकत्र येऊन या उपक्रमाला पुन्हा एकदा जोरदार सुरुवात करू शकू.
या १० वर्षांच्या प्रवासात साथ दिल्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार.
पुन्हा भेटू... रंगमंचावर!
आपले नम्र,
रोटरी क्लब ऑफ गोरेगाव

🌟 Annual District Awards | RY 2024-25 🌟A proud moment for Rotary Club of Goregaon at the Annual District Awards!🏆 Impact...
30/07/2025

🌟 Annual District Awards | RY 2024-25 🌟

A proud moment for Rotary Club of Goregaon at the Annual District Awards!

🏆 Impact Service Project Ex*****on
🌍 Successful Global Grant Project
💼 Zone’s First-Ever CSR Initiative
💯 100% Club Giving to The Rotary Foundation
🎖️ Abhijeet Gandhi awarded Best District Secretary – Events & Meets

These recognitions reflect our dedication to meaningful service, sustainability, and collective excellence. Grateful to all who made this possible!

04/07/2025
HAPPY DOCTORS DAY
01/07/2025

HAPPY DOCTORS DAY

लवकरात लवकर आपली सभासद नाव नोंदणी करावी.Online सीट बुकींग ची सुविधा उपलब्ध आहे
07/09/2024

लवकरात लवकर आपली सभासद नाव नोंदणी करावी.
Online सीट बुकींग ची सुविधा उपलब्ध आहे

Address

Goregaon West
402103

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rotary club of Goregaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share