Adim_Sanstha

Adim_Sanstha It has been registered at the Charity Commissioner's Office, Pune. The organization has undertaken various constructive activities. is included.

आदिम संस्कृती अभ्यास,संशोधन व मानव विकास केंद्र
[ Center for Primitive Culture Studies, Research and Human Development ]
This is the official page of the Organization An independent social institution named 'Center for Primitive Culture Studies, Research and Human Development ' was established in 2012 to research and preserve tribal dialects and culture and to increase employment generat

ion in rural areas and expand social work. The organization is doing research, constructive work in the context of law literacy, adult literacy, health, education and employment in Ambegaon taluka and especially on the issue of tribals and backward tribes. These include adult literacy classes, health camps, law workshops, building libraries in villages, etc.

वार – रविवार  | दि.०१/०३/२०२६ तांबे येथे पेसा ग्रामकोष समितीच्या पुढाकारातून दोन दिवसीय 'शाश्वत उपजीविका व उद्योजकता विक...
08/03/2026

वार – रविवार | दि.०१/०३/२०२६

तांबे येथे पेसा ग्रामकोष समितीच्या पुढाकारातून दोन दिवसीय 'शाश्वत उपजीविका व उद्योजकता विकास' प्रशिक्षण

आदिवासी भागातील महिलांचे आर्थिक परावलंबित्व कमी करून त्यांना 'कृषी-उद्योजक' बनवण्यासाठी तांबे (ता. जुन्नर) येथे दोन दिवसीय 'शाश्वत उपजीविका व उद्योजकता विकास' प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पेसा ग्रामकोष समिती- ग्रामपंचायत तांबे, आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र - आंबेगाव आणि विज्ञान आश्रम - पाबळ यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

तांबे गाव नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असूनही रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश होता. दि.२८ फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तांबे येथे हे प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात तांबे गावातील ७० महिलांनी सहभाग नोंदवला. या प्रशिक्षणाचे उदघाटन कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सरपंच मीराबाई मडके, उपसरपंच चंद्रकांत पारधी, सदस्य संतोष डावखर, विकास मडके, सुरेखा जोशी, ग्रामपंचायत अधिकारी नितीन भवारी, सुशील मडके, प्रफ्फुल जोशी, सखाराम लोहकरे इ. उपस्थित होते.

प्रशिक्षणादरम्यान विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी महिलांना मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी अरविंद मोहरे यांनी इस्रायली तंत्रज्ञानाने आंबा, काजू, लिंबू तसेच स्ट्रॉबेरी व बांबू लागवडीचे तंत्र या विषयी माहिती दिली. विश्वनाथ निगळे यांनी 'विकसित भारत रोजगार मिशन' (मनरेगा) आणि समीर गारे यांनी महाडीबीटी पोर्टल व सौर कृषी पंप योजनांची माहिती दिली. विज्ञान आश्रम पाबळ चे गणेश पिंगळे यांनी कुक्कुटपालन व शेळीपालनातील लसीकरण आणि सुधारित निवारा व्यवस्थापन व बाजारपेठ याविषयी माहिती दिली. दरम्यान महिलांना 'हातसडीचा तांदूळ' तयार करणे, पॅकेजिंग आणि ग्रेडिंग याविषयी देखील माहिती दिली.
"आम्ही आता पारंपरिक शेतीसोबतच कुक्कुटपालन व फळबाग व्यवसाय खात्रीने करू," असा विश्वास प्रशिक्षणार्थी यांनी व्यक्त केला. आदिम संस्थेचे सचिव डॉ. अमोल वाघमारे आणि व्यवस्थापक प्रा. स्नेहल साबळे यांनी सांगितले की, केवळ प्रशिक्षण देऊन न थांबता, महिलांना पुढील काळात व्यवसाय उभा करण्यासाठी ही सहकार्य केले जाईल.

पेसा ग्रामकोष समितीचे किरण लोहकरे, लिला जोशी व पेसा मोबीलायझर आश्विनी मडके यांनी हा कार्यक्रम यशस्वी यासाठी विशेष पुढाकार घेतला होता.

Happy Women's Day
08/03/2026

Happy Women's Day

हार्दिक अभिनंदन!
24/02/2026

हार्दिक अभिनंदन!

पत्रकार बंधू व वृत्तपत्रांचे उपक्रमाची दखल घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार!
20/01/2026

पत्रकार बंधू व वृत्तपत्रांचे उपक्रमाची दखल घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार!

📍वार – शनिवार | दि. १७/०१/२०२६  फुलवडे येथे जन आरोग्य समितीने राबविली ‘गाव आरोग्य मुल्यांकन’ प्रक्रिया फुलवडे :  आरोग्य ...
18/01/2026

📍वार – शनिवार | दि. १७/०१/२०२६

फुलवडे येथे जन आरोग्य समितीने राबविली ‘गाव आरोग्य मुल्यांकन’ प्रक्रिया

फुलवडे : आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि ग्रामीण भागातील आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी शनिवार, दि. १७ जानेवारी २०२६ रोजी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र फुलवडे येथे जन आरोग्य समितीच्या वतीने 'गाव आरोग्य मूल्यांकन' प्रक्रिया अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आली. या उपक्रमांतर्गत गावच्या आरोग्य स्थितीचा आढावा घेऊन भविष्यातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या दरम्यान समिती सदस्यांनी गावातील मोहरेवाडी, हिलेवाडी आणि नंदकरवाडी येथील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. शाळा, उपकेंद्र, पाण्याचे स्रोत याही ठिकाणांना भेटी देण्यात आल्या व येथील समस्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अंगणवाडी सेविकांनी अनेक गंभीर समस्या मांडल्या. सध्या अंगणवाडीची सर्व कामे ऑनलाइन प्रणालीवर आधारित आहेत, मात्र दुर्गम भागात इंटरनेटची रेंज नसल्यामुळे रिपोर्टिंगमध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. याचा थेट परिणाम सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यावर होत असून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. यावर सरपंच यांनी तातडीने दखल घेत आगामी ग्रामसभेत हा विषय मांडण्याचे आणि बीएसएनएल (BSNL) टॉवरच्या रेंज संदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. मूल्यांकन प्रक्रियेत असे निदर्शनास आले की, ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाच अंगणवाड्यांमध्ये अद्याप विजेची सोय नाही. यावर उपाय म्हणून जन आरोग्य समितीने ग्रामपंचायत किंवा सामाजिक संस्थांच्या (CSR) माध्यमातून या ठिकाणी कायमस्वरूपी 'सोलर पॅनेल' बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच, उघडेवाडी येथे हक्काची इमारत नसल्याने अंगणवाडी सेविकेच्या घरात भरते. जागेच्या अभावी दोन वेळा मंजूर झालेली इमारत रद्द झाली होती; मात्र आता जन आरोग्य समितीने पुढाकार घेऊन जागा उपलब्ध करून तिथे नवीन इमारत बांधण्यासाठी पाठपुरावा करण्याचे निश्चित केले आहे. यासोबत अनेक मुद्यांवर चर्चा करून पुढील वर्षात जन आरोग्य समितीने आपल्या कामाचा आराखडा तयार केला.

उपकेंद्र स्तरावर 'RRA' (Rapid Rural Appraisal - जलद ग्रामीण मूल्यांकन) प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी कर्वे संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने ग्रामस्थांनी गावाचा 'सामाजिक नकाशा' तयार केला. या नकाशाच्या माध्यमातून गावातील भौगोलिक स्थिती, वस्त्या आणि तेथील आरोग्याच्या समस्यांचे दृष्य स्वरूप मांडण्यात आले, ज्यामुळे भविष्यातील आरोग्य आराखडा तयार करणे सोपे होणार आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत उत्तम आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी जन आरोग्य समितीने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद ठरत आहे.

या महत्त्वपूर्ण प्रक्रियेवेळी फुलवडे गावचे सरपंच बबन मोहरे, उपसरपंच तेजस्विनी भारमळ, ग्रापंचायत सदस्य तनुजा मोहरे, जन आरोग्य समितीचे सदस्य, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर साथी व आदिम संस्थेचे प्रतिनिधी समीर गारे, रोहिदास फलके आणि कर्वे समाजसेवा संस्थेचे विद्यार्थी उपस्थित होते. लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने या प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले होते.

Azim Premji FoundationAvinash GawariSantosh LohakareRotary InternationalTata Motors ICICI Bank

नारोडी येथे जन आरोग्य समितीच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर आयुष्यमान भारत कार्डांचे वाटप आणि ३५ हून अधिक ग्रामस्थांच...
10/01/2026

नारोडी येथे जन आरोग्य समितीच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिर
आयुष्यमान भारत कार्डांचे वाटप आणि ३५ हून अधिक ग्रामस्थांची कर्करोग तपासणी

जन आरोग्य समिती, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र नारोडी व ग्रामपंचायत नारोडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. ०८ जानेवारी, २०२६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयात 'सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे' आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नारोडी आणि परिसरातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, जन आरोग्य समितीच्या माध्यमातून गावात हे शिबिर पार पडल्याने गावातील लोकांना याचा लाभ घेता आला यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या आरोग्य सोयी गावातच उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने उच्च रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) आणि कर्करोग (कॅन्सर) यांसारख्या गंभीर आजारांच्या प्राथमिक तपासण्या मोफत करण्यात आल्या. शिबिरातील आकडेवारीनुसार ३५ ग्रामस्थांची उच्च रक्तदाब व शुगर तपासणी करण्यात आली. ३५ नागरिकांची कर्करोग निदानासाठी रक्त तपासणी करण्यात आली. शासनाच्या आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी एकूण ४५ नागरिकांनी नवीन आयुष्यमान भारत कार्डांसाठी नोंदणी केली आणि कार्ड काढून घेतले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे नियोजन जन आरोग्य समितीच्या सदस्यांनी उत्तमरीत्या केले होते. हे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी जन आरोग्य समिती - आरोग्य वर्धिनी उपकेंद्र नारोडी, प्राथमिक आरोग्य केंद्र – लांडेवाडी , ग्रामपंचायत नारोडी, साथी संस्था - पुणे , आदिम संस्था – आंबेगाव यांनी विशेष सहकार्य केले.

Azim Premji Foundation Samir Ashabai Machhindra@followers

झारखंड आंदोलनाचे प्रणेते , संविधान सभेचे सदस्य , भारतीय हॉकी खेळाडूमा. जयपाल सिंह मुंडायांना जन्मदिनी विनम्र अभिवादन !  ...
03/01/2026

झारखंड आंदोलनाचे प्रणेते , संविधान सभेचे सदस्य , भारतीय हॉकी खेळाडू
मा. जयपाल सिंह मुंडा
यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन !

Samir Ashabai MachhindraSnehal Sable

स्री शिक्षणाच्या अग्रणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन!        #सावित्री
03/01/2026

स्री शिक्षणाच्या अग्रणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन!
#सावित्री

निगडाळे येथे प्रौढ साक्षरता वर्गाचे उत्साहात उद्घाटनघोडेगाव (दि.२४/११/२०२५ ) : शिक्षणापासून वंचित राहिलेल्या प्रौढांना ज...
02/01/2026

निगडाळे येथे प्रौढ साक्षरता वर्गाचे उत्साहात उद्घाटन

घोडेगाव (दि.२४/११/२०२५ ) : शिक्षणापासून वंचित राहिलेल्या प्रौढांना ज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी भीमाशंकर जवळील निगडाळे येथे आदिम संस्थेच्या वतीने प्रौढ साक्षरता वर्ग सुरु करण्यात आला आहे. या प्रौढ साक्षरता वर्गाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्यांने व आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र, आंबेगाव यांच्या स्थानिक संयोजनातून निगडाळे येथे प्रौढ साक्षरता वर्ग नागरिकांच्या मागणीनुसार सुरु करण्यात आला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक पेकारी यांनी आपल्या मनोगतातून शिक्षणाचे महत्त्व सांगून, 'माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, शिक्षणाला वयाचे बंधन नसते. आपण घेतलेला हा निर्णय आपल्या पुढील पिढीसाठी खूप महत्वाचा आहे,' असे मत व्यक्त केले. सध्या या वर्गात १८ प्रौढ नागरिक दाखल झाले असून, त्यांना अक्षर ओळख, मूलभूत अंकज्ञान आणि व्यवहारज्ञान शिकवले जाणार आहे. यासोबतच विविध कायद्यांविषयी, योजनांविषयी देखील माहिती दिली जाणार आहे. हा वर्ग दररोज संध्याकाळी चालणार आहे. हा प्रौढ साक्षरता वर्ग निगडाळे गावातील अनेकांसाठी ज्ञानाचे एक नवीन दालन उघडणार असून, गावाच्या विकासाला गती देईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार या वर्गात अध्यापनाचे काम करणाऱ्या स्वयंसेविका अश्विनी लोहकरे यांनी मांडले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक पेकारी, अशोक जोशी आदिम संस्थेचे प्रा.स्नेहल साबळे , समीर गारे, सतीश लोहकरे आदी नागरिक यावेळी उपस्थित होते.

Samir Ashabai MachhindraRotary InternationalRotarySnehal Sable Azim Premji Foundation

Happy New Year!        Samir Ashabai MachhindraSnehal Sable
01/01/2026

Happy New Year!
Samir Ashabai MachhindraSnehal Sable

इंदिरानगर ( शिनोली) येथे प्रौढ साक्षरता वर्गाचे उत्साहात उद्घाटनघोडेगाव (दि.०६/१२/२०२५) : शिक्षणापासून वंचित राहिलेल्या ...
01/01/2026

इंदिरानगर ( शिनोली) येथे प्रौढ साक्षरता वर्गाचे उत्साहात उद्घाटन

घोडेगाव (दि.०६/१२/२०२५) : शिक्षणापासून वंचित राहिलेल्या प्रौढांना ज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिनोली येथील इंदिरानगर येथे आदिम संस्थेच्या वतीने प्रौढ साक्षरता वर्ग सुरु करण्यात आला आहे. या प्रौढ साक्षरता वर्गाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ यांच्या सहकार्यांने व आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र, आंबेगाव यांच्या स्थानिक संयोजनातून शिनोली येथील इंदिरानगर या आदिवासी कातकरी समुदायाच्या वस्तीवर हा प्रौढ साक्षरता वर्ग येथील नागरिकांच्या मागणीनुसार सुरु करण्यात आला आहे.

यावेळी संस्थेचे प्रा.स्नेहल साबळे यांनी आपल्या मनोगतातून शिक्षणाचे महत्त्व सांगून, 'माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, शिक्षणाला वयाचे बंधन नसते. आपण घेतलेला हा निर्णय आपल्या पुढील पिढीसाठी खूप महत्वाचा आहे,' असे मत व्यक्त केले. सध्या या वर्गात २० प्रौढ महिला दाखल झाल्या असून, त्यांना अक्षर ओळख, मूलभूत अंकज्ञान आणि व्यवहारज्ञान शिकवले जाणार आहे. यासोबतच विविध कायद्यांविषयी, योजनांविषयी देखील माहिती दिली जाणार आहे. हा वर्ग दररोज संध्याकाळी चालणार आहे. हा प्रौढ साक्षरता वर्ग इंदिरानगर (शिनोली) वस्तीतील अनेकांसाठी ज्ञानाचे एक नवीन दालन उघडणार असून, या आदिवासी कातकरी समुदायाच्या विकासाला गती देईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार या वर्गात अध्यापनाचे काम करणाऱ्या स्वयंसेविका अर्चना चौरे यांनी मांडले. यावेळी संस्थेचे प्रा.स्नेहल साबळे, समीर गारे आदी नागरिक यावेळी उपस्थित होते.

Samir Ashabai Machhindra Rotary International Snehal Sable

घोडेगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना संस्थेच्या वतीने अभिवादनघोडेगाव (दि.२८/११/२०२५ ) : महान समाजसुधारक आणि क्रांतीस...
01/01/2026

घोडेगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना संस्थेच्या वतीने अभिवादन

घोडेगाव (दि.२८/११/२०२५ ) : महान समाजसुधारक आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनी घोडेगाव येथील संस्थेच्या कार्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजप्रेमी नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी महात्मा फुले यांनी मांडलेल्या समता, शिक्षण आणि सत्यशोधक विचारांचे स्मरण केले व यावर संवाद साधला. संस्थेच्या वतीने दरवर्षी अशा थोर महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात, त्याचाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना संस्थेचे डॉ.अमोल वाघमारे यांनी सांगितले की, ‘महात्मा फुले यांनी शोषित आणि वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे उघडली. त्यांनी दिलेला ज्ञानाचा वारसा पुढे नेणे हीच काळाची गरज आहे.’ विशेषतः आदिवासी आणि कष्टकरी समाजाच्या प्रगतीसाठी महात्मा फुलेंचे विचार आजही दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.
यावेळी संस्थेचे डॉ.अमोल वाघमारे, प्रा.स्नेहल साबळे , ऋतुजा भवारी, संचिता अलका, एसएफआय चे रोहिदास फलके, यश गभाले आदी यावेळी उपस्थित होते.

Samir Ashabai MachhindraSnehal Sable Rotary International

Address

Trimurti Bhavan, Near Junnar Phata
Ghodegaon
412408

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919168192823

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adim_Sanstha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Adim_Sanstha:

Share