04/05/2026
प्रकल्प जलशारदा: दुष्काळमुक्तीकडे टाकलेले एक खंबीर पाऊल!
गेवराई तालुक्यातील आवर्षणप्रवण भागात 'प्रकल्प जलशारदा' अंतर्गत नदी-ओढ्यांच्या खोलीकरण व विस्तारीकरणाच्या कामांना आजपासून गती मिळत आहे. आज सकाळी मौजे धानोरा येथे नाला सरळीकरण, खोलीकरण व विस्तारीकरणाच्या कामाचा शुभारंभ जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या 'गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार' या योजनेतून नाम फाऊंडेशन व शारदा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने ही लोकहिताची कामे हाती घेण्यात आली आहेत.
दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सिंचन सुविधा वाढविण्याची नितांत गरज आहे. जलसंधारणाची हीच लहान-लहान कामे भविष्यात भूजल पातळी वाढवण्यासाठी आणि दुष्काळ निवारणार्थ मोठी मदत ठरणार आहेत. दुष्काळमुक्त आणि सुजलाम-सुफलाम गेवराईसाठी शारदा प्रतिष्ठान कटिबद्ध आहे.
या शुभारंभप्रसंगी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. कालिदास नवले, चेअरमन श्री. बाबुराव शिंदे, सरपंच श्री. अविनाश राऊत, उपसरपंच श्री. शिवाजी शिंदे, श्री. मधुकर येवले, श्री. उमेश येवले, श्री. महादेव पट्टे, श्री. बाबुराव अंबादास शिंदे, श्री. शिवप्रसाद शिंदे, श्री. अनिरुद्र पट्टे, श्री. विजय खुणे, श्री. संदिपान शिंदे, श्री. प्रकाशराव शिंदे, श्री. महेश खुणे, ग्रामपंचायत सदस्य श्री. गणेश शिंदे, श्री. नंदकुमार शिंदे, श्री. सतीश कांबळे, श्री. संजय सावंत, श्री. दत्ता दादा शिंदे, श्री. दत्ता पाटील खुणे, श्री. बालाजी गायकवाड, श्री. सोहम शिंदे, श्री. ओमप्रकाश शिंदे, श्री. अशोक खंडागळे, श्री. विश्वास कांबळे यांच्यासह धानोरा ग्रामस्थ व परिसरातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.