12/12/2025
अविस्मरणीय क्षण..!
महाराष्ट्र शासनातर्फे आरोग्य सेवेतील उत्कृष्ट कार्यासाठी सन्मानित...!
आरोग्य मंत्री सन्माननीय प्रकाश आबिटकर साहेब यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान....!
AIIMS नागपूर येथे आयोजित विभागीय आढावा सभा तथा कार्यशाळा – आरोग्य विभाग महाराष्ट्र – या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय *सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री मा. श्री. प्रकाशजी आबिटकर सर* यांच्या हस्ते मला प्रदान करण्यात आलेल्या प्रशस्तीपत्र आणि सन्मानाबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञ आहे. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्याचे *प्रधान सचिव आरोग्य विभाग डॉ.निपुण विनायक सर मुंबई आरोग्य भवन, डॉ इ सुंदरम सर सचिव आरोग्यसेवा मुंबई, डॉक्टर खंडागळे सर सचिव माता बालसंगोपन आरोग्य विभाग पुणे, सहसंचालक कुष्ठरोग डॉक्टर वाघमारे सर, डॉ जोशी सर संचालक AIIMS हॉस्पिटल नागपूर* उपस्थित होते.
आदिवासी भागातील PHC नारंडा अंतर्गत उपकेंद्र पीपरडा येथे HR गरोदर मातांना उत्कृष्ट सेवा, समुपदेशन व आवश्यक उपचार पुरवून माता-मृत्यू व बालमृत्यू रोखण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळालेल्या या गौरवामुळे सेवाभाव अधिक दृढ झाला आहे. तसेच विविध आरोग्यविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल मिळालेला हा सन्मान संपूर्ण आरोग्य यंत्रणेचे आहे.
या यशामागे सदैव साथ, सहकार्य व मार्गदर्शन देणारे
चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे सर, DRCHO डॉ. गिरी सर, THO डॉ. स्वप्नील टेंबे सर यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि मार्गदर्शनामुळेच ग्रामीण व आदिवासी भागातील आरोग्यसेवा अधिक परिणामकारकपणे पुरवता आली. या प्रवासात माझ्या आई-वडिलांच्या कार्याची प्रेरणा त्यांचा आशीर्वाद.. तसेच माझी गृहिणी डॉक्टर नंदिनी मोरे हिची साथ सदैव सोबत आहे.
माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आरोग्य विभागाचेही मनापासून आभार.
हा सन्मान म्हणजे माझ्या सेवाप्रवासातील प्रेरणादायी क्षण असून, पुढील काळातही ‘माणसेवी सेवाभाव’ जपत आरोग्यसेवेचे कार्य अधिक निष्ठेने करत राहीन.
आपला
डॉ. कुलभूषण मोरे
माणसेवी वैद्यकीय अधिकारी
उपकेंद्र पीपरडा PHC नारंडा