Tilaknagar Sarvajanik Ganeshotsav Mandal

Tilaknagar Sarvajanik Ganeshotsav Mandal This is a NGO

" #शौर्य,  #संस्कृती आणि  #स्वाभिमान यांची ओळख –  #आपला  #महाराष्ट्र!..... #महाराष्ट्र  #दिनाच्या  #मंडळातर्फे  #हार्दिक...
01/05/2026

" #शौर्य, #संस्कृती आणि #स्वाभिमान यांची ओळख – #आपला #महाराष्ट्र!.....

#महाराष्ट्र #दिनाच्या #मंडळातर्फे #हार्दिक #शुभेच्छा!"

सस्नेह निमंत्रण.....प्रति महिन्याप्रमाणे मंडळाच्या ऑफिसमध्ये संध्याकाळी ७ ते ८.३० या वेळात यथाशक्ती अथर्वशीर्षाची आवर्तन...
29/04/2026

सस्नेह निमंत्रण.....

प्रति महिन्याप्रमाणे मंडळाच्या ऑफिसमध्ये संध्याकाळी ७ ते ८.३० या वेळात यथाशक्ती अथर्वशीर्षाची आवर्तन पार पडणार आहेत. आपल्या ओळखीत सुद्धा याची माहिती द्यायला विसरू नका..

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणिमनोदय ट्रस्ट फिनिक्स , डोंबिवली ह्यांच्या सहकार्याने एक अनोखा उपक्रम "परिवर्तन"'मना ...
26/04/2026

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
आणि
मनोदय ट्रस्ट फिनिक्स , डोंबिवली
ह्यांच्या सहकार्याने

एक अनोखा उपक्रम
"परिवर्तन"
'मना मनात बांधू या सकारात्मकतेची भिंत'

डोंबिवली येथे गेली सतरा वर्षे, 'मनोदय ट्रस्ट' फिनिक्स गट नामक पुनर्वसन केंद्र चालवत आहे.

येथे मानसिक रुग्ण ज्यांचे उपचार चालू आहेत अशांसाठी मनोदय संस्था त्यांना वर्तमानपत्राच्या कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण देत आहे.

कागदी पिशव्या वापरणे हे पर्यावरण पूरक आहे. कागदी पिशव्यांना पोळी-भाजी केंद्र, औषध दुकाने यांचेकडून बरीच मागणी आहे. यातून मिळणारे पैसे हे शुभार्थीना त्यांनी केलेल्या कामाप्रमाणे दिले जातात.

महिन्याला साधारणपणे १५० किलो पेपर रद्दी लागते. तर ह्या वर्षी पासून मंडळ खारीचा वाटा उचलत आहे ,मंडळातर्फे आपणास विनंती आहे की आपल्या जितकी शक्य असेल, तितकी रद्दी आपण ह्या संस्थेला दान करावी.
संस्थेला आपल्या सहकार्याची गरज आहे.

वृत्तपत्र संकलन ड्राइव्ह

रविवार, ०७ जून २०२६
वेळ :- सकाळी १० ते ११
कार्यालय पत्ता:- १, विराट सोसायटी, टिळकनगर विद्यामंदिर रोड, टिळकनगर डोंबिवली (पूर्व.)

फोन नंबर: ९८१९९५३०६१

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,                         आणि                    ऊर्जा फाऊंडेशन                       आय...
25/04/2026

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,
आणि
ऊर्जा फाऊंडेशन
आयोजित

♻️प्लास्टिक कचरा
📀 ई-कचरा
📦कपडे संकलन ड्राईव्ह..

🚮माझा प्लास्टिक कचरा ही माझीच जबाबदारी.🚮

चला एक पाऊल टाकूया प्लास्टिक मुक्त डोंबिवलीकडे...🏃

रविवार, दि. ०७ जून २०२६
वेळ:- सकाळी १०.०० ते ११.००
पत्ता:- गाळा नं १, विराट सोसायटी, टिळकनगर विद्यामंदिर रोड, टिळकनगर डोंबिवली (पूर्व.)

या सोयीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरण संवर्धनाला आपला हातभार लावावा. आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप ला शेअर करा तसेच स्टेटसला ठेवून याची माहिती जास्तीत जास्त लोकांना द्या व मंडळाला सहकार्य करा.

संपर्क:-
9819953061

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ                     आयोजित        रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट                        आण...
25/04/2026

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
आयोजित
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली ईस्ट
आणि
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
ह्यांच्यासहकार्याने,

"संजीवनी"
Return your expired & Unwanted medicine Drive

या उपक्रमातून मुदतबाह्य आणि निरुपयोगी असणाऱ्या गोळ्यांचा आणि द्रव औषधांचा होणार कचरा घरगुती कचऱ्यात किंवा शौचालयात किंवा बागेत किंवा झाडांमध्ये टाकल्याने होणारे प्रदूषण आणि अशा कृतींमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळणे आणि यांविषयी जनजागृती करणे हे ह्या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे..

नागरिकांकडून गोळ्या, कॅप्सूल्स, द्रव औषधे, मलम, पावडर, तसेच डोळे, कान आणि नाकात टाकण्याचे थेंब (ड्रॉप्स) अशा विविध प्रकारची औषधे या अभियानातून संकलित करण्यात येतील आणि त्याची शास्त्रीय आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट करण्यासाठी ती महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
कोणत्याही प्रकारची सौंदर्य प्रसाधने, मलम, तेल इत्यादी स्वीकारण्यात येणार नाहीत.

या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरण संवर्धनाला आपला हातभार लावावा. आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप ला शेअर करा तसेच स्टेटसला ठेवून याची माहिती जास्तीत जास्त लोकांना द्या आणि मंडळाला सहकार्य करा.

रविवार, दि. ०७ जून २०२६
वेळ:- सकाळी १०.०० ते ११.००
कार्यालय पत्ता:-१, विराट सोसायटी, टिळकनगर विद्यामंदिर रोड, टिळकनगर डोंबिवली (पूर्व.)

संपर्क:-
9969963277
9819953061

अक्षय्य तृतीयेच्या मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा!
19/04/2026

अक्षय्य तृतीयेच्या मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा!

 #टिळकनगर  #सार्वजनिक  #गणेशोत्सव  #मंडळ                     आयोजित    #रोटरी  #क्लब  #ऑफ  #डोंबिवली  #ईस्ट             ...
02/04/2026

#टिळकनगर #सार्वजनिक #गणेशोत्सव #मंडळ
आयोजित
#रोटरी #क्लब #ऑफ #डोंबिवली #ईस्ट
आणि
#कल्याण #डोंबिवली #महानगरपालिका
ह्यांच्यासहकार्याने,

" #संजीवनी"
Return your expired & Unwanted Madicine Drive

पर्यावरण संरक्षण आणि जनआरोग्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलत..
#मुदत #संपलेली, #अंशतः वापरलेली आणि #खराब झालेली #औषधे संकलित करणे हा मूळ उद्देश आहे तसेच या उपक्रमाला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे ( ) सहकार्य देखील आहे ..

या उपक्रमातून आणि असणाऱ्या गोळ्यांचा आणि सिरप बॉटल ह्यांचा होणार कचरा, सिंक , घरगुती कचऱ्यात किंवा शौचालयात फेकून दिल्याने होणारे पर्यावरणीय प्रदूषण आणि अशा कृतींमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके यांविषयी जनजागृती हे ह्या उपक्रमाचे उदिष्ट आहे..

नागरिकांकडून गोळ्या (टॅब्लेट्स), कॅप्सूल्स, सिरप, मलम, पावडर, तसेच डोळे, कान आणि नाकात टाकण्याचे थेंब (ड्रॉप्स) अशा विविध प्रकारची औषधे या अभियानातून संकलित करण्यात येतील आणि त्याची शास्त्रीय आणि वैज्ञानिक विल्हेवाटीसाठी ती महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.

या सोयीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरण संवर्धनाला आपला हातभार लावावा. आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप ला शेअर करा तसेच स्टेटसला ठेवून याची माहिती जास्तीत जास्त लोकांना द्या व मंडळाला सहकार्य करा.

रविवार, दि. १९ एप्रिल २०२६.
वेळ:- सकाळी १०.०० ते ११.००
पत्ता:- गाळा नं १, विराट सोसायटी, टिळकनगर विद्यामंदिर रोड, टिळकनगर डोंबिवली (पूर्व.)

संपर्क:-
9819953061
9969963277

24/03/2026

डोंबिवलीच्या ‘टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’तर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘श्री रामरक्षा पठण’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रामनवमीचे औचित्य साधून टिळकनगर विद्यामंदिर येथे सकाळी 10 ते 2 या वेळेत पार पडलेल्या या स्पर्धेत 40 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.

ही स्पर्धा 5 ते 10, 11 ते 18 आणि खुला गट अशा तीन वयोगटात घेण्यात आली असून प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले, तसेच काही गटांसाठी विशेष पारितोषिकेही देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण संतोष बुचके यांनी केले तर पौरोहित्य अमोल आठल्ये यांनी पार पाडले.

या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल प्रकल्पप्रमुख प्रसाद रिसबूड यांनी समाधान व्यक्त करत पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला; स्पर्धेच्या शेवटी सर्व स्पर्धक, पालक, कार्यकर्ते व परीक्षकांनी एकत्र ‘रामरक्षा’ पठण करून कार्यक्रमाची सांगता केली.

24/03/2026

टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा प्रथमच श्रीरामरक्षा पठण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रामनवमीच्या औचित्य साधून रविवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत टिळकनगर विद्यामंदिर येथे ही स्पर्धा पार पडली.

या उपक्रमाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत ४० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत श्रीरामरक्षा स्तोत्राचे भावपूर्ण पठण केले. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत विविध वयोगटातील सहभागींचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरला.

मंडळाने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला चालना मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन अधिक व्यापक स्वरूपात करण्याचा मानस मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Address

Tilaknagar Vidya Mandir Road
Dombivli
421201

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tilaknagar Sarvajanik Ganeshotsav Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Tilaknagar Sarvajanik Ganeshotsav Mandal:

Share