24/03/2026
डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान गेल्या २८ वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागतयात्रा आयोजित करते. या स्वागतयात्रेचे खास आकर्षण असते ते आपल्या ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात येणारे विशेष उपक्रम ! दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या उपक्रमांमुळे नववर्ष स्वागतयात्रा ही विशेष ठरली.
‘वंदे मातरम्’ गीताचे शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवी वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष अशी दुहेरी औचित्ये साधत नेहरू मैदानावर तब्बल १५० फूट उंच भव्य गुढी उभारण्यात आली. ही महाकाय गुढी विशाल हिंदुत्व आणि मराठमोळ्या संस्कृतीचे प्रतीक ठरली.
तसेच यंदाच्या यात्रेत क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित ‘देशसेवक क्रांतिकारी वेशभूषा स्पर्धे’त चिमुकल्यांनी साकारलेली रूपे पाहून उपस्थितांचा ऊर अभिमानाने भरून आला. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे प्रदान करण्यात आली.
हिंदुत्व, मराठी बाणा, सांस्कृतिक वारसा आणि राष्ट्रभक्तीचा हा अभूतपूर्व संगम डोंबिवलीकरांच्या एकजुटीचे दर्शन घडवणारा ठरला.
[ Gudi Padwa 2026, Gudi Padwa Shobhayatra, Navvarsh Swagatyatra, Hindu Navvarsh, Hindu New Year, Dombivli Swagatyatra, Vande Mataram 150, RSS@100, Cultural Events In Dombivli, Shree Ganesh Mandir Sansthan Dombivli, Dombivlikar, Aapla Ravi ]