HUM Charitable Trust

HUM Charitable Trust Jodo jammu-kashmir
Integration through
Education,
Cultural exchange,
Tourism.

दोन तास आपल्या जवानांसाठी .........जयहिंद🇮🇳
28/07/2023

दोन तास आपल्या जवानांसाठी .........

जयहिंद🇮🇳

24/07/2023
It was an eventful  fortnight for 'Hum CharitableTrust', full of activities in the UT of Jammu-Kashmir. It began with th...
04/05/2023

It was an eventful fortnight for 'Hum CharitableTrust', full of activities in the UT of Jammu-Kashmir.
It began with the 4th group of tourists vising the welfare projects from 20th of April to 25th of April. The tour which is fast becoming popular, in as much that we have to hold registration n people for the next visit. The 4th group visit finished with accustomed smoothness on 25th.
On 27th we started receving the team members for medical camps in the kashmir valley, around Srinagar.
Immediately on arrival n after a brief inaugural function, the groups divided into 5 teams (each consisting of a male n female doctor n 2 volunteers tohelp with registration n medicines) went to their destinations the same day for the night halt.
The response for the camp was overwhelming both in numbers n in the affection with which the team was greeted by the locals. Some data about the camps;
A- 1st day Kachan(167), 2nd day Tullaeagh (85) ( Gamderbal district)
B- 1st day Hard Shoora (105), 2nd day Gund Maqsood 97 ( Baramulla district)
C- Nagdandi(Anantnag district) 1st day 84, 2nd day 102
D- 1st day Haeef Shirmal 144, 2nd day Newa 119 (Pulwama district
E- Chara-E-Sharif, Kandijan 164 Chrivan 167 (Budgam district)

Thanks to all the participating doctors Dr. Jayant Gokhale and his son Dr. Shreeram Gokhale, Dr. Pramod Bahekar, Dr. Sujata Bharambe, Dr. Gayatri Kulali, Dr. Sunita Shintre, from Dombivli
Dr. Dhananjay Wagh, Dr. Eknath Jagtap and Dr. Suchita Saoji from Kalyan,
Dr. Sangeeta Bansode from Navi Mumbai.
The doctors, not only paid for their travel from Mumbai to Sribagar n back ( as do all volunteers travelling to Jammu or Srinagar, travelling at their own cost) but they also helped us with the medicines.
With this exercise, we feel we have reached out n connected with1,234 patients, around 500 families in 10 villages in 5 districts.
Thanks to Sewa Bharati n National Medicos Organization for the opportunity Given to Hum trust n facilitate the camps🙏

शिक्षित आणि साक्षर ...काल जम्मूजवळ पौनीचक ईथे सेवा भारती संचालित मुलींचे वसतिगृह पाहण्याचा योग आला.तिथल्या मुली, संचालक ...
21/04/2023

शिक्षित आणि साक्षर ...

काल जम्मूजवळ पौनीचक ईथे सेवा भारती संचालित मुलींचे वसतिगृह पाहण्याचा योग आला.
तिथल्या मुली, संचालक यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली.

तसाही माझा गेली काहीं वर्षे जम्मू - काश्मिर मधली प्रशासकीय घडीशी व्यावसायिक भूमिकेतून संबंध आहे.
त्यातूनच कुठेतरी सामाजिक नोंदी मनाने टिपल्या आहेतच.
या वसतिगृहातून बाहेर पडत असतानाच पूंछ जवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ५ भारतीय सैनिक मृत्युमुखी पडल्याची बातमी कळली.

बाहेर गारांचा पाऊस आणि मनात विचारांचा शॉवर एकदम सुरू झाला.

त्या वसतिगृहात जशा हिंदू मुली आहेत , तशा बुद्ध आणि अगदी मुसलमान मुलीही आहेत. त्यानात भारतीय ( केवळ हिंदू नाही ) , संस्कृति सांगितली जाते आहे.
मुसलमान मुली या वसतिगृहात राहताना रोजा पाळू शकतात . ही केवळ सैद्धांतिक भूमिका नाही.
नव्हे . प्रत्यक्षात पाळतात.
त्याचवेळी " भारतीय " रीतिरिवाज ही सगळेजण आवर्जून पाळतात.

काल या वसतिगृहात काहीं तास व्यतीत केल्यावर ( घालवल्यावर मुद्दामून म्हणलेले नाही. ) माझीच मला लाज वाटली. कारण सायकालीन प्रार्थनेत त्यांनी सरस्वती स्तवन केले.
" या कुंदेंदू...." नंतरची कडवी मी गेल्या ४० -४५ वर्षात म्हणलेलीच नाहीत. अशी काही कडवी आहेत हे माहीत होते ; पण शब्द पार विसरून गेलो होतो.
ती कडवी तुम्हीं सावकाश म्हणा , मी भराभर लिहून घेतो हे त्या मुलींना सांगायची मला हिम्मतच झाली नाही.
( अगदी खरं सांगायचे तर लाज वाटली. )

दिवेलागणीच्या वेळी देवाशी दिवा लावताना , नंतर सायंस्तोत्रं म्हणताना उघड्या , बोडक्या डोक्याने वावरायचे नाही हा संकेत फार सुंदर पाळला जाणे हा सुखद अनुभव होता. सगळ्यानी ओढणी डोक्यावर घेतली. ज्यांच्या ड्रेसला ओढणी नव्हती त्यांनी हातरुमाल किंवा नॅपकिन डोक्यावर घेतले.
आई खूप आठवली...
हा अनुभव मी गुढीपाडव्याच्या दिवशीही घेतला होता. यावर्षी गुढीपाडव्याला दोन काश्मिर स्थित विद्यार्थी आमच्या घरी राहायला आले होते. त्यांना औक्षण करुन घरात येताना त्यां दोघांनी रुमाल डोक्यावर घेतले. कॅप काढून टाकली.
घरात आल्या आल्या हात - पाय धुवून घरातल्या सगळ्या ज्येष्ठांना नमस्कार केला.
हे सारे आपण कधीच विसरून गेलो आहोत.

या वसतिगृहातील मुलींना १२ भारतीय भाषा , निदान कामचलाऊ स्वरूपात का होईना , येतात. निदान त्या कळतात. त्यातली मोजकी का होईना गाणी येतात. आवडीनुसार त्या त्या भाषेतील पुढच्या शिक्षणाची सोय आहे.
आपल्या व्यावसायिक जीवनात सुध्दा , अनेकदा मोठ्या शहरात , सर्व सुविधा उपभोगत जगताना सुध्दा मला मातृभाषा - हिंदी - इंग्लिशच्या पलीकडे आपली गाडी जात नाही.
एकवेळ या ३ भाशांव्यातिरिक्त परदेशी भाषा आपल्याला येतात
; पण भारतीय भाषा ....

नंतर त्या वसतिगृहातील वरिष्ठ मंडळींशी बोलताना कलम ३७० चा विषय निघणे अपरिहार्य होते. हे कलम रद्दबातल झाल्यावर परिस्थिती नक्कीच बदलते आहे. अपेक्षित वेगाने बदलते आहे की नाही हा वादाचा नाही तरी चर्चेचा मुद्दा नक्कीच आहे. दिशे बाबत माञ हा आणि असा प्रश्न नाही.
कायदेशीर परवानगी असणे आणि ती परवानगी अंमलात आणणे यात असणारा फरक पदोपदी - क्षणोक्षणी जाणवतो आहे असे नसले तरी ती वस्तुस्थिती नक्कीच आहे.
आणि याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे सरकारी कागदपत्रे एका विशिष्ट भाषेत असणे आणि त्याबद्दल काश्मिरी खोऱ्याबाहेरची बहुतांश जनता अनभिज्ञ असणे हे आहे. एखादी भाषा कळणे आणि ती भाषा लिहिता - वाचता - बोलता येणे यातला हा फरक आहे.

सहज वाटून गेले
हाच प्रश्न असा नाही
काळाच्या ओघात आपण सगळे " शिक्षित " ( Educated ) असण्यापेक्षा फक्त " साक्षर " ( Literate ) झालो आहोत .

चन्द्रशेखर टिळक
२१ एप्रिल २०२३ .

हम चॅरिटेबल ट्रस्ट चा सांस्कृतिक सोहळ्यास आज दणक्यात आरंभ झाला.जम्मू येथून आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी पावसानेही द...
21/03/2023

हम चॅरिटेबल ट्रस्ट चा सांस्कृतिक सोहळ्यास आज दणक्यात आरंभ झाला.
जम्मू येथून आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी पावसानेही दमदार हजेरी लावली.
आमच्या पाठीशी सदैव असणाऱ्या फाटक काकूंच्या 'सर्वेश' हॉलमधे हम च्या कार्यकर्त्यांनी पाहुण्यांचे कुंकुम तिलक, अत्तर, चाफ्याचे फुल आणि पेढा देऊन पारंपारिक पद्धतीने स्वागत केले.
सकाळी १० ते १२.३० या वेळात संस्कार भारतीच्या कलाकारांनी विद्यार्थ्यांना रांगोळी प्रशिक्षण दिले. मुलांनी अत्यंत हौसेने सर्व शुभचिन्हे आणि रांगोळ्या शिकून घेतल्या. कलेचे, सांस्कृतीचे आदानप्रदान याचबरोबर संस्कार भारतीचे तरुण कलाकार आणि जम्मूतील तरुणाई यांच्यामधे झालेला 'संवाद' हा फार महत्वाचा आहे. याचसाठी ' हम ' ची सारी धडपड आहे.
असेच विवीध कार्यक्रम चार दिवस चालुच रहातील. त्याची वार्ता तुमच्यापर्यंत येत राहील.
मंडळी या साऱ्या सोहळ्यात सामिल होण्यासाठी उद्या नववर्ष स्वागत यात्रेत मोठ्या संख्येने सामिल व्हा.
जोडो जम्मू-कश्मीर!
हम साथ साथ है!!

14/11/2022

धर्म जागरण महिलांचा सत्संग!

"चलो जम्मू" प्रकल्प भेट सहल तिसरी दिवस पाचवा:आजचा दिवस जरा निवांत सुरु झाला आणि एका वेगळ्याच वळणावर येऊन संपला.आज पुरमंड...
14/11/2022

"चलो जम्मू" प्रकल्प भेट सहल तिसरी
दिवस पाचवा:
आजचा दिवस जरा निवांत सुरु झाला आणि एका वेगळ्याच वळणावर येऊन संपला.
आज पुरमंडल या ठिकाणाला भेट द्यायला निघालो. जम्मूपासून 22किमी अंतरावर पुरमंडल हे शंकराचे स्थान आहे. गंगा नदीची बहीण देविका हीचे मोठे पात्र आहे. हे पात्र कोरडे असते पण जिथे थोडेसे उकरावे तिथे पाणी लागते. हिलाच गुप्तगंगा असेही म्हणतात. येथे एक पुरातन शिवालय आहे. येथे शिवाची पिंड एका खोलगट कपारीत आहे. त्या पिंडीवर कितीही अभिषेक केला तरी त्यातील पाण्याची पातळी वाढत ही नाही की कमीही होत नाही.
या शिवालयाच्या खालच्या बाजुला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय आहे. एक मोठा वाडा आहे तो. जिथे एक वाचनालय आहे .ज्यामधे चारी वेद, अठरा पुराणे रामचरीतमानस असे अनेक धर्मग्रंथ अतिशय छान पद्धतीने मांडली आहेत.
धर्म जागरणच्या वतीने तिथे स्त्रियांचा एक सत्संग ग्रुप आहे. त्या गावातील २५ एक बायका, तरुण मुली एकत्र येतात व भजन,पूजा असे कार्यक्रम करतात.
जम्मू-कश्मीर मधे त्यांचे महीने पौर्णिमेपासून बदलतात. त्यांचा मार्गशीर्ष त्रिपुरीपासूनच सुरु झाला आहे. आज तिथे श्रीमद्भगवत्गीता पाठ सुरु होते. आपल्याकडे भागवत सप्ताह असतो तसा तिकडे श्रीमद्भगवत्गीतेचा सप्ताह असतो.
त्याचे पठण केले जाते. तिथे आम्हालाही त्यांनी भजनात दंग करुन टाकले.
कश्मीर बरोबर जोडशब्द म्हणून येणाऱ्या जम्मूमधील ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्यामधे हे उल्लेख येत नाहीत.ही ठिकाणे दाखवली जात नाहीत.
संघपरीवाराने सततच्या प्रयत्नाने टिकवून ठेवलेला हा आपला धार्मिक वारसा आहे.
आता या सत्संगासाठी जमणार्‍या महिलांना एकत्र करुन संगीता नशिराबादकर यांनी शिलाईवर्ग सुरु केले आहेत. हम चॅरिटेबल ट्रस्ट नी त्यांना शिलाई मशीन घेऊन दिली आहेत.
आमच्या सहलीतील एका महीलाग्रुपने तिथे दोन पंखे घेण्यासाठी रक्कम काढून दिली आणि हम साथ साथ है हा विश्वास दिला.
त्यानंतर भेट होती सुचेतगड बॉर्डर. जिथून समोर पाकिस्तान पोस्ट. 10 किमीवर सियालकोट. संध्याकाळी पाच वाजता बॉर्डर बंद होते. त्यानंतर तिथे राष्ट्रभक्ती गीतांचा कार्यक्रम मग परेड असे सगळे भारावून टाकणारे कार्यक्रम होते.आपल्या जवानांवर आपले असलेले प्रेम व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम.
हे सगळे खरे असले तरी माझं मन काही तिथे रमत नाही. एकाच आभाळाखाली असलेली जमिन दुभंगून गेली. मी भारत देशाचा नागरीक आहे असा अभिमान बाळगणारे लाखो लोक क्षणात निर्वासित झाले. हे सगळं आठवत
रहातं.
आज विकासजी आमच्याबरोबर होते. ते आम्हाला शहीद मेजर अरविंद बझाला यांच्या घरी घेऊन गेले. श्रीनगरला हॅलिपॅडच्यावर 100 मीटरवर हेलिकॉप्टर बंद पडले आणि त्या आपघातात पायलट अरविंद यांचे निधन झाले. त्यांची एकेक गोष्ट जतन करून ठेवलेले हे घर. आई वडील त्याच्याविषयी भरभरून बोलत होते
सुरक्षित राष्ट्र आणि आपल्या सुरक्षित आयुष्याची किंमत किती मोठी आहे याची जाणीव प्रखर करणारा आजचा दिवस होता.
या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आजचा ट्रीप चा शेवटचा दिवस संपला.
- नंदिनी

12/11/2022

डांगरी शाळेत विद्यार्थ्यांनी केलेले स्वागत

"चलो जम्मू" प्रकल्प भेट सहल तिसरी दिवस चौथा:आजची सकाळ होती रजौरीच्या नयनरम्य परीसरात,थोड्याशा बोचर्‍या थंडीत, आणि पाठीमा...
12/11/2022

"चलो जम्मू" प्रकल्प भेट सहल तिसरी
दिवस चौथा:
आजची सकाळ होती रजौरीच्या नयनरम्य परीसरात,थोड्याशा बोचर्‍या थंडीत, आणि पाठीमागे पीरपंजालच्या बर्फाच्छादित डोंगर रांगा पार्श्वभूमीवर वसतीगृहातील मुलांची प्रातःप्रार्थना.
त्या मुलांना ब्रह्मनादाविषयी मृदुला मॅडमनी माहीती दिली. तिथल्या कोवळ्या उन्हात बसून नाश्ता करून वसतीगृहाचा निरोप घेतला.
तिथून बलिदानभवन बघायला गेलो.

" बलिदान भवन " विषयी आमचे प्रवासी श्री.चंद्रशेखर टिळक यांनी केलेले वर्णन
"ही केवळ इमारत नाही.
एक भावना - मंदिर आहे.....
आपण सगळ्यांनी आवर्जून जावे असे....
तरीही कोणतीही पर्यटन कंपनी आपल्या प्रवाशांना नेत नाही असे..,
कदाचित त्यानांही माहिती नाही असे!
आणि म्हणूनच आपण आपणहून गेले पाहिजे.
( आम्ही दोघं हम फाउंडेशन बरोबर आलो आहोत. )
१९६४ साली झालेल्या पाकिस्तान विरुध्दच्या युद्धात पाकिस्तानी फौजा राजौरी पर्यन्त पोचल्या होत्या. नदीच्या एका किनाऱ्यावर भारतीय फौजा आणि दुसऱ्या किनाऱ्याला पाकिस्तानी फौजा.
भारतीय सैन्याची सर्वार्थाने स्थिती जरा नाजूक अशी अवस्था.
त्यावेळी राजौरीच्या सर्वसामान्य नागरिकांनी भारतीय फौजांबरोबर उभे राहायचे ठरवले. पण त्यावेळी त्या नागरिकांच्या मनात एक भीती भेडसावत होती. ती म्हणजे जर काही मागे - पुढे झाले आणि पाकिस्तानी फौजा राजौरीत शिरल्या तर घरातील विविध वयोगटातील स्त्रियांवर काय, किती, कसा अनावस्था प्रसंग ओढवेल ?
आणि म्हणून अनेकांनी आपल्या हातांनी आई - बायको - बहीण - वहिनी - मुलगी यांची हत्या केली आणि नंतर ते भारतीय फौजांबरोबर युद्धात उतरले.
या युद्धात विजयी झाल्यावर या युद्धासाठी असे आगळे - वेगळे बलिदान दिलेल्या माता - भगिनींच्या स्मृती - प्रीत्यर्थ १९६९ साली उभारलेले श्रद्धास्थळ म्हणजे ....." बलिदान भवन"
याठिकाणी नमन करून आम्ही डांगरी येथील भारतीय विद्यामंदिरास भेट द्यायला गेलो. टाळ्यांच्या कडकडाटात आमचे स्वागत झाले.
डांगरीची ही शाळा काहीकाळ अतिरेक्यांच्या ताब्यात होती, मग ती जागा रिकामी करवून घेऊन शाळा सुरू झाली . आता हळूहळू ती आकार घेत आहे. "या आमच्या व्हेंटीलेटर वरून बाहेर खेचून काढलेल्या पेशंटसाठी काही मदत करुया" असे आवाहन श्री. मनोज नशिराबादकर यांनी केले.आज आपली शाळा तिथे नसेल तर ते विद्यार्थी गव्हर्न्मेंट स्कूलमधे जाणार, ज्या मदरशाच्या धर्तीवर चालतात.
या सगळ्या प्रश्नाचा विचार करत परतीचा प्रवास सुरू झाला.
संध्याकाळी अखनूर येथील पांडव गुंफा बघितल्या. चिनाब नदीच्या काठी वसलेला हा सुंदर परीसर. अज्ञातवासात पांडव त्याठिकाणी एक वर्ष वास्तव्यास होते. श्रीकृष्ण आणि पांडवांची खलबतं जिथे चालत अशी एक छोटी गुंफा पण तिकडे आहे.
रात्री जेवणाच्या वेळी श्री. विकास मनहास यांच्यासह बातचीत हा अजूनच वेगळा अनुभव.
फौजी लोकांविषयी ते भरभरून बोलतात तेवढेच कामही करतात. भारतातून बाहेर पडणाऱ्या तरुण पिढीला थांबवणे, हे प्रत्येक पालकाचे परमकर्तव्य आहे असाही एक विचार त्यांनी प्रभावीपणे मांडला.
अशा विवीध विषयांचा गुंता सोडवत आजचा दिवस संपला.

नंदिनी

11/11/2022

योगवर्ग

Address

301, Nirmala Sadan, Sant Namdev Path, Gopal Nagar, Lane No. 1
Dombivli
421201

Telephone

+919930231590

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when HUM Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to HUM Charitable Trust:

Share