27/01/2025
*कॅटॅलिस्ट हा नवीन कोर्स ध्रुव सुरु करतंय त्या निमित्ताने* ...
काल २६ जानेवारी साजरा झाला. प्रजासत्ताक दिन ! *हम करे राष्ट्र आराधन* हे गीत अशा दिवशी विशेषतः सहजच मनात रुंजी घालतं. अगदी लहानपणी पाहिलेल्या चाणक्य सिरीयल पासून. सर्व प्रजेला सुखदायी वाटणारं आश्वासक राज्य निर्माण व्हायचं असेल तर तसे *कर्तव्यदक्ष अधिकारी* निर्माण व्हायला हवेत यासाठी ध्रुव सातत्याने प्रयत्नशील आहे.
विशेषतः कोविड नंतर शालेय ते महाविद्यालयीन मुलांच्या अभ्यास, ऑनलाईन शिक्षण पद्धती मुळे शिकण्यात शिरलेले दोष, नियोजन बद्ध पद्धतीने विचार करण्याची क्षमता यात खूपच फरक पडलेला दिसतो. अनेकांच्या विचारात वर्तमानाची सजगता नाही आणि भविष्याची सखोल मांडणी नाही. आपल्या क्षमता आणि स्वप्ने, इच्छा यांच्यातही अंतर पडलेलं दिसतंय. ज्यांच्यात क्षमता आहे अशा मुलांना तशा धर्तीचं वातावरण मिळत नाही. वातावरण असेल तर दिशा मिळत नाही. यावर उत्तर शोधत होतो. ते मिळालंय असं दिसतंय.
सोळा वर्षांच्या आपल्या सजग अनुभवाच्या पार्श्वभूमीवर ध्रुव आय. ए. एस. अकॅडमी *कॅटॅलिस्ट हा नवीन कोर्स* आपल्यासमोर घेऊन येतेय. इयत्ता *आठवी आणि नववीत* जाणाऱ्या *महत्वाकांक्षी शालेय* *मुलांसाठी* हा कोर्स आम्ही सुरु करत आहोत. आपल्या मुलांनी चांगला अधिकारी होणं ही सगळ्यांचीच इच्छा असते, अपेक्षा असते. पण त्यासाठी लागणारे नेतृत्वगुण, बुद्धी, व्यापकता हे ३-४ दिवसांच्या कॅम्प मध्ये किंवा एक-दोन सत्रांमध्ये विकसित होत नाहीत. त्यासाठी *सातत्यपूर्ण प्रोसेस* तयार करावी लागते. मुलांच्या *बुद्ध्यांकाबरोबरच* (IQ) *भावनांकाचा* (EQ) विकास घडवणे, *अभ्यास कौशल्य* , *तुलनात्मक विचार* , *टीम वर्क* , *निर्णयक्षमता* , *सवयी* , *नियोजन कौशल्य* अशा अनेक पैलूंवर काम केले तर त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व घडेल. *अभ्यास कौशल्य, *अनुभव, अनुकरण, अभिव्यक्ती, अविष्कार* अशा विविध अंगाने मुलांच्या क्षमता विकसित करण्याचा हा प्रयत्न आहे. विविध तज्ज्ञांच्या साथीने मुलांमधील संवेदनशील परंतु स्व अभ्यासातून निर्णय घेणारं नेतृत्व विकसित करणं हा मूळ हेतू. *ऍप्टिट्यूड टेस्ट* घेऊन वैज्ञानिक अंगांनी त्यांच्या सद्य स्थितीचा अदमास घेत *इनडोअर आणि आऊटडोअर activitis* आणि *क्लासरूम कोचिंग* अशा अनेक माध्यमातून हा कोर्स मुलांना समृद्ध करेल. तुम्हाला याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर जरूर कॉल करा / भेटा. तुमच्या ओळखीतल्या पालकांना पाठवा.
*ध्रुव आय ए एस अकॅडमी*
C -३०१, झेन क्लिनिक च्या वर, वैभव बिल्डिंग, कस्तुरी प्लाझा समोर, मानपाडा रोड डोंबिवली पूर्व.
भेटायला येण्याआधी खालील गूगल फॉर्म भरून वेळ निश्चित केलीत तर बरे पडेल.
*गुगल फॉर्म लिंक*
https://forms.gle/A5rhoUi1i1dJ8DoG6
*संपर्क:* ७९७७ ५५४ ९५५ / ९८१९ ७७३ ९७०.