30/04/2026
*रविवारी धरणगाव हेरिटेज वाॅकची :*
*ज्योतीदेवी गो-सेवा आश्रमाला भेट :*
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
रसिक मित्रांनो. आपल्या *हेरिटेज वाॅक* च्या सलग ८व्या उपक्रमाअंतर्गत *रविवार दि. ३ मे* रोजी आपण सकाळी ८.३० वा निशाणे फाटा येथील येथील *ज्योतीदेवी गो-सेवा आश्रमा* ला भेट देणार आहोत. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून *श्री मुकेश बयस* आणि कार्यक्रमाध्यक्ष म्हणून *मा. जिवनआप्पा बयस* हे आपल्या सोबत उपस्थित राहणार आहेत.
*ज्योतीदेवी गो-सेवा आश्रम* ही धरणगांव तालुक्याची एक नवी ओळख बनू पहात आहे. गो-संवर्धन, गो-वंशाचे जतन आणि गोमातेचा गौरव करणारे बयस परिवार एक पुण्याचे कार्य करीत आहे. त्यांचे श्रध्देय प्रयत्न जाणून घेणे आणि गोमातेविषय कृतज्ञता व्यक्त करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आपल्या परिसरात गो-सेवेच्या होत असलेल्या कार्याची ओळख करुन घेण्यासाठी आपण आवश्य उपस्थिती द्या.
*सर्वांनी ८ वा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जमावे.*
वाहनाची व्यवस्था होणार आहे.
*सर्वांनी उन्हाची काळजी घ्यावी. पाणी बाॅटल सोबत आणावी*
*समन्वयक
*जैनेंद्र जैन (नाशिक)*
( ९८२३० ८९११७)
*प्रा.बी.एन.चौधरी (धरणगाव)*
(९४२३४९२५९३)